चक्सचे भारतातील आद्य उत्पादक : जी.एम.टी.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    01-Sep-2017   
Total Views |

India's first manufacturer of chucks: GMT

लेथ चक्सचे भारतातील प्रमुख उत्पादक असलेल्या ’गिंडी मशिन टूल्स’कडे (जी.एम.टी.) अचूक आणि अवघड धातू कर्तनासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे स्टँडर्ड चक्स उपलब्ध आहेत. आम्ही एस डिझायनर्स, एल.एम.डब्ल्यू., एच.एम.टी., गॅलक्सी, बाटलीबॉय, मार्शल, बी.एफ.डब्ल्यू., प्राइड यांच्यासारख्या बहुतांश भारतीय मशिन टूल उत्पादक आणि प्रमुख ऑटो यंत्रभाग पुरवठादार आणि व्हॉल्व्हज तसेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिनसारख्या उपकरणांच्या उत्पादकांचे आम्ही प्रथम पसंतीचे पुरवठादार आहोत. एम.एस.एम.ई. क्षेत्रातील हजारो ग्राहकांना आम्ही संतुष्ट करण्यात यशस्वी झालो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही मॅन्युअल लेथ चक्स आणि सी.एन. सी. प्रयोजनासाठी ॲक्च्युएटर्ससहित वेगवान (हाय स्पीड) चक्सचे उत्पादन करतो, तसेच स्टँडर्ड कामांसाठी लागणारे 135 मिमी ते 2000 मिमी व्यासापर्यंत लेथ चक्स बनवतो. ग्राहकाच्या गरजेनुसार डिझाईन केलेले चक्स आणि ट्रायपॉड, स्टिअरिंग नकल, रॉकर आर्म आणि अन्य स्वयंचलित यंत्रभागांच्या विविध प्रकारांसाठी कार्यवस्तू पकडण्याची विशेष साधने आम्ही पुरवतो.
 
1959 मध्ये जेव्हा आपल्या देशातील हत्यारे (टूल्स) उत्पादन उद्योग अगदी बाल्यावस्थेत होता, तेव्हा ‘गिंडी मशिन टूल्स’ (जी.एम.टी.) या भारतातील चक्सच्या आद्य उत्पादक कंपनीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बनारस हिंदू विेशविद्यालयाचे पदवीधर असलेले, आमच्या कंपनीचे संस्थापक, वेंकटरमण, यांनी एका लहानशा बेंच लेथच्या उत्पादनापासून उद्योगाची सुरुवात केली होती. त्यांच्याजवळ मेटलर्जी विषयाचे प्रगाढ ज्ञान होते. त्यांनी सर्व घटकांची (कंपोनंट्स) यंत्रचित्रे (मशिन ड्रॉइंग्ज) बनवण्यापासून ते लेथचा पाटा (बेड) घासून संरेखित (अलाइन) करण्यापर्यंत सर्व काही स्वतःच्या हाताने केले. संरेखनाच्या कामासाठी त्यांना एक सरफेस प्लेट हवी होती. अशी प्लेट त्या काळात सहजासहजी मिळत नव्हती. त्यामुळे ब्रिटिश स्टँडर्डचा संदर्भ घेऊन ती प्लेट बनवली आणि तेच आमच्या कंपनीचे पहिले वहिले उत्पादन होते. त्याचे विपणन (मार्केटिंग) करण्यासाठी व्होल्टाजनी साहाय्य केले.

Lathe chuck and cylinder assembly 
एका संस्थापकाचे धडाडीचे नेतृत्व, धैर्य आणि चिकाटीसोबत संशोधन आणि विकासासाठी घेतलेले कठोर परिश्रम यांचा संयुक्त परिणाम म्हणजे आमची आजवरची यशस्वी वाटचाल. आज जी.एम.टी. स्वतःच्या सरफेस प्लेट आणि मेट्रॉलॉजी उत्पाद श्रेणीसाठी सुप्रसिद्ध असली, तरी भारतातील यंत्र उत्पादन उद्योगात लेथ चक्सबरोबर आमचे नाव पक्के जोडले गेले आहे.
 
भारतात त्या काळी स्क्रोल प्रकारचे चक्स उपलब्ध असत. स्क्रोल चकची वस्तू पकडण्याची शक्ती मर्यादित असते, परंतु वेंकटरमण एका अधिक पकड शक्ती असलेल्या चकच्या शोधात होते. उच्च टॉर्क असलेल्या, गियरद्वारा चालित लेथमधून अधिकतम शक्ती वापरणे यासाठी असा चक हवा होता. म्हणून 1965 मध्ये आम्ही बर्ग स्पॅन्टेक्निक (जर्मनी), या कंपनीबरोबर ‘तंत्रविशिष्ट ज्ञान (टेक्निकल नो हाउ)’ यासाठी करार केला आणि त्यांच्या वर्म आणि वर्म-व्हील असलेल्या चक्सची यंत्ररचना मिळविली. या यंत्ररचनेचे, वर्म, वर्म व्हील डिझाईन आणि कॅमचा मोठा उतार आणि चढाव हे वैशिष्ट्य होते. या डिझाईनमध्ये उच्च यांत्रिक बल प्राप्त होते.
 
स्क्रोल-बेव्हेल गियर चक आणि वर्म-वर्म व्हील/कॅम चक
 
स्क्रोल प्रकारच्या चकमध्ये स्क्रोल आटे असलेली स्क्रोल तबकडी असते. हे आटे तिन्ही जबड्यांवरच्या दात्यांमध्ये गुंफले जातात आणि एका वेळेस तिन्ही जबड्यांची त्रिज्यात्मक (रेडियल) हालचाल होते. या तबकडीच्या मागच्या बाजूला एक बेव्हेल गियर असतो अथवा बेव्हेल दाते असतात, जे चकच्या बॉडीमध्ये असणाऱ्या हाताने फिरवण्याच्या गियरमध्ये गुंफले जातात. (चित्र क्र. 1)
 
जी.एम.टी.च्या हाताने चालवण्याच्या चकमध्ये, एका पान्ह्याच्या साहाय्याने वर्म फिरतो. तो वर्म व्हीलला फिरवतो. वर्म व्हीलच्या डोक्यावर एक कॅम असतो. त्याकॅमवर असलेले बटन बेस जॉला ॲक्चुएट करते. वर्म आणि व्हील यांच्या दात्यांतील गुणोत्तर आणि कॅमचे गुणोत्तर यांच्या गुणाकारामुळे अधिक यांत्रिक बल मिळते आणि त्यामुळे जास्त पकड शक्तीचा फायदा मिळतो.

Scroll - Bevel gear chuck

आतापर्यंतचा प्रवास
 
आम्ही हाताने चालवण्याचे चक्स (मॅन्युअल चक) बनवायला सुरुवात केली तेव्हा ओतकाम (कास्टिंग) आणि घडाई (फोर्जिंग) केलेले जॉब कधीच एकसारखे होत नव्हते. बाहेरचा व्यास कधीच पूर्ण वर्तुळाकार नसायचा. त्यामुळे अशा फोर्जिंग आणि कास्टिंगमधून मिळणाऱ्या कार्यवस्तूंच्या अनियमित पृष्ठभागांना पकडण्याचे बल सहन करू शकतील तसेच 3 किंवा 5 मिमी काप (कट) घेण्यासाठी आवश्यक असलेले अधिक पकड बल देऊ शकणारे चक गरजेचे होते, तसेच चक बाजारात विकणे हे वेगळेच आव्हान होते. स्क्रोल चकची किंमत ही कॅम चक किंमतीच्या अर्धी होती. परंतु आमची चिकाटी, चाचण्यांद्वार वापरकर्त्यांना आमच्या उत्पादनाचे फायदे पटवून देण्याची क्षमता आणि तंत्रविषयक साहाय्य यांच्यामुळे आम्ही यश संपादन केले.

Manual Chuck

Manual chuck system 
1966 मध्ये आमच्या चकचा नमुना तयार झाला. आम्ही त्याची सी.एम.टी. आय. आणि एच.एम.टी.मध्ये चाचणी घेतली आणि आयात केलेल्या इतर चकपेक्षा सरस कामगिरी आमच्या चकने केली. हे चक आमच्या आजच्या एकूण उत्पादनाचा छोटाहिस्सा असले, तरी याच उत्पादनाने आम्हाला पॉवर चक आणि इतर विविध उत्पादने तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव मिळवून दिला.
 
पॉवर चक्सची निर्मिती
 
60 च्या दशकाच्या उत्तरार्धात आमच्याकडे एक मुरलेला आणि परिपक्व डिझाईन कार्यगट होता. 1971 मध्ये आम्ही गोल फिरणाऱ्या न्युमॅटिक अथवा हायड्रॉलिक सिलिंडर्सद्वारा कार्यन्वित होणारे पॉवर ऑपरेटेड चक मॉडेल पी.एस. विकसित केले. हे पायाने किंवा हाताने ऑपरेट करायच्या स्विचद्वारे संचलित केले जातात. या कार्यवाहीमुळे कामगाराला थकवा येत नाही आणि उत्पादनात वाढ होते. हे चक्स आणि ॲक्च्युएटर्स स्पिंडलची गती जास्तीत जास्त 2000 आर.पी.एम. असणाऱ्या चकर्स आणि टरेट लेथसाठी विकसित केले होते. त्यांचा उपयोग प्रामुख्याने टेल्को, बजाज ऑटो, बजाज टेम्पो, के.एस.बी. इ. उद्योगसंकुलात केला गेला. त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना आयात केलेल्या चक्स आणि सिलिंडर्सच्या तोडीस तोड असे चक्स आणि सिलिंडर्स देऊ केले.

1989 मध्ये आम्ही हॉलो हाय स्पीड पॉवर ऑपरेटेड चक मॉडेल पी.एच.एन.सी. आणि सुरक्षित हॉलो हाय स्पीड हायड्रॉलिक रोटेटिंग सिलिंडर्सचे उत्पादन सुरू केले. हे चक्स आणि सिलिंडर्स 4000 आर.पी.एम. आणि त्याच्याही वर चालवण्यासाठी सक्षम आहेत. इतर चक्समध्ये आम्ही पुढील प्रकार विकसित केले.
 
1) तेल उत्पादक देशांतील लेथसाठी तेलाच्या नलिकांच्या आणि पंपासाठी केसिंग पाईप्सच्या यंत्रणासाठी न्युमॅटिकली ऑपरेटेड फ्रंट एंड चक्स.
 
2) विविध प्रकारचे कॉलेट चक्स आणि एक्सपान्डिंग मँड्रेल्स
 
3) ऑटो आणि अर्थ मूव्हिंग उद्योगासाठी फ्रिक्शन वेल्डिंग चक्स.

Chuk 1

Chuk 2 

ग्राहकाच्या गरजेनुरूप बनविलेली कार्यवस्तू पकड साधने
 
आमच्याकडे ऑटोमोटिव्ह उद्योगातील बऱ्याच यंत्रभागांसाठी विशिष्ट घडणीचे चक्स आहेत. ग्राहक आम्हाला ज्या यंत्रभागाचे यंत्रण (मशिनिंग) करायचे असते, त्याचे डिझाईन आणि यंत्रचित्र देतात. आम्ही त्याच्या यंत्रणासाठी योग्य उपाय योजना तयार करतो आणि विशेष चक देतो. यामध्ये बॉल लॉक चक्स, ग्रिप डाऊन चक्स, हायड्रॉलिक चक आणि इतर विविध प्रकारचे विशेष चक येतात.

Chuk 2

आमच्या काही विशेष उपाययोजना
 
वाहन उद्योगात लागणाऱ्या व्हॉल्व्हच्या बॉडी आणि युनिव्हर्सल क्रॉससाठीचे यंत्रण करण्यासाठी आम्ही पॉवरवर चालणारे, हँड इंडेक्सिंग अर्ध स्वयंचलित विशेष चक बनवतो. पॉवरवर चालणारे पॉवर इंडेक्सिंग चक्स वाहन उद्योगाचे भाग तयार करण्यासाठी वापरले जातात. यंत्रण चालू असतानाच याच्यात इंडेक्सिंग होत असल्याने उत्पादकता वाढते. 4X90 किंवा 3X 120 अंशातील यंत्रण एकाच सेट-अपमध्ये करण्यासाठी हे चक उपयुक्त आहेत. त्याच्यासाठी राखीव असलेल्या डिस्ट्रिब्युटर आणि हायड्रॉलिक पॉवर पॅकच्या साहाय्याने ते काम करतात
 
मोठ्या आकाराच्या व्हॉल्व्हच्या भागांसाठी पॉवरवर चालणारे पॉवर इंडेक्सिंग चक्स परवडत नसल्याने आम्ही पॉवरवर चालणारे हँड इंडेक्सिंग अर्ध स्वयंचलित विशेष चक तयार केले. या यंत्रभागांचा बराचसा भाग चकच्या बॉडीच्या आतमध्ये पकडला जात असल्याने त्याचा ओव्हरहँग कमी होतो. याची पकडण्याची आणि पोझिशन लॉक करण्याची क्रिया पॉवरने होते, तर इंडेक्सिंग हाताने केले जाते.
 
बरेचसे यंत्रभाग चकच्या बाहेरच क्लॅम्पिंग करून त्यांचे डायनॅमिक बॅलन्सिंग करून, यंत्रणासाठी तयार करून ठेवता येऊ शकतात. हे चक्स 440, 550 आणि 900 मिमी व्यासाच्या आकारात उपलब्ध आहेत.

व्यवसायावर एक दृष्टिक्षेप
 
आमच्या एकंदर 285 जणाच्या कार्यगटातील 12 जण सॉलिड वर्क्स आणि FEA सुविधा वापरून स्टँडर्ड आणि विशेष डिझाईनसाठी काम करतात. सुरुवातीच्या काळात आमचे उत्पादन फारसे नव्हते. तेव्हा आम्ही एका वर्षात अंदाजे 1,000 चक्स बनवत असू. वाहन उद्योगातील वाढीबरोबरच आम्ही आमची क्षमता वाढविल्याने आता आमचे चकचे उत्पादन वर्षाला 4,000 इतके आहे. त्यात मॅन्युअल चक्सचा हिस्सा कमी आहे. विशेषत: एच.एम.टी.च्या लेथमध्ये जी.एम.टी.चा मॅन्युअल चकच वापरला जातो. त्या व्यतिरिक्त आमचे 15% उत्पादन विशेष चक्सचे असते. गेल्या 60 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत आम्ही सुमारे 60 हजार चक आणि 9,500 सिलिंडर भारतातील बाजारात विकले आहेत.
 
हाताने चालवले जाणारे आणि पॉवरवर चालणारे चक सोडून आम्ही हायड्रॉलिक रोटरी इंडेक्सिंग टेबल, सिंगल साईड लॅपिंग आणि प्लॅनेटरी लॅपिंग मशिन, ॲब्रेझिव्ह बेल्ट ग्राईंडिंग मशिन आणि CMM सारखी यंत्रेही तयार करतो.
90 mm HIC

संशोधन आणि विकास (आर अँड डी)
 
संशोधन आणि विकास हा नेहमीच कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचा अविभाज्य भाग राहिला आहे. सुरुवातीपासूनच आमचा डिझाईनर कार्यगट, ग्राहकांबरोबर सातत्याने संवाद साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम उत्पादने बनवण्यात उत्पादन, तपासणी आणि विक्री या विभागांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आला आहे. याचाच परिणाम म्हणून विकास आणि नवीन उपक्रम ही आमच्याकडे अखंड जोपासली जाणारी प्रक्रिया आहे. याच कारणामुळे आमच्याकडे संशोधन आणि विकास या विभागाचे वेगळे अंदाजपत्रक नसते.
 
Hand Indicshing Chuck

Power Indicshing Chuck 

उत्पादन व्यवस्था
 
चक्सच्या निर्मितीसाठी आमच्याकडे सर्व प्रकारची मूलभूत तसेच अत्याधुनिक यंत्रे आहेत. चक्स निर्मितीच्या आमच्या एकात्मिक व्यवस्थेमध्ये आर.एम. टेस्टिंग, सी.एम.एम., हत्यारांना धार लावणे, सी.एन.सी., व्ही.एम.सी., पकड बल मोजण्याची सुविधा, डायनॅमिक बॅलन्सिंग, स्वतःची स्पेशल पर्पज इंडक्शन हार्डनिंग असलेली एच.टी. (हीट ट्रीटमेंट) वगैरेंचा समावेश आहे. आम्ही चकसाठी स्वतःच काही महत्त्वाची एस.पी.एम. (स्पेशल पर्पज मशिन्स) तयार केली आहेत. उदा., चकच्या बॉडीमध्ये T आकाराच्या खाचेचे (T स्लॉट) ग्राईंडिंग करणे, हे वेज प्रकारच्या तीन जबड्यांच्या चक्समधील एक महत्त्वाचे काम असते. आम्ही यासाठी दोन स्पिंडल्स असलेले आणि उभ्या पृष्ठभागाचे ग्राईंडिंग करणारे यंत्र खास विकसित केले. या यंत्रात एक ग्राईंडिंग व्हील T खाचेचा उभा भाग ग्राईंड करते, तर दुसरे व्हील आडवा आणि टोकाचा उभा भाग ग्राईंड करते. (चित्र क्र.2) चक बॉडीमधल्या खाचेची 120 अंशाची कोनीय अचूकता मिळवण्यासाठी आम्ही जी.एम.टी.चे हायड्रॉलिकली ऑपरेटेड इन्डेक्सिंग टेबल वापरतो. (चापाची अचूकता +/- 3 सेकंद) यामुळे आवश्यक अचूकता आणि उत्पादनक्षमता दोन्ही साध्य होतात. आमच्या कारखान्यात अशी चार यंत्रे कार्यरत आहेत.
 
जबड्यांच्या हालचालीत विश्वासार्हता आणि पुनरावृत्तीक्षमता टिकवण्यासाठी तळातल्या जबड्याच्या प्लेटवरील खाचांचे ग्राईंडिंग अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी आम्हीच तयार केलेले हिऱ्याचे व्हील असलेले क्रीप फीड ग्राईंडर्स वापरतो.


HAND INDECSHING CHUK

Fig 2 

गुणवत्ता पद्धती
 
गुणवत्ता मिळवण्याच्या आमच्या प्रक्रिया परिपक्व आहेत. नेहमीच्या तपासणी उपकरणांव्यतिरिक्त आमच्याकडे जॉ फोर्स ॲनलायझर्स आणि बॅलन्सिंग मशिन्स आहेत. बहुतांशी यंत्रभाग जी.एम.टी.च्या सी.एम.एम. वर तपासले जातात. कच्च्या मालाची स्पेक्ट्रोमीटरद्वारा तपासणी ही आमच्या गुणवत्ता ओशासनाची पहिली पायरी आहे. आमचा कर्मचारी वर्ग कार्यकुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांची बरोबरी करणारी आहे. हा प्रवास अतिशय विलक्षण होता आणि भविष्यात आमच्याबरोबर वाटचाल करण्यासाठी आपल्याला आग्रहाचे आमंत्रण आहे. अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला पुढील पत्त्यावर भेट द्या. www.gmt.co.in


के जगन्नाथन जी.एम.टी. कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांना वर्क होल्डिंग आणि मशीन टूल्स क्षेत्रातील 56 वर्षांचा अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@