बार कापण्याची सुधारित पद्धत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    09-Jul-2017   
Total Views |
 
The mechanism on the bad saw machine
 
कारखान्यात काम करत असताना अनेक क्रिया आपण वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने करीत असतो. काहीवेळा जर ती मूळ क्रिया नीट तपासली तर कदाचित आपल्याला ती सुधारून त्यातून वेळ आणि पैशाची बचत करणे शक्य असते. व्यवसायातील चुका शोधणे, नवीन माहिती मिळविणे, मिळालेल्या माहितीचा, उपलब्ध सामग्रीचा वापर करून त्याआधारे काही तंत्र पद्धती अंलात आणणे, उत्पादनाचा दर्जा वाढविणे, कमी किंमतीत आणि कमी वेळेत अधिक उत्पादन करणे अशा गोष्टी आजचा प्रगतीशील उद्योजक करायला लागला आहे. पुण्यातील ’टेक्नो स्किल इंजिनिअर वर्क्स’ कंपनीमध्ये कमी वेळेत, कमी मनुष्यबळाचा वापर करून बॅँड सॉ कटिंग मशिनवर लोखंडी बारचे हव्या त्या आकाराचे तुकडे कसे पाडले जातात ते आपण पाहू.
 
बार कापण्याची जुनी पद्धत
 
• बार बँड सॉ मशिनवर उचलून ठेवणे व योग्य तेवढा भाग पात्याच्या पुढे काढून व्हाईस घट्ट करणे.
 
• यंत्र चालवून बारचा तुकडा पाडणे, व्हाईस खोलून जॉब वेगळा करणे.
 
• परत पाठीमागे जाऊन बार पुढे ढकलून ही सगळी प्रक्रिया पुन्हा करणे.

The mechanism on the bad saw machine 
 
जुन्या पद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणी
 
• बार जास्त लांबीचा आणि वजनदार असेल तर तो हाताळण्यासाठी एकापेक्षा अधिक कामगारांची गरज भासत असे.
 
• बारचा तुकडा पडल्यानंतर व्हाईसमधून मोकळा करून परत मागे येऊन तो बार पुढे ढकलावा लागत असे. बार आतमध्ये ढकलल्यानंतर परत पुढील बाजूला, ज्याठिकाणी बार कापला जातो त्याठिकाणी येऊन तो बार लॉक करावा लागत असे.
 
यामध्ये वेळेचा अपव्यय झाल्याने कंपनीचे नुकसान होत होते. मुख्य दोन समस्या सोडविण्याकरता विचार चालू झाला.
 
1. बार जेवढा हवा तेवढाच पुढे सरकवता येणे जेणेकरून जॉब अचूक तयार होईल.
 
2. बार पुढे ढकलण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित केली तर वेळेची बचत होईल.
 
त्यासाठी रोलर आणि वजन यंत्रणेचा वापर करण्याचे ठरले.
 
नवीन पद्धत
 
बार कापण्यासाठी बनवलेली रोलर यंत्रणा
 
बँड सॉ मशिनवरील बारला पाठीमागील बाजूने एक तार अडकविण्यात आली. ती तार मशिनपर्यंत आणून मशिनच्या मध्यभागी त्या तारेला वजन अडकविण्यात आले. बारच्या जाडीनुसार तारेवर किती वजन लावायचे हे ठरविले जाते.
 
• बार मशिनवर ठेवला जाणे. जितक्या लांबीचा बारचा तुकडा कापायचा आहे त्या लांबीनुसार स्टॉपर निश्चित करणे.
 
• यंत्र चालवून बारचा तुकडा पाडणे. बारचा तुकडा कापला गेल्यानंतर तो बार
 
• व्हाईसमधून मोकळा करणे.
 
• बार मोकळा केल्या केल्या वजनामुळे तो आपोआप पुढे सरकला जातो.
 
• पुढील बाजूस लावलेल्या स्टॉपरमुळे हवा तेवढाच बार पुढे येतो. नंतर व्हाईस घट्ट करून पुढील तुकडा कापला जातो.
 
• बार पुढे सरकल्यानंतर जेव्हा वजन जमिनीजवळ येते तेव्हा वजनावर तारेचे वेढे वाढवून त्याला वर उचलले जाते.
 
रोलर यंत्रणेुळे झालेले फायदे
 
• वेळेची बचत झाली.
 
• प्रति तास उत्पादन वाढले.
 
• मनुष्यबळ कमी झाले.
 
मागील 3 ते 4 महिन्यांपासून या नवीन प्रयोगानुसार मशिनवर जॉब तयार करण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे 15 मिमी ते 40 मिमी व्यास असलेला बार कापण्यापर्यंत काही अडचण येत नाही.
 
प्रसाद परचुरे ’टेक्नो स्किल इंजिनिअरिंग वर्क्सचे’ मालक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@