इक्सेंट्रिक खाचेसाठीचे प्रोग्रॅमिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    13-Sep-2018   
Total Views |
भिन्नकेंद्री (नॉन कॉन्सेंट्रिक) टर्निंग करण्याऱ्या टर्निंग सेंटरवर कार्यवस्तू पकडण्यासाठी उत्केंद्री आणि कामाशी संतुलित असलेला विशेष कार्यवस्तूधारक आवश्यक असतो. त्याकरिता आणखी एका मशिन आणि कामगाराची गरज असते. त्यामुळे काम चालू असलेल्या कार्यवस्तू (वर्क इन प्रोग्रेस - WIP) वाढतात. तसेच कार्यवस्तू लोडिंग आणि अनलोडिंग करण्याचा वेळ वाढून मटेरियलची हाताळणीही वाढते.
 
मात्र, हेच काम आपण नेहमीच्या पद्धतीने कार्यवस्तू पकडून, म्हणजे अक्षांची हालचाल आणि स्पिंडलचे फिरणे यांचा एकत्रित परिणाम तसेच दंडगोलाकार यंत्रणाची पद्धत वापरून केल्यास, मशिन, कामगार आणि कार्यवस्तू यांची अतिरिक्त गरज कमी भासते. ठराविक मिमी/फेरा सरकवेगाची निवड केली की, स्पिंडलच्या प्रति फेऱ्यामागे टूल प्रोग्रॅम केलेल्या सरकवेगानुसार पुढे सरकते. त्यामुळे आतील किंवा बाहेरील व्यासावर (ID किंवा OD) हेलिक्स बनविले जाते. परंतु, फेसवर कमीअधिक होणाऱ्या (डायनॅमिक) व्यासाची हेलिक्स बनविली जाते.
25_1  H x W: 0
 
तेल प्रवाहासाठी फेसवरील उत्केंद्री (इक्सेंट्रिक) खाच
 
फेसवर उत्केंद्री खाच (ग्रुव्ह) असलेले यंत्रभाग बनविण्यासाठी आपल्याला थ्रेडिंग G कोड (सर्वसाधारणपणे G33 किंवा G32) वापरावा लागतो. तसेच आर.पी.एम. आणि पिचसाठी करावी लागणारी आकडेमोड तक्ता क्र. 1 मध्ये दिली आहे.
t1_1  H x W: 0
 
प्रोग्रॅम
O2121
N1 T0000 X0 Z0
T0101 (फेसवरील खाचेचे टूल)
G97 S150 M4
(इन्सर्ट डाऊन असलेले टूल वापरा.)
(इन्सर्ट अप असलेल्या टूलसाठी M3 वापरावे.)
G0 X200.0 Z50.0 M7
X78.0 Z10.0
Z-35.0
G1 Z-36.0 F0.5
(सिंगल ब्लॉकमध्ये चालवू नका)
(पहिला फेरा)
G33 X110.0 Z-36.1 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-36.2 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(दुसरा फेरा)
G33 X110.0 Z-36.3 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-36.4 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(तिसरा फेरा)
G33 X110.0 Z-36.5 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-36.6 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(चौथा फेरा)
G33 X110.0 Z-36.7 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-36.8 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(पाचवा फेरा)
G33 X110.0 Z-36.9 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-37.0 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(सहावा फेरा)
G33 X110.0 Z-37.1 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-37.2 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(सातवा फेरा)
G33 X110.0 Z-37.3 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-37.4 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(आठवा फेरा)
G33 X110.0 Z-37.45 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-37.5 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(शेवटचा आयडल फेरा)
G33 X110.0 Z-37.5 F32.0 Q0 (0-180 अंश हालचाल)
G33 X78.0 Z-37.5 F32.0 (180 ते 0 अंश हालचाल)
(बाहेर)
G33 X78.0 Z-36.0 F20.0 (बाहेर)
G0 Z20.0 M9
T0000 X0 Z0 M5
M30
 
टीप
• कार्यवस्तूचे मटेरियल आणि व्यास याप्रमाणे कापाची खोली बदलावी लागते.
• सर्वाधिक सरकवेग मिमी./मिनिट (आर. पी.एम. X मिमी./फेरा) हे 10,000 मिमी./मिनिटपेक्षा जास्त नसावे.
 
सर्वाधिक सरकवेगाच्या 50-75% मर्यादेत असावे.
 
0 9844048876
काशिनाथ पत्नासेट्टी ’मायक्रोमॅटिक मशिन टूल्स प्रा. लि.’ कंपनीच्या टेक सेंटर अँड व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस विभागाचे मुख्य सल्लागार आहेत. त्यांना मशिन बिल्डिंग आणि ॲप्लिकेशन, उत्पादकता वाढ या क्षेत्रातील 27 वर्षांचा अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@