मास्टरकॅम 2019 सह कोरोमंट प्राईम टर्निंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    02-Nov-2018   
Total Views |
सँडविक कोरोमंट प्राईम टर्निंग आणि कोरोप्लस टूल लायब्ररी हे डिजिटल यंत्रणाला आणि त्याला इंडस्ट्री 4.0 संकल्पनेशी जुळवून घ्यायला मदत करण्यासाठी सँडविक कोरोमंटने पुरविलेला पर्याय आहे. या पर्यायाला सॉफ्टवेअरचा आधार मास्टरकॅम 2019 ने पुरविला आहे.
 
मास्टरकॅम 2019 काय आहे?
गेली 23 वर्षे जागतिक पातळीवर कॅम सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या ‘सी.एन.सी. सॉफ्टवेअर कंपनी’ने मास्टरकॅम 2019 ही सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती यंत्रणासाठी उपलब्ध केली आहे. मास्टरकॅम 2019 सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मशिनची उत्पादकता वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्चदेखील कमी करणे शक्य होते. यासाठी यामध्ये असलेल्या बहुअक्षीय (मल्टीॲक्सिस) 2D मिलिंगचे स्वयंचलन, CAD आणि कामाच्या मॉडेलसाठी मिळणाऱ्या अधिकाधिक सुविधा, 3D टूलिंग, तसेच अधिक जलद गतीने कार्यवस्तूचे फिनिशिंग, अधिक शक्तीचे टर्निंग आणि मिलटर्न या सुविधा उपयोगी पडतात.
 
सँडविक कोरोमंट कोरोप्लस टूल लायब्ररीमधून 3D मिलिंग टूल थेट मागविण्यासाठी मास्टरकॅम 2019 सॉफ्टवेअर मदत करते. कोरोप्लस टूल लायब्ररीबरोबरच्या एकत्रीकरणामुळे मास्टरकॅम, ग्राहकांचा टूल शोधण्याचा आणि आयएसओ 13399 डेटा फॉरमॅटद्वारे त्रिमितीय ॲसेम्ब्ली बनविण्याचा वेळ लक्षणीयरीत्या वाचवू शकते.
 
कोरोप्लस टूल लायब्ररी शोधून टूलचा धातू, आकार, प्रकार आणि आवश्यक यंत्रण प्रक्रियेचा प्रकार असे गुणधर्म निवडून वापरकर्ते टूल ॲसेम्ब्ली तयार करतात. टूल, होल्डर आणि ॲडॅप्टिव्ह यंत्रभाग यांचे योग्य संयोजन (कॉम्बिनेशन) होण्यासाठी सॉफ्टवेअरमधील आधीच तयार करून ठेवलेले फिल्टर वापरले जातात. या ॲसेम्ब्ली थेट मास्टरकॅम 2019 मध्ये घेऊन वेळ आणि कष्ट वाचविता येतात. तयार होणारी 3D ॲसेम्ब्ली मॉडेल दृश्य स्वरुपात दिसणे, टूल प्रोजेक्शन बदलणे अशा सोयी मास्टरकॅममध्ये असल्यामुळे, सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग प्रक्रियेत क्लिअरन्स आणि टूल धडकू नये यासाठी आवश्यक तपासणी करणे वापरकर्त्यांना सहज शक्य होते.

p

सी.एन.सी. प्रोग्रॅमिंग
मास्टरकॅम 2019 मुळे उत्पादकतेत सातत्याने वाढ आणि प्रोग्रॅमिंगही सुलभ होत असल्याने प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने करता येते. 2D आणि 5 अक्षातील टूलच्या हालचालींमध्ये सुधारणा होत असल्यामुळे अंतिमतः उत्पादन खर्चात बचत होते. यामध्ये नव्याने अंतर्भूत केलेली चॅम्फरिंग आणि भोके पाडण्यासाठी उपलब्ध धोरणे तसेच नव्या बहुआयामी डीबरिंगची सोय असल्यामुळे वेळेच्या बचतीबरोबरच सुलभता आणि स्वयंचलन साधता येते.
 
यंत्रणाची उत्पादकता आणि कार्यवस्तुच्या पृष्ठभागाची अचूकता मिळविण्यासाठी यामध्ये वेगवान ‘स्कॅलोप’ प्रकारच्या टूल मार्गासारखे नवे आणि सुधारित टूल मार्ग उपलब्ध आहेत. या नव्या सुधारणेमध्ये सँडविक कोरोमंट प्राईम टर्निंग सुलभतेने वापरता येईल अशी प्रणाली आहे, ज्यामुळे सुधारित दर्जाचे ग्रुव्हिंग, बार फीडिंग, तसेच टर्निंग, मिलटर्नवरील यंत्रण आणि नव्या प्रकारचे लेथ, स्विस प्रकारच्या लेथवरील यंत्रणासाठीही उपयुक्त ठरतील अशी काही वैशिष्ट्ये आहेत.

p
कार्यवस्तुची तयारी आणि मशिनवरील सेटिंग
मास्टरकॅम 2019 मुळे मशिनवर कार्यवस्तू बसविण्यासाठी (सेटिंग) लागणारा वेळ, यंत्रण करण्यासाठी लागणारी तयारी आणि प्रोग्रॅमिंग या सगळ्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होते. यामध्ये CAD ची कार्यपद्धती आणि 3D चा उपयोग, यंत्रभागांच्या तयारीतील सुधारणा, फिक्श्चर टूल सेटअप आणि त्याची तयारी, ॲडिशनल पॉवर सरफेस कॅपॅबिलिटी, मॉडेल आधारित डेफिनेशनसाठी (MBD) विस्तारित आधार यांचा समावेश होतो.
 
टूल
मास्टरकॅम 2019 च्या डिजिटल टूल लायब्ररीमुळे अचूकता, 3D जुळणी आणि यंत्रण प्रक्रियेची सोय, तसेच सँडविक कोरोमंट कोरोप्लस आणि मशिनिंग क्लाऊड या दोन्हींची मदत उपलब्ध होते. निमुळते यंत्रण (टेपर) आणि भिंग प्रकारचे यंत्रण (लेन्स स्टाईल) यामध्ये मास्टरकॅम 2019 वापरून 75% वेळेच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याबरोबरच कार्यवस्तुच्या पृष्ठभागाचे फिनिशिंग आणि अचूकपणा यात सुधारणा अपेक्षित आहे.
 
मास्टरकॅम प्राईम टर्निंग वापरताना प्रोग्रॅमरसाठी काही प्रणाली विकसित केल्या आहेत. मास्टरकॅमची सुधारित आवृत्ती करणारा गट आणि सँडविक कोरोमंटचा उत्पादन विकास गट यांनी एकत्रित काम करून प्राईम टर्निंगची सर्व दिशांना यंत्रण करण्याची क्षमता मास्टरकॅमच्या प्रमाणित उत्पादनात वापरण्याची सोय केली आहे. या प्रगत क्षमतांमुळे कोरोटर्न प्राईम इन्सर्टच्या डिझाईनचा पूर्ण वापर करता येतो. ज्यामुळे जास्तीतजास्त मटेरियल निघते आणि टूलचे आयुष्य वाढते. मास्टरकॅम 2018 च्या नंतरच्या आवृत्ती कोरोटर्न प्राईम ‘A’ आणि ‘B’ दोन्ही प्रकारच्या इन्सर्ट वापरू शकतात. ‘अ’ प्रकारचे इन्सर्ट रफिंग, फिनिशिंग आणि प्रोफाइलिंगसाठी, तर ‘इ’ प्रकारचे इन्सर्ट हेवी रफिंगसाठी आवश्यकतेनुसार वापरले जातात.
 
प्रोग्रॅमरला ISO- P स्टील, ISO-M स्टेनलेस स्टील आणि ISO-S हीट रेझिस्टंट सुपर ॲलॉय (HRSA) प्रकारच्या मटेरियलसाठी सुधारित स्वयंचलित टूलमार्ग वापरून उत्पादकतेमध्ये वाढ मिळविता येते.
मास्टरकॅममधील स्वयंचलित धोरणांमुळे CAM प्रोग्रॅमिंगसाठी नव्या आणि सुधारित इन्सर्टचे प्रोग्रॅमिंग सुलभ होते, ज्यामुळे खूप जास्त मटेरियल काढता येते आणि टूलचे आयुष्य दुप्पट झाल्याने उत्पादकता 50-80 टक्क्यांनी वाढविण्यास मदत होते. डायनॅमिक फीड रेट, स्वयंचलित स्टॉक कॅल्क्युलेशन, प्राईम टर्निंग मार्ग अशा अनेक गोष्टींसाठी केली जाणारी गणिते मास्टरकॅममध्ये आपोआप होत असल्याने सी.एन.सी. प्रोग्रॅमरला प्रोग्रॅमिंग करतेवेळी विना अटकाव कामाचा अनुभव मिळतो.
 
प्रमाणीकरण
टूलचे मार्गक्रमण, यंत्रणाचे सिम्युलेशन, टूल मार्गाचा नकाशा (ग्राफ) आणि इतर तपासणीची, तसेच विश्लेषणांची सुविधा यामुळे मास्टरकॅम 2019 च्या विेशासार्हतेत आणि कार्यवस्तुच्या प्रक्रियेबाबत निर्णयक्षमतेत सुधारणा होते. उदाहरणार्थ, ब्लॉक ड्रिलिंगमध्ये एकाचवेळी खूप ड्रिल वापरून भोके पाडण्यासाठी सुधारित अक्ष नियंत्रणाचे सिम्युलेशन करून, मशिनची क्षमता तसेच होणारे अपघात टाळणे शक्य होते.
 
कार्यवस्तू व्यवस्थापन आणि नोंदी (डॉक्युमेंटेशन)
गुणवत्ता आणि प्रमाणीकरणासाठी मास्टरकॅम 2019 मध्ये अंतर्गत नोंदणी, मांडणी, नव्या टूल मार्गाचे इष्टतमीकरण, त्यांची क्षमता बघणे, सेटअपमधील सुधारणा आणि बेस पातळीवरील सुधारणा, तसेच कार्यवस्तुच्या प्रक्रियेच्या मार्गाचा सुरळीतपणा इत्यादी बाबी करणे शक्य आहे.
 
केस स्टडी
समस्या
आमच्या एका यंत्रभाग बनविणाऱ्या ग्राहकाला त्यांच्याकडे तयार होणाऱ्या एका यंत्रभागाची मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढविणे गरजेचे झाले होते. आवर्तन काळ जास्त असल्याने, तो कमी करण्यासाठी उपाय सुचविण्याची मागणी त्यानी आमच्याकडे केली.

p
जुनी यंत्रण पद्धत
नियंत्रकावर (कंट्रोलर) मशिन चालकामार्फत ISO प्रोग्रॅमिंग केले जात होते. प्रचलित (कन्व्हेन्शनल) टर्निंगने यंत्रण होत असल्याने एक यंत्रभाग पूर्ण होण्यास लागणारा वेळ जास्त होता.
 
प्रचलित प्रोग्रॅमिंगने मिळणारा आवर्तन काळ
• यंत्रभाग 1 : 600 मिनिटे
• यंत्रभाग 2 : 560 मिनिटे

ग्राहकाची अपेक्षा
• आवर्तन काळ कमीतकमी मिळावा आणि टूलचे आयुष्य सुधारावे.
• प्रोग्रॅमिंग अधिक वरच्या दर्जाचे असावे.
मास्टरकॅम 2019 सह प्राईम टर्निंग वापरून मिळाला आवर्तन काळ
• यंत्रभाग 1 : 90 मिनिटे
• यंत्रभाग 2 : 156 मिनिटे
यंत्रभाग 2 चे यंत्रण तपशील तक्ता क्र. 1 मध्ये दिले आहेत.

p
सॉफ्टवेअर आणि टूलिंग क्षेत्रातील अनुभव एकत्रित करून ग्राहकाला सुलभ आणि उच्च दर्जाचे यंत्रण करण्यासाठी हा समर्थ पर्याय आहे.
@@AUTHORINFO_V1@@