गळती तपासणीसाठी क्विक रिलीज कपलिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    01-Apr-2018   
Total Views |

Quick release coupling for leakage check
 
क्विक रिलीज कपलिंगचे (क्युआरसी) कित्येक हजार प्रकार आहेत. त्यापैकी आम्ही तीन हजार प्रकारचे क्विक रिलीज कपलिंग तयार करतो आणि विशेष तपासणी करण्यासाठी लागणारी क्विक रिलीज कपलिंग हे आमचे वैशिष्ट्य आहे. कपलिंगची तपासणी करताना त्याला प्रत्येकवेळी थ्रेडमध्ये बसवून मग हवा सुरू करायची यामध्ये 30 सेकंद वेळ जातो, त्याऐवजी आम्ही तयार केलेल कपलिंग वापरून तेच काम 3 ते 5 सेकंदात करता येते. त्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हे केवळ कपलिंगसाठीच नाही तर लिकेज तपासणीसाठीही उपयुक्त ठरणारे आहे. हे एक स्पेशल तपासणीसाठी लागणारे कपलिंग आहे. साधी कपलिंग केवळ प्रवाह चालू, बंद करण्यासाठी वापरली जातात. आमची कपलिंग ही 300 बार पर्यंत वापरली जातात.
 
उद्योगांमध्ये अनेकदा तयार केलेल्या उत्पादनाला कुठेही लिकेज नाही ना हे तपासावे लागते. (उदा. इंधनाच्या टाक्या, इंधनवाहक नळ्या, फिल्टर्स) हे तपासताना त्याच्या एका भागात उच्च दाबाची हवा अथवा द्रव भरला जातो, आणि त्यानंतर बाकीचे सर्व मार्ग बंद करून लिकेज तपासले जाते, ही तपासणी करताना द्रव भरण्यासाठी जोडलेल्या व बंद अशा सर्व ठिकाणी लिकेज होऊन चालत नाही. असे मार्ग लिक प्रूफ जोडण्यासाठी तसेच जोडणीतला वेळ कमीतकमी करण्यासाठी आम्ही या प्रकारच्या क्विक रिलीज कपलिंगची निर्मिती केली.
 
लिकेज टेस्टिंग क्युआरसी
 
उदाहरण 1 (चित्र क्र.1)
 
Fig 1
 
आम्ही गेली अनेक वर्षे साधी क्युआरसी बनवतो. ही क्युआरसी तयार केल्यावर त्यामध्ये काही गळती नाही ना हे 6 बार दाबाच्या हवेने तपासावे लागते. यासाठी एक टोक (एंड कनेक्शन) बंद करून दुसऱ्या टोकाकडून उच्च दाबाची हवा अथवा द्रव भरावा लागतो.
 
1. तपासणी करताना वेळ खूप जात असे व जोडणीच्या ठिकाणी गळती होत असे.
2. पूर्वी आम्ही कपलिंगवर होज पाईप चढवून व नट लावून तपासणी करत होतो.
3. पाईप चढवून त्यात क्लिप बसवण्यात वेळ जातो व क्लिप नीट घट्ट न बसल्यास तेथून गळती होते. नट थ्रेडिंगवर चढवताना वेळ जातो व वॉशर खराब असल्यास किंवा पूर्ण आटे न पिळल्यास तेथून गळती होते.
4. गळती तपासताना जोडापाशी गळती असल्यास ती दिसून येते.
 
वरील पद्धतीमध्ये तपासणी करणाऱ्यावर व त्याच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागते.
 
लिकेज टेस्टिंग क्युआरसी वापरून तपासण्याच्या पद्धतीमध्ये कौशल्याची कुठेही गरज पडत नाही. तसेच क्युआरसीच्या टोकाला जोडण्यात कोणतीही चूक झाल्यामुळे तेथून गळती होवू नये अशी रचना केलेली असते. तसेच आमच्या या क्युआरसीमध्ये टोक बंद करण्यासाठी लागणारा वेळ अनेक पट कमी होतो व गळती अजिबात होत नाही. त्यामुळे आतील द्रवाचा दाब कायम राहतो. दर तासाला तपासणी होऊ शकणाऱ्या नगांची संख्या अनेक पट वाढते.
 
अनेक उद्योगांमध्ये अशा प्रकारची गळती तपासणी (लिकेज टेस्टिंग) करावी लागते. अशा सर्व ठिकाणी हे क्युआरसी उपयोगी पडतात. आम्ही अनेक प्रकारच्या टोकांसाठी अशी कपलिंग बनवली आहेत. याची दोन वेगळी उदाहरणे पुढे दिली आहेत.
 
उदाहरण 2
 
Fig 2
 
चित्र क्र.2 मध्ये दाखविलेली फ्लँज एका दाब असलेल्या टाकीवर वेल्डिंग होते. त्या टाकीची 0.5 बार दाबाच्या हवेने तपासणी करताना फ्लँजवर एक झाकण लावून ते किमान तीन स्क्रूने घट्ट बंद करावे लागत असे. त्याला किमान 40 सेकंद लागत होते आणि पूर्ण लिकेज बंद होण्याची खात्री नव्हती. यासाठी आम्ही दिलेले कपलिंग वापरून 3 सेकंदात हे काम होते. कपलिंग आत दाबल्यावर बाहेरील दांडा फिरवून यातील 6 बॉल, रिंगमधून बाहेर येऊन कपलिंग फ्लँजवर घट्ट बसते आणि ही जोडणी लिक टाईट होते.
 
उदाहरण 3
 
Fig 3
 
चित्र क्र.3 मध्ये दाखविलेला कनेक्टर दुसऱ्या भागाच्या 10 बार दाबाच्या हवेने प्रेशर तपासणीसाठी इनलेट कनेक्शन म्हणून वापरला जातो. त्याला प्रेशरमध्ये टिकणारे आणि जलद पकडण्यासाठी आतमध्ये 3 ‘O’ रिंग देऊन, बाहेरील कनेक्टरवर पकडण्यासाठी एक रिंग दिली आहे. कपलिंग कनेक्टरमध्ये बसवून फक्त रिंग फिरविली की कपलिंग घट्ट होते आणि प्रेशर तपासणी करता येते. याला 0.5 सेकंद इतकाच वेळ लागतो.
QRC Drawing 
 
या कपलिंगच्या जोडणीपाशी कोणतीही गळती होत नाही. त्यामुळे आतील दाब कायम राहतो, व जोडणी कमी वेळात होत असल्यामुळे तपासणीचे उत्पादन वाढते. ही जोडणी प्रचलित पद्धतीपेक्षा 5 ते 20पट जलद होते. (उदाहरणार्थ, प्रचलित पद्धतीत ही जोडणी होण्यासाठी 60 सेकंद लागत असतील तर आमच्या क्युआरसीमुळे ही जोडणी 3 ते 10 सेकंदात होवू शकते.) अशा प्रकारची काही उत्पादने आयात केली जातात. त्या उत्पादनांना कमी किंमतीत पर्यायी उत्पादने आम्ही बनवितो. त्यासाठी आम्हाला ऑटोमोबाईल कॉम्पोनन्टस् मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनतर्फे ‘एक्सलन्स इन मेक इन इंडिया ड्राईव्ह’ हा सन्मान मिळाला आहे.
 
शशांक गद्रे ’सीलंट एंटरप्रायझेस’ या कंपनीचे संचालक आहेत. गेली 30 हून अधिक वर्षे ही कंपनी QRC क्षेत्रात अभिनव उत्पादने ग्राहकांना देत आहे.
@@AUTHORINFO_V1@@