मिलिंगमधील कंपन निवारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Aug-2017   
Total Views |

आजकाल बहुतेक मिलिंग प्रक्रिया या मशिनिंग सेंटर्सवर केल्या जातात. कॉम्प्रेसरचे हाउसिंग, बेल हाउसिंग, ट्रान्समिशन हाउसिंग यासारख्या भागांवर मिलिंग प्रक्रिया करताना आतपर्यंत पोहोचणाऱ्या हत्यार जोडणी (टूल ॲसेंब्ली) वापरल्या जातात. अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या मिलिंग प्रक्रियेत पॅरामीटर्सचे आकडे कमी ठेवून कर्तन केले तरी कंपने निर्माण होतात. प्रलंबी (ओव्हरहँग) मिलिंगमधील कंपने घालविण्यासाठी सूचना व उपाय याबाबत आपण लेखात माहिती घेणार आहोत.
bvcfcxgdfsgfg_1 &nbs
 
गिअर बॉक्स हाऊसिंगमध्ये (चित्र क्र. 1) पृष्ठीय (फेस) मिलिंगबाबत समस्या निर्माण झाली. मिलिंग करताना मोठ्या प्रमाणावर कंपने येत होती. ही कंपने कमीकरण्याच्या दृष्टीने विचार केला. मिलिंगच्या चांगल्या पद्धतीआणि थोड्या हटके पध्दतीने विचार केल्यावर नेहमीचे कर्तन परिमाण (पॅरामीटर) वापरूनदेखील तीन टप्प्यात ही कंपने घालविता येतात असे अभ्यास आणि निरीक्षणावरून कळले. हे तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

bvcfcxgdfsgfg_1 &nbs
 
टप्पा 1
टूल होल्डरविषयी
1. त्या मशिनवर HSK 63 इंटरफेस वापरला जात होता. त्यामुळे स्पिंडलचा इंटरफेसच्या दोन पृष्ठभागांना स्पर्श होत होता.
2. जर HSK इंटरफेस उपलब्ध नसेल आणि BT टेपर 40 किंवा BT टेपर 50 इंटरफेस वापरायचा असेल तर, येणारा बाक (डिफ्लेक्शन) कमी करण्यासाठ शिमचा वापर करावा लागतो. यासाठी स्पिंडल इंटरफेस आणि टेपर इंटरफेसच्या मोठया व्यासाची सुरुवात यामधले अचूक अंतर मोजले. (ते साधारणपणे 3.125 मिमीच्या जवळपास होते.) त्यानंतर एका विशिष्ठ आकाराची शिम तयार करून ती हत्यार धारकाच्या (टूल होल्डर) मागच्या पृष्ठभागावर (बॅकफेस) स्क्रूने बसविली. (चित्र क्र.2)
3. एकसंध (इंटिग्रल) हत्यार जोडणीवर हिट ट्रिटमेंट करायला अवघड जाते. हिट ट्रिटमेंट करत असताना या जोडणीमध्ये वक्रता आली किंवा ती जोडणी वाकली तर असमतोल (इंबॅलन्स) निर्माण होऊन कंपने निर्माण होतात. ही कंपने निर्माण होऊ नयेत यासाठी मॉड्युलर एक्सटेन्शन वापरून आवश्यक ती गेज प्लेन लेंग्थ (GPL) मिळवावी लागते.

nghghghgh_1  H
टप्पा 2
मिलिंग कटर आणि इन्सर्टविषयी
मिलिंग प्रक्रिया करत असताना जर हत्यार जोडणीची लांबी (लेंग्थ ऑफ टूल असेंब्ली) कर्तन हत्याराच्या व्यासाच्या दुपटीपेक्षा जास्त असेल तर, पुढे दिलेल्या युक्त्या वापरून कंपने निर्माण करणाऱ्या कर्तन बलांचे (कटिंग फोर्सेस) अक्षीय (ॲक्सिअल) आणि त्रिज्यात्मक (रेडिअल) घटक कमी होतात. परिणामी कंपने घालविता येतात.
• Vc (सरकमफरेन्शियल व्हेलॉसिटी) = 120 - 140 मीटर/मिनीट आणि सरकवेग/दाते (फीड/टूथ) FZ = 0.15 ते 0.25 मिमी/दाते वापरण्यात यावा.
• कमी वजनाचे कटर्स वापरल्यास कमीत कमी असंतुलित वजन राहते.
• हलक्या (लाइट) कर्तन भूमितीचे (कटिंग जॉमेट्री) PVD (फिजिकल व्हेपर डिपॉझिशन) लेप असलेले इन्सर्ट वापरावे.
• डिफरन्शिअल पिच असणाऱ्या मिलिंग कटरमध्ये इन्सर्ट त्याच्या व्यासाशी वेगवेगळे कोन करून बसविलेला असतो. त्यामुळे हा कटर वापरण्यास प्राधान्य द्यावे.
• उपलब्ध असलेला कटर सम (इव्हन) पिचचा असेल तर त्याचे एक आड एक इन्सर्ट काढून टाकावेत. असे केल्यास दर इन्सर्टमागे फीड FZ दुप्पट होतो, मात्र तरीही ते इन्सर्टच्या क्षमतेमध्ये राहते.

ghfggfgfdfgfg_1 &nbs
टप्पा 3
हत्याराचा मार्ग आणि परिमाण याचा सर्वात किफायतशीर वापर करून प्रलंबी मिलिंग करणे.
जेव्हा लांब ओव्हरहँग पद्धतीचे मिलिंग करायचे असते तेव्हा अक्षीय कापाची खोली (डेप्थ ऑफ ॲक्सिअल कट) आणि मिलिंग केल्या जाणाऱ्या पृष्ठभागाशी कटरच्या संपर्काची टक्केवारी यांची योग्य जोडी (कॉम्बिनेशन) निवडण्याची गरज असते. त्यामुळे सर्वोत्तम मिलिंग करता येते.
• कापाची खोली -P= 2 मिमीच्या जवळ ठेवून सुरुवात करावी.
• कटर ॲप्रोच कोन 15° - 45° ठेवला जावा. त्यामुळे कर्तन बल (कटिंग फोर्सेस) स्पिंडलच्या दिशेने लावला जातो.
• मिलिंग केल्या जाणाऱ्या पृष्ठभागाच्या 20- 25% भागाशी कटर संपर्कात राहील असा प्रोग्रॅम करण्यात यावा.
• शेवटच्या (फिनिश) वेळी कटर पास करताना जास्त नोझ त्रिज्या असणाऱ्या कापवडया वापराव्यात.
• कापाचा प्रवेश रोल-ऑन पद्धतीने केल्यास कापवडीवरील जोर (लोडिंग) हळूहळू वाढत जाईल. सुरुवातीला जाड छिलके निघतील आणि नंतर कमी जाडीचे छिलके निघतील. साधारणपणे 10० ते 20० कोन करून कटर पृष्ठभागाला स्पर्श करेल असे पहावे.
• मिलिंग केल्या जाणाऱ्या भागाच्या पृष्ठभागामध्ये सरळ प्रवेश करण्याऐवजी हळूहळू प्रवेश (चित्र क्र. 3) करण्याचा प्रोग्रॅम करा.
यावरून असे म्हणता येईल की, मिलिंगमध्ये येणारी कंपने घालविण्यासाठी पर्याय उपलब्ध असतो, तो ओळखून वर सांगितलेल्या पद्धतीने पावले उचलली तर कंपने कमी करणाऱ्या हत्यारांमधील (डँपनिंग टूलिंग) खर्चिक गुंतवणूक वाचविता येते.
 
रवी नाईक टूलिंग विषयक सुधारणांसाठी सल्लागार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@