टेलस्टॉक योग्य स्थानी नसणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-May-2018   
Total Views |

Tellstock
 
या आधीच्या लेखांमध्ये आपण तातडीची मदत, मशिन चालूच होत नाही, वंगण तेलाची पातळी समाधानकारक नसणे, तसेच वंगण तेलाचा दाब कमी असल्यास काय परिणाम होतात आणि चक निष्क्रिय असणे या समस्यांबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण टेलस्टॉकसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करणार आहोत.
 
जेव्हा आपण मशिन चालू करतो, तेव्हा टेलस्टॉक ‘होम’ स्थानी असतो. तो ‘होम’ स्थानी आहे, हे समजण्यासाठी प्रॉक्झिमिटी स्विच दिलेले असतात. जर हा स्विच बंद असेल, तर प्रणालीला असे वाटते की, मशिनचे क्विल पुढे आलेले आहे. त्यामुळे इतर हालचाल, उदाहरणार्थ टरेटची हालचाल झाल्यास तो टेलस्टॉकवर धडकू शकतो. त्याचप्रमाणे टेलस्टॉक ‘होम’ स्थानी असताना प्रॉक्झिमिटी स्विच चालू असतो. टेलस्टॉकच्या सुरवातीच्या ठिकाणी आणि तो पुढे येतो त्या ठिकाणी असे दोन प्रॉक्झिमिटी स्विच दोन ठिकाणी बसविलेले असतात. जेव्हा ’होम’ ठिकाणचा प्रॉक्झिमिटी स्विच चालू असतो, तेव्हा फॉरवर्ड ठिकाणचा प्रॉक्झिमिटी स्विच बंद असतो आणि जेव्हा फॉरवर्ड ठिकाणचा प्रॉक्झिमिटी स्विच चालू असतो, तेव्हा ’होम’ ठिकाणचा प्रॉक्झिमिटी स्विच बंद असतो. मात्र जर हे दोन्ही स्विच बंद असतील, तर मात्र गजर (अलार्म) चालू होतो. जर ’होम’ स्थानासाठी दिलेला प्रॉक्झिमिटी स्विच खराब झालेला असेल, तर हा गजर सतत वाजत राहतो.

Table 1 
 
आता जेव्हा कार्यवस्तू चक अथवा सेंटरमध्ये पकडली आहे, अशा परिस्थितीत टेलस्टॉक ’होम’स्थानी नसून त्याने पुढे येऊन कार्यवस्तू घट्ट पकडलेली आहे. आता आवर्तन (सायकल) चालू होताना, तो पुढे आलेला आहे. एकतर अशावेळी फॉरवर्ड स्विच चालू असतो, पण तरीही अशा वेळेस वर नमूद केल्याप्रमाणे टरेट त्याला धडकू नये याची काळजी कामगाराने प्रोग्रॅम करताना घ्यावी लागते.
 
प्रॉक्झिमिटी स्विच व्यवस्थित काम करतात की नाही, हे तपासावे लागते. क्वचित प्रसंगी कमी वापरामुळे ती घट्ट बसलेली असतात. अशा वेळेस ती स्वच्छ करून, परत बसवावी लागतात. यात बर अथवा लहान कपच्या जाण्याची शक्यता नसते, कारण कार्यवस्तूवर काम होताना शीतकाचा फवारा असल्याने काम होत असताना मशिनचे दरवाजे बंद असतात. म्हणूनच बरमुळे बिघाड होण्याची शक्यता फारच कमी असते.
 
टेलस्टॉकसुद्धा कधी कधी अडकून बसतो. अर्थात जर बरेच दिवस त्याचा वापर झालेला नसेल, तरच हे घडू शकते. अशा वेळेस तो स्वच्छ करावा आणि त्याचे सर्व्हिसिंग करावे. हा गजर वाजण्याची अनेक कारणे असू शकतात.
 
• टरेट जर व्यवस्थित क्लॅम्प झालेला नसेल तर हा गजर वाजू शकतो.
 
• मोटरमध्ये काही बिघाड असणे.
 
• मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर (MPCB) बिघडला असणे.
 
• मोटर आणि MPCB यांच्यातील विद्युत जोडणी सैल असणे.
 
• फुट स्विच खराब असणे.
 
गजर वाजू लागल्यावर आवश्यक तपासणी करून दोष दूर करणे गरजेचे असते.
 
नारायण मूर्ती ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’चे सर्व्हिस व्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन मेंटेनन्समधील प्रदीर्घ अनुभव आहे
 
 
@@AUTHORINFO_V1@@