स्वयंचलित चकमधील बिघाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-Apr-2018   
Total Views |
 
Failure of the automatic wheel
 
या आधीच्या लेखांमध्ये आपण तातडीची मदत, मशिन चालूच होत नाही, वंगण तेलाची पातळी समाधानकारक नसणे तसेच वंगण तेलाचा दाब कमी असल्यास काय परिणाम होतात या समस्यांबद्दल माहिती घेतली. आता आपण या अंकात चकच्या संदर्भात काय समस्या उद्भवतात ते पाहूया.
 
सी.एन.सी लेथ मशिनवरचा चक हायड्रॉलिक दाबावर कार्य करतो व यासाठी पायाने वापरायची कळ (फूट ऑपरेटेड स्विच) वापरली जाते, कारण कार्यवस्तू पकडण्यासाठी कामगाराचे दोन्ही हात मोकळे असणे हितावह असते. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. चक नेहमी खुल्या अवस्थेत असतो. जेव्हा पायाने कळ दाबली जाते तेव्हा कार्यवस्तू चकमध्ये घट्ट पकडली जाते व तीच कळ पुन्हा दाबल्यास कार्यवस्तूवरील दाब नाहीसा होतो आणि कार्यवस्तू चकमधून बाहेर काढता येते. पण जेव्हा ही कळ पुन्हा पुन्हा दाबून चक कार्यवस्तूस पकडत किंवा सोडत नाही, म्हणजेच सक्रीय होत नाही तेव्हा चक बिघडला आहे असे लक्षात येते. जेव्हा कळ पायाने दाबली जाते तेव्हा ही कळ दोन तत्वावर चालते. कळ यांत्रिकरित्या (मेकॅनिकल) दाबली जाते व इशारा (सिग्नल)विद्युत उर्जेने दिला जातो. जर यांत्रिक भागात बिघाड असेल तर ही कळ बरोबर काम करत नाही, कारण विद्युत उर्जेने इशारा मिळत नाही. याचा परिणाम चक निष्क्रिय होण्यात होतो आणि गजर वाजून आपल्याला इशारा मिळतो. ही पायाने दाबायची कळसुद्धा विद्युत उर्जेने सक्रीय होत असल्यामुळे जर 24 र्ींेश्रीं पेक्षा कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असेल तरीसुद्धा या समस्येला तोंड द्यावे लागते.
 
आता आपण या समस्येच्या यांत्रिक भागाकडे लक्ष देऊया. या चकमध्ये घर्षण मुख्यत्वे खालील भागांमध्ये असते.
 
1 चक व त्यामध्ये बसणार्‍या जॉमध्ये.
 
2 ड्रॉ बार व तो ज्या भागात बसतो त्या दोन भागांमध्ये.
 
जर ड्रॉ बार मागे पुढे हलत नसेल तर चकच्या जॉची अपेक्षित हालचाल होणार नाही. त्यामुळे ड्रॉ बारची मुक्तपणे हालचाल होते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. ही हालचाल व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा चक काम करत नसेल तर मात्र जॉ चकमध्ये घट्ट झालेत काय हे तपासावे लागेल. याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
 
 
1 चिप अडकल्यामुळे
 
2 चिप मोठ्या प्रमाणात तयार होत असल्यामुळे.
 
3 लवचिक (डक्टाईल) धातूचे यंत्रण.
 
4 ठिसूळ धातूचे यंत्रण (उदाहरणार्थ - कास्ट आयर्न ) यामध्ये लहान आकाराच्या चिप तयार होतात व त्या चकमधील स्लायडर जॉ आणि जॉ ओपनिंगमध्ये असलेल्या फटीमध्ये जमा झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. त्याचप्रमाणे निर्माण होणारी धूळसुद्धा याला कारणीभूत असते.
 
आता या वरील बाबींसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे निदान महिन्यातून एकदा तरी चक साफ करणे अत्यंत गरजेचे आहे.. अर्थात हे आपण कोणत्या प्रकारच्या कार्यवस्तू करतो त्यावरसुद्धा अवलंबून आहे.
 
Failure of the automatic wheel
 
दररोज ग्रीसिंग करणे आवश्यक आहे. पण बर्‍याच ठिकाणी वस्तुस्थिती अशी असते की जोपर्यंत समस्या उद्भवत नाही तोपर्यंत सर्व्हिसिंग केलेच जात नाही. अशामुळे नियोजनाच्या अभावामुळे उत्पादनाचा खोळंबा होतो व देखभालीच्या खर्चात लक्षणीय वाढ होते. म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे.
 
stitch in time saves Nine
 
नारायण मूर्ती ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’चे सर्व्हिस व्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन मेन्टेनन्समधील प्रदीर्घ
अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@