नवीन उत्पादने : मोठ्या आणि लांब कार्यवस्तुंसाठी CLX 750

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prkashan Marathi    03-Dec-2019   
Total Views |
 
1_1  H x W: 0 x
 
इमो हॅनोव्हर 2019 प्रदर्शनामध्ये डीएमजी मोरीने CLX मालिकेतील नवीन मॉडेल CLX 750 सादर केले. हे मशिन 600 किलो वजनापर्यंतच्या आणि 1,290 मिमी.पर्यंत टर्निंग लांबीच्या कार्यवस्तुंसाठी डिझाइन केलेले, तसेच युनिव्हर्सल टर्निंग सेंटर म्हणून विशेषत: मोठ्या शाफ्टच्या यंत्रणासाठी उपयुक्त आहे. शिवाय यामध्ये डीएमजी मोरी टेक्नॉलॉजी सायकल, IoT कनेक्टर अशी स्टँडर्ड वैशिष्ट्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे आधुनिक 3D नियंत्रण तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या CLX 750 मशिनवर भविष्यातील विविध प्रकारचे उत्पादन करणे सहज शक्य आहे. ग्राहकानुरूप विशिष्ट स्वयंचलन उपाययोजना (ऑटोमेशन सोल्युशन) असलेल्या मशिनही या मालिकेत आहेत. 
 
टर्न मिल
 
ज्यावेळी एखाद्या मोठ्या कार्यवस्तूवर यंत्रणाची अनेक कामे करावयाची असतात, तेव्हा कामानुरूप ती कार्यवस्तू वेगवेगळ्या मशिनवर न्यावी लागते. त्यामुळे सेटअप वाढतात आणि अचूकता कमी होते. कार्यवस्तू टर्न मिलवर लावून यंत्रण करताना जास्तीतजास्त कामे एकाच सेटिंगमध्ये होत असल्याने लोडिंग अनलोडिंगचा वेळ वाचतो. दोन सेटअपच्यामधील कार्यवस्तुची हाताळणी वाचते. त्याबरोबरच यंत्रभागाची अचूकताही वाढते. पूर्वी जी कामे टर्निंग, मिलिंग आणि व्ही.एम.सी.वर वेगळी करावी लागत होती, ती या मशिनवर एकत्र करता येतात. 
 
 
 

2_1  H x W: 0 x 
 
 
11_1 H x W: 0  
 

600 किलो वजनापर्यंतच्या कार्यवस्तूचे हेवी ड्युटी यंत्रण करण्यासाठी मशिनची आवश्यक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
 
> 700 मिमी.पर्यंत व्यास आणि 1,290 मिमी.पर्यंत टर्निंग लांबी असलेल्या कार्यवस्तू (पर्यायी Y अक्षासोबत अधिकतम व्यास 640 मिमी. असू शकतो.)
 
46 kW, 2000 Nm मुख्य स्पिंडल (A2-11”)
 
यंत्रभागाचा पोकळ क्लॅम्पिंग व्यास 127 मिमी.
 
12 - वे व्हीडीआय 50 टरेट
 
ऑफ सेंटर यंत्रणासाठी ± 80 मिमी. Y अक्ष (पर्यायी), 430 मिमी. व्यासापर्यंत वैकल्पिक स्टेडी रेस्ट
 
4,000 आर.पी.एम. आणि 360 Nm असलेले पर्यायी सब स्पिंडल ISM76
 
डीएमजी मोरी तंत्रज्ञान आवर्तनांची (टेक्नॉलॉजी सायकल) विस्तृत श्रेणी
 
स्टँडर्ड वैशिष्ट्य असलेला डीएमजी मोरी IoT कनेक्टर
 
19” टच पॅनेलवरील 3D नियंत्रण तंत्रज्ञान (कंट्रोल टेक्नॉलॉजी), वैकल्पिकरित्या सीमेन्स किंवा फानुकसह
 
बेडवरील स्विंग Ø : 950 मिमी.
 
कमाल टर्निंग Ø : 700 मिमी.
 
Z अक्षामध्ये ट्रॅव्हल : 1300 मिमी.
 
बार पॅसेज Ø : 127 मिमी.
 
चकचा नॉमिनल आकार Ø : 400/500 मिमी.
 
टूल इंटरफेस : 12xVDI 50/6 x BT/12 x VDI 40 (V6)
 
इतर महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये 
 
आल्टरनेटिंग वेग 
 
 

4_1  H x W: 0 x 
 
तीन पॅरामीटर असल्याने आणि अतिरिक्त संवेदक (सेन्सर) नसल्यामुळे सुलभ अ‍ॅप्लिकेशन
 
सानुकूलित गतीमुळे (स्पीड अ‍ॅडॅप्शन) कंपन प्रतिबंध
 
मुख्य आणि काउंटर स्पिंडल दोन्हीसाठीचे अ‍ॅप्लिकेशन 
 
परतीचे (रिट्रॅक्शन) आवर्तन 
 
5_1  H x W: 0 x 
 
संबंधित बटण (की) दाबल्यावर X अक्ष आणि Y अक्ष बाह्य यंत्रणासाठी अंतिम पॉझिटिव्ह स्थानापर्यंत जातात.
 
सेटअप करण्यासाठी लागणारी जागा तयार करण्यास अनुकूल, आणीबाणीच्या परिस्थितीत वैकल्पिक म्हणून उपयुक्त.
 
मल्टी थ्रेडिंग 2.0
 
6_1 H x W: 0 x  
  
ऑनपॉइंट थ्रेडिंग
 
कंटूर, पिच आणि गिअर यांची मुक्त रचना (डेफिनिशन) शक्य
 
साध्या थ्रेड चेसिंगद्वारा न करता येणार्‍या मोठ्या ट्रान्स्मिशन अथवा विशेष थ्रेडची निर्मिती शक्य
 
 
काउंटर स्पिंडल TIP 
 
 
7_1  H x W: 0 x
 
>  6 बाजूंचे संपूर्ण यंत्रण आणि टेलस्टॉक कार्याचे परिपूर्ण संयोजन
 
>  टरेटमार्गे काउंटर स्पिंडलच्या चकमध्ये, टेलस्टॉक सेंटर स्वयंचलितपणे लोड आणि अनलोड करता येते.
 
>  समांतर चाल असलेल्या (सिन्क्रोनस) काउंटर स्पिंडल अग्राच्या साहाय्याने मुख्य स्पिंडलवर लांब, पातळ कार्यवस्तुला आधार देता येतो.
 
>  दरवाजा न उघडता स्वयंचलितपणे बदल करता येतो, (उष्णता प्रवाह स्थिर) त्यामुळे यंत्रभागाची अचूकता अधिक असते.
 
> स्पिंडलला अग्रासोबत पोझिशन लॉकिंग केल्यामुळे प्रक्रियेतील सुरक्षितता वाढते.
 
टूलचे सहज संनियंत्रण 2.0
(इझी टूल मॉनिटरिंग) 
 
8_1  H x W: 0 x
 
>  टूल तुटण्यामुळे अथवा ओव्हरलोड झाल्यामुळे होणारे नुकसान टाळणे शक्य
 
>  संवेदकाचा वापर नाही, भाराची मर्यादा स्वयंचलितपणे आकलन केली जाते.
 
>  टर्निंग, मिलिंग आणि ड्रिलिंगसाठी
 
>  पहिल्या कार्यवस्तूनंतर कार्यक्षम संनियंत्रणासाठी शक्तिशाली अल्गोरिदम
 
>  प्रत्येक टूल आणि प्रत्येक यंत्रण कडेसाठी संनियंत्रणाच्या मर्यादा प्रोग्रॅममध्ये संचयित करता येतात.
 
की वे ब्रोचिंग 

9_1  H x W: 0 x 
 
>  खाचेची भूमिती, टूल आणि यंत्रणाची कार्ययोजना (स्ट्रॅटेजी) यांच्यासाठी संरचित इनपुट पॅरामीटर
 
>  कोणत्याही स्थानी आणि कितीही संख्येत अंतर्गत आणि बाह्य खाचा करणे मुक्तपणे समायोज्य (अ‍ॅडजस्टेबल)
 
>  टूल विस्थापनाची सहज भरपाई
 
>  निवडलेल्या यंत्रण कार्य योजनेनुसार रेसिड्युअल स्ट्रोकची गणना
 
Y अक्ष पार्टिंग 
 

11_1  H x W: 0  
 
>  हत्यारधारकाच्या (टूल होल्डर) लाँजिट्युडिनल दिशेत बलाचे इष्टतम (ऑप्टिमम) ट्रान्स्मिशन होत असल्याने उच्च स्थिरता.
 
>  यंत्रभागाला ‘पार्ट ऑफ’ करण्यासाठी एक बटन दाबून टूलचा सरकवेग Y दिशेत करता येतो.
 
>  मानक आवर्तन CYCLE92 (पार्ट ऑफ सायकल) बरोबर सुसंगत, त्यामुळे ऑपरेटर नेहमीप्रमाणे प्रोग्रॅम बनवू शकतो (शॉपटर्न आणि DIN/IS)
 
 
प्रगत नियंत्रक (कंट्रोलर)
 
यंत्रणाच्या कामामधील वाढत्या डिजिटलायझेशनच्या पार्श्वभूमीवर डीएमजी मोरीने CLX 750 फ्यूचर प्रूफ बनविले आहे. यामध्ये सीमेन्स किंवा फानुक कंपनीकडून घेतलेले आधुनिक कंट्रोल तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याशिवाय या मशिनमधील अल्टरनेटिंग रोटेशनल स्पीड, इझी टूल मॉनिटर 2.0 किंवा मल्टी थ्रेडिंग सायकल या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे आवर्तने आणि यंत्रणाचे कार्य सुलभ आणि कार्यक्षम होते. IoT कनेक्टर हा सर्व CLX मशिनच्या स्टँडर्ड उपकरणाचा भाग आहे. याच्यामुळे मशिनचे डिजिटल नेटवर्किंग सक्षम केले जाते. एकात्मिक फायरवॉलच्या साहाय्याने जास्तीतजास्त शक्य असेल तितके संरक्षण प्रदान करते आणि सर्व्हिस कॅमेरा आणि नेट सर्व्हिससह अग्रणी सेवा उपाययोजना (सर्व्हिस सोल्युशन) सक्षम करते.
 
 11_1 H x W: 0
 
12_1 H x W: 0  
 
भविष्यातील उत्पादननिर्मिती आणि स्वयंचलित उत्पादन एकत्रितपणे पुढे जात असून हा कल डीएमजी मोरीने नेहमीच ध्यानात ठेवला आहे. अशा प्रकारे, CLX 750 ची उत्पादनक्षमता सानुकूलित स्वयंचलन उपाययोजना (कस्टमाइज्ड् ऑटोमेशन सोल्युशन) वापरून दीर्घकाळपर्यंत सुधारली जाऊ शकते.
 
 
 

ravindra kruhnamutri_1&nb 
रविंद्र कृष्णमुर्ती
(उत्पाद विक्री व्यवस्थापक, टर्निंग अँड अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, डीएमजी मोरी इंडिया) 
80 40896525
 
रविंद्र कृष्णमुर्ती हे डीएमजी मोरी इंडिया कंपनीमध्ये टर्निंग अँड अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे उत्पाद विक्री व्यवस्थापक म्हणून काम पहात आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@