प्रेसिंगमधील सुरक्षितता आणि वेळेची बचत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    28-Oct-2018   
Total Views |

 
c
 
सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी अनेकदा कार्यवस्तुंचा आहे त्या किंमतीमध्ये किंवा कमी किंमतीमध्ये पुरवठा करावा लागतो. कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आहे त्या सेटअपमध्ये सुधारणा करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. याच विचारातून आमच्या ‘श्री. शिव प्रॉडक्ट’ कंपनीमध्ये आम्ही एक सुधारणा केली आहे.

m
कामाचे स्वरूप
प्रेसमध्ये एका डायचा वापर करून आम्ही लग, डिस्क, वॉशर या कार्यवस्तूंचे उत्पादन करीत होतो. मशिनमध्ये पट्टी सरकवून पंचिंग करणे, तयार झालेली कार्यवस्तू हाताने बाहेर काढणे आणि पुन्हा दुसरी कार्यवस्तू लावणे अशी प्रक्रिया केली जाते. पूर्वी डायमधून कार्यवस्तू काढण्याचे काम हातानेच केले जात होते.
 
समस्या
• कार्यवस्तू मशिनमधून हाताने बाहेर ढकलली जात असताना अपघात होत होते.
• कामगाराकडून कार्यवस्तू बाहेर ढकलली जाताना विलंब होत होता.
• कार्यवस्तू हाताने बाहेर ढकलताना कामगारांना येणारा थकवा (ऑपरेटर फटीग)

m
समस्येचे मूळ कारण
अर्ध स्वयंचलित मशिनमध्ये लोड आणि अनलोड करण्याचे काम कामगारांकडून केले जाते. त्यामध्ये उत्पादकतेची उद्दिष्टे गाठत असताना अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
नवीन पद्धत

m
कार्यवस्तू मशिनमधून बाहेर काढण्यासाठी मानवी हस्तक्षेपाशिवाय ते काम स्वयंचलित कसे करता येईल, यावर विचार करण्यात आला. तयार झालेली कार्यवस्तू आपोआप बाहेर ढकलता येईल अशी पद्धत विकसित केल्यास सुरक्षितता मिळेल आणि उत्पादकताही वाढण्यासही मदत होईल असे लक्षात आले. त्यानुसार तयार झालेली कार्यवस्तू डायमधून बाहेर काढण्यासाठी कुठले बल वापरावे, जे कमीतकमी खर्चात आणि सहज उपलब्ध होईल याचा विचार आम्ही सुरू केला. यासाठी आमच्याकडे असलेल्या कॉम्प्रेसरमधून उपलब्ध असलेली दाबयुक्त हवा वापरावी असे ठरले. त्यासाठी आवश्यक तेवढी पाईप लाईन बनवून घेतली. त्यामधून हवा डायखाली उपलब्ध केली. ही हवा पाहिजे तेव्हाच मिळावी यासाठी मशिनवरील कामाच्या आवर्तन काळाचा विचार करून एक मायक्रो कंट्रोलर सर्किट बनविले. त्यावर प्रोग्रॅमिंग करून मशिनच्या आवर्तन काळाशी त्याचे एकत्रीकरण (सिन्क्रोनायझेशन) केले. एअरजेट वापरून विकसित केलेल्या या पद्धतीमुळे प्रेसच्या स्ट्रोकपाठोपाठ सुनियंत्रित पद्धतीने पाहिजे तेवढ्या दाबाची हवा कार्यवस्तुला बाहेर ढकलते, अशा पद्धतीने ‘AIRiJECT’ विकसित झाले.
 
एअरजेटमुळे पट्टी चालवून किंवा ब्लँक ठेवून स्ट्रोकनंतर तयार झालेली कार्यवस्तू दाबयुक्त हवेच्या मदतीने बाहेर काढली. त्यामुळे अनलोडिंग ऑपरेशन स्वयंचलित झाले, तसेच कामगारांना असणारा धोका टळला आणि कामगारांची सुरक्षितता सुनिश्चित झाली. या सुधारणेची व्हिडिओ क्लिप पाहण्यासाठी शेजारील QR कोड मोबाईलवर स्कॅन करा.
 
 
 
फायदे
• कार्यवस्तू बाहेर ढकलण्यासाठी उपलब्ध हवेचा कमीत कमी वापर होऊ लागला.
• कार्यवस्तू ढकलण्याच्या स्वयंचलित पद्धतीमुळे कामगाराचा 50% वेळ वाचला आणि सुरक्षितता वाढली.
• उत्पादकतेमध्ये वाढ झाली.
• उत्पादनाचा खर्च कमी झाला.

 

@@AUTHORINFO_V1@@