शीतक पंप बंद होणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    01-Jan-2018   
Total Views |

Cooling pump shutdown
 
या आधीच्या लेखांमध्ये आपण तातडीची मदत, मशिन चालूच होत नाही, वंगण तेलाची पातळी समाधानकारक नसणे, तसेच वंगण तेलाचा दाब कमी असल्यास काय परिणाम होतात आणि चक निष्क्रीय असणे या समस्यांबद्दल तसेच टेल स्टॉकसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार केला.
 
जुलै महिन्यात आपण टरेटबद्दलच्या समस्यांची माहिती घेतली. या लेखात शीतक (कुलंट) पंप बंद पडणे या समस्येचा विचार करू.

Cooling Pump 
 
हायड्रॉलिक आणि शीतक मोटरचे तापमान वाढल्यामुळे होणारा परिणाम
  
पंपाच्या साहाय्याने मशिनमध्ये आवश्यक तिथे शीतकाचा आणि तेलाचा पुरवठा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या मोटरचा वापर केला जातो. मोटरच्या सुरक्षेसाठी मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर (MPCB) आणि पूरक स्विच दिलेला असतो. या MPCB मध्ये योग्य तापमानाचे आणि ॲम्पीअरचे सेटिंग केलेले असते. जर दोन्हीपैकी एक पॅरामीटर मर्यादेबाहेर गेला तर MPCB ट्रिप होतो. तसेच जर शीतकाचे तापमान वाढले तर स्विच कार्यान्वित होतो आणि अलार्म वाजतो. स्विच बंद पडण्याची कारणे पुढे नमूद केली आहेत.
  
1. पंप गरम होतो.
2. पंपामधून वाहणाऱ्या शीतकाच्या प्रवाहाला अडथळा झाल्यामुळे तापमानात वाढ होते.
3. शीतकाच्या टाकीत गाळ साचून पंपाला शीतक खेचण्यास जास्त शक्ती लागल्यामुळे तापमान वाढू शकते.
4. पंपावर जास्त भार आल्यामुळे मोटर गरम होते. कारण मोटर जास्त विद्युत प्रवाह खेचू लागते.
5. जर एखादी वायर खराब होऊन दोन फेजच काम करत असतील तर मोटरचे तापमान वाढते.
 
शीतकाच्या टाकीत गाळ साठण्याचे कारण म्हणजे योग्यवेळी टाकी स्वच्छ केली जात नाही. त्याचप्रमाणे जे फिल्टर बसविलेले असतात ते साफ केले जात नाहीत. सहा महिन्यानंतर जुने फिल्टर काढून नवीन फिल्टर बसवावेत. शीतकाच्या टाकीची देखभाल व्यवस्थित आणि वेळच्यावेळी केल्यास मोटरवरील भार जास्त होऊन स्विच बंद होणार नाही.
 
आता टोटल प्रॉडक्टिव्ह मॅनेजमेंट प्रणाली वापरणाऱ्या कंपन्यांमध्ये मशिन बंद होण्याचा कालावधी आणि त्याची कारणे यांची स्वयंचलित नोंदणी होत असते. मशिनकडून मिळणाऱ्या या माहितीचा (डेटा) खूपच उपयोग होतो. मशिन कशामुळे बंद होते याची कारणे संगणकात नोंद केली जातात.
 
उदाहरणार्थ,
 
1. मोटर गरम झाली.
2. मशिन चालूच होत नाही.
3. वंगणाची पातळी असमाधानकारक असणे.
4. मोटरची वायर खराब असणे.
 
मशिन बंद पडल्याचे कारण आणि त्याचा अवधी या दोन्ही बाबींची नोंद आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे योग्य ती कृती केल्यास मशिन पूर्ण कार्यक्षमतेने वापरणे शक्य होते.
 
या लेखमालेमध्ये आपण सी.एन.सी. लेथमध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात, त्याची कारणे आणि उपाय काय आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाच्या जागी अशा प्रकारची मशिन असल्यास आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा अभ्यास करावा.
 
वाचकांच्या सोयीसाठी या लेखमालेत मांडणी केलेल्या सर्व समस्यांचा एकत्रित तक्ता पुढे दिला आहे.
 
Table : 1
 
Table : 2
 
नारायण मूर्ती ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’चे सर्व्हिस व्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन मेंटेनन्समधील प्रदीर्घ अनुभव आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@