वेगवान ड्रिल टॅप सेंटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Oct-2018   
Total Views |
उत्पादन जगतामध्ये सध्या सातत्याने जास्तीतजास्त कार्यक्षमतेसाठी प्रयत्न सुरू असलेले दिसून येत आहेत. पूर्वी कधीही नव्हती इतकी आजची बाजारपेठ स्पर्धात्मक आणि वेळेची किंमत जाणणारी आहे. काम करताना (वर्क फ्लो) केलेल्या छोट्या छोट्या सुधारणांमुळे मध्यम आणि दीर्घकालीन मोठा फायदा होताना दिसतो. अशा सुधारणांचा एकत्रित फायदा म्हणजेच ग्राहकाशी असलेली बांधिलकी जपणे. तंत्रज्ञानांचा शोध घेऊन आणि सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादन श्रेणीचा विकास करून हे अवघड आव्हान पेलता येते. उत्पादन क्षेत्रामध्ये वेगाला ‘चलना’चे स्वरूप येत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने संशोधन करून, आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरून, विकसित मशिनची निर्मिती करत असतो.
उच्च गतिच्या यंत्रण प्रक्रियेसाठी मशिनमध्ये पूर्णपणे नवीन बदल करण्याची आवश्यकता असते. जास्त उत्पादकतेसाठी विविध प्रकारच्या उद्योगांना उपयुक्त ठरेल असे मशिन विकसित करण्याची मोठी मागणी बाजारपेठेतून केली जाते. या मागणीतूनच यंत्रणामध्ये जास्त वेगाची गरज निर्माण होते. उत्पादक जगासमोरील या सर्व बाबींचा विचार करतानाच अधिक विेशासार्ह आणि वेगवान गतीने काम करण्याच्या आव्हानाची पूर्तता करण्यासाठी ‘ज्योती सी.एन.सी.’ या आमच्या कंपनीने ‘टेकयन’ नावाचे वेगवान ड्रिल टॅप सेंटर विकसित केले आहे.
 
निर्मितीमागील प्रेरणा
‘टेकयन’ हा शब्द ‘टॅकीस’ या ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून, ‘स्विफ्ट’ असा त्याचा अर्थ आहे. ‘टेकयन’ हे सैद्धांतिकदृष्ट्या मांडलेल्या गृहीतकामध्ये प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणाऱ्या कणांचा विचार केला आहे. ही संकल्पना प्रथम ओ.एम.पी. बिलानिऊक, भारतीय शास्त्रज्ञ व्ही.के. देशपांडे आणि इ.सी.जी. सुदर्शन यांनी 1962 मध्ये मांडली होती. ‘टेकयन’ कणांच्या संशोधनातील भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाची आठवण म्हणून, या मशिनला आम्ही ‘टेकयन’ हे नाव दिले. लोडिंग अनलोडिंगमध्ये अतिशय नगण्य वेळ खर्च करून उत्तम आवर्तन काळ (सायकल टाईम) मिळविण्यासाठी या मशिनची निर्मिती केली आणि वेगाचे प्रतीक म्हणून ‘टेकयन’ हे नाव दिले.

टेकयन मशिन

निर्मितीमधील आव्हाने
जागतिक पातळीवरील मशिनशी वेगाच्या बाबतीत स्पर्धा करेल असे भारतीय मशिन बनवून देशाची मशिन उत्पादनातील क्षमता दाखवून देणे असे उद्दिष्ट समोर ठेवून हे मशिन विकसित करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले. मशिनचे प्रत्येक वैशिष्ट्य जास्त वेगासाठी पूरक ठरेल या दृष्टिकोनातून मशिन विकसित करणे हे आमच्यासमोरील कळीचे आव्हान होते. जुळवणी (मॅचिंग) प्रक्रिया जलद बनविताना जास्त ‘रॅपिड’ हा एक महत्त्वाचा घटक प्रभावी ठरतो, तो साध्य करणे हेदेखील आव्हान होते. दुसरे आव्हान म्हणजे जास्त वेगाने मशिन चालविताना त्याचे डायनॅमिक्स टिकून राहील अशी संतुलित मशिन रचना तयार करणे. त्याच वेळी रचनेचे डिझाईन अशा पद्धतीने करणे की, सर्व आवश्यक इतर गोष्टी कमीतकमी जागेत बसवून कामासाठी जास्तीतजास्त जागा उपलब्ध राहील. टूल बदलाची प्रक्रिया वेगाने करणे हादेखील यामधील महत्त्वाचा घटक होता. तसेच यंत्रण प्रक्रिया जलद होऊन रिकामा वेळ कमी करण्यासाठी स्वयंचलित पॅलेट चेंजरचा त्यामध्ये समावेश करणे हीदेखील आमच्यासाठी आव्हानात्मक बाब होती. कार्यवस्तू आणि टूल बदल कमीतकमी वेळात केल्याने मशिनचा प्रत्यक्ष यंत्रण न होणारा वेळ कमी करण्यासाठी खूप मदत होते. या आवश्यकता पूर्ण करणे ही ‘टेकयन’च्या विकासातील अवघड आव्हाने होती.

 मशिन
उत्पादाची (प्रॉडक्ट) वैशिष्ट्ये
‘टेकयन’ ही मशिन टूलची विशेष आवृत्ती असल्यामुळे उद्योगांची गरज भागविण्यासाठी हे एक संपूर्ण पॅकेज आहे. या मशिनमध्ये वाहन उद्योग क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र, सर्जिकल उपकरणांचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. क्षेत्र या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या यंत्रभागांची यंत्रण करण्याची क्षमता आहे. जास्तीतजास्त उत्पादकतेच्या दृष्टीने हे मशिन अनेक उद्योगांसाठी सकारात्मक परिणाम घडवत आहे.
चांगला आवर्तन काळ मिळविणे हा ‘टेकयन’चा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच अचूकता आणि सातत्य मिळविण्यासाठी पॅलेट चेंजर, उच्च वेग असलेले टूल चेंजर आणि उच्च डायनॅमिक रॅपिड ही या मशिनची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
‘टेकयन’चे फायदे
‘टेकयन’ मशिन उच्च गतीचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे, मशिन बनविताना सर्व 3 अक्षांमध्ये 60 मी./मिनिटे इतका उच्च रॅपिड ट्रॅव्हर्स मिळविणे आणि 15 मी./सेकंद उच्च त्वरण (ॲक्सिलरेशन) मिळविणे यावर सर्वांत जास्त लक्ष दिले गेले. त्यामुळे या मशिनला टूलच्या ‘फास्ट ड्रिल टॅप सेगमेंट’मध्ये समाविष्ट केले आहे.

 मशिन
‘टेकयन’च्या रचनेत सर्व गतिशील, हलणारे वस्तुमान कॉलमवर आणले आहे, ज्यामुळे यंत्रणामध्ये जास्त अचूकता मिळते. ‘टेकयन’ला लागणारी जागा (फूटप्रिंट) अतिशय कमी असली तरी उच्च रॅपिड ट्रॅव्हर्स सहन करण्यासाठी त्याची रचना अतिशय भक्कम आहे. रचनात्मक डिझाईनमध्ये घेतलेल्या खास काळजीमुळे चिप प्रभावीपणे बाहेर काढण्यात येतात. संतुलित रचनेमुळे मशिनमध्ये कंपने येत नाहीत. या मशिनला लागणारी जागा अतिशय कमी असली तरी मोठ्या आकाराचा यंत्रभाग बसविण्यासाठी त्याची हालचालीची जागा (वर्क एन्व्हलप) अधिक मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना अधिक उत्पादकतेसाठी कार्यवस्तू पकडणारी अनेक उपकरणे आणि फिक्श्चर या मशिनवर सहज बसविता येतात. खास डिझाईन केलेला स्वयंचलित टूल चेंजर (ATC), जलद स्वयंचलित पॅलेट चेंजर (APC), मशिनला लागणारी कमी जागा, थेट कपल केलेले स्पिंडल, एर्गोनॉमिक आणि TPM पूरक डिझाईन तसेच उच्च दाब असलेली शॉवर शीतक प्रणाली ही ‘टेकयन’ मालिकेची आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या कार्यवस्तुंसाठी आणि ॲप्लिकेशनसाठी या मालिकेत ‘टेकयन 4’, ‘टेकयन 5’ आणि ‘टेकयन 7’ हे प्रकार उपलब्ध आहेत.


 मशिन
वर उल्लेख केलेल्या ‘टेकयन’च्या वैशिष्ट्यांशिवाय या श्रेणीतील इतर मशिनपेक्षा ‘टेकयन’चे वेगळेपण म्हणजे, ते अधिक मोठी कामाची जागा (वर्क एन्व्हलप) पुरवत असल्यामुळे त्यावर मोठ्या आकारांच्या यंत्रभागांचेही यंत्रण होते. 450 मिमी. स्ट्रोक पुरवेल असा न अक्ष डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे जेव्हा अधिक खोलवर जाऊन प्रक्रिया करायची असते, तेव्हा त्यासाठी उपयुक्त असे अधिक मोठे टूल निवडण्यासाठी मदत होते. दोन्ही बाजूला 300 किलोपर्यंत वजनाची कार्यवस्तू बदलण्याची क्षमता असून ती व्यवस्था हायड्रॉलिक किंवा न्युमॅटिक स्रोताशिवाय चालविता येते. मशिनच्या जागेतून कार्यक्षम पद्धतीने छिलके काढून टाकण्यासाठी ‘गंगा शीतक’ ही शॉवर शीतक प्रणाली ‘ज्योती’ने खास डिझाईन केली आहे.
वापरकर्त्यासाठी कमाल कामगिरी करणारे आणि कमाल नफा मिळवून देणारे ‘टेकयन’ हे आपल्या देशाच्या जोमाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला योगदान देण्यासाठी तयार केलेले भारतीय उत्तर आहे.
9879571116
अंबरीश नसीत ’ज्योती सी.एन.सी. ऑटोमेशन लि.’ कंपनीमध्ये ते साहाय्यक व्यवस्थापक (टेक्निकल सपोर्ट) आहेत. एस.आर.ई. झेड. अभियांत्रिकी महाविद्यालय (राजकोट) येथे गेली 5 वर्षे ते अध्यापन करीत असून ’मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस : II हे इंग्रजी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@