सी.एन.सी. टर्निंग सेंटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    31-Jul-2017   
Total Views |
fgfdfgrgregrfg_1 &nb
 
आज अनेक ठिकाणी सी.एन.सी. टर्निंग सेंटर वापरले जाते. सी.एन.सी टर्निंग सेंटर म्हणजे जुन्या काळातील मॅन्युअली चालणाऱ्या लेथचा आजचा आधुनिक आविष्कार होय. ज्यामध्ये चक, टूलपोस्ट, टेलस्टॉक या तीन महत्त्वाच्या घटकांची हालचाल मोटरने केली जाते. संगणकावर जतन (सेव्ह) केलेल्या किंवा तयार केलेल्या प्रोग्रॅमने त्याचे नियंत्रण केले जाते. त्याचबरोबर टूल टरेट आणि इतर काही ॲक्सेसरीज त्याच्यासोबत जोडल्यामुळे हा नुसता लेथ न राहता त्याचे व्यापक स्वरुप तयार झालेले आहे, ज्यामध्ये अनेकविध यंत्रणाच्या क्रिया करता येतात. यालाच प्रचलित भाषेत सी.एन.सी. टर्निंग सेंटर असे म्हणतात.

fgfdfgrgregrfg_1 &nb
सी.एन.सी. टर्निंग सेंटरचे कार्य
धातुकाम करण्यासाठी सी.एन.सी. टर्निंग सेंटरचा वापर होतो. हे मशिन समजावून घेण्यासाठी यंत्रण कार्य (मशिनिंग ऑपरेशन) समजावून घेणे आवश्यक आहे.
सी.एन.सी. मशिनमध्ये स्पिंडल चक फिरवणे, टूल पुढे-मागे, वर-खाली करणे ही कामे प्रोग्रॅमिंग आज्ञावलीमार्फत केली जातात. (चित्र क्र. 1 आणि 2) प्रोग्रॅमर ड्रॉईंग वाचून त्याप्रमाणे ठराविक कोड्सच्या आधारे प्रोग्रॅम तयार करतो. त्या प्रोग्रॅमबरहुकुम मशिनमधील हालचाली होतात.

fgfdfgrgregrfgdfgdfgfe_1&
सी.एन.सी. टर्निंग सेंटरवर काम करत असताना खालील तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
1. प्रोग्रॅमिंग
2. सेटअप
3. ऑपरेशन

तीन टर्निंग ॲप्लिकेशन्स
1. चकिंग वर्क
2. शॅफ्ट वर्क
3. बार वर्क
यामध्ये भरपूर लवचिकता (फ्लेक्झिबिलिटी) मिळते.

सी.एन.सी. लेथसाठी आदर्श कार्यप्रणाली
सी.एन.सी. लेथ मशिन योग्य पद्धतीने चालविण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली अंमलात आणावी लागते. आदर्श कार्यप्रणाली म्हणजे, अनुभवातून तयार केलेली आज्ञावलींची मालिका होय. या मालिकेच्या वापरातून योग्य पद्धतीने सी.एन.सी. मशिन्स चालवता येते. जर मशिन चालविणारा ऑपरेटर स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असेल, धार असणारी टूल्स, तयार होणारा यंत्रभाग (पार्ट) ड्रॉईंगप्रमाणे होत आहे, याची खात्री करून मशिन चालवत असेल तर शक्यतो सी.एन.सी. मशिनच्या कार्यात कोणतीही अडचण येत नाही. सी.एन.सी. लेथ मशिन सुस्थितीत दीर्घकाळ चालावे, उत्पादन चांगल्या दर्जाचे व्हावे आणि कामाचा वेळ वाया जावू नये यासाठी काही महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत.

ertgretgreg_1  
1. वार्म अप - बहुतेक कंपन्यांमध्ये दुसऱ्या पाळीनंतर (शिफ्ट) मशिन बंद केले जाते किंवा वीज गेल्यामुळे मशिन बंद होते. अशावेळी मशिन पुन्हा चालू करताना वार्म अप करणे आवश्यक ठरते. वार्म अपमध्ये प्रथम स्पिंडल दोन्ही दिशांमध्ये (फॉरवर्ड आणि रिव्हर्स) एक ते दीड मिनिटांपर्यत चालवून बघणे आवश्यक आहे. तसेच टूल पोस्ट/टरेटच्या सर्व हालचाली करणे गरजेचे असते. यामुळे वंगण तेल सगळीकडे पसरले जाते.
2. कामासाठी लागणारी टूल्स, कार्यवस्तू मटेरिअल तयार ठेवणे.
3. चक जॉज आणि टूलिंग तयार ठेवणे. हे सर्व ठरवलेल्या आराखड्यानुसार असावे.
4. कार्यवस्तू चकमध्ये व्यवस्थित घट्ट बसली आहे, याची खात्री करून घेणे. चकमध्ये अंतर्गत किंवा बाह्य पद्धतीने कार्यवस्तू घट्ट करता येते. जी पद्धत वापरात असेल त्याप्रमाणे चक जॉज निवडावेत.
5. कार्यवस्तू घट्ट केल्यानंतर चक फिरवून कार्यवस्तू कुठेही आदळत नाही ना, याची खात्री करून घेणे.
6. कटिंग टूल संदर्भ बिंदूवर (रेफरन्स पॉईंट) आहे की नाही, याची खात्री करून घेणे.
7. मशिन चालू करण्यापूर्वी टेल स्टॉक हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे व्यवस्थित क्लॅम्प झाला आहे का? तसेच टूल व्यवस्थित क्लॅम्प झाले आहे का आणि कार्यवस्तू व टूल स्थान (पोझिशन) यामध्ये आवश्यक जागा (स्पेस) आहे का? याची संपूर्ण खात्री करून घेणे.
8. कार्यवस्तू टर्निंगसाठी बनवलेला प्रोग्रॅम हा त्या कार्यवस्तूसाठीच केलेला आहे की नाही, याची खात्री करून घेणे. सर्वसाधारण कार्यवस्तूचे नाव किंवा भागांचे (पार्ट) क्रमांक प्रोग्रॅमवर घालण्याची पद्धत असते.
9. मशिनवरील गार्डस् (कव्हर्स) व्यवस्थित बसवले आहेत का ते पाहणे.
10. प्रोग्रॅम निवडल्यानंतर सुरुवातीच्या बिंदूवर कर्सर आणणे.
11. मशिनवरील सेटिंग्जमध्ये बदल केला असल्यास त्याची नोंद करून ठेवणे.
12. मशिनिंग होणारा भाग ड्रॉईंगबरहुकुम होतो आहे का, याची खात्री करणे.
13. तयार होणाऱ्या भागाचा दर्जा (क्वालिटी) आणि अचूकता (ॲक्युरसी) योग्य असल्याची खात्री करून घेणे.
14. काम पूर्ण झाल्यानंतर मशिन स्वच्छ करणे, पुरवठा (सप्लाय) बंद करणे या गोष्टी करणे गरजेचे आहे.

thtryhthtr_1  H
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंग क्षेत्रामधील तज्ज्ञ असून ते याबाबत सल्लागार म्हणून काम करतात.
विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथ विषयावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
त्यांनी संगणक या विषयावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून पुस्तके लिहिली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@