इंडेक्सिंग टेबल आणि त्याचे कल्पक उपयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    31-Jul-2017   
Total Views |

यंत्रणामधील बऱ्याच कामात इंडेक्सिंग टेबल्सचा वापर केला जातो. या लेखात वाचकाला इंडेक्सिंग टेबलचा परिचय करून दिला आहे. त्याचा परिणामकारक वापर करून, उत्पादकता आणि गुणवत्ता यांच्यात कशी सुधारणा होऊ शकते, ते समजावून सांगितले आहे.


yjghghj_1  H x

कामाच्या स्वरुपानुसार आणि गरजेनुसार वापरण्यास योग्य असे इंडेक्सिंग टेबल्सचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे,
1. हायड्रॉलिक इंडेक्सिंग आणि क्लॅम्पिंग - फेस गियर/हर्थ कपलिंग यांच्यासहित किंवा विरहित
2. न्युमॅटिक इंडेक्सिंग आणि क्लॅम्पिंग
3. कॅमने चालित इंडेक्सिंग आणि क्लॅम्पिंग
4. इलेक्ट्रो - मेकॅनिकल - फेस गियर/(हर्थ कपलिंग)सहित
5. सर्व्हो मोटरचालित रोटरी टेबल

या लेखात आपण मुख्यत्वेकरून हर्थ कपलिंगसहित इलेक्ट्रो - मेकॅनिकल इंडेक्सिंग टेबलवर लक्ष केंद्रित करू, कारण हे टेबल वापरून मशिनिंगमध्ये अचूकता, सुलभता आणि मजबुती याचा उत्तम संयोग साधता येतो. हे इंडेक्सिंग टेबल साध्या इंडक्शन मोटर आणि गियर साखळीचा (गियर ट्रेन) वापर करून चालविता येतात. त्यासाठी सी.एन.सी. इंटरफेसिंग, सर्व्हो मोटर वगैरे काही लागत नाही.

इलेक्ट्रो-मेकॅनिकल इंडेक्सिंग टेबलची प्रातिनिधिक संरचना चित्र क्र. 1 मध्ये दाखविल्यानुसार असते. याच्यात दोन महत्त्वाच्या यंत्रणा आहेत.
1. टेबलला इंडेक्स करणारी समांतर इंडेक्स कॅम यंत्रणा.
2. तीन भागांच्या हर्थ कपलिंगला क्लॅम्प आणि डी-क्लॅम्प करणारी ड्रम कॅम यंत्रणा.

इंडेक्सिंग टेबल कसे चालते?
इंडेक्सिंगसाठी तीन भागात असलेले फेस गियर कपलिंग मुख्यत: काम करते. कपलिंगच्या विशिष्ट डिझाईनमुळे टेबल उचलले न जाता इंडेक्स होते. आवश्यक असा भक्कमपणा आणि पुनरावृत्ती करतानाची अचूकताही यामुळेच मिळते. वर्म - वर्मव्हीलच्या साहाय्याने 3 फेजची इलेक्ट्रिक मोटर कॅमशाफ्टला फिरविते. कॅमशाफ्ट फॉलोअर शाफ्टला ‘जिनिव्हा मेकॅनिझम’प्रमाणे असमान पद्धतीने फिरवतो. कपलिंगची पकड (क्लॅम्पिंग) आणि मुक्तता (रिलीज) नियंत्रित करणाऱ्या ‘ड्रम कॅम’लाही कॅमशाफ्ट गियरने जोडलेला असतो. (चित्र क्र. 1)


fghfghfghf_1  H

सुरवातीची सुमारे 900 होणारी कॅमशाफ्टची हालचाल फॉलोअर शाफ्टला फिरवत नाही. पण ड्रम कॅम 300 त फिरतो आणि त्यातून मिळालेल्या पकड बलामुळे स्लायडिंग कपलिंग मोकळे होते. पुढच्या सुमारे 1800 अंशातील कॅमशाफ्टची हालचाल फॉलोअर शाफ्टला 900 इंडेक्स करते आणि पुढच्या गियर गुणोत्तरानुसार टेबल 300 किंवा 450 त फिरते. ही हालचाल होत असताना ड्रम कॅमच्या बाह्यरेषेमुळे (प्रोफाईल) स्लायडिंग कपलिंग मुक्तच असते. कॅमशाफ्टच्या शेवटच्या 900 तील हालचालीच्या वेळी फॉलोअर शाफ्ट स्थिर राहतो. ड्रम कॅम स्लायडिंग कपलिंगला ओढून अडकवितो आणि डिस्क स्प्रिंगच्या साहाय्याने पकड बल पुरवितो.

कॅमशाफ्टच्या एका फेरीमध्ये मुक्तता - इंडेक्स - पकड हे चक्र पूर्ण होते. ॲब्सोल्युट एनकोडर इंडेक्सिंग टेबलाच्या स्थानाची माहिती देतो. प्रॉक्झिमिटी स्विच इंडेक्सिंग टेबलाचे पकड स्थान तपासतो.

समांतर इंडेक्सिंग कॅम यंत्रणेमुळे जड फिक्श्चरसुद्धा जलद आणि सुलभतेने फिरते. संगणक वापरून तयार केलेल्या कॅम बाह्यरेषेमुळे कुठलाही झटका न बसता इंडेक्सिंग शक्य होते.

हर्थ कपलिंग हा स्थानाची अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता (रिपिटॅबिलिटी) यांचे नियंत्रण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याच्याविषयी सविस्तर माहिती वरील चौकटीत दिली आहे.


fbggbgbb_1  H x

इंडेक्सिंग टेबलचे महत्त्वपूर्ण फायदे

1. जर मशिनिंग सेंटरवर इंडेक्सिंग टेबल वापरले, तर सी.एन.सी. कंट्रोलला चौथ्या अक्षाची गरज भासत नाही. कारण इंडेक्सिंग टेबलला चालवणारी मोटर ही एक साधी इंडक्शन मोटर असते.
ज्यांच्या वर्कशॉपमध्ये स्टँडर्ड 3 अक्षीय मशिनिंग सेंटर कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हे उपसाधन बसवणे आणि त्याचा इंटरफेस करणे अतिशय सुलभ असते.

2. पूर्णतः विजेवर चालणारे कार्य

न्युमॅटिक किंवा हायड्रॉलिक असा कोणताही इतर ऊर्जास्रोत या कामात आवश्यक नसतो. त्यामुळे जिथे कॉम्प्रेसर नसेल अशा छोट्या कारखान्यात किंवा हायड्रॉलिक पॉवर पॅकची सुविधा नसलेल्या मशिन्ससाठी हे एकदम योग्य आहे. जर इंडेक्सिंग टेबलवर हायड्रॉलिक/न्युमॅटिक बलाद्वारे चालणारे फिक्श्चर लावलेले असेल, तर मात्र ऑपरेटरला संबंधित तरतूद करून घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
3. या प्रकारचे इंडेक्सिंग टेबल सामान्यतः 12 X 300 अथवा 8 x 450 स्वरुपात मिळते. यामुळे हे टेबल 300 किंवा 450 च्या टप्प्यात फिरवता किंवा इंडेक्स करता येते.
4. हर्थ कपलिंगद्वारा इंडेक्सिंग करताना अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता मिळते. इंडेक्सिंगची अचूकता +/-6 आर्क सेकंद तर, पुनरावृत्तीक्षमता +/-2 आर्क सेकंद इतकी मिळू शकते. मायक्रॉनमध्ये सांगायचे तर, इंडेक्सिंग टेबलच्या केंद्रापासून 125 मिमी.त्रिज्येवर 4.8 मायक्रॉनमध्ये अचूकता आणि 1.2 मायक्रॉनमध्ये पुनरावृत्तीक्षमता मिळते. खरेतर, हर्थ कपलिंग जितके अधिक वापरले जाते तितकी त्याची पुनरावृत्तीक्षमता वाढत जाते. याचे कारण कपलिंगच्या ’व्ही’ आकाराच्या दात्यांचा एकमेकांशी वारंवार संपर्क येऊन त्यांचे पृष्ठभाग अधिकाधिक एकमेकांना पूरक होऊन त्यांचे संपर्क क्षेत्र चांगले होत जाते.
5. तीन भागांच्या कपलिंगचा वापर केल्यामुळे इंडेक्सिंग करताना टेबलची मुख्य फ्लँज उचलली जात नाही.
6. इंडेक्सिंग टेबलाच्या प्रकारानुसार, डिस्क स्प्रिंग 6 टनापर्यंत भक्कम क्लॅम्पिंग बळ पुरविते.
7. हायड्रॉलिक आणि न्युमॅटिक ऊर्जास्रोतावर चालणाऱ्या इंडेक्सिंग टेबलच्या तुलनेत या इंडेक्सिंग टेबलची देखभाल ठेवणे सोपे असते. तसेच यामध्ये बॅकलॅश नसतो.
8. वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनमुळे हे टेबल गरजेनुसार उभे किंवा आडवे ठेवून वापरता येते.
9. व्ही.एम.सी. किंवा मिलिंग मशिनबरोबरच, रोटरी ट्रान्सफर मशिनवर, तसेच वस्तूवाटपाच्या (व्हेंडिंग/डिस्पेन्सिंग) एसपीएम्स आणि स्वयंचलनासाठीही याचा वापर करता येतो.
10. हायड्रॉलिक ऊर्जेवर चालणाऱ्या फिक्श्चर्ससाठी हायड्रॉलिक नलिकेची तरतूद केंद्रभागातून रोटरी युनियनच्या सोबत करता येते.

इंडेक्सिंग टेबलच्या मर्यादा
जिथे इंडेक्सिंग 300 किंवा 450 च्या पटीत नसते, तिथे या इंडेक्सिंग टेबलच्या वापरामध्ये मर्यादा आहेत. जिथे अन्य विशिष्ट अंशात इंडेक्सिंग आवश्यक असेल, अशा कामात सर्व्हो चालित रोटरी टेबलचा वापर करावा लागतो. परंतु यासाठी चौथ्या अक्षाची क्षमता लागते.

इंडेक्सिंग टेबलचे विविध वापर
वर सांगिलेल्या वैशिष्ट्यांमुळे इंडेक्सिंग टेबलचा उपयोग नेहमीच्या तीन अक्षीय व्ही.एम.सी.वर विविध अभिनव पद्धतीने करता येतो. उदाहरणार्थ,
1. एकावेळी एकापेक्षा जास्त कार्यवस्तूच्या यंत्रणासाठी इंडेक्सिंग टेबलावर आडवा ठोकळा लावून (त्याला मध्यवर्ती आधार असेल किंवा नसेलही) चित्र क्र. 2 मध्ये दिसते आहे, त्याप्रमाणे एकाच क्लॅम्पिंगमध्ये लहान आकाराच्या कार्यवस्तूचे तीन बाजूंनी यंत्रण करणे शक्य होते. याद्वारे सर्वोत्तम भौमितिक आणि मितीय (डायमेन्शनल) अचूकता प्राप्त होते. फिक्श्चर ब्लॉकच्या सर्व म्हणजे चारही बाजूंवर कार्यवस्तू चढवता येतात. त्यामुळे बहुतेक वेळा ही मशिनिंगची सर्वात किफायतशीर पद्धत ठरते.


fgnfghfg_1  H x

2. मध्यवर्ती आधार असणारे पाळण्याच्या (क्रॅडल) प्रकारचे फिक्श्चर - मोठ्या आकाराच्या कार्यवस्तूचे तीन बाजूंनी यंत्रण करणे शक्य होते आणि या प्रकारच्या मांडणीमुळे जर अनुकूल असेल तर चौथ्या बाजूचे यंत्रणही करता येते. (चित्र क्र. 3)


reghdfghdfghgh_1 &nb

3. या प्रकारच्या मांडणीमध्ये इंडेक्सिंग टेबलच्या पृष्ठावर 3 जॉ किंवा कॉलेट चक बसविला जातो. हा हाताने किंवा हायड्रॉलिक पद्धतीने चालणारा असू शकतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे चकमध्ये कार्यवस्तू पकडून त्याचे यंत्रण करता येते. (चित्र क्र. 4)


fgdfghdfgh_1  H

4. फिक्श्चर थेट इंडेक्सिंग टेबलच्या पृष्ठभागावर बसवलेले असताना (चित्र क्र. 5)


dsewffregtghtggh_1 &

5. बऱ्याचवेळा शाफ्ट फेसिंग सेंटरिंगसाठी SPM उपलब्ध नसेल किंवा कार्यवस्तूंची संख्या कमी असेल, तेव्हा इंडेक्सिंग टेबल आणि फिक्श्चर वापरून काम करता येते. चित्र क्र. 6 मध्ये एकाचवेळी दोन शाफ्ट लावलेले दिसत आहेत.
वर सांगितलेले उपयोग पाहता, इंडेक्सिंग टेबल वापरून साध्या तीन अक्षीय व्ही.एम.सी.वर लहान ते मध्यम आकाराच्या कार्यवस्तूवर यंत्रण करता येते. ते नसते तर कदाचित महागडे एच.एम.सी. वापरावे लागले असते.


fbdfgtrh_1  H x
 
तेव्हा एकंदरीत पाहता, कार्यशाळेतील अभियंते इंडेक्सिंग टेबलचा उपयोग विविध आणि कल्पक पद्धतीने करून घेऊ शकतात. या बहुमोल उपसाधनामुळे यंत्रणातील नवनवीन शक्यता आपल्या समोर येतात आणि उत्पादकता तसेच गुणवत्ता वेगाने सुधारते.





यांत्रिकी अभियंता असलेले अतुल भिरंगी यांनी 1989 पासून ’प्रगति ऑटोमेशन प्रा. लि.’मध्ये डिझाइन डेव्हलपमेंट विभागात कामाला सुरुवात करून आता 2001 सालापासून ते या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
[email protected]
@@AUTHORINFO_V1@@