अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या : 9

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    29-Oct-2018   
Total Views |
 
n
मागील अंकातील लेखात आपण ‘ऑटो नंबरिंग’ ही कमांड तपशीलवार अभ्यासली आहे. आर्किटेक्चरल ड्रॉईंग तसेच फॅब्रिकेशन ड्रॉईंगमध्ये अनेकविध अँगल, बीम आणि कॉलम इत्यादींची सविस्तर माहिती असणे आवश्यक असते. या सर्व बाबींना त्यांच्या तपशीलासह अनुक्रमांक देणे तितकेच आवश्यक असते. ज्यामुळे ते पद्धतशीरपणे त्या त्या अनुक्रमांकानुसार त्याच्या योग्य जागी बसविताना सोपे जाते. हा सराव अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सरळ मार्गाने आपल्याला करता येतो. हे आपण या कमांडमुळे सिद्ध करून सोदाहरण स्पष्ट केले. यामुळे वेळेची, कष्टाची बचत तर होतेच त्याचबरोबर अचूकताही साध्य होते.
 
या लेखात आपण ड्रॉईंग तयार करण्याच्या अनुषंगाने उपयोगी अशा अजून एका विशिष्ट कमांडविषयी माहिती घेऊ. ही कमांड पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कमांडचेच आधुनिक स्वरूप म्हणून रूढ झाली आहे.
 
टेक्स्ट मास्क
 
कोणत्याही कंपनीमध्ये म्हणजेच प्रत्यक्ष काम करताना अनेक गोष्टींची मर्यादा घालून दिलेली असते. जसे की, स्टँडर्ड, कामाचा अग्रक्रम, त्याचे टप्पे इत्यादी. हे सर्व सांभाळताना आपल्याला वेळेचे गणितही पाळावे लागते. विशेषतः आपण जर कंपनीच्या ‘डिझाईन’ विभागात कार्यरत असू तर यावर कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता असते. जसजसा आपल्याला कामाचा अनुभव येत जाईल तसतसे आपण या सर्वांना सरावून जातो. परंतु, हा अनुभव घेत असताना आपण बरेच काही शिकले पाहिजे. मी स्वतः अनेक कंपन्यामध्ये विविध पदावर असताना, प्रत्येक काम करताना त्या त्या घटकाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे काही गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवल्या. त्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकल्पाची अंतिम तारीख अगदीच नजीकची असते. ड्रॉईंग तयार करून झाल्यावर त्यात बदल अथवा खाडाखोड करण्यासाठीचा राखीव कालावधीच शिल्लक नसतो. अशावेळी आधी तयार असलेल्या अथवा तयार केलेल्या ड्रॉईंगमधील एखादा आकार काढल्यानंतर त्यात टीप देण्यासाठी किंवा पाठीमागील बाजूस तो आकार, आरेखन किंवा चिन्ह तसेच ठेवून अक्षराकरिता जागा तयार करणे जेणेकरून ते अक्षर ठळकपणे दर्शविता येईल, हे चटकन करण्यासाठी टेक्स्टमास्क कमांडचा उपयोग होतो.
 
टेक्स्टमास्क ही कमांड कशी वापरावी. यासंबंधीचे निर्देश खालील टप्प्यानुसार अधोरेखित केले आहेत.

n
• Express tools मध्ये ’Text' या प्रमुख कमांडमध्ये ‘टेक्स्टमास्क’ ही उपकमांड निवडावी अथवा कमांड लाईनमध्ये ती टाईप करावी.
Text आणि Hatch यातील अंतरही आपण निश्चित करू शकतो.
Text ला आपण हवा तो रंग आणि प्रमाण देऊ शकतो.
अशाप्रकारे ‘टेक्स्टमास्क’ ही कमांड आपण प्रत्यक्षात आणू शकतो.
 
याच्याच विरुद्ध TEXTUNMASK ही कमांड आपल्याला वापरता येईल. ज्यायोगे आपण याच्या अगदी विरूद्ध बदल घडवून आणू शकतो.
 
टेक्स्टमास्क कमांडमुळे होणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे आहेत.
 
• आधीच उपलब्ध असलेल्या ड्रॉईंगमध्ये जलदगतीने बदल घडवून आणता येतो.
• यात उल्लेखलेल्या अक्षरांसाठी किंवा शब्दासाठी वेगळी अशी रचना करावी लागत नाही.
• सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रॉईंग काढून झाल्यावरही आपण हा बदल हव्या त्या ठिकाणी फक्त एका कमांडच्या आधारे करू शकतो.
• यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जसे की रंग, आकार, अक्षर आणि हॅच यामधील विशिष्ट अंतरनिश्चितीसाठीचे परिमाण इत्यादींचा अंतर्भाव याच कमांडच्या अंतर्गत आहे.
• वेळेची बचत होते.
• ड्रॉईंगच्या फेरपडताळणीच्या वेळीही यात हवा तो बदल सहजगत्या साधता येतो.
 
• अशाच प्रकारचा परिणाम आपण नेहमीच्या वापरत असलेल्या MS WORD या प्रकारच्या फाईलमध्ये सर्रास करत असतो.
या लेखात आपण साध्या, सोप्या परंतु नेहमी लागणाऱ्या कमांडचा अभ्यास केला. यामुळे एकाच कमांडचा आपण अनेकविध प्रकारे उपयोग करून घेतला. या कमांडमुळे ड्रॉईंग तयार झाल्यानंतरही योग्य तो बदल सहज साध्य होईल. त्याबरोबरच आपल्या कार्यशैलीमध्ये अमूलाग्र बदल झालेला आढळून येईल. ज्यायोगे आपला वेळ वाचेल तसेच नेमका परिणाम साध्य करता येईल. अशाच प्रकारच्या इतर काही आधुनिक कमांड आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
@@AUTHORINFO_V1@@