ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Oct-2017   
Total Views |
Vaibhav patl, macpower cnc machines pvt. Ltd., twin spindle cnc lathe machine, types of twin spindle lathe machine
 
सी.एन.सी. म्हणजे कॉम्प्युटराईज्ड न्युमरिकल कंट्रोल किंवा मराठीत भाषांतर केले तर, संगणकीय संख्यात्मक नियंत्रण होय. याचा अर्थ असा की, सी.एन.सी. लेथ मशिन संगणकाने नियंत्रित केली जाते. हे मशिन आपोआप आपली कामे करते.
 
परंपरागत लेथ मशिनवरील सर्व हालचाली स्वतः ऑपरेटरला नियंत्रित कराव्या लागतात, तर सी.एन.सी. लेथ विशिष्ठ कामासाठी एका कुशल तंत्रज्ञाने तयार केले (प्रोग्रॅम आणि सेटअप केला) की, मग कार्यवस्तू मशिनवर लोड करणे, हिरवे बटण दाबणे आणि भागाची तपासणी करणे, ही कामे एक साधारण कौशल्य असलेला ऑपरेटरही करू शकतो. परंपरागत लेथवर मात्र, प्रत्येक भाग बनविण्यासाठी कुशल ऑपरेटरची आवश्यकता असते.
 
सी.एन.सी. लेथ मशिन संगणकीय संख्यात्मक नियंत्रकाने नियंत्रित केले जाते. 0.001 मिमी. इतकी अचूकता देण्यासाठी या लेथ मशिनच्या प्रत्येक आसाला एक सर्व्हो मोटर व एनकोडर जोडलेला बॉल स्क्रू असतो. G आणि M कोड्स आणि कार्टेशिअन कोऑरडिनेटस्द्वारे यंत्रभागाची भूमिती, त्याचबरोबर मटेरिअलचा सुरुवातीचा व्यास (स्टार्ट डायमीटर) आणि मशिन टूलच्या अनुक्रमे उभ्या आणि आडव्या आसांशी संबंधित चकच्या बाहेर आलेल्या रफ स्टॉकचे स्थान प्रोग्रॅमद्वारे नियंत्रित केलेले असते. स्वयंचलित टूलमधील प्रत्येक टूलला इतर टूल तसेच, चक आणि यंत्रभागाच्या मुळस्थितीशी त्याच्या असलेल्या संबंधाबद्दल शिक्षित (प्रोग्रॅम्ड) करावे लागते. सी.एन.सी. लेथमध्ये मिलिंग टूलचा पर्यायही असू शकतो, ज्याद्वारे त्याच्या आसांच्या संख्येत वाढ होते.
 
ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ या मशिनमध्ये नावाप्रमाणे एकाऐवजी दोन स्पिंडल असतात. ट्विन स्पिंडल लेथ मशिनचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
 
ट्विन स्पिंडल डबल टरेट
 
दोनही स्पिंडल एकाच वेळी काम करून एकाचवेळी दोन पार्ट्सची निर्मिती करतात.

Twin spindle double tray 
 
ट्विन स्पिंडल सिंगल टरेट
 
या प्रकारामध्ये एकच स्पिंडल काम करतो, दुसरा स्पिंडल स्थिर असतो.
 
Twin spindle single tray
 
ट्विन स्पिंडल लिनिअर टाईप सिंगल टूल स्लाईड
 
या प्रकारामध्ये एकच स्पिंडल काम करतो, दुसरा स्पिंडल स्थिर असतो आणि टरेटऐवजी एक लिनिअर स्लाईड असते.

Twin spindle linear type single tool slide 
 
ट्विन स्पिंडल लिनिअर टाईप डबल टूल स्लाईड
 
या प्रकारामध्ये दोन्ही स्पिंडल एकाच वेळी काम करतात आणि दोन टरेटच्या ऐवजी दोन लिनिअर स्लाईड असतात.
 
Twin spindle linear type double tool slide
 
ट्विन स्पिंडल सिंगल टूल स्लाईड
 
या प्रकारच्या लेथ मशिनमध्ये दोन स्पिंडल आणि एक टूल स्लाईड बसविलेली असते. यंत्रभागाच्या एका बाजूचे मशिनिंग एका स्पिंडलवर तर दुसऱ्या बाजूचे मशिनिंग दुसऱ्या स्पिंडलवर करता येते. परंतु या मशिनमध्ये एकावेळी फक्त एकच स्पिंडल काम करतो, त्यावेळी दुसरा स्पिंडल स्थिर (आयडियल) असतो.
 
अशा प्रकारच्या मशिनमुळे आणखी एका मशिनला लागणाऱ्या वर्कशॉप फ्लोअरच्या जागेची, एका ऑपरेटरची बचत होते. कार्यवस्तू एका माशिनवरून दुसऱ्या मशिनवर हलवावी लागत नसल्यामुळे वेळेची बचत होते. कार्यवस्तू हाताळण्याच्या संख्येमध्ये घट झाल्यामुळे तिचा दर्जा व सुसंगतपणा यात वाढ होते.
 
ट्विन स्पिंडल सिंगल टरेट
 
या प्रकारच्या लेथ मशिनमध्ये दोन स्पिंडल व एक टरेट असते. जे यंत्रभाग बनविण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात, असे यंत्रभाग या मशिनच्या सहाय्याने बनवता येतात. टरेटच्या प्रकारानुसार आपण 8, 12, 16 किंवा 24 टूल्स वापरू शकतो.
 
Twin spindle cnc Lathe machine
 
ट्विन स्पिंडल डबल टरेट
 
सिंगल स्पिंडल लेथ मशिनद्वारे एक यंत्रभाग किंवा एका कंपोनंटच्या एकाच यंत्रभागाचे मशिनिंग आपण करू शकतो, परंतु ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिनद्वारे दोन यंत्रभागांचे मशिनिंग एकाचवेळी करणे शक्य होते. जास्तीचा एक स्पिंडल जोडल्याने आपण उत्पादनक्षमता वाढवू शकतो व प्रति यंत्रभाग खर्च कमी करू शकतो. ऑटोमोबाईलसारख्या कंपन्यांमध्ये, ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर यंत्रभागांचे मशिनिंग एकाचवेळी करणे आवश्यक असते अशा ठिकाणी या प्रकारच्या सी.एन.सी.लेथ मशिन्स फार उपयुक्त ठरतात.
 
अचूक मशिनिंग व उत्पादनशक्तीच्या समय कौशल्याची गरज असलेल्या काळात आम्ही म्हणजे ’मॅकपॉवर कंपनी’ने या दोन्ही महत्त्वाच्या विषयांना ट्विन हेड सिंगल स्लाईड सी.एन.सी. लेथ मशिनद्वारा संबोधित केले आहे. त्याद्वारे सिंगल मशिन्सऐवजी ग्राहकांना अमूल्य उपाय देऊ केला आहे.
 
ट्विन स्पिंडल लिनिअर टूलिंग मशिनमुळे वाया जाणारा वेळ (आयडल टाईम) कमी होतो. परिणामी कमी मनुष्यबळ, संकलित उत्पादनशक्ती, अधिक मार्जिनमुळे ग्राहकाला फायदा देऊ केला आहे. ट्विन श्रेणीमध्ये (सेरीज) वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन्स कंपनीने उपलब्ध केल्यामुळे ग्राहकाच्या सद्य स्थितीतील गरजा भागविल्या जातात. ग्राहकाला अधिक निवड करण्याची संधी मिळते. कमी खर्चात अधिक उत्पादन केल्याने ग्राहकाला त्याचा फायदा होतो.
 
ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिनचे फायदे
 
 
सिंगल स्पिंडल सी.एन.सी. लेथशी तुलना करता, ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिनचे फायदे पुढीलप्रमाणे दिसून येतात.
 
• झिरो आयडल टाईममुळे उच्च उत्पादकता मिळते.
 
• एकाच मशिनवर दोन सेटअप उपलब्ध असल्यामुळे यंत्रभागाच्या एका बाजूचे मशिनिंग एका स्पिंडलवर, तर दुसऱ्या बाजूचे मशिनिंग दुसऱ्या स्पिंडलवर एकाच वेळी करता येते.
 
• कमी मनुष्यबळ लागते.
 
• कमी जागा (फ्लोअर स्पेस) लागते.
 
• एका स्पिंडलवर काम चालू असताना, ऑपरेटर दुसऱ्या स्पिंडलवरील पूर्ण झालेली कार्यवस्तू काढून घेऊ शकतो.
 
केस स्टडी
 
ट्विन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिन


Twin spindle single tray lathe machine 
 
एक स्पिंडल आणि दोन स्पिंडल सी.एन.सी. लेथ मशिनमध्ये तुलना करण्यासाठी 3 हजार यंत्रभागांच्या एका गटावर एक - स्पिंडलची दोन मशिन्स वापरून प्रक्रिया केली. दुसऱ्या गटावर एका दोन-स्पिंडल मशिनवर प्रक्रिया केली. दोन्ही प्रक्रिया करताना बाजार भावाप्रमाणे प्रति तास दर लक्षात घेतला, ज्यामध्ये सर्व खर्च म्हणजे मशिनचा दर, ऑपरेटरचा दर, जागेचा दर, वीज, टूल्स, तेल आणि नफा यांचा समावेश होता.

Nut 

Table no. 1 

Table No. 2 

Table No. 3 
 
ट्विन स्पिंडल सी. एन. सी. लेथ मशिन वापराचे फायदे
 
1. प्रतिभाग उत्पादन खर्चात घट : रु.16.88 वरून रु.11.2 (33.64%)
 
2. मशिनच्या संख्येमध्ये घट - 2 वरून 1, त्यामुळे लागणाऱ्या जागेची बचत (40 चौ. फू., 16.66%)
 
3. मनुष्यबळात घट - 2 ऐवजी 1 ऑपरेटर (50% बचत)
 
निष्कर्ष
 
ट्विन स्पिंडल सी. एन. सी. लेथ मशिन वापरल्यामुळे उत्पादन दरात घट होते. उत्पादन विभागास कमी जागा लागते, मनुष्यबळ कमी लागते, वेळेची बचत होते, एकूण उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे उत्पादकाला अधिक फायदा होतो आणि यंत्रभाग कमी किंमतीत विकल्याने ग्राहकाचा फायदा होतो. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/स्थानिक स्पर्धेत सरस ठरण्यास उपयोग होतो.

वैभव पाटील ’मॅकपॉवर सी.एन.सी. मशिन्स प्रा. लि’. या कंपनीच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर आहेत.
@@AUTHORINFO_V1@@