वेळेची बचत करणारा अल्पखर्चिक ’जॉ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    08-Sep-2017   
Total Views |

Quick release coupling
 
कार्यवस्तू पकडण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे चकची गुणवत्ता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच कामगाराला इजा पोहोचण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे चक्स उत्पादन निर्मितीमध्ये वापरले जाणे महत्त्वाचे ठरते. आज उद्योग जगतामध्ये बहुतांशी टर्निंग प्रक्रियेमध्ये 3 जॉ पॉवर चक्स वापरण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, अशी काही ऑपरेशन्स आहेत जिथे खासकरून एखाद्या जॉबसाठी विशेष जॉ तयार करावे लागतात. आमच्या ‘सीलंट’ कंपनीने याचसाठी अभिनव पद्धती शोधून काढली आहे. त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
 
आमची ‘सीलंट’ कंपनी मागील 30 वर्षांपासून क्विक रिलिज कपलिंग हे उत्पादन तयार करते. कपलिंगची शेकडो मॉडेल्स असतात. (संदर्भासाठी चित्र क्र. 1 पहा.) प्रत्येक मॉडेलमधे 3 ते 6 सुटे भाग असतात. हे सर्व भाग मुख्यत्वे सी.एन.सी. लेथवर बनतात.

Quick release coupling
 
क्विक रिलीज कपलिंग चकवर पकडण्यासाठी ‘सॉफ्ट जॉ’ वापरले जातात. प्रत्येक यंत्रभागासाठी 3 जॉचा स्वतंत्र सेट लागतो. पुढच्या वेळी वापरण्यासाठी ते साठवून ठेवायचे ठरवल्यास शेकडो सेट्स सांभाळून ठेवावे लागतात. याचा खर्च खूप येतो. त्यासाठी जागाही भरपूर लागते. नवीन जॉ सेट लावल्यावर तो योग्य (ट्रू) लागण्यासाठी नवीन काप (कट) घ्यावा लागतो, त्यासाठीदेखील बराच वेळ खर्ची होतो.
 
हे काम सोपे व्हावे आणि वेळ वाचावा यासाठी आम्ही पटकन बदलता येणाऱ्या व कमी खर्चाच्या ‘टिप’ जॉची निर्मिती केली. यासाठी भारत सरकारचे पेटंटही आम्हाला मिळाले आहे. चकवर वापरल्या जाणाऱ्या ‘कठीण’ जॉचे डिझाईन बदलून त्याच्या अग्रभागावर छोटा टिप जॉ बसवण्याची सोय केली. (चित्र क्र.2)

Fig 2
 
कठीण जॉ चकवर बसवल्यावर तो न हलवता त्यात बसवलेला छोटा जॉ काढता - घालता यावा, अशी ही रचना आहे. काढलेला छोटा जॉ पुन्हा बसवताना अचूकपणे पूर्वस्थानी यावा यासाठी निमुळता गोपुरी सांधा (टेपर्ड ट्रॅपॅझॉयडल जॉईंट) वापरला आहे. ड्रिलिंग मशिनमध्ये ड्रिल ज्याप्रमाणे नुसते दाबून घट्ट बसते व ट्रू फिरते तसेच हे टिप काढून नंतर परत बसवल्यास 0.05 मिमी मध्ये ट्रू बसते. जरी जॉ घट्ट बसत असला, तरी बोअरिंग करताना बसणाऱ्या धक्क्यांमुळे तो सैल होऊ नये, यासाठी एका स्क्रूची रचना करण्यात आलेली आहे. हे घट्ट बसलेले टिप नुसत्या हातांनी निघत नाही. ते काढण्यासाठी पुलर वापरावा लागतो. आठ महिन्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमधून अखेरीस पटकन बदलता येणाऱ्या जॉची (क्विक चेंज टिप जॉज) निर्मिती झाली आहे.

O.D.JOB
 
ही टिप्स आम्ही सॉफ्ट EN8, टफन्ड व हार्डनेबल अशा तीनही प्रकारात देतो. एकच जॉ सॉफ्ट टिप्स लावल्यावर सॉफ्ट जॉ म्हणून, हार्डनेबल टिप लावल्यावर हार्ड जॉ म्हणून वापरता येतो. EN8 टफन्ड टिप वापरल्यामुळे बोअरिंग करण्याची गरज खूप कमी होवून तोही वेळ वाचवता येतो.
 
तीन टिपचा सेट ठेवण्यासाठी आम्ही पुठ्ठ्याची छोटी खोकी देतो. या खोक्याचा आकार एका जॉपेक्षाही लहान असतो.तसेच या खोक्यावर कार्यवस्तूचे नाव त्याचा बोअर साईज व मशिन हे लिहिण्याची सोय असल्याने योग्य जॉ सेट शोधण्याचा वेळही वाचतो. (चित्र क्र. 3)

Fig 3
 
आमची इतर उत्पादने

Combined job 

joa 
 
फायदे
 
• या उत्पादनामुळे सेटिंगच्या वेळात अर्ध्या तासाची बचत होते.
 
• रोज सेटिंग बदलत असेल तर वर्षाकाठी 30 हजार रुपये सेटिंगच्या वेळातच वाचवता येतात. याचे कारण संपूर्ण जॉ सेट बदलण्यापेक्षा टिप बदलण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी असतो.
 
• आम्ही 135, 165, व 200 मिमी या आकाराच्या चकसाठी एकच टिप वापरता येतील, अशी सोय केली.
 
• या जॉवर षट्कोनी जॉब पकडणेही शक्य होते. यामुळे प्रि-मशिनिंगची गरज नाहीशी होते.
 
वेगवेगळ्या कंपन्यांचे चक वापरले जात असतील, तर त्यासाठी वेगवेगळे जॉज ठेवावे लागतात. यामुळे जॉची संख्या वाढत जाते. आमच्या पद्धतीमध्ये चकनुसार बेस जॉ बनवला जातो. या सर्व जॉमध्ये टिप्स मात्र कुठल्याही प्रकारच्या चकला चालतील अशी असतात.
 
टिपची किंमत जॉच्या 40% असते. त्याशिवाय अनेक मशिन्सवर तीच टिप वापरता येत असल्याने जॉमधील गुंतवणूक 90% पर्यंत कमी होऊ शकते. (उदाहरणार्थ, काही विशिष्ट कामे वेगवेगळ्या मशिनवर करण्यासाठी 1 लाख रुपयांचे जॉ लागत असतील, तर तेच काम करण्यासाठी लागणाऱ्या टिप्सची किंमत आमच्याकडे 10 हजार रुपये असू शकते.)
 
या उत्पादनासाठी आम्हाला औद्योगिक गुणवत्तेसाठीचे जी.एस. पारखे पारितोषिक मिळाले आहे.
 
शशांक गद्रे ’सीलंट एंटरप्रायझेस’ या कंपनीचे संचालक आहेत. गेली 30 हून अधिक वर्षे ही कंपनी QRC क्षेत्रात अभिनव उत्पादने ग्राहकांना देत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@