URXH रोटरी टेबल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    12-Oct-2018   
Total Views |
 
urx
 
प्रिसिजन सी.एन.सी. रोटरी टेबल, इंडेक्सिंग टेबल आणि पॅलेट चेंजिंग सिस्टिममध्ये बाजारपेठेतील प्रमुख उत्पादक असलेल्या ‘युकॅम प्रा. लि.’ कंपनीने रोटरी टेबलची URXH मालिका सादर केली आहे. या उत्पादन निर्मितीमधील आव्हाने, त्याची वैशिष्ट्ये आणि फायदे याची माहिती या लेखात दिली आहे.
 
 
निर्मितीमागील प्रेरणा
आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डबरोबर स्पर्धेत टिकून राहण्याची महत्त्वाकांक्षा आणि अधिक क्लॅम्पिंग टॉर्क असणाऱ्या रोटरी टेबलची वाढती मागणी यामुळे विविध मालिकेच्या रोटरी टेबलची निर्मिती झाली. सर्वप्रथम URH या मालिकेतील रोटरी टेबल आम्ही बाजारात आणले. त्यानंतर त्यात सुधारणा करून वजनाने हलक्या असलेल्या URX मालिकेच्या रोटरी टेबलची निर्मिती एक वर्षापूर्वी करण्यात आली. URX मध्ये उपलब्ध असलेला क्लॅम्पिंग टॉर्क आणि वेग वाढविण्याविषयी ग्राहकाची मागणी आल्यामुळे त्यात अधिक सुधारणा करून आम्ही URXH मालिकेतील रोटरी टेबल तयार करण्यास सुरुवात केली आहे.

urx
URXH ही मालिका डिझाईनच्या टप्प्यात असतानाच ग्राहकांकडून आलेल्या मागणीवरून आम्ही ती ग्राहकाला पुरविली. या सुधारित आवृत्तीबाबत ग्राहक समाधानी आहेत, कारण उत्पादकता वाढविण्यासाठी या मालिकेतील रोटरी टेबल सक्षम असल्याचा प्रतिसाद ग्राहकांकडून आम्हाला मिळत आहे.

urx

urx
 
निर्मितीमधील आव्हाने
रोटरी टेबलचे वजन कमी करून क्लॅम्पिंग टॉर्क वाढविणे असे उद्दिष्ट आमच्यासमोर होते. त्यासाठी फायबर ग्लासच्या आच्छादनाचे (कव्हर) आरेखन आणि निर्मिती करणे यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न केला. क्लॅम्पिंग टॉर्क वाढविण्यामध्येदेखील आम्हाला अनेक तांत्रिक अडचणी आल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आमच्या संशोधन आणि विकास (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) विभागाने हे आव्हान यशस्वीपणे पेलले आणि रोटरी टेबलचे URXH हे नवीन मॉडेल विकसित केले.

उत्पादाची (प्रॉडक्ट) वैशिष्ट्ये
• न्युमॅटिक पकड (क्लॅम्पिंग).
• पूर्वभारित (प्री लोडेड) ॲक्सिअल/रेडिअल रोलर बेअरिंग.
• गिअर यंत्रणा : मोटर ते वर्म शाफ्ट.
• दुहेरी लीड असलेला वर्म गिअर सेट.
• उभी जोडणी (व्हर्टिकल माऊंटिंग) करणे शक्य.
• उभ्या आणि आडव्या जोडणीसाठी (व्हर्टिकल/हॉरिझाँटल) पर्याय उपलब्ध.

URXH रोटरी टेबलचे फायदे
1. अधिक क्लॅम्पिंग टॉर्क असलेली पकड.
2. फायबर ग्लास आच्छादन असल्यामुळे वजनाने हलके.
3. आकर्षक.
4. लहान मशिनमध्ये वापरण्यास योग्य असा आटोपशीर आकार.
 
ग्राहकांना मिळणारे फायदे
विमान उद्योग, वाहन उद्योग, तेल आणि वायू उद्योग अशा विविध उद्योगांसाठी लागणाऱ्या यंत्रभागांच्या उत्पादनासाठी या मालिकेतील रोटरी टेबल वापरले जातात. ज्या यंत्रणामध्ये कापाची खोली जास्त असते अशा क्लिष्ट यंत्रणात URXH मालिकेतील रोटरी टेबल अतिशय फायदेशीर ठरतात. या रोटरी टेबलमुळे कमी वेळात काम पूर्ण करता येत असल्याने उत्पादकताही वाढते, तसेच इतर स्टँडर्ड रोटरी टेबलच्या तुलनेत या टेबलमुळे कामात सुलभता प्राप्त होते आणि अधिक चांगली कार्यक्षमता मिळते.
 
पुढे काय?
क्लिष्ट यंत्रणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने नवनवीन सुधारणा केलेली रोटरी टेबल विकसित करून ग्राहकांना पूर्ण समाधानकारक पर्याय उपलब्ध करून देणे यासाठी अधिक आटोपशीर टिल्टिंग टेबल, जास्त वेगवान आणि जास्त टॉर्क देणारी रोटरी टेबल, DDR टिल्टिंग टेबल, रोलर कॅम टेबल यासारखी उत्पादने आम्ही विकसित करीत आहोत.
 
9886024565
विजय झरीटाकळीकर यांत्रिकी अभियंता असून, त्यांना विविध कंपन्यांचा सेवा विभागातील 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते रोटरी टेबल निर्मितीमधील अग्रगण्य असलेल्या ‘युकॅम प्रा. लि.’ कंपनीमध्ये ते नॅशनल सेल्स हेड या पदावर कार्यरत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@