लेथवरील आवर्तने - 2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    12-Sep-2018   
Total Views |
 
Cycles on the lathe - 2
 
एखादया भोकाचे ड्रिलिंग करताना त्याचे लांबी/व्यास (L/D) हे गुणोत्तर 5 पेक्षा जास्त असेल, तर त्याचे सलग ड्रिलिंग न करता ते टप्प्याटप्प्याने (पेक) केले जाते. यामुळे बर काढणे सोपे जाते. या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रॅमची माहिती पुढे दिली आहे.
 
G74 पेक ड्रिलिंग आवर्तन
 
हे आवर्तन फिनिशिंग नसलेल्या कार्यवस्तूसाठी आणि Z अक्षावर वापरले जाते. तसेच मशिनिंग सेंटरवर वापरल्या जाणा़ऱ्या G73 प्रमाणेच हे आवर्तन आहे. लेथच्या कामासाठी हे आवर्तन उपयोगी असून ते तुटक (इंटरप्टेड) कट, टर्निंग, बोअरिंग, डीप फेस ग्रुव्हिंग, पार्ट ऑफ मशिनिंग आणि त्यासारख्या इतर ॲप्लिकेशनसाठी सहज वापरता येते.
 
G74 आवर्तन फॉरमॅट फानुक 10T/11T/15T
 
G74X
 
X (U) - कापल्या जाणाऱ्या ग्रुव्हच्या व्यासाचे अंतिम मूल्य (व्हॅल्यू)
Z (W) - भोकाची खोली/शेवटच्या पेकची न पोझिशन
I - प्रत्येक कापाची खोली (+/- 0)
K - प्रत्येक पेकचे अंतर (+/- 0)
D - कापाच्या शेवटी ठेवलेल्या रिलीफचे मूल्य (फेस ग्रुव्हिंगसाठी शून्य)
F - ग्रुव्ह कटिंग सरकवेग (इंच/फेरा, मिमी./फेरा)
S - स्पिंडल वेग (फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट)
 
G74 आवर्तन फॉरमॅट फानुक 0T/16T/18T/20T/21T
दोन ब्लॉक प्रोग्रॅमिंग फॉरमॅट
G74R & G74X 
 
R - प्रत्येक कापाचा क्लिअरन्स
X (U) - ग्रुव्ह व्यास अंतिम काप
Z (W) - भोकाची खोली - शेवटच्या पेकची न पोझिशन
P - प्रत्येक कापाची खोली
Q - प्रत्येक पेकचे अंतर
R - कापाच्या शेवटी ठेवलेल्या रिलीफचे मूल्य (फेस ग्रुव्हिंगसाठी शून्य)
F - ग्रुव्ह कटिंग सरकवेग (इंच/फेरा, मिमी./फेरा)
S - स्पिंडल वेग (फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट)
वरील फॉरमॅटमधून जर X (U) आणि I (किंवा P) वगळले, तर फक्त Z अक्षावर यंत्रण (पेक ड्रिलिंग) होईल. पेक ड्रिलिंगमध्ये Z, K आणि F चे मूल्य प्रोग्रॅम केले जाते. (चित्र क्र. 1)

Fig :- 1 
 
G74 स्किमॅटिक फॉरमॅट प्रोग्रॅम
03500 G 74 ........................पेक ड्रिलिंग आवर्तन
N1 G20
N2 T0200
N3 G97 S1200 M03 ................................................वेग
N4 G00 X 0 Z 0.2 T0202 M08 .............................सुरुवात
N5 G74 Z - 3.0 K0.5 F0.012 .............................पेक ड्रिलिंग
N6 G00 X 6.0 Z2.0 T0200 ........................क्लिअर पोझिशन
N7 M30 ..........................................................प्रोग्रॅम एंड
%
 
एकूण ड्रिलिंग 3 इंच होईल. प्रत्येक खोलीत 0.5 इंच प्रत्येकवेळी वाढ होईल. सुरुवात करण्याच्या पॉईंटपासून पहिल्या पेकची खोली काढली जाते.
 
G75 ग्रुव्ह कटिंग आवर्तन
• G75 आवर्तन X अक्षावर काम करते.
• रफ, अचूकता नसणाऱ्या कामास उपयुक्त.
• G74 बरोबर वापरल्यास तुटक कट किंवा चिप ब्रेकिंगसाठी उपयोग होऊ शकतो.
• G74 मध्ये X अक्ष होता, G75 मध्ये X अक्ष असतो.
 
G 75 आवर्तन फॉरमॅट फानुक 10T/11T/15T
सिंगल ब्लॉक
 
G75X
 
X (U) - कापल्या जाणाऱ्या ग्रुव्हचा शेवटचा व्यास
Z (W) - शेवटच्या ग्रुव्हची Z पोझिशन. (अनेक ग्रुव्ह असतील तरच लागू.)
I - प्रत्येक कापाची खोली
K - ग्रुव्हमधील अंतर
D - कापाच्या शेवटी ठेवलेले रिलीफचे मूल्य
F - ग्रुव्ह कटिंग सरकवेग (इंच/फेरा, मीटर/मिनिट)
S - स्पिंडल वेग (फूट/मिनिट, मीटर/मिनिट)
 
G75 सायकल फॉरमॅट फानुक 0T/16T/18T/20T/
दोन ब्लॉक फॉरमॅट

G75R & G75R 
 
पहिला ब्लॉक
R - प्रत्येक कापासाठी क्लिअरन्स
दुसरा ब्लॉक
X (U) - ग्रुव्ह कापण्याचा अंतिम व्यास
Z (W) - शेवटच्या ग्रुव्हची न पोझिशन
P - प्रत्येक कापाची खोली
Q - ग्रुव्हमधील अंतर
R - कापाच्या शेवटी ठेवलेले रिलीफचे मूल्य
(फेस ग्रुव्हिंगला R = 0)
F - ग्रुव्ह कापाचा सरकवेग (इंच/फेरा, मिमी./मिनिट)
S - स्पिंडल वेग (फूट/मिनिट किंवा मीटर/मिनिट)
 
G74 आणि G75 आवर्तन वापरासाठी मूलभूत नियम
1. दोन्ही आवर्तनामध्ये X आणि Z चे मूल्य ॲबसोल्युट किंवा इनक्रिमेंटल मोडमध्ये प्रोग्रॅम करता येते.
2. दोन्ही आवर्तनामध्ये स्वयंचलित रिलीफ असतो.
3. कापाच्या शेवटचे रिलीफ मूल्य वगळता येते.
4. रिटर्न मूल्य फक्त दोन ब्लॉक पद्धतीमध्ये प्रोग्रॅम करता येते. अथवा कंट्रोल सिस्टिममधील इंटर्नल पॅरामीटरवरून सेट करता येते.
5. जर दोन ब्लॉक पद्धतीमध्ये रिटर्न मूल्य प्रोग्रॅम केले आणि त्याचबरोबर रिलीफ मूल्यसुद्धा प्रोग्रॅम केले तर X चे अस्तित्व त्याचा अर्थ ठरविते. जर X प्रोग्रॅम केला असेल, तर R चा अर्थ रिलीफ मूल्य होतो.
 
G 75 उदाहरण सिंगल ग्रुव्ह
 
Single Groovh
 
प्रोग्रॅम 03005 G75 सिंगल ग्रुव्ह (चित्र क्र. 2)
G20
.....
N45 G00 X 1.05 Z-0.175 T0303 M08
N46 G75 X 0.5 I 0.055 F0.004
N47 G00 X 6.0 Z2.0 T0300 M09
N48 M30
%
 
I चे मूल्य काढावयाचे गणित
टूल ट्रॅव्हल Ø 1.050 ते Ø 0.500 म्हणजेच 0.275 प्रति बाजू.
(1.05 - 0.5) / 2 = 0.275.
म्हणजेच पाच ग्रुव्हिंग पेक होतील. 0.055 प्रत्येकी.
(0.275/5 = 0.055.)
Multiple Groovh 
 
G75 वापरून मल्टिपल ग्रुव्ह प्रोग्रॅम (मल्टिपल ग्रुव्ह)
G20
.....
N12 G50 S1000 T0300M42
N13 G96 S375 M03
N14 G00 X 1.05 Z - 0.175 T0303 M08
N15 G75 X 0.5 Z - 0.675 I 0.055 K 0.125 F 0.004
N16 G00 X 6.0 Z 2.0 T0300 M09
N17 M30
%
 
महत्त्वाचे मुद्दे
1. ग्रुव्हमधील अंतर समान हवे.
2. ग्रुव्हमधील अंतर K ने दाखवितात.
3. K जर इन्सर्टच्या रुंदीपेक्षा जास्त असेल, तर कित्येक स्वतंत्र ग्रुव्ह कापल्या जातील.
4. जर K इन्सर्ट रुंदीएवढा किंवा कमी असेल, तर एकच रुंद ग्रुव्ह कापली जाईल.
 
8625975219
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@