छोट्या आकाराच्या त्रिज्या आणि चॅम्फर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    10-Aug-2018   
Total Views |

बरेचदा टर्निंग सेंटर मशिन वापरणार्‍यांकडून आपण असे ऐकतो की, ड्रॉईंग आणि प्रोग्रॅम निर्देशक बरोबर असले तरी R0.1 ते R0.5 मिमीसारख्या छोट्या आकाराच्या त्रिज्या (फिलेट) आणि 0.1 ते 0.5 मिमी मापाचे छोटे चॅम्फर मशिनच्या साहाय्याने बनविता येत नाहीत.

टर्निंगने दंडगोलाकार कार्यवस्तू बनविता येतात, हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये कार्यवस्तू स्पिंडलच्या साहाय्याने फिरवून एक बिंदू (सिंगल पॉईंट) टूलला विशिष्ट सरकवेग (फीडरेट) देऊन यंत्रण केले जाते. सरकवेगाचा प्रोग्रॅम स्पिंडलच्या एका फेऱ्यात ठरविलेल्या मिमी/फेरा या सरकवेगाने एक फीड हेलिक्स अंतर निर्माण करतो. हे रेषीय हालचालीवरील थेट अंतर असते. (G01 लाईन प्रोग्रॅम वापरल्यामुळे) ते वर्तुळाकार हालचालीमध्ये कॉर्डच्या लांबीत मोजले जाते. (G02 - G03 हा वर्तुळाकार प्रोग्रॅम वापरून.)


2_1  H x W: 0 x

44_1  H x W: 0
 

स्पिंडलच्या प्रत्येक फेऱ्यात टूल प्रोग्रॅम केलेल्या सरकवेगाइतके (मिमी/फेरा) पुढे जाते. फीड हेलिक्समुळे तयार होणाऱ्या लहान लांबीच्या रेषा सरकवेगाइतक्या अथवा त्यापेक्षा कमी लांबीच्या असल्यामुळे त्या ड्रॉईंगमध्ये दाखविल्याप्रमाणे तयार होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे कमी त्रिज्या असलेले फिलेट आणि कमी अंतर्भूत (इन्क्लुडेड) कोनसुद्धा तयार होऊ शकत नाहीत. (चित्र क्र. 1 आणि तक्ता क्र. 1 पहा.) यासाठी कमी फिलेटच्या त्रिज्या आणि छोटे चॅम्फर असलेल्या कार्यवस्तू बनवायच्या असतील, तर आपल्याला फिलेट किंवा चॅम्फरच्या सुरुवातीला सरकवेग कमी करावा लागतो.

%
O1234 (गाईड)
N1 T0000 G21 G0
G28 U0 W0
T0101 (SVJBL 1616H11 R0.4)
G92 S3000
G96 S350 M03
M07
(फिनिश टर्न)
G0 X50. Z2.0
X5.0
G1 G42 X3.029 Z0.8 F0.25
G2 X4.629 Z0 F0.1
G3 X5.166 Z-0.166 R0.3 F0.03
G1 X6.937 Z-1.937 F0.08
G3 X7. Z-2.071 R0.3 F0.03
G1 Z-3.146 F0.08
G2 X9. Z-4.146 R1.
G1 X10.232
G3 X10.585 Z-4.252 R0.2 F0.02
G1 X11.133 Z-4.765 F0.08
G3 X11.103 Z-4.93 R0.15 F0.015
G1 X10.732 Z-5.162 F0.08
G2 X10.644 Z-5.592 R0.4
G1 X11.363 Z-6.3
G2 X12.076 Z-6.519 R0.4
G1 X12.972
G1 X13.272 Z-6.669 F0.015
G1 Z-10.0 F0.08
G1 X17.272 F0.3
G0 G40 X50.0 Z2.0
G97 S100
T0000 M09
M05
G28 U0 W0
M30
%

[email protected]

काशिनाथ पत्नासेट्टी ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’ कंपनीच्या टेक सेंटर अँड व्हॅल्यु ॲडेड सर्व्हिस विभागाचे मुख्य सल्लागार आहेत. त्यांना मशिन बिल्डिंग आणि ॲप्लिकेशन, उत्पादकता वाढ या क्षेत्रातील 27 वर्षांचा अनुभव आहे.

@@AUTHORINFO_V1@@