लोकेटर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    30-Jul-2017   
Total Views |
जिग्ज आणि फिक्श्चर्स या लेखमालेच्या पहिल्या लेखात आपण जिग्ज आणि फिक्श्चर्सचे फायदे व त्यांची उपयुक्तता याबद्दल माहिती घेतली. त्याचप्रमाणे कार्यवस्तू अचूकतेने लोकेट करण्याचे 3-2-1 हे तंत्रदेखील पहिले. या लेखात आपण यंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिग्ज आणि फिक्श्चर्सच्या प्रकारांची माहिती घेणार आहोत.
 
 
यंत्रणासाठी वापरले जाणारे फिक्श्चर्स मुख्यतः तीन प्रकारचे असतात.
 
 
1. सामान्य प्रकारच्या मशिन्सवर (जनरल पर्पज मशिन्स) वापरली जाणारी फिक्श्चर्स.
उदाहरणार्थ, टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग यासारखी मशिन्स. आपण पुढील भागांमध्ये या प्रकारच्या मशिनवर वापरल्या जाणाऱ्या जिग्ज आणि फिक्श्चर्सची माहिती घेणार आहोत.
 
 
2. विशेष किंवा विशिष्ट प्रकारची मशिन्स (स्पेशल पर्पज मशिन्स).
या मशिन्ससाठी जी फिक्श्चर्स बनवली जातात ती वजनदार असतात. ही फिक्श्चर्स फक्त विशिष्ट मशिनसाठी आणि कार्यवस्तूसाठी बनवलेली असल्याने त्यांना हलविण्याची वेळ येत नाही.
 
 
3. सी.एन.सी. मशिन्ससाठी बनवलेली फिक्श्चर्स
ही फिक्श्चर्स सर्वसाधारणपणे जास्त सुटसुटीत आणि मजबूत असतात आणि तुलनेत वजनाने हलकी असतात. यामध्ये टूल गाईड करायची आवश्यकता नसते.
आता आपण सामान्य प्रकारच्या मशिन्सवर कार्यवस्तू अचूकतेने पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फिक्श्चर्समधील महत्त्वाच्या घटकांची माहिती घेऊ.
1. वेगवेगळ्या प्रकारचे लोकेटर्स
2. वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅम्प्स
3. वर, खाली होणारे आधार (जॅक्स)
4. फूल-प्रूफिंग (पोकायोके) चूक होऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी.
5. वेगवेगळ्या प्रकारची गाईड बुश.
6. मिलिंग फिक्श्चर्ससाठी सेटिंग पीस. याचा वापर टूल (मिलिंग कटर) सेट करण्यासाठी होतो.
7. फिक्श्चर्स यंत्रावर पकडण्यासाठी व लोकेट करण्यासाठी करावी लागणारी तरतूद.
8. मजबूत ढाचा/सांगाडा (स्ट्रक्चर)
या लेखात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेटर्सबाबत माहिती दिली आहे. कार्यवस्तूची अचूकता ही लोकेशनवर अवलंबून असते. फिक्श्चरवरच्या लोकेशन पॉईंट्सची व्यवस्थित देखभाल करणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण कार्यवस्तूची गुणवत्ता यावरच अवलंबून आहे.
 
 
छिद्रामध्ये बसणारे लोकेटर्स म्हणजेच लोकेटिंग पिन्स

fbfbfxvfvv_1  H 
राउंड (गोल) लोकेटिंग पिन 1 ही मुख्य पिन आहे, ज्यामध्ये कार्यवस्तू अचूकपणे बसलेली असते. ही कार्यवस्तू आता पिन 1 च्या भोवती A व B या दिशेने हलू शकते. (चित्र क्रमांक 1). हे वस्तूचे हलणे थांबविण्यासाठी चित्र क्र. 2 बघूयात.
 
 
ओरीएंटेशन पिन

fdfhdfghgdhg_1   
 
 
चित्र क्र. 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे कार्यवस्तू A दिशेने ढकलून ओरिएंटेशन पिनला टेकवली व क्लॅम्प केल्यास ती वस्तू हलू शकणार नाही. ओरीएंटेशन पिन कार्यवस्तूची वर्तुळाकार दिशेत होणारी हालचाल नियंत्रित करते.
वरील उदाहरणात पिन 1 ही कार्यवस्तूच्या छिद्रामध्ये म्हणजेच आतील पृष्ठभागामध्ये बसवलेली आहे. हे भोक नियंत्रित केलेले आहे व त्यामुळे याला मुख्य स्थान (प्रायमरी लोकेशन) म्हणून ओळखले जाते. पिन 2 हे गौण स्थान (सेकंडरी लोकेशन) म्हणून ओळखले जाते. पिन 2 ही वस्तूच्या बाह्यपृष्ठभागावर बसवलेली आहे. जर हा बाह्यपृष्ठभाग नियंत्रित केलेला नसेल, तर वस्तूचा उजवीकडील भाग हा निरनिराळ्या ठिकाणी येईल. म्हणजेच वस्तूची वर्तुळाकार दिशेत होणारी हालचाल अनियंत्रित होईल आणि अचूकतेवर परिणाम होईल.
 
 
आता आपण स्प्रे गनच्या टर्निंग फिक्श्चरचे उदाहरण पाहूया. चित्र क्रमांक 3 मध्ये एक स्प्रे गन टर्निंग फिक्श्चर कार्यवस्तूसह दाखविले आहे. तसेच कार्यवस्तू ॲल्युमिनियमची बनवलेली आहे. चित्र क्र. 4 मध्ये स्प्रे गन काढून नुसते फिक्श्चर पाहिले असता, आपल्याला असे दिसते की, पिन 1, गोल लोकेटिंग पिनने कार्यवस्तूला लोकेट केलेले आहे व ही कार्यवस्तू या पिनभोवती गोलाकार फिरून पिन 2 वर जाऊन टेकते. कार्यवस्तूवर स्विंग लॅच आणून क्लॅम्पने कार्यवस्तू पक्की पकडली जाते. इथे आपल्याला पिन 1 गोल लोकेटिंग पिन व पिन 2 ओरीएंटेशन पिन यांचे कार्य लक्षात येते.

dfgdfhdghgh_1  
 

jghjghjghhj_1   
 

 
 
गोल पिनचे वेगवेगळे प्रकार
चित्र क्र.5 अ ब क ड इ मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोल लोकेटिंग पिन्स दाखवल्या आहेत. लोकेटिंग पिन्सला तोंडाला गोलाकार आकार किंवा चॅम्फर द्यावा लागतो. त्यामुळे कार्यवस्तू पिनमध्ये लोकेट करणे सुलभ जाते. साधारणपणे कार्यवस्तू व पिन यामध्ये सरकता (स्लिप) फिट ठेवलेला असतो.

jghjghjghhjjhjhj_1 &
 
 
 
 ruyuy_2  H x W:

ruyuy_1  H x W: 
 
 
 
 


rgthgh_1  H x W

rgthgh_2  H x W 
 
 
 
चित्र क्र. 6 मध्ये ओरीएंटेशन पिन न वापरता उजवीकडे दाखवलेला स्लाइडिंग (मागे व पुढे सरकणारा) ‘व्ही’ ब्लॉकसुद्धा वापरता येईल. यामुळे दोन गोष्टी साध्य होतील.

cfgnfgnh_1  H x
1. ‘व्ही’ ब्लॉक कार्यवस्तूची अ आणि इ दिशेने होणारी हालचाल नियंत्रित करतो. यालाच ‘ॲव्हरेजिंग आऊट द एरर’ (averaging out the error) असेही म्हणतात.
 
2. जेव्हा कार्यवस्तूच्या बाह्य वर्तुळाकार भागाच्या व्यासात असमानता असते तेव्हा ओरिएंटेशन पिन न देता अशा प्रकारच्या सरकणाऱ्या ’व्ही’ ब्लॉकचा उपयोग करावा लागतो. हा ’व्ही’ ब्लॉक मागे पुढे सरकणारा असल्यामुळे वस्तू पकडणे आणि सैल करणे शक्य होते.
 
जेव्हा वस्तुवर मोठे व छोटे ही दोन्ही छिद्रे झालेली असतील तेव्हा कार्यवस्तू दोन्ही छिद्रामध्ये लोकेट केली जाते. पण अशा वेळेस डायमंड पिन वापरली जाते. चित्र क्र 7 मध्ये दाखविल्याप्रमाणे याचा आकार असतो. पिनची ताकद वाढविण्यासाठी 60° चा कोन दिलेला असतो. त्याचप्रमाणे ज्या दोन छिद्रामध्ये कार्यवस्तू लोकेट केलेली असते त्या दोन छिद्राच्या केंद्राच्या फरकासदेखील डायमंड पिनमुळे सामावून घेतले जाते. डायमंड पिनचा A-B अक्ष हा C-D अक्षाशी 90° चा कोन करून बसवलेला असतो.

yjfghjghjhj_1  
‘व्ही’ लोकेटर

hfghghgh_1  H x 
 
 
चित्र क्र. 8 मध्ये ‘व्ही’ लोकेटर दाखवलेला आहे. चित्रावरून आपल्याला हे समजते की, जरी वर्तुळाचा व्यास बदलला तरी त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू उभ्या अक्षावरच वर खाली होतो. त्यामुळे जर चित्र क्र. 8 मध्ये दाखवल्याप्रमाणे ड्रिलिंग केले तर, वर्तुळाचा व्यास बदलला तरी ते त्या वर्तुळाच्या केंद्रामधूनच जाणार.


dfgdfghfghfgh_1 &nbs
चित्र क्रमांक 9 मध्ये आपल्याला असे दिसते की, ‘व्ही’चा अक्ष हा जमिनीला समांतर आहे. अशा परिस्थितीत जर दंडगोलाचा (सिलिंडर) व्यास बदलला तर मात्र चुकीच्या कार्यवस्तू मिळतील
 
 
डॉवेल पिन्स
चित्र क्रमांक 10 मध्ये दंडगोलाच्या आकाराच्या डॉवेल पिन्स दिसत आहेत. शक्यतो डॉवेल पिन्ससाठी छिद्रे आरपार असावीत म्हणजे त्या काढणे सोपे होते. कारण या नेहमी दाबून (प्रेस फीट) बसवलेल्या असतात. डॉवेल्सचा उपयोग दोन भाग (पार्टस्) अचूकतेने जोडण्यासाठी होतो. तसेच डॉवेल्स वापरल्यामुळे भाग हलू शकत नाहीत, तसेच त्या जोडाची ताकदही वाढते. दोन डॉवेल पिन्समधील अंतर नेहमी जास्तीत जास्त असावे. चित्र क्रमांक 11 मध्ये दोन स्क्रूचा वापर भाग जोडण्यासाठी केला आहे. नुसत्या स्क्रूचा वापर केला तर जोड हलू शकतो व त्यामुळे चुकीच्या कार्यवस्तू बनू शकतात. डॉवेल पिन्सशिवाय फिक्श्चर अशी कल्पनाच आपण करू शकत नाही.

ghmbmm_1  H x W
 

fggbhgb_1  H x  
 
 
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्स, या क्षेत्रातील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी किर्लोस्कर, ग्रिव्हेज लोंबार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे.
विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तसेच ARAI, येथे ते अतिथी प्राध्यापक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@