टर्निंगसाठी टूलची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Apr-2018   
Total Views |
 
Selection of tools for turning
आतापर्यंत आपण ऑटोमोटिव्ह गियर बॉक्सच्या कव्हरचे यंत्रण, व्हीडीआय टूल होल्डर, व्हॉल्व्ह हाउसिंग, ट्रॅक्टर फ्लाय व्हील हाउसिंग या संदर्भात केलेल्या सुधारणांच्या केस स्टडी बघितल्या. यामध्ये बहुतांश यंत्रभाग ग्रे कास्ट आयर्न, स्टील फोर्जिंग, एसजी आयर्न यापासून बनवलेले होते. क्रोमियम बेस, मॉलिब्डेनम, स्टेनलेस स्टील अशा उच्च तापमानामध्ये काम करणाऱ्या मिश्र धातूंचे यंत्रण करण्यात फार मोठे आव्हान असते.
 
या लेखात आपण एका टर्निंगविषयक अनुभवाची माहिती घेऊ. एका कंपनीमध्ये ब्रॉन्झ आणि मॉलिब्डेनम झाळून(ब्रेझिंग) बरेच यंत्रभाग बनवले जातात. इलेक्ट्रिकल उद्योगक्षेत्र आणि सरकारी क्षेत्रातील उद्योगांना ते नियमितपणे यंत्रभागांचा पुरवठा करीत आहेत.अशा उच्च तापमानामध्ये काम करणाऱ्या मिश्र धातूंमधील यंत्रभागांच्या यंत्रणासाठी काटेकोर भूमिती आणि मायक्रोफाईन ग्रेडची टूल वापरावी लागतात.
 
सध्याच्या यंत्रणाच्या पद्धतीमध्ये खर्च तर अधिक होताच आणि इन्सर्टचे कोपरे तुटण्याची मोठी समस्यादेखील होती.
ग्राहकाची आवश्यकता
 
1. इन्सर्टच्या कोपऱ्यांचे तुटणे थांबवणे.
2. प्रति यंत्रभाग खर्च कमी करणे

Insert 
Scroo clamp
 
सध्या वापरात असलेल्या इन्सर्टला कापण्याच्या तीक्ष्ण धारेच्या दोन कडा होत्या आणि त्याची ग्रेड या कामासाठी अयोग्य होती. कापून बाहेर काढायचे मटेरियलही पुष्कळ होते. त्यामुळे यंत्रणाचे अनेक पास चालवावे लागत होते. ग्राहकाचा फायदा डोळ्यापुढे ठेवून आम्ही चार कोपरे असलेला,अधिक तीक्ष्ण धारेचा इन्सर्ट (चित्र क्र.1) वापरायचे ठरवले.
 
सध्या वापरात असलेल्या इन्सर्टला होल्डर म्हणून स्क्रू क्लॅम्पिंगचा(चित्र क्र.2) उपयोग केला होता. अजून चांगले आणि दृढ क्लॅम्पिंग मिळावे यासाठी चार कोपर्‍यांच्या इन्सर्टसाठी टॉप/मल्टीपल क्लॅम्पिंग (चित्र क्र.3) असलेल्या हत्यार धारकाची (चित्र क्र.4) शिफारस केली.

Multi Lock
Assassin's Creed 
 
कामाचा तपशील
 
इथे यंत्रभाग म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे रोटर आहेत. आम्ही ज्यासाठी उपाय सुचवला तो रोटर चित्र क्र. 5 आणि 6 मध्ये दाखवला आहे. याचे 1500 नग इतके दरमहा उत्पादन अपेक्षित होते.

Raw material
Roter
Table No. 1
Table No. 2 
 
बदललेल्या इन्सर्टचे गुणविशेष
 
• VBMT इन्सर्टला साईड रिलिफ असल्याने तो एकाच पृष्ठभागावर होल्डरमध्ये बसतो. त्यामुळे दोनच कडा कर्तनासाठी मिळतात. VNMG इन्सर्टला ’0’ रिलिफ कोन असल्याने तो टॉप आणि बॉटम अशा दोन्ही पृष्ठभागांवर होल्डरमध्ये बसतो. त्यामुळे चार कडा कर्तनासाठी मिळतात.
 
• DP 5010 ग्रेड- उच्च तापमानावरील मिश्र धातूंच्या हरप्रकारच्या टर्निंगसाठी सुयोग्य, पीव्हीडीचा लेप दिलेले.चांगला फ्रॅक्चर टफनेस असलेले अतिशय कठीण सबमायक्रॉन सबस्ट्रेट
 
• मध्यम कर्तन आणि फिनिशिंगसाठी उपयुक्त
 
• 41 चिप ब्रेकरची काटेकोर भूमिती (चित्र क्र. 7 )असल्यामुळे फीड (सरकवेग) आणि कापाची खोली कमी असताना चिप बाहेर काढणे सुलभ तसेच चिपवर उच्च प्रतीचे नियंत्रण
 
Chip Breaker
Test results table
 
फायदे : तेच पॅरामीटर ठेवून ग्राहकाला इन्सर्टच्या दोन अतिरिक्त कोपर्‍यांचा फायदा झाला आणि खर्चातही बचत झाली. प्रति इन्सर्ट टूलचे आयुर्मान 100% वाढले. इन्सर्टचे कोपरे तुटण्याचा प्रश्न नाहीसा झाला आणि टूलचे सातत्यपूर्ण आयुर्मान मिळाले.

1995 साली यंत्र अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर विजेंद्र पुरोहित यांनी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांना मशिन टूल, कटिंग टूल डिझाईनमधील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून सध्या ते ’ड्युराकार्ब इंडिया’ कंपनीमध्ये तांत्रिक साहाय्य विभागाचे प्रमुख आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@