प्रोफाईल कटिंग आवर्तन- रफिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    02-Aug-2018   
Total Views |
 
Profile cutting frequency- roughing
 
सी.एन.सी. लेथ कामासाठी अतिशय प्रगत आणि सर्व सोयींयुक्त अशी आवर्तने (सायकल) उपलब्ध आहेत. यातून केवळ स्ट्रेट किंवा टेपर्ड कटच नाहीत तर रेडियस, चॅम्फर, ग्रुव्हज, अंडरकट अशा पद्धतीची सर्व कामे सहज करता येतात. याचा उपयोग काऊंटरिंगसाठीसुद्धा होतो. टूल नोज रेडियस ऑफसेटचा वापरही गरज असल्यास करता येतो.
 
मल्टीपल रिपिटेटिव्ह आवर्तनाला संगणकीय (कॉम्प्युटर) मेमरी लागते. त्यामुळे जुन्या सी.एन.सी. मशिनवर हे आवर्तन वापरता येत नाही. सध्याचे प्रगत सी.एन.सी. कंट्रोल खालील क्रिया अतिशय वेगात आणि अचूक करतात.
 
• वाचणे.
• शोधून काढणे.
• प्रोसेस करणे.
• इव्हॅल्युएट करणे.
• फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही दिशांमध्ये काम करता येते.
• गणिती आकडेमोड, गणिती कमांडचे उच्च वेगात प्रोसेसिंग करता येते.
 
या सर्वामुळे प्रोग्रॅम करणे अतिशय सुलभ होते.
 
माहिती- टर्निंग ग्रुपमध्ये एकूण सात
मल्टीपल रिपिटेटिव्ह आवर्तने उपलब्ध आहेत.
 
प्रोफाईल कटिंग आवर्तन - फिनिशिंग
 
G70,71,72,73
 
चिप ब्रेकिंग आवर्तन
 
G74 & 75
 
थ्रेडिंग आवर्तन
 
G76
 
वरीलपैकी G73 आणि G76 आवर्तन आपण पूर्वी पाहिले आहे.
 
आवर्तन रचना (फॉरमॅटिंग)
मल्टीपल रिपिटेटिव्ह आवर्तन प्रोग्रॅमिंग करण्यासाठी फानुक कंट्रोल मॉडेलचे दोन प्रकार आहेत.
1. फानुक सिस्टिम 0T, 16T, 18T, 20T, 21T (लोअर लेव्हल)
2. फानुक सिस्टिम 10T, 11T, 15T (हायर लेव्हल)
 
G71 - स्टॉक रिमूव्हल टर्निंगसाठी
• अतिशय सामान्य रफिंग आवर्तन
• आडवे कटिंग करून स्टॉक काढला जातो. (Z अक्ष)
• सॉलिड सिलिंडरमधून
• हे आवर्तन दोन फॉरमॅटमध्ये येते.
1. सिंगल ब्लॉक फॉरमॅट
2. डबल ब्लॉक फॉरमॅट
 
G71 (सिंगल ब्लॉक),10T/11T/15T आवर्तन फॉरमॅटसाठी
G71 P...Q..I..K..U..W..D..F..S
P: फिनिशिंग प्रोफाईलचा पहिल्या ब्लॉकचा नंबर.
Q: फिनिशिंग प्रोफाईलचा शेवटच्या ब्लॉकचा नंबर.
I: दिशा आणि अंतर रफ फिनिशिंग X अक्ष प्रत्येक बाजूला.
K: दिशा आणि अंतर रफ फिनिशिंग Z अक्ष.
U: X अक्ष व्यास फिनिशिंगसाठीचा स्टॉक अमाऊंट.
W: Z अक्ष फिनिशिंगसाठी राहिलेला स्टॉक.
D: रफिंग कट डेप्थ.
F: कटिंग फीडरेट - इंच/रिव्हो किंवा मिमी/रिव्हो. (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड करायची सोय.)
S: स्पिंडल स्पीड - फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट- (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड करायची सोय.)
 
G71 (डबल ब्लॉक) 0T/16T/18T/20T/21T आवर्तन फॉरमॅटसाठी
G71 U...R
G71 P...Q...U...W...F...S...
U: रफिंग कटची डेप्थ.
R: प्रत्येक कटला परत मागे जाण्याची व्हॅल्यू.
 
दुसरा ब्लॉक
P: फिनिशिंग प्रोफाईलचा पहिला ब्लॉक नंबर.
Q: फिनिशिंग प्रोफाईलचा शेवटचा ब्लॉक नंबर.
U: X अक्ष व्यास फिनिशिंगसाठीची स्टॉक अमाऊंट.
W: Z अक्षावर फिनिशिंगसाठी राहिलेला स्टॉक.
F: कटिंग फीडरेट - इंच/रिव्हो,मिमी/रिव्हो. (P आणि Q मध्ये ओव्हरराईडची सोय)
S: स्पिंडल स्पीड - फूट/मिनिट, मीटर/मिनिट (P आणि Q मध्ये ओव्हरराईडची सोय.)
 
पहिल्या ब्लॉकमध्ये U म्हणजे कापाची खोली आहे तर दुसऱ्या ब्लॉकमध्ये U व्यासावर राहिलेला स्टॉक आहे.
 
G71 रफिंग आवर्तन उदाहरण 1
प्रोग्रॅम
रफिंग आवर्तन (आऊटसाईड रफिंग)
N2 G96 V200 T 202 M4
G00 X 124 Z 2 M8
G71 P50 Q60 I 0.5K 0.1 D4 F 0.4
G26 M9
 
फिनिश टर्निंग
(कटर रेडियस कॉम्पेन्सेशनसह)
 
Fig - 1
 
G96 V250T303M4
G46
G0 X 40 Z1 M8
G01 X50 Z - 8A15 F 0.2
G01 160
G02 X 80 Z- 42 R 18
G01 Z - 62
G01 X 125 D0.5
G01 W - 6.5
G40
G28 M9
 
उदाहरण 2
Fig- 2 

Fig- 3 
 
काऊंटर रफिंग आणि फिनिश टर्निंग कटर रेडियस कॉम्पेन्सेशनसह
 
वापरायचे टूल
T3 - रफिंग फीड 0.3 मिमी/रिव्हो. कटिंग डेप्थ 3.5 मिमी.
T4 -फिनिश टर्निंग फीड 0.2 मिमी/रिव्हो.
 
प्रोग्रॅम (आऊटसाईड रफिंग)
G96 V 180 T0303 M4
G0 X 120 Z2 M8
G58
G71 P50 Q60 I0.05 K0.1 D3.5 F0.3
G26 M09
 
फिनिश टर्निंग
G96 V220T0404 M4
G46
G0 X 12 Z1 M8
G01 X 14 Z0 F 0.2
G01 X 48 140 R5
G01 Z - 46
G01 A90
G01 X 80 Z - 49 A-15
G01 Z - 68
G01 X 121 D4.5
G01 W - 5.5
G40
G26 M09
 
उदाहरण 3
वरील उदाहरणातील कार्यवस्तूला बाहेरील कटिंगसाठी 800 चे स्टँडर्ड टूल वापरता येईल. फेसवरील कट आणि बाहेरील भागाचे रफिंग याच टूलने करता येईल.
 
प्रोग्रॅम
0300 - G 71 (रफिंग आवर्तन) (आऊटसाईड रफिंग)
N1 G20
N2 T0100M41 (ओ.डी. रफिंग टूल + गिअर)
N3 G96 S500 M03 रफ टर्निंगसाठी स्पीड
N4 G00 G41 X 3.2 Z0 T0101 M08 (फेस सुरुवात)
N5 G01 X 0.36 (फेस व्यास एंड)
N6 G00 Z 0.1 (क्लिअर फेस)
N7 G42 X 3.1 N8 G71 P9Q17 U0.06 W0.004 D1250 F0.014
N9 G00 X 1.7 (काऊंटर सुरुवात)
N10 G01 X 2.0 Z - 0.05 F 0.005
N11 Z - 0.4 F 0.01
N12 X 2.25
N13 X 2.5 Z - 0.6
N14 Z - 0.875 R 0.125
N15 X 2.9
N16 G01 X 3.05 Z - 0.95
N17 U 0.2 F0.2
N18 G00 G40 X 5.0 Z 6.0 T0100
N19 M01
 
(या पॉईंटला बाहेरील रफिंग संपले आहे.) अंतर्गत रफिंगसाठी टूल नं. 3 वापरणार आहोत. (T03)
N20 T0300 (आय.डी. रफिंग टूल)
N21 G96 S 500 M03
N22 G00 G41X 0.5 Z0.1 T0303 M08
N23 G71 P24 Q 31 U - 0.06 W 0.004 D1000 F0.012
N24 G00 X 1.55
N25 G01 X1.25 Z- 0.05 F0.004
N26 Z- 0.55R - 0.1 F0.008
N27 X 0.875 K - 0.05
N28 Z- 0.75
N29 X 0.625Z - 1.25
N30 Z - 1.55
N31 U - 0.2 F 0.02
N32 G00 G40 X 5.0 Z2.0 T0300
N33 M01
 
या दोन प्रोग्रॅमनंतर कार्यवस्तूचे पूर्ण रफिंग झालेले आहे. यानंतर G70 फिनिशिंग आवर्तन वापरून कार्यवस्तू पूर्ण करता येईल. 
 
G72 फेसिंग स्टॉक रिमूव्हल
G72 ही आवर्तने बऱ्याच अंशी G71 प्रमाणेच काम करतात. मुख्य फरक म्हणजे, स्टॉक उभ्या कटिंगने (फेसिंग) काढला जातो. याचा उपयोग सॉलिड सिलिंडरचे रफिंग करण्यासाठी होतो. त्यात लहान लहान उभे कट घेतले जातात. कंट्रोल सिस्टिमप्रमाणे या आवर्तनाचा फॉरमॅट दोन प्रकारांत होतो.
1. सिंगल ब्लॉक फॉरमॅट
2. डबल ब्लॉक फॉरमॅट
 
G72 सिंगल ब्लॉक फॉरमॅट
फानुक सिस्टिम 10T/11T/15T साठी
G72 P...Q...I..K...U...W...D...F...S... ज्यामध्ये
P: फिनिशिंग प्रोफाईल पहिल्या ब्लॉकचा नंबर.
Q: फिनिशिंग प्रोफाईल शेवटच्या ब्लॉकचा नंबर.
I : X अक्षावर रफ सेमीफिनिशिंगचे अंतर आणि दिशा.
K : Z अक्षावर सेमीफिनिशिंगचे अंतर आणि दिशा.
U : X अक्ष व्यासावर फिनिशिंगसाठी काढायचा स्टॉक.
W : Z अक्षावर फिनिशिंगसाठी राहिलेला स्टॉक.
D: रफिंग कापाची खोली.
F: कटिंग फीडरेट - इंच/मिनिट, मिमी/रिव्हो. (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड शक्य.)
S: स्पिंडल स्पीड - फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट. (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड शक्य.)
I आणि K पॅरामीटर सर्व मशिनमध्ये उपलब्ध नसतात.
 
डबल ब्लॉक
G72 आवर्तन फॉरमॅट 0T/16T/18T/20T/21T
 
G72 Format
 
फानुक सिस्टिमसाठी पहिला ब्लॉक
W : रफिंग कापाची खोली.
R : प्रत्येक कटपासून मागे जाण्याचे अंतर.
 
दुसरा ब्लॉक
P : फिनिशिंग प्रोफाईलचा पहिला ब्लॉक नंबर.
Q : फिनिशिंग प्रोफाईलचा शेवटचा ब्लॉक नंबर.
U : X अक्ष व्यासावर फिनिशिंगसाठी काढायचा स्टॉक.
W : Z अक्षावर फिनिशिंगसाठी राहिलेला स्टॉक.
F : कटिंग फीडरेट - इंच/रिव्हो, मिमी/रिव्हो. (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड शक्य.)
S : स्पिंडल स्पीड फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट (P आणि Q ब्लॉकमध्ये ओव्हरराईड शक्य.)
 
महत्त्वाची सूचना - G71 मध्ये (दोन ब्लॉक फॉरमॅट) दोन वेळेला U आलेला आहे, तर G72 डबल ब्लॉक फॉरमॅटमध्ये दोन वेळेला W आलेला आहे.
 
Fig - 4
 
पहिल्या ब्लॉकमध्ये आलेला W कापाची खोली दर्शवितो, तर दुसऱ्या ब्लॉकमधील W फेसवर राहिलेला स्टॉक दर्शवितो.
 
उदाहरण G72
03301 G72 फक्त रफिंग
N1 G20
N2 T0100 M41
N2 T0100 M41
N3 G96 S500 M03...................
ओडी फेसिंग टूल, बोअर
N4 G00 G41 X6.25 Z0.3 T0101 M08 सुरुवात
N5 G72 P6 Q 12 U0.06 W0.03 D1250 F0.014
N6 G00 Z - 0.875
N7 G01 X 6.05 F0.02
N8 X 5.9 Z - 0.8 F 0.008
N9 X 2.5
N10 X 1.5 Z0
N11 X 0.55
N12 W 0.1 F0.01
N13 G00 G40 X8.0 Z 3.0 T0100
N14 M01
 
G72 संकल्पना
 
Fig - 5
 
G70 काऊंटर फिनिशिंग आवर्तन हे काऊंटरिंग आवर्तनामधील शेवटचे आवर्तन आहे. आपण पूर्वी पाहिलेल्या G71, G72, G73 या कोणत्याही आवर्तनाचा वापर करून झाल्यावर G70 फिनिशिंग आवर्तन वापरले जाते. या आवर्तनाचा वापर फक्त फिनिशिंग कटसाठी केला जातो.
 
G70 आवर्तन फॉरमॅट
कंटूर फिनिशिंग आवर्तन
या आवर्तनासाठीचा फॉरमॅट सर्व कंट्रोलसाठी एकच आहे, त्यात बदल नाही.
G70 P...Q...F...S...
P : फिनिशिंग प्रोफाईलच्या पहिल्या ब्लॉकचा नंबर.
Q : फिनिशिंग प्रोफाईलच्या शेवटच्या ब्लॉकचा नंबर.
F : कटिंग फीडरेट इंच/रिव्हो किंवा मिमी/रिव्हो.
S: स्पिंडल स्पीड फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट
 
उपयुक्त सूचना - सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जो बिंदू सुरुवातीचा बिंदू म्हणून रफिंगला वापरला होता तोच पॉईंट G70 ला वापरावा.
 
उदाहरण - पूर्वीचा प्रोग्रॅम पुढे चालू (ओ.डी. फिनिशिंग)
N15 T0500M42
N16 G96 S530 M03 ओ.डी. फिनिशिंग टूल + गिअर
N17 G42 X 3.1 Z 0.1 T0505M08 फिनिश टर्निंग स्पीड
N18 G70 P9Q 17 सुरुवात
N19 G00 G40 K5.0 Z 6.0 T0.500
N20 M01
पुढे चालू (आय.डी. फिनिशिंग)
N21 T0700
N22 G96 S600 M03 आय.डी.
फिनिशिंग टूल
N23 G00 G41 X 0.5 Z0.1 रफ बोअरिंगसाठी स्पीड
T0707M08 सुरुवात पोझिशन
N24 G70 P24 Q31
N25 G00 G40 X5.0 Z2.0 T0700 फिनिशिंग आवर्तन
N26 M30 फिनिशिंग आवर्तन आय.डी.
% प्रोग्रॅम एंड
G70 आवर्तनामध्ये सरकवेग प्रोग्रॅम करावा लागत नाही. कारण P आणि Q मध्ये सरकवेग आलेला असतो. त्यामुळे
प्रोग्रॅममधील सरकवेग नाकारला जातो. 3301 वरचा प्रोग्रॅम ज्यामध्ये G72 वापरले आहे, त्यात फिनिशिंग कटसाठी बाहेरील टूल फिनिशिंग कटसाठी G70 वापरून पूर्ण करता येतो.
 
प्रोग्रॅम 3301
 पुढे चालू.
N15 T500 M42 ओ.डी. फेसिंग टूल + गिअर
N16 G96 S500 M03
N17 G00 G41 X 6.25 Z0.3 सुरुवात पोझिशन
N18 G70 P6 Q12 फिनिशिंग आवर्तन
N19 G00 G40 X8.0 Z3.0 T0500
N 20 M30
%
 
G70 आवर्तन वापरासंबंधी मूलभूत नियम
1. स्टॉक रिमूव्हल आवर्तनाच्या आधी टूल नोज रेडियस ऑफसेट सुरू करा.
2. स्टॉक रिमूव्हल आवर्तन संपल्यानंतर टूल नोज रेडियस ऑफसेट रद्द करा.
3. स्टार्ट पॉईंटकडे परतीची गती आपोआप होते. प्रोग्रॅम करण्याची जरुरी नाही.
4. P ब्लॉक (G71 मधील) Z अक्ष व्हॅल्यू घालू नका.
5. U स्टॉक अलाऊन्स व्यासावर प्रोग्रॅम केलेला असतो. त्याच्या चिन्हावरून (+/-) कोणत्या बाजूच्या स्टॉकचे काम करायचे आहे ते कळते.
6. फिनिशड् काऊंटरमध्ये प्रोग्रॅम केलेला फीडरेट विचारात घेतला जात नाही.
7. D अक्षराला डेसिमल पॉईंटचा वापर करू नका. त्याऐवजी लिडिंग झिरो सप्रेशन फॉरमॅट वापरा. (उदाहरणार्थ, D0750 किंवा D750 म्हणजेच 0.0750 खोली.)
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@