ईएमओ 2017 - ‘कनेक्टिंग सिस्टिम्स फॉर इंटेलिजन्ट प्रॉडक्शन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    02-Aug-2017   
Total Views |

dadfdfdf_1  H x
’बुद्धिवान उत्पादनासाठी पूरक प्रणाली’ (कनेक्टिंग सिस्टिम्स फॉर इंटेलिजन्ट प्रॉडक्शन). हे बोधवाक्यच या प्रदर्शनात काय होते हे सांगणारे आहे.
सर्वप्रथम ईएमओ (EMO) म्हणजे काय ते समजून घेऊया. ’एक्सपोझिशन माँडियाल द ला मशिन-आउटिल’ (जागतिक मशिन टूल प्रदर्शन) हे जर्मनी येथील ’हॅनोव्हर’ या गावी 1951 पासून दर वर्षाआड भरवले जाणारे प्रदर्शन आहे. मशिन टूल आणि एकूणच धातूकाम (मेटल वर्किंग) संदर्भातली अद्ययावत माहिती आणि भविष्यात काय येत आहे, याची चुणूक दाखविणारे हे प्रदर्शन अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठी पर्वणीच असते.
 
 
2017 चे हे प्रदर्शन आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन म्हटले पाहिजे, कारण त्यात 44 देशांच्या 2,200 हून अधिक प्रदर्शकांनी सहभाग घेतला होता. ’ईएमओ’च्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार 1,30,000 हून अधिक पाहुण्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यातील 50% परदेशी पाहुणे होते. मात्र पूर्वीच्या वर्षांपेक्षा या वर्षी कमी गर्दी असल्याचे जाणवले. सुमारे 8 बिलियन युरो इतक्या किंमतीचे व्यवहार या कालावधीत झाले.
 
 
भारतातल्या 32 प्रदर्शकांनी यात सहभाग घेतला ही मोठी आनंदाची बाब होती. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनांच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताचा हा सर्वात मोठा सहभाग असावा. अशा प्रदर्शनांत नियमितपणे सहभाग घेणाऱ्या प्रगती, एस. डिझायनर्स, ज्योती सी.एन.सी., युकॅम, स्फूर्ती, ग्राईंड मास्टर अशा कंपन्यांव्यतिरिक्त भारतभरातील अन्य कंपन्यांची उपस्थितीही येथे उल्लेखनीय होती. त्यात उत्तरेकडच्या हिमाचल प्रदेशातील परवानूपासून ते मध्य भारतातील औरंगाबाद आणि दक्षिणेतल्या कोईम्बत्तूरपर्यंत भागातील या कंपन्या होत्या. भारतीय कंपन्यांनी सी.एन.सी. लेथ्स, मशिनिंग सेंटर्स अशी मशिन्स आणि टूल चेंजर्स, टरेट्स, रोटरी टेबल्स, कुलंट पंप्स, टूल होल्डर्स, कार्बाईड टूलिंग्ज, एस.पी.एम. (स्पेशल पर्पज मशिन्स) अशी विविध प्रकारची उपसाधने प्रदर्शित केली होती. येथे दोन फाउंडरीज् आणि औरंगाबादचे एक टूल फिक्श्चर उत्पादक यांचीही दालने होती.

dadfdfdfhtrhtrh_1 &n
बऱ्याच भारतीय कंपन्यांना आपली उत्पादने जागतिक दर्जाची आहेत आणि ती अशा प्रदर्शनात सर्वांसमोर साधेपणाने मांडावी असा विेशास आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रदर्शनात मिळालेल्या प्रतिसादाविषयी उत्पादक संतुष्ट होते. या प्रदर्शनात भरपूर मागणी नोंदविल्या गेल्या आणि त्या ऑर्डरमध्ये रूपांतरित होतील अशी अनेक उद्योजकांची अपेक्षा असल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळले.
 
 
राजमाने इंडस्ट्रीज्चे राजेंद्र राजमाने त्यांना त्यांच्या पहिल्यावहिल्या ’ईएमओ’ प्रदर्शनात मिळालेल्या प्रतिसादाविषयी पूर्णपणे समाधानी होते. कोईम्बत्तूरच्या फाइन - क्राफ्ट्स या स्लायडिंग हेड्स ऑटोमॅट्ससाठी कॉलेट्सचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे दालन युरोपिअन कंपन्याच्या तोडीस तोड होते.
 
 
भारतीय कंपन्यांपैकी ’ज्योती सी.एन.सी.’चे (ह्युरॉनच्या सोबतीने) प्रदर्शन सर्वोत्कृष्ट होते. त्यांनी 5 अक्षीय मशिन्स, मल्टीटास्किंग मशिन्स, ब्रिज टाइप मशिनिंग सेंटर्स, Y-अक्ष असलेला लेथ अशी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 10 पेक्षा अधिक मशिन्स प्रदर्शित केली होती. ’युकॅम’चे दालनही भव्य होते आणि त्यांनी त्यांचे रोटरी टेबल्सचे सर्व प्रकार प्रदर्शित केले होते. यामध्ये डायरेक्ट ड्राइव्ह असणारी टिल्टिंग प्रकारची रोटरी टेबल्स समाविष्ट होती.

efdedef_1  H x
भारताचा सहभाग वाढला असला तरी, केवळ एस, ए.एम.एस. आणि ’ज्योती सी.एन.सी.’ हेच सी.एन.सी. मशिन्सचे उत्पादक त्यात होते.
 
 
बऱ्याच युरोपियन कंपन्यांनी बुद्धिमान उत्पादनाला पूरक प्रणाली या ’ईएमओ’ 2017 च्या मुख्य विषयाला न्याय देणारी ’इंडस्ट्री 4.0’ला अनुरूप वैशिष्ट्ये/उपसाधने असलेली मशिन्स सादर केली होती.नेहमीप्रमाणे ’डीएमजी मोरी’ हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी हॉल 2 च्या संपूर्ण जागेत ’इंडस्ट्री 4.0’शी अनुरूप अशा 80 अत्याधुनिक मशिन्सचे थेट प्रात्यक्षिक सादर केले होते.

frsrrfreref_1  
 
 
यंदाच्या ’ईएमओ’मध्ये पुढील विषयांवर भर दिला गेला
1) ’इंडस्ट्री 4.0’ : मशिनमध्ये होऊ घातलेल्या बिघाडाचे पूर्वानुमान करू शकणारे संवेदक (सेन्सर्स), उत्पादनाच्या व्यवस्थापनाच्या आयुधांसोबत उत्पादकता सुधारण्यासाठीचा सुसंवाद, उत्पादनावरील अधिक चांगल्या नियंत्रणासाठी परस्परांशी संवाद असणारी मशिन्स आणि पूर्वानुमानित कामगिरीसाठी डेटा व्यवस्थापन व विश्लेषण करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI - आर्टिफिशियल इंटिलिजन्स)
2) स्वयंचलन : गँट्री लोडर्सने सुसज्ज मशिन्स, कार्यवस्तू आणि फिक्श्चर्स हाताळण्यासाठी रोबो, 4 अक्ष आणि 2 टरेट्स असलेली मल्टिटास्किंग मशिन्स, मल्टिस्पिंडल ऑटोमॅट्स, इंटिग्रेक्स प्रकारची मशिन्स.
3) एअरोस्पेस : विमाने आणि अवकाशयाने यांचे यंत्रभाग बनवण्यासाठी 5 अक्षीय मशिन्स
4) ॲडिटिव्ह उत्पादन : 3 डी प्रिंटर्स, आणि 3 डी यंत्रभागांचे यंत्रण
5) अखंडित उत्पादन : अखंडित उत्पादनासाठी भरपूर टूल्सची क्षमता असलेली मशिन्स (रॅक टाईप मॅगेझिन्स)
6) डिजिटल कारखाना : कारखान्याच्या स्वयंचलनासाठी सॉफ्टवेअर आणि टूल्स, डिजिटल कारखाना.
 
 
यांत्रिकी अभियंते असलेले अतुल भिंरगी यांनी 1989 साली प्रगति ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीमध्ये डिझाइन डेव्हलपमेंट विभागाची जबाबदारी पेलली. त्यानंतर 2001 सालापासून ते या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@