मागील अंकात आपण थ्रेड चेजिंग प्रोग्रॅम G-76 चे तपशील बघितले. या लेखात आपण G78 या प्रोग्रॅमविषयी माहिती घेणार आहोत.
G78 वापरून सिंगल लाईन थ्रेड
M 5 x 1 थ्रेड
T0505 - टूल कॉल नं. 5
G0 X 6 (X- कटिंग पोझिशन रॅपिड)
Z1 ( Z - कटिंग पोझिशन रॅपिड)
G78 X 4.5 Z-10 F1 - पहिला कट
पिच 1 मिमी
X 4.25 - दुसरा कट
X 4.04 - तिसरा कट
X 3.9 - चौथा कट
X 3.8 - पाचवा कट
G0 X 20 X जलद गतीने 20 कडे
Z30 जलद गतीने 30 कडे
M30 - प्रोग्रॅम एंड
G78 वापरून मल्टीलाईन थ्रेड प्रोग्रॅम
T0907...टूल कॉल अप
G0 X 5...(X रॅपिड कटिंग स्टार्ट पॉइंट)
Z1 (Z रॅपिड कटिंग स्टार्ट पॉइंट)
G78 X 4.5 Z-10 H5 F1 - कटिंग पहिला
कट 5 लाईन थ्रेड कट पिच 1 मिमी
X 4.25... दुसरा कट
X 4.04... तिसरा कट
X 3.9... चौथा कट
X 3.8... पाचवा कट
G0 X 20... X जलद गतीने 20 कडे
Z30 Z जलद गतीने 30 कडे
M30
G78 सायकलला काही ठिकाणी स्पेशल थ्रेडसाठी थ्रेडिंग सायकल तर काही ठिकाणी टेपर थ्रेड कटिंग सायकल असे म्हटले जाते. G78 सायकलचा प्रोग्रॅम फॉरमॅट खालीलप्रमाणे असतो.
G78 X(U)...Z(W)...R...H...F...E
या पॅरामीटरचे वर्णन खालीलप्रमाणे करता येईल.
X (U) - शेवटच्या पॉइंटच्या ठिकाणचा X अक्ष कोऑर्डिनेट (अबसोल्युट) तर U - इनक्रिमेंटल.
Z (W) - शेवटच्या पॉइंटच्या ठिकाणचा Z अक्ष कोऑर्डिनेट (अबसोल्युट) तर W - इनक्रिमेंटल
R - वाढत किंवा कमी होत जाणारा टेपर (Dmax - Dmin ) / 2 मिमी
H - मल्टीपल थ्रेडमधील थ्रेड लाईन नंबर
F - थ्रेडचा लीड (मिमी/रिव्होल्युशन)
E - इंच थ्रेड (थ्रेड /इंच)
R ची पॉझिटिव्ह व निगेटिव्ह
व्हॅल्यु स्पष्टीकरण
G78 च्या वापरामध्ये R ची व्हॅल्यु द्यावी लागते.
R - थ्रेडची सुरुवात व शेवट यामधील रेडियल डिफरन्स ही व्हॅल्यु +ve किंवा -ve असते. सरळ रेषेतील (स्ट्रेट लाईन) थ्रेडसाठी R ची व्हॅल्यु शून्य असते.
R- मोजण्यासाठीचे सूत्र
R (मिमी) = (थ्रेड कट सुरुवातीचा व्यास -थ्रेड कट शेवटचा व्यास) / 2
प्रोग्रॅम लिहित असताना ’R’ ची योग्य किंमत व चिन्ह (साइन) घालणे बंधनकारक आहे.
’R’ ची व्हॅल्यु सर्वसाधारणपणे
• बाहेरील थ्रेडसाठी +ve
• आतील थ्रेडसाठी -ve
• सरळ रेषेतील थ्रेडसाठी- 0 (शून्य)
थोडक्यात जर टूलची हालचाल X +ve आणि टेपर थ्रेड असतील तर R -ve आणि टूलची हालचाल X -ve आणि टेपर थ्रेड असतील तर R +ve
खाली दिलेल्या आकृतीवरून हे स्पष्ट होते.
कोन थ्रेड कटिंग G-78 वापरून प्रोग्रॅम
T0707 ...........टूल कॉल
G0 X 9.5 .........X रॅपिड कटिंग सुरूवात पोझिशन
X-15...............Z रॅपिड कटिंग सुरूवात पोझिशन
G78 X 2.1 Z-5 R2.5 F1 - पहिला कट पिच 1 मिमी.
X 1.8 ....................... दुसरा
X 1.6........................तिसरा
X 1.4 .......................चौथा
X 1.3........................पाचवा
G0 X 20..................... X जलद गतीने 20 कडे (रॅपिड टू 20)
Z30 ..........................Z जलद गतीने 30 कडे (रॅपिड टू 30)
M30..................... प्रोग्रॅम एंड
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंग क्षेत्रामधील तज्ज्ञ असून ते याबाबत सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथ विषयावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणक या विषयावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून पुस्तके लिहिली आहेत.