टूल आणि उत्पादन खर्च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    29-Jul-2017   
Total Views |
आजच्या उत्पादकाला कायमच आपल्या उत्पादनाची किंमत कमी कशी करता येईल, या प्रश्नाचा सामना करावा लागतो. यासाठी तो उत्पादन खर्चातील सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देत असतो आणि कुठेही अनाठायी खर्च होऊ नये यासाठी अनेकविध उपाय करत असतो. टूलवर होणारा खर्च हा उत्पादन खर्चातील लक्ष वेधून घेणारा घटक आहे, कारण तो वारंवार होणारा खर्च आहे. अशावेळी हा खर्च कमी न करता तो वाढवून जास्त फायदा कसा होऊ शकतो, हे या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 
cdfgtyhugi_1  H
 
यासाठी उदाहरणादाखल घेतलेल्या कार्यवस्तूच्या उत्पादन खर्चाचा विचार केला असता असे दिसून आले की, संपूर्ण उत्पादन खर्च प्रति कार्यवस्तू रुपये 100 असेल तर त्यातील विविध घटकांची विभागणी तक्ता क्र. 1 प्रमाणे करता येईल.
जर उत्पादन खर्चात बचत करायची असेल, तर साधारणत: प्रथम जास्त खर्चिक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. पण त्याचबरोबर तुलनेने कमी वाटा असलेल्या टूलवर जर वेगळा विचार केला तर, एकूण खर्चावर लक्षणीय परिणाम दिसून येऊ शकतो. याबाबतीतील एक प्रत्यक्ष अनुभव पाहू.

cdfgtyhugidfdsf_1 &n
 
 

sadfghjk_1  H x 
केस स्टडी
पुण्यातील एका नामांकित कारखान्यात स्लीव्हच्या मिलिंग ऑपरेशनमध्ये टूलच्या सुधारणेमुळे एकूण किंमतीत खालीलप्रमाणे फरक पडला.
सुरुवातीला चित्र क्र.1 मध्ये दाखवलेले ऑपरेशन हे एच.एस.एस. कटर वापरून केले जात असे.

zsxdcfghjk_1  H

एच.एस.एस. कटर
त्याऐवजी ब्रेझ्ड कार्बाईडचा कटर वापरल्याने खालीलप्रमाणे फरक दिसून आला. हा कटर सुमारे 1,80,000 कार्यवस्तूंचे यंत्रण करू शकतो. त्याला दर 60,000 कार्यवस्तूंचे यंत्रण झाल्यावर रिशार्पनिंग करावे लागते.
ब्रेझड् कार्बाईड कटर
या उदाहरणावरून असे दिसून येते की, एच.एस.एस. ऐवजी कार्बाईड कटर वापरल्याने खालील फायदे मिळाले.
1) कटरवरील खर्च 0.23 रुपये वरून 0.08 रुपये प्रती कार्यवस्तू आला.
2) उत्पादन प्रति शिफ्ट 180 वरून 200 कार्यवस्तूवर गेले.
3) रिशार्पनिंग महिन्यातून एकदा करण्याऐवजी वर्षातून एकदाच करावे लागले.
म्हणजेच टूल वरील एकावेळी होणारा खर्च जरी चौपट झाला तरी प्रत्यक्षात प्रति कार्यवस्तू खर्च कमी झाला आहे तसेच उत्पादन 10% वाढले आहे. हेच आपण एकूण उत्पादन खर्च तक्त्यात मांडले तर कसे दिसेल ते पुढील तक्ता क्र.3 मध्ये दिले आहे. याचा संदर्भ तक्ता क्र. 1 मध्ये दिलेल्या विभागणीशी आहे.

zsxdcfghjkdgb_1 &nbs
यावरून असे दिसून येईल की, टूल्सवर प्राथमिक खर्च जरी जास्त वाटला तरी एकूण प्रति कार्यवस्तू उत्पादन खर्चात 10% बचत झाली आहे. म्हणजेच टूल्सवर लक्ष केंद्रित करून नवनवीन प्रकारची अधिक उत्पादकता देणारी टूल्स वापरली तर एकूण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

jhkjkghfd_1  H
अशा प्रकारच्या सुधारणांसाठी खालील क्लृप्त्या वापरता येतील.
1) नवीन पद्धतीची टूल्स वापरणे. उदाहरणार्थ, एच.एस.एस. ऐवजी कार्बाईड, कार्बाईडऐवजी कोटेड कार्बाईड (Coated Carbide), कोटेड कार्बाईडऐवजी सिरॅमिक ज्यामुळे टूल्सचा वेग वाढविणे अथवा टूल्सचा फीडरेट वाढविणे शक्य होईल.
2) एकापेक्षा अधिक ऑपरेशन्स एकत्र करणारी टूल्स वापरणे.
3) क्विक चेंज टूलिंग वापरणे.
4) मॉड्युलर टूलिंग वापरणे.
या लेखात टूलिंगमधील सुधारणांमुळे खर्च कसा कमी करू शकतो याचे एक उदाहरण दिले आहे. अर्थात सुयोग्य टूलिंगची निवड, त्याची संपूर्ण माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.
 
अनिल गायकवाड यांत्रिकी अभियंते आहेत. 1973 ते 2002 पर्यंत ते कमिन्स इंडिया लि. मध्ये टूलिंग विभागाचे प्रमुख होते. विविध कंपन्यांमध्ये ते तांत्रिक विद्याशिक्षण आणि सुधारणांचे कार्य करतात. 
@@AUTHORINFO_V1@@