खाचेचे यंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    29-Oct-2018   
Total Views |
सी.एन.सी. लेथ वापरून खाचेचे (स्लॉट) यंत्रण करणे ही अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होणारी यंत्रण प्रक्रिया असते. क्लिअरन्स रेसेस खाचा, ऑईल खाचा असे खाचांचे प्रकार असतात. दोन भाग एकमेकांवर घट्ट बसणे, तेलासाठी (वंगण) खाच, पुली किंवा व्ही बेल्ट खाच, ओ-रिंगसाठी खाच अशाप्रमाणे इतर अनेक ॲप्लिकेशनसाठी खाचांचा वापर केला जातो.
 
दंडगोलाकार भागावर एका ठराविक खोलीची खाच पाडणे म्हणजेच ग्रुव्हिंग होय. ही खाच पाडण्यासाठी एका खास प्रकारच्या टूलची म्हणजेच टूल होल्डरवर बसविलेल्या कार्बाईड इन्सर्टची आवश्यकता असते, ज्याला ग्रुव्हिंग टूल असे म्हणतात. या टूलच्या डिझाईनमध्ये अनेक टिप बसविलेल्या असतात.
 
खाच पाडणे (ग्रुव्हिंग)
खाच पाडण्यासाठी दोन प्रकारचे कटिंग टूल वापरले जातात.
1. बाहेरील खाचेसाठी असणारे टूल.
2. आतील बाजूच्या (आंतरिक) खाचेसाठी असणारे टूल.
 
या दोन्ही प्रकारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे इन्सर्ट असतात. कटिंग दिशा हा टर्निंग आणि खाच करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा फरक असतो. खाच करण्यासाठीचे टूल फक्त एकाच दिशेत काम करते, तर टर्निंग टूल अनेक दिशांमध्ये काम करते.
 
खाचेसाठीचे मापदंड
खाचेसाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
1. खाचेचा आकार
2. कार्यवस्तूवरील खाचेची जागा
3. खाचेचे माप आणि टॉलरन्स
 
1. खाचेचा आकार : खाचेचा हेतू आणि पार्ट ड्रॉईंगवरून खाचेचा आकार ठरतो. खाचेच्या आकारावरूनच इन्सर्ट ठरविला जातो. चित्र क्र. 1 मध्ये इन्सर्टचे काही ठराविक आकार दाखविले आहेत.

c
 
2. इन्सर्टचे माप : सर्वच यंत्रणामध्ये उपलब्ध असणाऱ्या ग्रुव्हिंग इन्सर्टच्या रुंदीपेक्षा खाचेची रुंदी जास्त असते. (चित्र क्र. 2) सर्वसाधारणपणे टूलिंग कॅटलॉगमध्ये पुढील रुंदीचे इन्सर्ट मिळतात. 1 मिमी., 2 मिमी., 3 मिमी. किंवा 1/32, 1/64, 1/16, 1/8 इंच. उदाहरणार्थ, 0.276 इंचाची खाच 0.250 इंच इन्सर्टने करता येते. त्यामुळे रफिंग आणि फिनिशिंग असे दोन काप (कट) होऊ शकतात.

c
3. खाचेची जागा : कार्यवस्तूवरील खाचेची जागा चित्र क्र. 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे तीनपैकी एका गटात असते.

c
• दंडगोलाकारावरील खाच : व्यास कटिंग
• शंकूवरील (कोन) खाच : टेपर कटिंग
• फेसवरील खाच : शोल्डर कटिंग
या तिन्ही गटात बाहेरून (एक्स्टर्नल) किंवा आतून (इंटर्नल) खाच असू शकते.
 
4. खाचेची मापे : खाचेच्या मापामध्ये रुंदी, खोली, कोपऱ्यांचे वर्णन हे महत्त्वाचे मुद्दे येतात. खाचेच्या रुंदीपेक्षा जास्त रुंद असणाऱ्या इन्सर्टने खाच करता येत नाही. खाचेच्या मापावरून यंत्रणाची पद्धत ठरविली जाते. चित्र क्र. 4 मध्ये दोन प्रकारांनी खाचेची मापे कशी घेता येतात, ते दाखविले आहे.

c
खाचेची खोली : खोली दाखविण्याच्या दोन पद्धती असतात, त्या चित्र क्र. 5 मध्ये दाखविल्या आहेत.

c

साध्या खाचेसाठी प्रोग्रॅमिंग : सगळ्यात सोपी खाच म्हणजे कटिंग टूलच्या रुंदीच्या आकाराची खाच. चित्र क्र. 6 मध्ये अशा पद्धतीची खाच दाखविली आहे.

c

c
पुढील प्रोग्रॅममध्ये 0.125 इंच स्क्वेअर ग्रुव्हिंग इन्सर्ट वापरली आहे. त्यामुळे त्याच रुंदीची खाच होईल.

c
टूल नंबर T08 वापरले आहे.
03401 साधी खाच
G20 (इंग्लिश युनिट इनपुट)
...
...
N33 T0800 M42 ................. टूल नंबर 8 कार्यरत (ॲक्टिव्ह)
N34 G97 S650 M03 ................................. 650 आर.पी.एम.
N35 G00 X3.1 Z-0.625 T0808 M08........................... सुरुवात
N36 G01 X2.637 F0.003................................. खोलीपर्यंत फीड
N37 G04 X0.4......................................................... तळाशी ड्वेल
N38 X3.1 F0.05 .................................... खाचेपासून मागे
N39 G00 X6.0 Z3.0 T0800 M09................. क्लिअर पोझिशन
N40 M30....................................................................... प्रोग्रॅम एंड
%
कार्यवस्तू व्यास क्लिअरन्स : (3.1 - 2.952) / 2 = 0.074
प्रत्यक्ष खाचेचे यंत्रण N36 ला होते. सरकवेग 0.003 इंच/रिव्हो.
पुढील ब्लॉक छ37 ड्वेल दाखवतो. 0.4 सेकंद.

खाच करताना लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे मुद्दे
• खाचेचे यंत्रण कमी सरकवेगाला करतात.
• टूलची रुंदी 0.125 प्रोग्रॅममध्ये कुठेही येत नाही. याचा अर्थ खाचेची रुंदी आणि आकार इन्सर्ट टूलप्रमाणे होईल.
• टूल बदलले तरी प्रोग्रॅम तोच राहतो.
नाजूक आणि अचूक ग्रुव्हिंगचे तंत्र
साध्या खाचेच्या (आतील/बाहेरील) बाजू खरबरीत असतात. खाचेचे बाहेरचे कोपरे टोकदार असतात. या खाचेची रुंदी इन्सर्टवर अवलंबून असते. त्यामुळे यंत्रण करावयाच्या कार्यवस्तूमध्ये या पद्धतीची खाच स्वीकारली जात नाही. चित्र क्र. 7 मधील खाच ही प्रिसिजन खाच आहे.

c

c 
प्रिसिजन ग्रुव्ह प्रोग्रॅम : 03602
कोपरे मोडणे : 0.012X45 अंश
कटिंग पद्धत : एक प्लंज रफ कट आणि दोन फिनिश कट (प्रत्येक वॉलला एक)
तळातील व्यासामध्ये वाढ : 0.006 स्टॉक.
टोकदार कोपरे/टोके 0.12 चॅम्फरने
Ø 4.0 ला मोडून काढले आहेत.
खाचेचे टॉलरन्स : खाचेची टॉलरन्स श्रेणी (रेंज) 0.0 ते + 0.001 इतकी असते. खाचेच्या रुंदीवर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक म्हणजे टूलची झीज. जसजसा इन्सर्टचा वापर वाढत जातो, तसतशी त्याची झीज होऊ लागते. त्याच्या कडा अरूंद होऊ लागतात. त्यामुळे तयार होणारी खाच योग्य त्या मापाची होत नाही. त्याचबरोबर वापरण्यात येणारे इन्सर्ट जरी क्लोज टॉलरन्सने बनविलेले असले तरी त्यांनाही मर्यादा असते. त्यामुळे इन्सर्ट बदलल्यास खाचेची रुंदी बदलते. कारण नवीन इन्सर्टची मापे पहिल्या इन्सर्टबरहुकूम असणे शक्य नाही. त्यावर सोपा उपाय म्हणजे फिनिशिंग ऑपरेशनसाठी जास्त ऑफसेट ठेवणे.
N16 Z-0.687
N17 G01 X3.976 Z-0.625 F0.002
N18 X3.826 F0.003
N19 X4.1 Z-0.6083 F0.04
या पॉईंटला खाचेची डावीकडील बाजू फिनिश झाली आहे. उजव्या बाजूचे यंत्रण होण्यासाठी टूलच्या उजव्या टोकाने (कडेने) काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सगळ्यात सोपा प्रोग्रॅम इनक्रिमेंटल मोडमध्ये Z अक्ष इनक्रिमेंटल मापे टाकणे. त्यासाठी W या अक्षराचा वापर केला जातो.
 
N50 W0.0787 T0313
N51 X3.976 W-0.062 F 0.002
N50 ब्लॉकमध्ये टूल एकूण अंतर = उजव्या बाजूवरील मटेरियल + चॅम्फर + क्लिअरन्स
0.0167 + 0.012 + 0.050.
N51 ब्लॉकमध्ये चॅम्फर पोझिशन आणि अबसोल्युट मोड X अक्षासाठी आणि इनक्रिमेंटल मोड Z अक्षासाठी.
खाच उजव्या बाजूला पूर्ण करण्यासाठी तळातील व्यासाचा कट पूर्ण करा. ब्लॉक N52 त्यानंतर 0.003 चा स्टॉक काढणे सुरू करा. या प्रक्रियेला खाचेचे बॉटम स्वीपिंग असे म्हणतात.
 
N52 X3.82 F0.003
N53 Z-0.6247 T0303
N54 X4.1 Z-0.6083 F0.04
N55 G00 X 10.0 Z2.0 T0300 M09
N56 M30
%
संपूर्ण प्रोग्रॅम (प्रिसिजन खाच) 03602
N41 T03000142
N42 G96 S400 M03
N43 G00 X4.1Z-0.6083 T 0303 M08 (ऑफसेट 03)
N44 G01 X3.826 F0.004
N45 G00 X4.1
N46 Z-0.657
N47 G01 X3.976 Z-0.625 F0.002
N48 X3.826 F0.003
N49 X4.1 Z-0.6033 F0.04
N50 W0.0787 T0313
N51 X3.976 W-0.062 F0.002
N52 X3.82 F0.003
N53 Z-0.6247 T0303
N54 X4.1 Z-0.6083 F0.04
N55 G00 X6.0 Z3.0 T0300 M09
N56 M30
%
@@AUTHORINFO_V1@@