स्लॉट मिलिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-Aug-2018   
Total Views |

Works and machinery area
 
वाहन उद्योगातील वाहन उत्पादक त्यांच्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांसाठी लागणारे यंत्रभाग लघु उद्योगांकडून आवश्यक तेवढ्या संख्येने तयार करून घेतात. अशा यंत्रभागांच्या डिझाईनमध्ये फारसा बदल अपेक्षित नसेल तर पुरवठादाराला त्याच्याकडेच हा साठा करून ठेवायला सांगतात. त्यामुळे पुरवठादाराला साठा तयार करून ठेवायला आणि वेळेवर हवा तेवढाच पुरवठा करून योग्य किंमत लावता येते. योग्य टूलिंग आणि इष्टतम पॅरामीटर वापरून या यंत्रभागांच्या यंत्रणाचा खर्च कसा कमी करायचा, यावर काम करण्यासाठी पुरवठादाराला वेळ मिळतो. वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी यंत्रणाच्या प्रक्रियेत बदल करणेसुद्धा शक्य होते. वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या समरूप यंत्रभागांवर एकाच प्रकारची टूल वापरून समान यंत्रण प्रक्रिया वापरणेसुद्धा शक्य होते.
 
एक पुरवठादार दुचाकीच्या यंत्रभागांचा उत्पादक आणि अनेक दुचाकी उत्पादकांचा महत्त्वाचा पुरवठादार आहे. या यंत्रभागांवर कमी वेळात प्रक्रिया करणे आणि उत्पादनक्षमता वाढविणे, हे या पुरवठादारासमोरील आव्हान आहे. ते कसे पेलायचे हे ठरविण्यासाठी आम्ही सध्याच्या प्रक्रियेचा व्यवस्थित अभ्यास केला.
 
कटिंगचे पॅरामीटर, यंत्रभाग धरून ठेवणे यातील काय बदलू शकतो किंवा आपण दोन/अधिक प्रक्रिया, फिक्श्चर सेटअप एकत्र करू शकतो का, याचा तपशीलवार अभ्यास केला. साधारणपणे ज्यात जास्त संख्येने यंत्रभागांचे यंत्रण करता येईल असे नवे फिक्श्चर बसविणे किंवा जास्त मशिन बसविणे (आवश्यकता असेल तर) याचा विचार केला. सध्या असलेल्या सेटअपमध्येच प्रक्रियेचा खर्च कसा कमी करायचा याचासुद्धा विचार झाला.
 
योग्य प्रकारचे टूलिंग आणि पॅरामीटर निवडून उत्पादनक्षमतेत सुधारणा करणे आणि आवर्तनाचा कालावधी (सायकल टाईम) कमी करणे शक्य आहे असे अभ्यासानंतर लक्षात आले.
 
उत्पादनक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि आवर्तनाचा कालावधी (सायकल टाईम) कमी करण्यासाठी टूलिंग केलेल्या
यंत्रभागाची माहिती पुढे दिली आहे.
 
यंत्रभाग : व्हॉल्व्ह ब्रिज
धातू : फोर्जड् स्टील (हार्डनेस 200-220 BHN)
प्रक्रिया : स्लॉट आणि एंड मिलिंग
मशिन : AMC MCV 450
 
Table 1
 
सध्याच्या टूलमधील समस्या
a. टूलचे कमी आयुष्य
b. इन्सर्टच्या कोपर्‍यांचे (कॉर्नर) टवके उडणे.
c. आवर्तन कालावधी/कटिंग कालावधी जास्त होता - सरकवेग वाढवता येत नव्हता.
जुन्या आणि नवीन प्रक्रियेचे तपशील तक्ता क्र. 1 मध्ये दिले आहेत. नवीन पद्धतीत आम्ही जास्त जाडीचा 3 कोपरे असलेला इन्सर्ट आणि सध्याच्या 4 पॉकेटच्या कटर ऐवजी 3 पॉकेट असलेले कटर वापरले.
 
Fig : 2
 
TOMX 10 टूलची वैशिष्ट्ये आणि फायदे
1. इन्सर्टला हेलिक्स असल्यामुळे कटिंगचा भार कमी होतो.
2. कडांना इष्टतम क्लिअरन्स
3. कटिंग एजवर धन (+) रेक कोन
4. इन्सर्टच्या जास्त जाडीमुळे जास्त बळकटी आणि दृढतेची खात्री मिळते.
5. किफायतशीर 3 कटिंग एज आणि शोल्डरवर अचूक 90 अंश मिळतात.
6. अधिक सरकवेगासाठी मजबूत कटिंग एज.
 
उत्पादनातील फायदे
 
1. फीड/टूथ वाढविल्यामुळे आवर्तनाचा कालावधी 25% ने कमी झाला.
 
2. टूलचे कोपरे तुटणे थांबले.
 
3. टूलचे आयुष्य 40% ने वाढले.
 
4. इन्सर्ट मजबूत असल्यामुळे टूल इतर प्रकारच्या धातुंसाठीसुद्धा वापरता येते. उदाहरणार्थ, संमिश्र पोलाद, गंज विरहित पोलाद, ओतीव लोखंड.
 
5. इन्सर्टची संख्या कमी केली. जुन्या कटरला 4 इन्सर्ट होते तर नवीन पद्धतीत 3 इन्सर्ट असलेले कटर वापरण्यात आले.
 
विजेंद्र पुरोहित यांना मशिन टूल, कटिंग टूल डिझाईनमधील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून सध्या ते ’ड्युराकार्ब इंडिया’
कंपनीमध्ये तांत्रिक साहाय्य विभागाचे प्रमुख आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@