अभियांत्रिकी ड्रॉईंग युक्त्या : 3

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    07-Apr-2018   
Total Views |
   
Lock Library
 
मागील लेखामध्ये आपण पॅरामेट्रिक ड्रॉईंग हे अत्याधुनिक तंत्र अभ्यासले. पॅरामेट्रिक ड्रॉईंगमुळे आपण आपला कामाचा वेळ वाचवू शकतो. तसेच चुकांची शक्यताही बरीच कमी होते. यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रॉईंगचे प्रमाणीकरण होण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण ड्रॉईंग तयार करण्यापूर्वीची तयारी याबद्दल माहिती घेणार आहोत.
 
जसे ‘क्रिकेट’ खेळताना खेळपट्टी कशी आहे हे महत्त्वाचे असते, तसेच ड्रॉईंग तयार करण्यापूर्वी त्याची निर्धारित खेळपट्टी म्हणजेच टेम्प्लेट योग्य असणे आवश्यक आहे. लघु उद्योजकाकडे उत्पादनांची बहुविविधता असते. जसे की, शाफ्ट तयार करणे, पिन तयार करणे, प्रसंगी जोडणीही करणे. ग्राहकाभिमुख राहिल्यामुळेच तो व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहू शकतो. त्याच्याकडे जशी कामाची विविधता असते, तशी ग्राहकांची विविधता असते. प्रत्येक ग्राहकानुसार त्याची कामाची पद्धत आणि स्टँडर्ड बदलत असतात. यासाठी लागणाऱ्या ड्रॉईंगच्या स्टँडर्डमध्येही बदल करावे लागतात. म्हणूनच एक कायमस्वरूपी ड्रॉईंग फाईल तयार करून ठेवणे रास्त ठरते. कॅडमध्ये ड्रॉईंगच्या फाईलला संबोधण्यासाठी विशिष्ट एक्सटेंशनचा वापर होत असतो. ज्यावरून आपण ती फाईल कोणत्या स्वरुपाची आणि कशासाठी आहे हे चटकन ओळखू शकतो. कॅड ड्रॉईंग फाईलला ’dwg’ असे संबोधले जाते. तसेच टेम्प्लेटसाठी ’dwt’ हे एक्सटेंशन वापरतात.
 
(टीप : ‘टेम्प्लेट’ ही फाईलसुद्धा एक प्रकारची ड्रॉईंग फाईलच आहे.)
 
• टेम्प्लेट तयार करताना पुढील बाबींचा जरूर विचार करावा.
• शीटचा आकार ( शीट साईज) : ड्रॉईंग ज्यावर काढणार आहोत ते शीट त्याचे माप- A0, A1, A2, A3, A4
• टायटल ब्लॉक : ज्यामध्ये ड्रॉईंगबद्दलची तांत्रिक माहिती व इतर तत्सम विश्लेषण यांचा अंतर्भाव असतो.(चित्र क्र.1)
• मापन पद्धती (डायमेन्शन स्टाईल)
• निर्देश पद्धत (अॅरो स्टाईल)
• अक्षर प्रकार ( टेक्स्ट स्टाईल)
• मापनाचे एकक (युनिट ऑफ मेजर) : म्हणजेच मिमी अथवा इंच इत्यादी.
• प्रमाण (रेशो)
 
ग्राहकाच्या पद्धतीनुसार आणि मानांकनानुसार त्याच्यासाठीच्या विशिष्ट बाबींचा टेम्प्लेटमध्ये समावेश असावा. त्याला अपेक्षित असणारा साचेबद्धपणा टेम्प्लेट फाईलच्या माध्यमातून साठवून ठेवता येतो आणि त्याचा वेळोवेळी गरजेनुसार वापर
करू शकतो.
 
टेम्प्लेट तयार केल्यामुळे होणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे
 
• या सर्व निश्चितीकरणामुळे कामातील तोचतोचपणा कमी होतो.
• वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते.
• नेहमी होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका कमी करता येतात.
• डॉक्युमेंटेशन करताना याचा फायदा होतो.
• नवीन सॉफ्टवेअर वापरणाऱ्याला समजून घेताना सोपे जाते.
 
टेम्प्लेट तयार करताना टायटल ब्लॉकला अत्यंत महत्त्व आहे. एकाच ग्राहकाकडून निरनिराळ्या पद्धतीचे ड्रॉईंग करण्याकरिता येत असतात. त्यावेळी टेम्प्लेट तीच ठेऊन फक्त टायटल ब्लॉकमध्ये बदल करावा. त्यासाठी टायटल ब्लॉक करताना तो ‘BLOCK’ या कमांडने केलेला असावा. (होम (HOME) पर्यायामध्ये क्रिएट (create) नावाचा उप-पर्याय निवडावा अथवा कमांड लाईनमध्ये ब्लॉक (BLOCK) लिहिले असता ही कमांड प्रत्यक्षात येईल.)
 
कारण त्याने सर्व माहिती संकलित पद्धतीने राहते आणि त्यात बदल करण्यास सोपी जाते.
 
Sample of title block
 
टायटल ब्लॉकमध्ये अपेक्षित असणारी माहिती खालीलप्रमाणे (चित्र क्र.1)
 
• वस्तूचे नाव आणि क्रमांक.
• वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासंबंधीची माहिती.
• प्रमाण
• ड्रॉईंग काढणाऱ्याचे नाव, तपासणाऱ्याचे नाव, मान्यता देणाऱ्याचे नाव इत्यादी.
• ड्रॉईंग काढण्याची पद्धत. (फर्स्ट/थर्ड अँगल)
• दुरूस्ती (रिव्हिजन) क्रमांक.
• दुरूस्तीची टीप.
• शीट क्रमांक.
 
ड्रॉईंगमधील विविध ऑबजेक्टचा समूह म्हणजे ब्लॉक . आता ब्लॉक कमांड कशी वापरावी याविषयी आपण थोडक्यात
माहिती घेऊ.
 
• सर्वप्रथम आपल्याला एकत्रित हवे असलेले ऑबजेक्ट तयार करून घ्यावेत.
• ब्लॉक कमांड वापरावी.
• ब्लॉक चे नाव निश्चित करावे.
• एकत्रित अपेक्षित असलेली वस्तू निवडावी.
• ब्लॉक ची जागा निश्चित करावी.
 
अशा प्रकारे तुमचा समूह म्हणजेच ब्लॉक तयार होतो. तयार झालेला ब्लॉक आपण कालांतराने आवश्यकतेनुसार बदलू शकतो. या कमांडचा वापर करून आपण टायटल ब्लॉक तयार केला.
 
ब्लॉक कमांडचा वापर करून आपण अजूनही काही लाभ घेऊ शकतो ते पुढील प्रमाणे.
 
• नेहमी वापरासाठी लागणारे विविध प्रकारचे आकार.
• चिन्ह (symbols) तयार करून ठेऊ शकतो.
 
• विशिष्ट टीप.
• अंक, अक्षरे आणि शब्द इत्यादी.
 
Lock Library
 
ब्लॉक लायब्ररीमध्ये चित्र.क्र.2 मध्ये दाखवल्यानुसार चिन्ह, आकार तसेच काही विशिष्ट टीप.यांचा अंतर्भाव करता येईल.
 
या सर्वांची मिळून आपण ‘ब्लॉक लायब्ररी’ बनवू शकतो. ही लायब्ररी विशिष्ट टेम्प्लेट म्हणून सेव्ह करू शकतो. शेवटी ही लायब्ररी एक प्रकारची ड्रॉईंग फाईलच असते; या फाईलचा उपयोग करून आपल्या आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी ही फाईल वापरू शकतो. नेहमी लागणारे निरनिराळ्या प्रकारचे विशिष्ट आकार,चिन्ह, इत्यादी त्वरित आपल्या वापरात आणू शकतो. फक्त त्यासाठी फोल्डर स्ट्रक्चरचा वापर केला पाहिजे, म्हणजे आपण तयार केलेली ‘ब्लॉक लायब्ररी’ सहजासहजी सापडू शकेल आणि आपल्या वेळेची बचत होईल.
 
याच प्रकारच्या अधिक कल्पना आपण पुढच्या अंकात पाहणार आहोत. त्याचे काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे -
 
कॅडमधील अत्याधुनिक कमांड, ड्रॉईंग, कन्व्हर्जन्स, एक्सटर्नल रेफरन्सेस इत्यादी.
 
अमित घोले यांत्रिकी अभियंते असून त्यांनी अॅटलास कॉपको, इमर्सन इनोव्हेशन सेंटर, थायसन क्रूप अशा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये डिझाईन विभागात अनेक वर्षे काम केल्यानंतर ’इमॅजिका टेक्नोसॉफ्ट’ या इंजिनिअरिंग डिझाईन सोल्युशन आणि
कॉर्पोरेट प्रशिक्षण देणार्‍या कन्सल्टन्सीची स्थापना केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@