झीरो पॉइंट क्लॅम्पिंग व्यवस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    29-Jul-2017   
Total Views |
आधुनिक यंत्रण तंत्रज्ञान/प्रणाली सर्वसाधारणपणे बॅचमध्ये उत्पादन करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी वैविध्यपूर्ण मॉडेल्स आणि निरनिराळी वैशिष्ट्ये देऊ करणे, हा यातील प्रमुख उद्देश असतो. तसे पाहिले तर कोणत्याही कारखान्यात सेट-अपमध्ये बदल करावे लागणे, हे नेहमीचेच असते. परंतु तरीही उत्पादकता कशी उत्तम राखता येईल, यासाठी सतत प्रयत्न चालूच असतात.
जलद बदल (क्विक चेंज ओव्हर) व्यवस्थेचा अवलंब करणे, हा यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. यात कार्यवस्तू थेट अथवा फिक्श्चरच्या मदतीने क्लॅम्प केली जाते.
ए.एम.एफ. (अँड्रीआज मायर, जर्मनी) हे कार्यवस्तू पकडण्याच्या क्षेत्रातील आद्य प्रवर्तक आहेत आणि त्यांच्या उत्पादनांची एक मोठी श्रेणी बाजारात उपलब्ध आहे. ’झीरो पॉइंट क्लॅम्पिंग’ हे त्यांचे असे एक उत्पादन आहे, ज्यामुळे सेट-अप करताना मशिनवर वाया जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. पुनरावृत्तीमधील उच्च अचूकता, सेट-अपमधील दृढता आणि दीर्घकाळ चालण्याचा टिकाऊपणा ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत.
 
 
झीरो पॉइंट म्हणजे काय ?
ही शून्य त्रुटी अथवा शून्य चूक करणारी व्यवस्था आहे.
आपल्या उत्पादनामध्ये फिक्श्चर आणि कार्यवस्तू यांच्यातील बदल करण्यासाठी जितका वेळ आवश्यक आहे, तेवढ्याच वेळात तो बदल करणारी ही एक व्यवस्था आहे. यामुळे मशिनवर सेट-अपला लागणाऱ्या वेळाची आणि ओघानेच पैशांची बचत होते.
हे कसे चालते?
यामध्ये क्लॅम्पिंग ही पूर्णपणे यांत्रिक (मल्टिपल बॉल क्लॅम्पिंग) आणि मजबूत डिझाईन असलेली प्रणाली आहे. डी-क्लॅम्पिंगसाठी हायड्रॉलिक अथवा न्युमॅटिक अशा बाहेरच्या फीडची आवश्यकता असते. पकडण्यासाठी 105 किलो न्यूटन इतके बल उपलब्ध असते.

dsfgdfdfghb_1  
 
क्लॅम्पिंग
जेव्हा बाहेरचा दाब थांबवला जातो, तेव्हा पिस्टनच्या खाली असलेल्या स्प्रिंग्ज पूर्वस्थितीत परत येतात आणि पिस्टनला वर ढकलतात. यामुळे बॉल्स आतमध्ये ढकलले जातात आणि क्लॅम्पिंग केले जाते. (चित्र क्र. 1)
 
 
डी-क्लॅम्पिंग
जेव्हा बाहेरून दिलेल्या ऑईल/हवेच्या दाबाने पिस्टन स्प्रिंग्जच्या दिशेने खाली दाबला जातो तेव्हा क्लॅम्पिंगचे बॉल्स बाहेर ढकलले जाऊ शकतात. या स्थितीमध्ये फिक्श्चर किंवा कार्यवस्तूला जोडलेले निपल बाहेर येऊ शकते आणि कार्यवस्तूचे डी-क्लॅम्पिंग होते. (चित्र क्र. 1)
झीरो पॉइंट व्यवस्थेमधील रचना क्लॅम्पिंग मोड्युल
अतिशय अचूकतेने बनविलेल्या क्लॅम्पिंग मोड्युल ’झीरो पॉइंट’ व्यवस्थेत कार्यवस्तू अथवा फिक्श्चर आवश्यक तेवढे घट्ट आणि सुरक्षितपणे पकडले जाईल याची खात्री असते. ओढणे, बंद करणे व पकडण्यासाठी लागणारे आवश्यक बल उपलब्ध असल्याने हे मोड्युल कुठल्याही प्रकारच्या कामासाठी उपयुक्त ठरते. (चित्र क्र. 2)

asdfrgthyj_1  H
1. लॅटरल व खेचणाऱ्या बलांचा कोणताही परिणाम न होणारे, 5 मायक्रॉनच्या आतील अचूकतेमध्ये सपाट व समांतर पकड मिळवण्यासाठी, स्टेनलेस स्टीलचे हार्डनिंग व ग्राईंडिंग केलेले अचूक पृष्ठभाग.
2. कठीण (हार्डन्ड) पिस्टन - विेशसनीय व सातत्यपूर्ण पकडीसाठी फॉर्म फिट व सेल्फ लॉकिंगचे एकत्रीकरण केलेला.
3. इष्टतम पॉवर ट्रान्समिशनसाठी अचूक, झीज विरोधी व स्पंदनरोधक बॉल्स.
4. बॉलचा स्टेनलेस स्टीलमधील आधार - धूळ व द्रवापासून क्लॅम्पिंग मोड्युलचे रक्षण करतो.
5. ओढ देणे, बंद करणे व पकडण्याच्या जास्तीत जास्त बलासाठी दणकट स्प्रिंग प्लेट.
6. इंटिग्रेटेड एअरजेटसह मोड्युल फ्लोअर
A. क्लॅम्पिंग मोड्युलची खोली 22 मिमी इतकी कमी असल्याने बेस प्लेटची उंची 28 मिमी इतकी कमी असू शकते. (ब्लो आऊट शिवाय 24 मिमी)
 
 
क्लॅम्पिंग निपल

AZSXdfgthj_1  H
मशिन टेबल आणि फिक्श्चर/कार्यवस्तू यांना एकत्र जोडणारे क्लॅम्पिंग निपल (चित्र क्र. 3) हा या व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामुळे चपखल स्थाननिश्चिती होते, तसेच पक्की सुरक्षित पकड मिळते. कार्यवस्तूवर काम करताना निर्माण होणाऱ्या सर्व बलांचा एकत्रित परिणाम याच निपलद्वारे क्लॅम्पिंग मोड्युलकडे हस्तांतरित केला जातो.

cxzgdfhfghg_1  
 
 
केस स्टडी : 1
यंत्रभाग : टेक्स्टाईल मशिन फ्रेमचे यंत्रण

fbfbfbfb_1  H x
 
केस स्टडी : 2
यंत्रभाग : इंजेक्शन मोल्ड प्लेटचे एच.एम.सी.वरील यंत्रण

sadfxfcgffh_1  
 
केस स्टडी 3
छोट्या डाय ब्लॉकसाठी क्लॅम्पिंग
अतिशय आटोपशीर (कॉम्पॅक्ट) असणाऱ्या K05 मॉडेल झीरो पॉइंट सिस्टिममुळे छोट्या डाय ब्लॉकसारखे यंत्रभाग यंत्रण करताना जलद बदलता येतात. पुनरावृत्तीची अचूकता 5 मायक्रॉनपेक्षा कमी फरकात मिळते. प्रचलित पद्धतीने क्लॅम्पिंग करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ लागत होता, मात्र जलद बदल व्यवस्था वापरल्यामुळे केवळ 5 मिनिटांत क्लॅम्पिंग होते.

dhfjgkl;'_1  H
 
केस स्टडी 4
मोठ्या आकाराच्या यंत्रभागाचे क्लॅम्पिंग
K40 मॉडेल झीरो पॉइंट सिस्टिमद्वारे 3 मीटर स्विंग डायमीटर असलेल्या मोठ्या आकाराच्या ग्राईंडिंग किंवा टर्निंग मशिनवर कार्यवस्तू पकडलेले फिक्श्चर क्लॅम्प केले जाते. झीरो पॉइंट सिस्टिमवर ठेवण्यापूर्वी फिक्श्चरवरील कार्यवस्तू हायड्रॉलिक क्लॅम्पने पकडून त्याचे पॉवरपॅकशी असलेले कनेक्शन काढले जाते. प्रचलित पद्धतीने क्लॅम्पिंग करण्यासाठी लागणाऱ्या दीड ते 2 तासांऐवजी केवळ 5 ते 10 मिनिटांच्या कालावधीत 3 टन वजनाचे फिक्श्चर क्लॅम्प केले जाते. या यंत्रणेद्वारे पोझिशनिंग अचूकता 10 मायक्रॉनपेक्षा कमी फरकात मिळते.

hgfdcxdfzS_1  H
 
’झीरो पॉइंट’ क्लॅम्पिंग तंत्रज्ञानाचे फायदे
• मशिन काम करण्यासाठी उपलब्ध असण्याचा कालावधी वाढतो.
• कार्यवस्तू किंवा फिक्श्चर यांच्यातील बदल जलद होतात.
• उच्च पुनरावर्तनक्षमता (0.005 मिमी मर्यादेत)
• सर्व प्रकारच्या मशिनसाठी एकसारखा इंटरफेस.
• एकाच टप्प्यात स्थान-निश्चिती आणि क्लॅम्पिंग
 
 
श्रीधर देशपांडे यांत्रिकी अभियंता असून वर्क होल्डिंग क्षेत्राचा त्यांना 23 वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी अनेक देशी आणि विदेशी कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
2013 पासून ते अँड्रियाज मायर या जर्मन कंपनीत विक्री आणि विपणन विभागाचे रीजनल मॅनेजर आहेत.
@@AUTHORINFO_V1@@