न्यूट्रल टूल वापरून अंतर्गोल (कॉनकेव्ह) यंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Apr-2018   
Total Views |
 
concave machining
 
सी.एन.सी. लेथवर अंतर्गोलाकार टर्निंग करणे हे एक साधे इंटरपोलेशन आहे. सहनिर्देशक (कोऑर्डिनेटस्) अचूक निवडले असले, तरीही अशा कार्यवस्तूंची गुणवत्ता इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जर अपेक्षित गुणवत्ता परिपूर्ण ‘ब्ल्यू मॅचिंग’ अशी हवी असेल, तर त्यात पृष्ठीय फिनिश एकसारखा असला पाहिजे आणि केंद्रावर कोणताही उंच-सखलपणा नसला पाहिजे.
 
(ब्ल्यू मॅचिंग - ब्ल्यू मॅचिंग ही यंत्रण केलेल्या प्रतलांचा सपाटपणा/उच्च बिंदू तपासण्यासाठी घेतली जाणारी एक
चाचणी असते.)

12_1  H x W: 0
 
अंतर्गोलाला टर्निंग करण्यासाठी पुढील काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.
 
• सेंटरची उंची 0.05 ते 0.1 (मिमी) अक्षापासून वर असली पाहिजे.
• टूलचा प्रवेश बाहेरून दीर्घ/विस्तारित कंसात व्हावा.
• निकास (एक्झिट) सुद्धा कंसात व्हावा. निकासाच्या कंसाची त्रिज्या ही टूल नोज त्रिज्येच्या तिप्पट असावी.
• एक्स-ऑफसेट बिनचूक असावा.
 
1. जर तो अधिक असला, तर ब्ल्यू सीटिंग समस्या उद्भवेल.
2. जर तो कमी असला, तर ब्ल्यू सीटिंग समस्या उद्भवेल आणि केंद्रात सपाटपणा दिसेल
 
• टूल नोज रेडियस कॉम्पेन्सेशन (टीएनआरसी) - ब्ल्यू मॅचिंग होण्यासाठी R वेअरमध्ये समायोजन करणे आवश्यक.
 
(टीप : यंत्रण केलेल्या कार्यवस्तूची त्रिज्या मशिनवर थेट मोजता येत नाही. जर आपण सेटिंगची प्रक्रिया योग्यरीतीने केली नाही, तर अनेक कार्यवस्तू अस्वीकृत होण्याची आणि उत्पादकता कमी होण्याची शक्यता असते.

2_1  H x W: 0 x
प्रोग्रॅम

3_1  H x W: 0 x 
 
O2121 (कॉनकेव्ह टर्निंग) (एस डिझायनर्स लि.)
N1 G0 G21 G40
T0000 X0.0Z0.0
T0101
G92S3000
G96S250 M04
M07
(सेमी फिनिश)
G0 X45.0 Z5.0
G1 G41 X44.849 Z1.25 F1.0
X42.849 F0.2
G3 X0 Z-7.75 R30.0 F0.12
G3 X-0.695 Z-7.719 R2.0 (आर्क एक्झिट)
G0 G40 Z5.0
(फिनिश)
G0 X45.0 Z5.0
 
G1 G41 X44.849 Z1.0 F1.0
X42.849 F0.2
G3 X0 Z-8.0 R30.0 F0.12
G3 X-0.695 Z-7.969 R2.0 (आर्क एक्झिट)
G0 G40 Z10.0 M09
G97S100
M5 T0000X0.0Z0.0
M30
%
 
काशिनाथ पटनशेट्टी ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’ कंपनीच्या टेक सेंटर अँड व्हॅल्यु अॅडेड सर्व्हिस विभागाचे मुख्य सल्लागार आहेत. त्यांना मशिन बिल्डिंग आणि अॅप्लिकेशन, उत्पादकता वाढ या क्षेत्रातील 27 वर्षांचा अनुभव आहे. 
@@AUTHORINFO_V1@@