डायरेक्ट ड्राइव्ह रोटरी टेबल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    03-May-2019   
Total Views |

Direct drive rotary table
 
 
युकॅम कंपनी अनेक वर्षांपासून सी.एन.सी. रोटरी टेबल अंतर्भूत असलेल्या मशिन बेडचे उत्पादन करीत आहे. या रोटरी टेबलचा ड्राइव्ह यांत्रिकी (मेकॅनिकल) होता आणि अक्षाला सर्व्हो मोटरद्वारा शक्ती पुरविली जात होती.
 
युकॅमच्या दोन विभागांनी म्हणजे रोटरी टेबल विभाग आणि निम्बल इलेक्ट्रिक विभाग यांनी एकत्र काम करून एका डायरेक्ट ड्राइव्ह रोटरी टेबलची निर्मिती केली आहे. हे टेबल वापरून 600 मिमी. इतक्या मोठ्या व्यासापर्यंतच्या प्रिझ्मॅटिक कार्यवस्तूंचे अपेक्षित गतीने टर्निंग करता येते आणि अतिशय कमी आर.पी.एम.ने मिलिंग होऊ शकते. त्याव्यतिरिक्त अवजड आणि स्थिर मिलिंगच्या कामासाठी एक नवीन आणि सुधारित शक्तिशाली अक्षीय क्लॅम्पसुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
 
टेबलच्या डिझाइनमधील वैशिष्ट्ये
 
डायरेक्ट ड्राइव्ह रोटरी टेबलमध्ये फायनाइट एलिमेंट ॲनालिसिस (FEA) परिणामकारकपणे वापरून केलेल्या इष्टतमीकरणामुळे (ऑप्टिमाइज) उच्च दर्जाचा कडकपणा, आटोपशीर आकार मिळविला आहे. उच्च गती आणि दृढपणासाठी गरजेची क्रॉस्ड रोलर टेपर रोलर बेअरिंग वापरली आहेत. निम्बल इलेक्ट्रिकच्या संशोधन आणि विकास कार्यगटाने दुर्मिळ खनिजे वापरलेली चुंबके, उच्च कार्यक्षमतेसाठी स्टॅम्पिंग स्टील, व्हॅक्युम इम्प्रिग्नेशन आणि एन्कॅप्सुलेशन यांचा वापर करून मोटरचे डिझाइन केले आहे. या मोटरचे डिझाइन करताना स्पीड आणि फ्लक्स यांसारखी सॉफ्टवेअर वापरून त्याला इष्टतम केलेले आहे. यामुळे उच्च दर्जाची कामगिरी मिळण्यास मदत होते आणि यंत्रणाच्या गरजेला साजेशी टॉर्क स्पीडच्या आलेखातील कर्व्ह साध्य होते. (आलेख क्र. 1) त्याशिवाय त्यातील पोलची संख्या अधिक असल्यामुळे ती सर्व्हो मोटरप्रमाणे अचूकपणे हवे ते स्थान निश्चितपणे घेऊ शकते. यामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे कमी वेगावर टॉर्क अधिक असतो आणि वेग वाढतो तसा टॉर्क कमी होतो.
 
Torque speed curve
 
या रोटरी टेबलवरील क्लॅम्पिंगची व्यवस्था अतिशय मजबूत आहे. आम्ही दुहेरी कार्य करणारी, डिस्क प्रकारची क्लॅम्पिंग प्रणाली वापरली आहे. त्यामुळे क्लॅम्प/डीक्लॅम्पसाठी जलद प्रतिसाद मिळतो. पृष्ठभागावर केलेल्या विशेष उपचारामुळे घर्षणाचा गुणांक (कोईफिशंट ऑफ फ्रिक्शन) वाढविला आहे, ज्यामुळे क्लॅम्पिंगची दृढता वाढते. क्लॅम्पिंग टॉर्कची उच्चतम कार्यक्षमता मिळण्यासाठी डिस्कवर एका विशेष प्रोफाइलचा वापर केला आहे. या प्रोफाइलचे इष्टतमीकरण फायनाइट एलिमेंट मेथड (FEM) ॲनालिसिस सॉफ्टवेअर वापरून केले आहे.
 
उच्च परीघीय वेग सहन करण्यासाठी एक विशेष प्रकारचे सीलिंग मटेरियल वापरले आहे. या सीलमुळे टॉर्क मोटरचे शीतकाच्या फवाऱ्यापासून संरक्षण होते आणि बाहेरचा कचरा आतमध्ये शिरू शकत नाही. टॉर्क मोटर अखंडपणे थंड करण्यासाठी तिला चिलरसोबत जोडण्याची तरतूद केलेली आहे आणि यामुळे मोटरचा सर्वोच्च टॉर्क वापरण्यात काही अडचण राहत नाही.
 
टर्नटेबलच्या शाफ्टवर जोडलेल्या डायरेक्ट मेजरिंग एन्कोडरद्वारा अचूकता मोजली जाते.
 
Direct drive rotary table
 
डायरेक्ट ड्राइव्ह मिल टर्न रोटरी टेबलला मशिन बेडच्या आतमध्ये ठेवलेले असल्याने (चित्र क्र. 1) रोटरी टेबल, मशिन बेडवरील कामाची जागा व्यापत नाही आणि त्यामुळे Z अक्षातील स्ट्रोक कमी होण्याची समस्या येत नाही. 3 किंवा 4 अक्षांमध्ये यंत्रण करावयाचे लांब यंत्रभाग मशिन बेडवर ठेवताना टॉर्क मोटर रोटरी टेबलची काहीही अडचण येत नाही.
 
मुख्य वैशिष्ट्ये
 
सर्वोच्च टॉर्क : 1300 Nm
 
टॉर्कमधील सातत्य (पाण्याने थंड केलेला) : 770 Nm @ 100 आर.पी.एम.
 
रोटर वेग : 600 आर.पी.एम.
 
इंडेक्सिंगची अचूकता : +/- 5”
 
एकाच रोटरी टेबलमध्ये उच्च वेगाने टर्निंग आणि मिलिंगची कामे
 
अतिशय उच्च रिझोल्युशनचा एन्कोडर वापरत असल्यामुळे स्थाननिश्चितीच्या बाबतीत अत्यंत अचूक
 
आयात केलेल्या परदेशी मशिनमध्ये अशा प्रकारचे टेबल दिले जाते, परंतु भारतीय कंपनीकडून निर्यात करण्यासाठी आवश्यक
असलेल्या अचूक टॉर्क आणि गतीचे गुणोत्तर, टिल्टिंग कोन याबाबतीत आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करेल अशा टेबलची ऑफर दिली जात नाही.
 
आव्हाने
 
अधिक टॉर्क आणि वेग मिळविणे.
 
उच्च वेग असताना सीलिंग टिकविणे.
 
उच्च वेगासाठी रोटरी युनियन डिझाइन करणे.
 
बेअरिंगची निवड.
 
300 आर.पी.एम.पर्यंत टॉर्कमध्ये सातत्य राखणे आणि अधिकतम वेग 600 आर.पी.एम. मिळविणे.
 
चिलरच्या विद्युत वापरामध्ये घट.
 
मोटरचा आकार : बाहेरचे माप < 485 मिमी.
 
मिलिंगसाठी टिल्टिंग हेड लॉकिंग सिस्टिमबरोबरच आमची स्वतःची टॉर्क मोटर, सिलिंग व्यवस्था, बेअरिंगची निवड करताना आलेली आव्हाने यशस्वीपणे पेलली.
 
 
ग्राहकाला मिळणारे फायदे
 
लवचीक आणि कार्यक्षम वापर.
 
खर्चात बचत : टर्निंग आणि मिलिंगच्या कामांसाठी वेगवेगळ्या
 
मशिनमध्ये गुंतवणूक करावयाची आवश्यकता नाही.
 
जागेची बचत : मशिन शॉपमध्ये एकच टर्निंग सेंटर वापरून सर्व काम करू शकल्यामुळे आम्ही जवळपास 40 % जागा कमी करण्यात यशस्वी झालो.
 
आवर्तन काळ आणि लीड टाइम कमी : ग्राहक टर्निंग आणि मिलिंगचे काम एकाच मशिनवर करू शकतो. त्यामुळे प्रति यंत्रभाग आवर्तन काळ कमी होतो.
 
वाढलेली उत्पादकता आणि लाभ : दिलेल्या वेळेत अधिक यंत्रभागांची निर्मिती होऊ शकते. ज्यामुळे उत्पादकता आणि लाभदायकता यांच्यात वाढ होते.
 
टर्बाइन ब्लेड, प्रिझ्मॅटिक यंत्रभाग, डाय मोल्डचे भाग, (चित्र क्र. 2,3,4) एअरोस्पेसमध्ये लागणारे भाग, व्हॉल्व्ह हाउसिंग इत्यादी क्लिष्ट भूमिती असलेल्या भागांचे सुलभ यंत्रण.
 
Parts of die mold
 
Prismatic machinery
 
Turbine blades
 
युकॅमला विेशास आहे की, डायरेक्ट ड्राइव्ह रोटरी टेबल आणि टिल्टिंग हेड यांचा वापर करून बनविलेल्या मिल टर्न ॲप्लिकेशनसाठी अशा 5 अक्षीय मशिनची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असेल.
 
 
9886024565 
विजय झरीटाकळीकर यांत्रिकी अभियंता असून, त्यांना विविध कंपन्यांचा सेवा विभागातील 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या रोटरी टेबल निर्मितीमधील अग्रगण्य असलेल्या ‘युकॅम प्रा. लि.’ कंपनीमध्ये ते नॅशनल सेल्स हेड या पदावर कार्यरत आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@