TS 120 : गँट्री रोबोसह ट्विन स्पिंडल चकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    31-Jul-2017   
Total Views |
regdfgdfgfg_1
मशिन टूल क्षेत्रात सी.एन.सी. तंत्रज्ञानाचा विकास आणि सहभाग सुरू झाल्यापासून, धातूवर काम करणाऱ्या उद्योगांमधील उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. बाजारपेठेतील वाढणारी मागणी पूर्ण करताना स्पर्धेत टिकण्यासाठी ग्राहकाची मागणी वेळेत आणि अचूकतेने पूर्ण करण्यासाठी ‘ज्योती सी.एन.सी.’सारख्या मोठमोठ्या कंपन्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीपासून करत आहेत. TS 120 (गँट्री रोबोसह ट्विन स्पिंडल चकर) या गँट्री सी.एन.सी. लेथ मशिनची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
 
 
TS 120 - गँट्री रोबोसह ट्विन स्पिंडल चकरची रचना
मोठ्या संख्येने होणाऱ्या उत्पादनांचे मशिनिंग करताना अनेक प्रक्रियांचे एकत्रीकरण (मल्टीप्रोसेस इंटिग्रेशन) करण्यासाठी हे मशिन सुयोग्य आहे. कमीतकमी मानवी हस्तक्षेप आणि अचूक उत्पादन होण्यासाठी हे जास्तीत जास्त स्वयंचलन केलेले मशिन आहे. हे मशिन 120 मिमीपर्यंत व्यास असलेले भाग हाताळण्यासाठी सक्षम आणि योग्य आहे. या मशिनचाच भाग असलेली स्वयंचलित अंतर्गत गँट्री प्रणाली, कार्यवस्तूचे कमीतकमी वेळात बिनचूक लोडिंग आणि अनलोडिंग करते. चेंज ओव्हर स्टेशन असलेल्या गँट्री रोबोला दुहेरी स्विव्हेल ग्रिपर असल्यामुळे सेटअपमध्ये बदल करण्याचा वेळ कमी होण्यास मदत होते. आतून हवेचा प्रवाह असलेले (एअर पर्जसह) जास्त गतीचे स्पिंडल असणारे दोन सिमेट्रिक हेडस्टॉक असल्यामुळे मशिनिंग सुलभ होते. 8 स्टेशनच्या दोन सर्व्हो टरेटवर एकाचवेळी 16 टूल्स जलदपणे लावण्याची सोय असल्याने, मटेरिअल काढण्याचा दर वाढतो. यामुळे जास्त उत्पादनक्षमता मिळते. गँट्री बरोबर ऑटो फीडर हा एक आवश्यक विकल्प (ऑप्शन) आहे. आपल्याला कामाच्या स्वरूपानुसार त्यात बदल करता येतात.

regdfgdfgfg_1  
 
 
सी.एन.सी. लेथच्या कामाच्या जागेत कार्यभागांचे स्वयंचलित लोडिंग/अनलोडिंग करण्यासाठी गँट्री लोडरचा वापर केला जातो. याचे दोन मूलभूत भाग असतात. इंटिग्रल 3 अक्षीय गँट्री रोबो आणि ऑटोफीडर. या मशिनमध्ये गँट्री रोबो दुहेरी ग्रिपर स्विव्हेल हेड आणि दुसऱ्या कामासाठी एक चेंज ओव्हर स्टेशन दिलेले असते. कच्चा माल सुरक्षितपणे रचण्यासाठी आणि तयार माल भरण्यासाठी ऑटोफीडरमध्ये पॅलेट मॅगेझिन्सचा वापर केला जातो.
 
 
कच्चा माल पॅलेटवर हाताने भरला जातो. जेव्हा गँट्री ग्रिपर लोडरजवळ येतो आणि नवी कार्यवस्तू उचलून घेऊन जातो, तेव्हा आधीच्या कार्यवस्तूच्या जागी पुढची कार्यवस्तू येते आणि पुढच्या लोडिंगसाठी तयार ठेवली जाते. बिघाड टाळण्यासाठी तिची स्थिती एका संवेदकाद्वारे (सेन्सर) मॉनिटर केली जाते.

vcxf_1  H x W:
 
 
पहिला ग्रिपर कार्यवस्तू पहिल्या स्पिंडलवरून दुसऱ्या ग्रिपरवर हस्तांतरित करतो. दुसरा ग्रिपर दुसऱ्या स्पिंडलवर कार्यवस्तू सहजपणे बसवू शकेल, अशा रीतीने दोन ग्रिपरमधील हस्तांतरण केले जाते. दुसऱ्या ग्रिपरकडे कार्यवस्तू हस्तांतरित केल्यानंतर पहिला ग्रिपर नवीन कार्यवस्तू उचलण्यासाठी लोडरकडे जातो. पहिला ग्रिपर अर्धवट तयार झालेली कार्यवस्तू पहिल्या स्पिंडलवरून उचलतो आणि पहिल्या सेटअपमध्ये नवीन कच्ची कार्यवस्तू चढवतो आणि अर्धवट तयार झालेली कार्यवस्तू दुसऱ्या ग्रिपरला हस्तांतरित करतो. दुसऱ्या सेटअपसाठी कार्यवस्तू लोड करण्यापूर्वी स्पिंडलवरील तयार कार्यभाग दुसऱ्या ग्रिपरद्वारे उचलला जातो आणि पहिल्या ग्रिपरला हस्तांतरित केला जातो. पहिला ग्रिपर तयार कार्यभाग पॅलेटवर ठेवतो आणि पुढच्या आवर्तनासाठी नवीन कच्ची कार्यवस्तू उचलतो. कोणतीही पॅलेट पूर्ण भरली किंवा रिकामी झाली की, तिला इंडेक्स केले जाते.
 
अधिक माहितीसाठी 
 
 
मशिनिंग न थांबवता आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना ही संपूर्ण आवर्तने पार पाडली जातात. हे काम अतिशय वेगाने होते, त्यामुळे एकंदर आवर्तन काळ आणि मानवी अवलंबित्व कमी होते. माल हाताळणीतील स्वयंचलनामुळे उत्पादकता वाढते आणि एकंदर कामगिरी सुधारते.
 
 
हे यंत्र दुहेरी चॅनेल सी.एन.सी. नियंत्रक प्रणालीद्वारे चालवले जाते. दृढ आणि भक्कम रचना असलेल्या डिझाईनमुळे, हे मशिन सर्व स्थितिज आणि गतिज (स्टॅटिक आणि डायनॅमिक) भार पेलू शकते आणि कुठल्याही कठीण परिस्थितीतील मशिनिंग करताना
सर्वोत्तम सेवा देते. चिप कार्यक्षमतेने वाहून नेण्यासाठी खास डिझाईनचा विचार केल्याने, मोठ्या संख्येने होणाऱ्या उत्पादनात तयार होणाऱ्या चिप्सची विल्हेवाट परिणामकारकपणे होते. जास्त अचूकता असलेले एकरेषीय हालचालीचे गाईडवेज आणि बॉल स्क्रू सर्व अक्षांमध्ये अचूक हालचाल होईल याची खात्री करतात आणि मशिनची अचूकता दीर्घकाळ टिकवतात.

vcxfgfsgdfsgfg_1 &nb
 
 
मशिनिंग चालू असतानाच मोजमापन सलग सुरू राहण्यासाठी, स्वयंचलित कार्यवस्तू मोजणीचा पर्याय मदत करतो. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेचा वेग वाढतो आणि विलंब कमी होतो. त्याशिवाय ‘टूल्स प्रोब’ पर्यायामुळे ऑपरेटरने टूल्सवर वेगळे लक्ष ठेवण्याची गरज उरत नाही. परिणामी टूल्स सेटिंग्जचा वेळ कमी होतो. हा वेळ मोठ्या संख्येने होणाऱ्या उत्पादनातील एक महत्त्वाचा अनुत्पादक घटक आहे. स्पिंडलमधून शीतकाची पर्यायी सुविधा असल्याने कार्यवस्तू नीट बसल्याची खात्री केली जाते, ज्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. एर्गोनॉमिक दृष्टीने विचार करून तयार केलेले डिझाईन असल्याने ऑपरेटरला मशिन वापरण्यास सहजसोपे जाते. तसेच TPMला (टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्स) पूरक ठरते. बेअरिंग रिंग्ज, गिअर ब्लॉक, फ्लँजेस, बुशेस आणि त्यासारख्या आकाराचे यंत्रभाग TS 120 मशिनवर चांगल्या प्रकारे बनवता येतात. जिथे गुणवत्ता आणि संख्या हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे असतात अशा वाहन उद्योग आणि इतर अभियांत्रिकी क्षेत्रात या मशिनचा जास्तीत जास्त उपयोग होतो.

vcxfgfsgdfsgfgfdgvff_1&nb
 
 
केस स्टडी
राजकोट येथील फोर्जिंग केलेल्या यंत्रभागांचे यंत्रण करून, निर्यात करणाऱ्या एका कंपनीने जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करता यावी, म्हणून उत्पादन प्रणालीत मानवविरहित, विना व्यत्यय प्रवाह सुरू राहण्यासाठी स्वयंचलनाची गरज ओळखली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चालू असलेल्या उत्पादन प्रणालीत 12 TS 120 मशिन बसविली. या मशिनचा त्यांनी वेगळा विभाग (क्लस्टर) बनविला, जेणेकरून आधीच्या सिंगल स्पिंडल सी.एन.सी मशिनच्या तुलनेत मिळणारा फायदा स्पष्टपणे मोजता यावा. गँट्री, रोबोटिक आर्म आणि लोडर यांच्याद्वारे स्वयंचलन केल्यामुळे एकूण उत्पादन प्रक्रियेत मोठा फरक पडला. ऑपरेटरची उत्पादकता वाढण्याबरोबरच स्पिंडल थांबण्याचा वेळ कमी झाल्यामुळे एकूण उत्पादनही वाढले. या बदलामुळे झालेल्या फायद्यांची प्रातिनिधिक आकडेवारी तक्ता क्र. 1 मध्ये दिली आहे.
 
 
TS 120 प्रणालीद्वारे काम करून, कंपनीने कच्चा माल ते तयार माल हाताळणी, ऑनलाईन दर्जा नियंत्रण आणि संपूर्ण स्वयंचलित व्यवस्था (टोटल ऑटोमेटेड सोल्युशन) यामुळे उत्पादन प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी केला आणि उत्पादन आणि दर्जा याचे निश्चित अंदाज मिळवायला सुरवात केली.
 
 
 
अंबरीश नसीत ज्योति सी.एन.सी. कंपनीमध्ये 2008 पासून काम करतात. ते एस.आर.ई.झेड. अभियांत्रिकी महाविद्यालय (राजकोट) येथे गेली 5 वर्षे अध्यापन करीत आहेत. मॅन्युफॅक्चरिगं प्रोसेस II हे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@