उच्च प्रतीचा पृष्ठभाग देणारे स्वयंचलित FH3 मशिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    06-May-2017   
Total Views |
 
मशिनिंग क्षेत्रामधील अत्याधुनिक तंत्र पाहण्यासाठी जगभरातील उत्पादक हॅनोव्हरमध्ये भरणाऱ्या ’एचज’ प्रदर्शनाला भेट देतात. या प्रदर्शनात सादर झालेल्या काही निवडक उत्पादनांची ओळख करून देण्यासाठी आम्ही ‘हॅनोव्हरच्या खिडकीतून’ ही लेखमाला सुरू करत आहोत. लेखमालेच्या पहिल्या लेखात आपण स्टैहल लॅपिंग टेक्नॉलॉजीच्या FH3 मशिनविषयी माहिती घेणार आहोत.
 
’स्टैहल लॅपिंग टेक्नॉलॉजी लि.’ Stahli Lapping Technology Ltd. कंपनीने ’हॅनोव्हर 2017’ प्रदर्शनात ‘FH3 मशिन’ ही नव्याने विकसित केलेली संकल्पना सादर केली होती.
 
कंपनीविषयी थोडक्यात
 
’स्टैहल लॅपिंग टेक्नॉलॉजी लि.’ ही लॅपिंग आणि होनिंग तंत्रज्ञानातील स्विस मशिन उत्पादक कंपनी आहे. 50 कामगार असलेल्या या कंपनीत सपाट आणि गोलाकार कार्यवस्तूंचे (वर्कपीस) होनिंग, लॅपिंग आणि पॉलिशिंग करणारी मशिन विकसित करून त्याची बांधणी केली जाते.
 
मशिन निर्मितीचा उद्देश
 
दोन लोअर व्हील आणि अल्टरनेट टॉप ग्राईंडिंग व्हील असलेले स्टैहल कंपनीचे 3-व्हील प्लॅनेटरी कायनेमॅटिक मशिन हे सर्वांना परिचयाचे असले, तरी ते लोकप्रिय न झाल्याने मागील काही दशकांमध्ये ते बाजारपेठेत फार थोड्या प्रमाणात दिसले. या 3 व्हील व्यवस्थेमध्ये एका बाजूला लॅपिंग, होनिंग होत असताना दुसरीकडे कार्यवस्तू हाताने बदलता येतील अशी सोय होती. मात्र या व्यवस्थेमध्ये कमी गतीने यंत्रण होत असल्याने ही संकल्पना औद्योगिक क्षेत्रातून मागे पडली. त्यामुळे स्टैहलच्या DLM श्रेणीतील डबल साईडेड मशिनच्या गुणवत्तेसह स्पीड, फीड वाढवून आणि स्वयंचलन करून, कमी वेळात अधिक उत्पादन मिळावे या उद्देशाने स्वयंचलित ‘FH3 मशिन’ ही संकल्पना विकसित केली.
 
मशिन कसे काम करते?
 
‘FH3 मशिन’ संकल्पनेत आधुनिक रोबो तंत्रज्ञान आणि पूर्णपणे स्वयंचलित व्यवस्थेचा वापर करण्यात आला आहे. प्लॅनेटरी लॅपिंग मशिन किंवा फाईन ग्राईंडिंगच्या तुलनेत या मशिनचा मुख्य फायदा असा आहे की, यात कॅरिअर डिस्कला आपली जागा सोडावी लागत नाही. त्याऐवजी, दोन ग्राईंडिंग व्हीलची संपूर्ण लोअर ॲसेम्ब्ली, कॅरिअर आणि कार्यवस्तू 180 अंशात जागेवर गोलाकार फिरतात. गोलाकार फिरण्यातील अनुत्पादक वेळ हा केवळ 5 ते 10 सेकंद असतो. त्याऐवजी पारंपरिक प्रक्रियेत कॅरिअर लोडिंग-अनलोडिंग करण्यासाठी जवळपास 60 ते 90 सेकंद इतका वेळ लागायचा. पारंपरिक मशिनवर कार्यवस्तू, कॅरिअर मॅन्युअली हाताळाव्या लागत होत्या. या नवीन संकल्पनेत मानवावरचे अवलंबित्व काढून टाकत ते स्वयंचलित केले आहे. यासाठी विविध प्रकारचे स्टँडर्ड स्वयंचलित सेल वापरता येऊ शकतात. यामध्ये केवळ उचलणे आणि ठेवणे (पिक अँड प्लेस) एवढेच कार्य करावे लागते. कार्यवस्तू दातेरी कॅरिअर व्हीलवर बसविलेल्या असतात. हे व्हील प्लॅनेटरी गिअरच्या अंतर्गत आणि बाह्य पिन रिंगमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेत फिरत असतात. त्याचवेळेला होनिंग डिस्कच्या साहाय्याने (CBN किंवा सिंथेटिक रेझिनमधील डायमंड संच, सिरॅमिक किंवा धातू) मोठ्या पृष्ठभागावर घर्षण होते. फ्लॅट होनिंगमध्ये (किंवा फाईन ग्राईंडिंग) एका बाजूला होनिंगमधील क्रॉस हॅच फिनिश आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक ग्राईंडिंग ॲप्लिकेशनच्या तुलनेत खोलवर काप (कट) घेता येतो. या मशिनमध्ये सोप्या स्वयंचलित सेलद्वारे लोअर वर्किंग डिस्कवर थेट लोडिंग आणि अनलोडिंग होते. कॅरिअर व्हील हे वर्किंग डिस्कवरच राहतात आणि कार्यवस्तू स्वयंचलनाद्वारे बदलल्या जातात. मशिनची प्रक्रिया (प्रोसेसिंग) सायकल आणि मशिनबाहेर टेम्प्लेटचे लोडिंग संपले की, दोन सपाट (फ्लॅट) होनिंग डिस्कसह लोअर मशिन पार्ट, पिन रिंग आणि कॅरिअर व्हील 5 ते 10 सेकंदात 180 अंशामध्ये फिरतात.
 
मशिनचे कार्य समजण्यासाठी शेजारी दिलेला QR कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करा.
 
 
प्लॅनेटरी कायनेमॅटिक हे स्टैहलच्या DLM श्रेणीतील ‘टू डिस्क फ्लॅट होनिंग मशिन’ आहे. याद्वारे आपल्याला मोजमापातील अल्प फरक, उच्च प्रतीची पृष्ठीय समांतरता (पॅरलॅलिझम) आणि सपाटपणा (फ्लॅटनेस) मिळतो. त्याचबरोबर, काम चालू असताना मोजमाप घेण्याची सुविधादेखील यामध्ये आहे. ग्राहक दोन्ही बाजूला उच्च दर्जाच्या अचूक कार्यवस्तूंचे बॅच उत्पादन घेऊ शकेल, अशीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 
मशिनचे ॲप्लिकेशन
 
• मोठा पृष्ठभाग असणारे कार्यक्षेत्र (एरिया) आणि ज्याठिकाणी किचकट स्वरुपाचे यंत्रण आहे.
 
•6 ते 12 कॅरिअर व्हीलसाठी असलेल्या हँडलिंग सिस्टिमच्या मोजमापनासाठी हे मशिन वापरता येते.
 
• प्लॅस्टिक किंवा नॉन फेरस धातूंपासून ते स्टील किंवा सेरॅमिकपर्यंत अशा सर्व प्रकारच्या मटेरियलसाठी हे मशिन वापरता येते. स्टैहल कंपनी ऋक3 संकल्पनेद्वारे स्वयंचलित फ्लॅट (सपाट) होनिंग/फाईन ग्राईंडिंग प्रक्रियेमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.
 
यातील स्वयंचलनामुळे प्रति तास 3600 कार्यवस्तू तयार होतात. म्हणजेच प्रति सेकंद एक कार्यवस्तू तयार होते. या कार्यवस्तूंची अचूकतादेखील काही मायक्रोमीटर टॉलरन्स इतकी असते. या मशिनची बांधणी भक्कम असून इष्टतम (ऑप्टिमाईज्ड) कंपने (व्हायब्रेशन) डॅम्पिंग, उच्च टॉर्क ड्राइव्ह आणि प्रक्रियेअंतर्गत मोजमापन (इनप्रोसेस मेजरमेंट) अशी या मशिनची काही कार्यात्मक वैशिष्ट्ये सांगता येतील.
 
मशिनची तांत्रिक वैशिष्ट्ये
 
• 3 व्हील असलेले आधुनिक मशिन
• पूर्णपणे स्वयंचलित होऊ शकणारे (ऑटोमॅटेबल)
• यंत्रणादरम्यान कार्यवस्तूचे लोडिंग/अनलोडिंग
• जास्तीत जास्त उत्पादकता
• संगणकाद्वारे एकीकृत (इंटिग्रेटेड) मोजमापन
• मशिन नियंत्रकाद्वारे प्रासंगिक विश्लेषण (इंन्सिडेंटल अ‍ॅनॅलिसिस)
• रिमोट मेंटेनन्स, ऑनलाईन सेवा साहाय्य
 
सौजन्य-EMO हॅनोव्हर डेली
सई वाबळे या धातुकाम मासिकाच्या साहाय्यक संपादक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@