मिलिंगसह ड्रिलिंग आणि टॅपिंगसाठी DTC 400XL

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prkashan Marathi    25-Dec-2019   
Total Views |

DTC 400XL_1  H
 
 DTC म्हणजे ड्रिल टॅप सेंटर होय. हे मशिन प्रामुख्याने मिलिंगबरोबरच ड्रिलिंग आणि टॅपिंग कामासाठी वापरले जाते. काही यंत्रभागांसाठी जलद गतीने ड्रिलिंग आणि टॅपिंग करतानाच कमीतकमी चिप ते चिप वेळ मिळवून आवर्तन काळ (सायकल टाइम) कमी करणे गरजेचे असते. DTC मधील उच्च रॅपिड आणि उच्च त्वरण (अ‍ॅक्सिलरेशन) वापरून ग्राहक अपेक्षित अचूकतेसह लहान यंत्रभागांचे जलद उत्पादन करू शकतात. अशा वेळी काही कामांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक बाबींमुळे पारंपरिक व्ही.एम.सी.ची निवड योग्य ठरत नाही.
 
ग्राहकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन आमच्या डिझाइन चमूने DTC 400XL मशिनची निर्मिती केली आहे. आम्ही विकसित केलेल्या या मशिनमुळे ग्राहकांना आवर्तन काळ कमी करता येतो आणि स्पिंडलचे त्वरण (अ‍ॅक्सिलरेशन)/अवत्वरण (डेसिलरेशन) अधिक जलद करता येते. जागतिक स्तरावरील अशा प्रकारच्या मशिनच्या तुलनेत हा अधिक विश्वासार्ह आणि स्वस्त पर्याय आहे. याच्या मदतीने उत्पादक अपेक्षित अचूकतेशी तडजोड न करता कमी आवर्तन काळात लहान यंत्रभागांची निर्मिती करू शकतात.
 
DTC 400XL मशिनची वैशिष्ट्ये 
 
ड्रिल टॅप मशिनिंग सेंटर DTC 400XL संपूर्ण मिलिंग क्षमतेसह जास्त वेगवान ड्रिलिंग, टॅपिंग कामांसाठी डिझाइन करण्यात आलेले आहे. हे मशिन सुटसुटीत आणि ताकदवान असून त्यात BT 30/BBT 30 स्पिंडल बसविण्यात आलेले आहेत. यंत्रणाचे उच्च बल, जास्त वेग आणि अचूक टॅपिंग साध्य करण्यासाठी सुयोग्य रचनेचे डिझाइन करून हे मशिन विकसित करण्यात आलेले आहे. हे मशिन किफायतशीर असून रचनेची दृढताही टिकविण्यात आलेली आहे. अधिक चांगल्या दृढतेसाठी आणि उत्तम कामगिरीसाठी मशिनमध्ये रोलर प्रकारचे LM गाइडवेज बसविण्यात आलेले आहेत. मशिनच्या X, Y आणि Z या 3 एकरेषीय अक्षांवर अनुक्रमे 60/60/48 मी./मिनिट वेगाचे जलद रॅपिड ट्रॅव्हर्स देण्यात आल्यामुळे अचूक टॅपिंग होण्याबरोबरच आवर्तन काळ कमी होण्यास मदत होते. दृढ रचना आणि जास्त वेगामुळे ड्रिल टॅप मशिनिंग सेंटरवर जास्त अचूकता आणि उत्पादनक्षमता मिळते.
 
स्वयंचलित टूल चेंजर
 
टूल बदलण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित टूल चेंजर (ATC) डिस्क मॅगझिन तिरके करण्याऐवजी आम्ही एक एक टूल पॉकेट तिरके करण्याची संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. त्यामुळे हलणार्‍या सर्व वस्तुमानाचे जडत्व (इनर्शिया) लक्षणीयरित्या कमी होऊन फक्त एका पॉकेटच्या आकाराइतके उरले आहे. यामुळे आम्हाला जास्तीतजास्त 10,000 आर.पी.एम.साठी 1.8 सेकंदापर्यंत म्हणजे जपानी मशिनच्या तोडीसतोड ‘चिप ते चिप वेळ’ कमी करता आला. 
 
 
2_1  H x W: 0 x
 
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सी.एन.सी. प्रणालीत विशिष्ट डिझाइन आणि उत्पादित करण्यात आलेल्या कॅममुळेच हे शक्य झाले. IMTEX 2015 मध्ये प्रदर्शित केलेले 16 टूल डिस्क मॅगझिन असलेले पहिले प्रोटोटाइप मशिन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते, यात काहीच शंका नाही. आज DTC 400XL च्या विविध प्रकारातील 150 पेक्षा जास्त मशिन भारतभरातील अनेक ग्राहकांकडे कार्यरत आहेत.
 

3_1  H x W: 0 x 
 
विकसन करताना आलेली समस्या 
 
सुरुवातीच्या काळात, टूल बदलताना होणारा आवाज कमी करण्यामध्ये समस्या येत होत्या. स्पिंडल टेपर डिस्क स्प्रिंग स्टॅकला जोडलेल्या टूल चेंजरच्या क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंगसाठी वापरलेल्या प्रणालीमुळे आवाजाची पातळी, परवानगी असलेल्या पातळीपेक्षा जास्त होती. ग्राहकांना आवर्तन काळ कमी करता यावा, यासाठी टूल बदलण्याचा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा आवाज निर्माण होत होता. यावर लक्ष केंद्रित केले असता असे दिसून आले की, डीक्लॅम्पिंग बल थेट फेस कॅमवर येत असल्यामुळे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजाची निर्मिती होत होती.
 
नवीन वैशिष्ट्ये 
 
>पॉकेट तिरके होऊ शकणारे स्वयंचलित टूल चेंजर
>1.8 सेकंद इतका कमी चिप ते चिप वेळ : चिप ते चिप वेळेची व्याख्या ‘टूल बदलण्याचा वेळ’ अशी केली जाते. जर X, Y आणि Z अक्ष असलेले मशिन कमाल N आर.पी.एम.ने चालत असेल, तर ही वेळ टूल बदलण्याची आज्ञा दिल्यापासून मोजली जाते. त्यावेळी स्पिंडल N/2 वेगाने फिरते. त्याचप्रमाणे, अक्षांच्या स्ट्रोकची स्थिती स्ट्रोकच्या मध्यावर असली पाहिजे. ज्यावेळी टूल बदलण्याची आज्ञा सी.एन.सी. प्रणालीवरून मशिनवर येते, तेव्हा सर्व अक्ष टूल बदलण्याच्या क्षेत्रात जातात, स्पिंडल त्या दिशेने अभिमुख (ओरिएंट) होते, टूल बदलले जाते, अक्ष स्ट्रोकच्या मध्यावर येतात आणि स्पिंडलने N/2 चा वेग गाठला जातो. 
आज मशिनमधील वैकल्पिक नियंत्रण प्रणाली (कंट्रोल सिस्टिम) अपग्रेड करून ग्राहकांना ‘चिप ते चिप वेळ’ 1.5 सेकंदापर्यंत कमी करणे शक्य झाले आहे. याशिवाय आम्ही 24 टूल असलेला एक पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. 
 
मशिनची वैशिष्ट्ये
 
>X/Y/Z अक्षांसाठी 60/60/48 मी./मिनिटांचे जास्त रॅपिड 
>मशिनचा प्रतिसाद देण्याचा वेळ कमी
>स्पिंडलचे अधिक जलद त्वरण/अवत्वरण
>सुटसुटीत मशिन : आमच्याच व्ही.एम.सी. मशिनच्या सांगाड्यावर DTC मशिन बांधले आहे. आकारातील फरक DTC 1700 X 2650 X 2500 मिमी. तर मिलिंग 1750 X 2750 X 2650 मिमी. असा आहे.
 
ग्राहकांचे अनुभव 
 
भारतभरातील आमच्या ग्राहकांकडे सध्या 150 हून अधिक DTC 400XL मशिन यशस्वीपणे कार्यरत असून मशिनमध्ये फानुक कंपनीची सी.एन.सी. Oimf प्रणाली आणि X अक्षाच्या स्ट्रोकच्या 2 प्रकारांमध्ये 5.5kW/7.5kW स्पिंडल पॉवर देण्यात आलेली आहे. मशिन स्ट्रोकमध्ये 500, 400 आणि 320-X, Y आणि Z अक्ष असे स्ट्रोकचे प्रकार देण्यात आले आहेत. हे 750 X 400 टेबलच्या आकारासहीत उपलब्ध आहेत. दुसर्‍या प्रकारात 700, 400 आणि 320-X, Y आणि Z अक्ष स्ट्रोक 850 X 400 टेबलच्या आकारासहीत देण्यात आले आहेत. दोन्ही प्रकारांमध्ये स्पिंडलची कमाल गती 10,000 आर.पी.एम. इतकी आहे. 
 
वरील सर्व वैशिष्ट्ये एकाच उत्पादनात असल्यामुळे, ड्रिलिंग आणि टॅपिंगसारख्या महत्त्वाच्या क्रियांमध्ये अनेक ग्राहकांना आवर्तन काळ 40% ते 60% इतका कमी करता आला. त्यामुळे आवश्यक अचूकतेशी तडजोड न करता ग्राहकांना जास्त उत्पादनक्षमता साध्य करता आली. त्यासोबतच उत्पादांची मागणी कमी वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.
 
केस स्टडी
 

4_1  H x W: 0 x 
 
चाकण येथील सुनिती इंजिनिअरिंग कंपनीमध्ये 5 सी.एन.सी. मशिन आणि 1 व्ही.एम.सी. होते. या मशिनचा इंडेक्सिंग वेळ अधिक होता. यामुळे एकूण आवर्तन काळापैकी 25% वेळ इंडेक्सिंग करण्यात जात होता. त्यामुळे त्यांनी आमचे DTC 400XL मशिन घेण्याचा विचार केला. या मशिनविषयी बोलताना ‘सुनिती’चे बाळासाहेब जोगदंड म्हणाले, “या मशिनचा टूल इंडेक्सिंग काळ केवळ 3 ते 4 सेकंद इतका असून रॅपिड 60 मी./मिनिट आहे. जुन्या मशिनमध्ये एक टूल बदलण्यासाठी आम्हाला 12 सेकंदाचा अवधि लागत होता. रेग्युलेटर बॉडीचा एक भाग जुन्या व्ही.एम.सी.वर करताना आम्हाला 5 भागांसाठी 2 मिनिटे 20 सेकंद लागत होते. गेल्या वर्षभरापासून आम्ही DTC 400XL मशिन वापरत असून हे भाग केवळ 1.5 मिनिटांमध्ये पूर्ण होतात. मशिनचा आकार आटोपशीर असून त्याची किंमत परवडणारी आहे.”
 
 

eranna_1  H x W 
ए. इरण्णा
उप महाव्यवस्थापक, डिझाइन आणि विकसन, एस मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्स 
9741460370
 
 
ए.इरण्णा मागील 5 वर्षांहून अधिक काळ एस मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्सच्या डिझाइन आणि विकसन विभागाचे उप महाव्यवस्थापक आहेत. त्यांना मशिन डिझाइन, फिक्श्चरिंग आणि टूल डिझाइनिंग क्षेत्रातील 31 वर्षांचा अनुभव आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@