टूलचा न लेंग्थ ऑफसेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    05-Jun-2018   
Total Views |
धातुकाम कल्पक सुधारणा स्पर्धेमध्ये आलेल्या प्रवेशिकांपैकी बक्षीसपात्र ठरलेली पुणे येथील ’भाग्यश्री ॲक्सेसरीज प्रा.लि.’ कंपनीमध्ये केलेली ही सुधारणा.
 
Length offset of the tool
पूर्वीची पद्धत
 
आमच्याकडे ’ए.एम.एस.’ कंपनीचे MCV300 हे व्ही.एम.सी. मशिन आहे. या मशिनला 12 स्टेशनची टूल डिस्क आहे. व्ही.एम.सी. मशिनवर टूल सेटिंग करण्यासाठी एक एक टूल प्रथम टूल डिस्कमध्ये भरत असू. पूर्वीच्या पद्धतीमध्ये आम्ही प्रत्येक कार्यवस्तूचा एक मास्टरपीस (मशिनिंग करून) बनवलेला होता. जी कार्यवस्तू मशिनवर लावायची आहे त्याचा मास्टरपीस आधी लावून त्यावरून Z अक्ष झिरो करत होतो. (उदाहरणार्थ, समजा आम्हाला सरफेस मिलिंग करायचे असेल, तर आम्ही त्या सरफेसला Z अक्ष झिरो करायचो. अशाच प्रकारे समजा एका कार्यवस्तूवर 8 ऑपरेशन करायची असतील, तर आम्हाला 8 वेळा Z अक्ष झिरो करावा लागत होता. ही प्रक्रिया सर्व प्रकारच्या कार्यवस्तूसाठी करावी लागत होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जात होता. त्यानंतर एक एक टूल समोर आणून कार्यवस्तूवर Z = 0 ठिकाणी टेकवून त्याचा ऑफसेट मशिनच्या प्रोग्रॅममध्ये भरला जात असे.

Height Geij 
 
पूर्वीच्या पद्धतीतील समस्या
 
1) 12 टूल सेट करण्यासाठी मशिनला साधारणपणे 15 ते 16 मिनिटे एवढा जास्त वेळ लागत होता.
 
2) टूल Z अक्षात खाली घेत असताना अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागत असे. घाईगडबडीमध्ये टूल कार्यवस्तूवर धडकून तुटण्याचे प्रसंग वारंवार होत असत. विशेष करून कार्बाईडचे ड्रिल आणि लहान आकाराचे टूल सेट करताना असे अपघात होऊन नुकसान होत असे.
 
3) टूल सेट करण्यासाठी कुशल कामगारावर अवलंबून राहावे लागत.
 
सुधारणेसाठी कल्पना
 
वरील समस्येवर मात करण्यासाठी टूलचे Z ऑफसेट मशिनच्या बाहेरच कसे घेता येईल याबाबत विचार केला. त्यासाठी टूल प्रीसेटर घ्यावा असे सुचविण्यात आले. मात्र टूल प्रीसेटर महाग असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आम्हाला ते परवडणारे नव्हते. त्यामुळे आम्ही प्रोग्रॅममध्ये काही करता येईल का, याबाबत विचार केला. ही सुधारणा करण्यासाठी आम्हाला साधारणपणे 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला.
 
प्रत्यक्षात केलेली सुधारणा
 
1) मशिनमध्ये प्रोग्रॅम GS 54, हा मशिनचा सेंटर न वापरता GS 55 ते GS 59 हे सेंटर वापरून करण्यात आले.
 
2) त्यानुसार सर्व प्रोग्रॅम हे रिलेटिव्ह सेंटर वापरतात.
 
3) एक मास्टर ब्लॉक बनविण्यात आला. त्याच्या बोअरचा आकार BT40 सारखा करण्यात आला. या ब्लॉकचे दोन्ही फेस पूर्ण समांतर राहतील आणि बोअर त्याला लंब राहील याची विशेष काळजी घेण्यात आली.
 
4) नवीन पद्धतीमध्ये सर्वांत लहान टूल प्रथम हत्यारधारकामध्ये बसवले जाते. हे टूल मास्टर ब्लॉकमध्ये ठेवून हाईट गेजवर त्याची उंची घेतली जाते आणि ती हाईट रेफरन्स Z = 0 धरली जाते.
 
5) प्रत्येक टूल हत्यारधारकामध्ये आणि ब्लॉकवर लावून हाईट गेजवर त्यांची उंची संदर्भापासून (रेफरन्स) मोजली जाते. तसेच त्यांची यादी केली जाते.
 
6) टूल डिस्कमध्ये टूल लावून त्याची यादीत लिहिलेली उंची Z ऑफसेट म्हणून टाकली जाते.
 
7) सर्वांत लहान टूलचा Z ऑफसेट झिरो ठरविला जातो. फक्त तेच टूल कार्यवस्तूवर टेकवून प्रोग्रॅम ओरीजिनचा Z ऑफसेट घेतला जातो.
 
नवीन पद्धतीमुळे झालेले फायदे
 
1) टूल सेटिंगसाठी मशिनमध्ये लागणारा वेळ वाचला. (प्रत्येक सेटिंगमागे 15 ते 16 मिनिटे वाचली.) एका महिन्यात सर्वसाधारणपणे 15 कार्यवस्तू सेट होतात. म्हणजे महिन्यात 225 मिनिटे अर्थात सध्याच्या मशिन रेटनुसार प्रति महिना 1350 रुपये इतकी बचत झाली.
 
2) टूल सेटिंग होताना टूल तुटणे, कार्यवस्तूवर धडकून अपघात होणे टळले.
 
3) कुशल कामगारावर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली.
 
प्रशांत बोटे यांत्रिकी अभियंते आहेत. सध्या ते भाग्यश्री ॲक्सेसरीज प्रा. लि. कंपनीमध्ये क्वालिटी इंजिनियर म्हणून काम पाहत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@