आज्ञावलीची रचना (प्रोग्रॅम स्ट्रक्चर) आणि ब्लॉकचे स्वरूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Nov-2017   
Total Views |

Program structure and block format
 
मागील अंकात आपण कार्यवस्तूचे यंत्रचित्र आल्यानंतर मशिनवर प्रोग्रॅमिंग करण्यासाठी काय पूर्वतयारी करायची ते बघितले.
या लेखात आपण प्रोग्रॅमिंगच्या सुरवातीच्या पायर्‍या समजून घेणार आहोत.
 
प्रोग्रॅम बनविताना विशिष्ट शिस्त पाळावी लागते. प्रोग्रॅममधील प्रत्येक भाग आणि ओळ ठराविक माहितीच मशिनला देतात. तक्ता क्र.1 आणि 2 मध्ये याचे उदाहरण दिले आहे.
 
आज्ञावलीमध्ये G आणि M अक्षरांचा वापर केला जातो. आपल्याला टूल विविध अक्षातून कसे फिरवायचे आहे याची आज्ञावली करताना G अक्षर (G-00 पासून G-99) वापरले जाते. याला ’प्रिपरेटरी फंक्शन’ म्हणतात. M अक्षर(M-00 पासून M-99) वापरून इतर कामांची (मिसलिनियस) आज्ञावली लिहिली जाते. या आज्ञावलीमध्ये वेगवेगळे ब्लॉक असतात. प्रत्येक ब्लॉक काही अक्षरे आणि आकडे वापरून तयार केलेली एक ओळ असते आणि ती ओळ आज्ञावलीतील एक पायरी असते. मशिन काम करताना एकावेळी एकाच ब्लॉकमधील माहितीनुसार काम करते.
 
आज्ञावलीची रचना साधारणपणे खालीलप्रमाणे असते.
Table No. 1
Table No. 2
Table No. 3 
 
उदाहरणार्थ, या ब्लॉकमधील माहिती समजून 2.5 मिमी नोज त्रिज्या असलेले टूल 0. 2 मिमी/रिव्होल्युशन वेगाने x अक्षावरील 30 आकड्यापर्यंत जाते.
 
सूचना - एकदा दिलेल्या G कोडमधील सूचना, नवा G कोड येईपर्यंत पाळल्या जातात.

Image 
 
चित्र क्र. 1 मधील 5 मिमी व्यासाचे भोक करण्यासाठी तक्ता क्र. 4 प्रमाणे आज्ञावली लिहिली जाईल.
 
Table No. 4
 
चित्र क्र 1 मधील फेसिंग आणि लांबीवरील रफिंग करण्यासाठी तक्ता क्र. 5 प्रमाणे आज्ञावली लिहिली जाईल. यासाठी T 0303 या टूलचा वापर होईल. यातील G71 पासून सुरू होणारा ब्लॉक रफिंगसाठी आवश्यक असलेली टूलची हालचाल कशी असावी ते ठरवितो.
 
Table No. 5
 
चित्र क्र 1 मधील फिनिशिंग करण्यासाठी तक्ता क्र. 6 प्रमाणे आज्ञावली लिहिली जाईल. यासाठी T 0404 या टूलचा वापर होईल.
 
आज्ञावली रचनेसाठी लागणारी माहिती

Table No. 6 
 
1. प्रोग्रॅम नंबर - 3911
 
2. रफ पार्ट व्यास - 70 मिमी, लांबी - 120 मिमी (+1 मिमी फिनिशिंग अलाऊन्स )
 
3. टूल्स
 
ड्रिलिंग- टरेट स्टेशन - 2
कॉल अप- T0202
रफिंग टूल टरेट स्टेशन - 3
कॉल अप- T0303
फिनिशिंग टूल - टरेट स्टेशन - 4
कॉल अप- T0404
 
4. मेटल वर्किंग डाटा
 
4.1 ड्रिलिंग फीड 0.1 मिमी/ रिव्हो
स्पिंडल स्पीड 2000 RPM, फीड - 0.2 मिमी/रिव्हो
 
4.2 फेसिंग- फीड 0.2 मिमी/रिव्हो
कॉन्स्टंट कटिंग स्पीड 200 मी/मिनिट
 
4.3 रफिंग फीड - 0.4 मिमी/रिव्हो
कॉन्स्टंट कटिंग स्पीड 200 मी/मिनिट
 
4.4 फिनिशिंग फीड - 0.15 मिमी/रिव्हो
कॉन्स्टंट कटिंग स्पीड 250 मी/मिनिट
 
4.5 वर्कपीस झिरो पॉईंट G59
चक + जॉ हाईट - 130 मिमी
+ रफ पार्ट लांबी - 120 मिमी
- फिनिश अलाऊन्स (-1) मिमी
पहिले ऑपरेशन - 249 मिमी
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंग क्षेत्रामधील तज्ज्ञ असून ते याबाबत सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथ विषयावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणक या विषयावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून पुस्तके लिहिली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@