‘मझाक’ चे बहुअक्षीय मिलिंग मशिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prkashan Marathi    01-Jan-2020   
Total Views |

1_1  H x W: 0 x 
 
 
निओसिम कंपनी सी. के. बिर्ला ग्रुपमधील वाहन उद्योगासाठी लागणार्‍या अवजड यंत्रभागांच्या निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी आहे. पुण्याशेजारील तळेगाव ढमढेरे येथे त्यांची एक फाउंड्री आणि वेगळे मशिन शॉप आहे. ट्रक, बस, ट्रॅक्टर तसेच लहान अर्थमूव्हिंग इक्विपमेंटसाठी लागणारे गिअर बॉक्स, डिफरन्शिअल हाउसिंग अशा अवजड यंत्रभागांचे कास्टिंग त्यांच्या फाउंड्रीमध्ये केले जाते. यातील बहुसंख्य यंत्रभाग फिनिश यंत्रण करून ते ग्राहकाला पुरवितात.
 
चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेले डिफरन्शिअल हाउसिंग एस.जी. आयर्नमध्ये कास्ट केलेले असून त्याचे वजन अंदाजे 60 किलो आहे.
 

2_1  H x W: 0 x 
 
इंजिनमधून येणारी ऊर्जा (पॉवर) अ‍ॅक्सलपर्यंत पोहोचविण्याच्या यंत्रणेमधील हा एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे याचे यंत्रण अतिशय गुंतागुंतीचे असते. यातील बहुसंख्य मापे हाउसिंगच्या समोरील फेसशी संबंधित असतात. त्यामुळे या हाउसिंगच्या समोरील फेसचे कास्टिंगपासून फिनिश यंत्रभागापर्यंत होणारे मिलिंग अतिशय महत्त्वाचे आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी वाहन उद्योगातील एका प्रसिद्ध कंपनीची डिफरन्शिअल हाउसिंग बनविण्यासाठीची ऑर्डर त्यांना मिळाली. त्यांच्याकडे असलेल्या इतर बर्‍याच मशिनिंग सेंटरवर या यंत्रणाच्या त्यांनी विविध चाचण्या केल्या, परंतु उत्पादकता आणि गुणवत्ता या दोन्ही महत्त्वाच्या बाबींमध्ये खूप अडचणी येत होत्या. या दरम्यान त्यांच्याकडे मझाक कंपनीचे नेक्सस 6800 हे हॉरिझाँटल मशिनिंग सेंटर आम्ही बसविले होते. या मशिनच्या स्पिंडलची शक्ती जास्त असल्यामुळे त्यांनी डिफरन्शिअल हाउसिंगचे यंत्रण या मशिनवर करण्याचे ठरविले. या मशिनमध्ये नॉर्मल, हाय स्पीड आणि हाय टॉर्क असे तीन प्रकारचे स्पिंडल मिळतात. (अधिक माहितीसाठी तक्ता क्र. 1 पहा.) त्यांच्याकडे हाय टॉर्क स्पिंडल आहे. यामुळे फेस बटिंग करून, हेवी यंत्रण (कटिंग) पॅरामीटर ठेवून जलद वेगाने यंत्रण करता येते. यात जास्तीतजास्त 300 मिमी. व्यासाचे मिलिंग कटर वापरताना प्रक्रियेच्या आवश्यकतेनुसार किंवा टूलिंग निर्मात्याने सुचविल्याप्रमाणे यंत्रण पॅरामीटर वापरता येतात. मशिनच्या इतर महत्त्वाच्या क्षमता तक्ता क्र. 2 मध्ये दिल्या आहेत. 
 

T1_1  H x W: 0  
 
या अवजड यंत्रभागाच्या समोरील फेसचे मिलिंग करताना काही अडचणी आल्या. कास्टिंगमधून एवढ्या मोठ्या भागाचे (पार्ट) अंदाजे 400 X 400 मिमी.आकाराचे मिलिंग करताना जास्तीतजास्त दोन कापामध्ये यंत्रण संपविणे उत्पादकतेच्या दृष्टीने आवश्यक होते, कारण कटरचा कमाल व्यास 300 मिमी. आहे. मझाकच्या स्पिंडलची शक्ती 37 kw (50hp) आहे. यामुळे पहिल्या रफ कापाची खोली (डेप्थ ऑफ कट) 7 ते 8 मिमी. ठेवून 800 आर.पी.एम. आणि 1300 मिमी./मिनिट सरकवेगाने यंत्रण करता आले. मझाकच्या एच.एम.सी.चे मूळ वजनच खूप जास्त आहे. त्यामुळे मोठ्या भागांचे यंत्रण करताना कंपने आणि आवाजही येत नाही. पहिल्या कापामध्ये जास्तीतजास्त अतिरिक्त मटेरियल काढून टाकता येत असल्यामुळे फिनिश कट अंदाजे 0.5 मिमी. खोलीचा घेता येतो. या यंत्रणेमुळे महत्त्वाच्या फेसचा पृष्ठीय फिनिश आणि इतर महत्त्वाची मोजमापे योग्य राखता येतात. Ra मूल्य, Rz मूल्य आणि Rmz मूल्य इत्यादी घटकांच्या आवश्यकतेनुसार पृष्ठीय फिनिश राखता येतो.
 

T2_1  H x W: 0  
 
या मशिनमध्ये जास्तीतजास्त X अक्ष प्रवास (कॉलमच्या उजवीकडे आणि डावीकडे) 1050 मिमी., Y अक्ष प्रवास (स्पिंडल वर आणि खाली) 900 मिमी. Z अक्ष प्रवास (टेबल मागे आणि पुढे) 980 मिमी. उपलब्ध असल्यामुळे यंत्रभाग आणि मिलिंग कटर समोरासमोर लवकरात लवकर आणण्याच्या दृष्टीने अक्षीय हालचाली अतिशय कमी वेळात करता येतात. प्रोग्रॅममध्ये 3 किंवा 4 अक्षामध्ये यंत्रण करण्याची क्षमता उपलब्ध आहे. यामुळे प्रत्यक्ष यंत्रण सोडून इतर हालचालींचा वेळ (नॉन कटिंग टाइम) बराच कमी करता येतो. या डिफरन्शिअल हाउसिंगचा एकूण सर्व यंत्रणाचा वेळ सुरुवातीस सुमारे 42 मिनिटे होता. प्रोग्रॅम आणि टूलिंगमध्ये मल्टिपल कटर वापरणे, एकाचवेळी खाच आणि व्यासाचे यंत्रण करणे यासारख्या विविध सुधारणांनंतर हा वेळ 37 मिनिटांपर्यंत कमी करता आला. 
 
मझाकच्या सर्व मशिनमध्ये हेवी यंत्रण होताना वेगाने निघणार्‍या चिप सहज बाहेर काढल्या जातात. यंत्रणाच्या आणि मशिनच्या दीर्घ वापरासाठी हे उपयुक्त आहे. या मशिनच्या टूल मॅगझिनमध्ये एकूण 60 टूल ठेवण्याची व्यवस्था आहे. सध्याच्या प्रोग्रॅममध्ये अंदाजे 40 टूल लागतात. यामुळे, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन टूल तयार करताना काही मोठ्या व्यासाची टूल वापरता आली, ज्यासाठी टूल मॅगझिनमध्ये शेजारचा कप्पा मोकळा ठेवता आला. या मशिनची शक्ती अधिक असल्यामुळे मिलिंग, बोअरिंगसारखी कामे करताना मोठ्या आकाराचे टूल वापरून उत्पादन वाढविणे सहज शक्य होते.
 

3_1  H x W: 0 x 
 
या मशिनिंग सेंटरबरोबर एक पॅलेट चेंजरदेखील उपलब्ध आहे. यामुळे एका यंत्रभागाचे यंत्रण करताना ऑपरेटरला उपलब्ध असलेला वेळ वापरून दुसर्‍या पॅलेटमध्ये समान फिक्श्चरमध्ये दुसरा यंत्रभाग बसविता येतो. प्रोग्रॅममध्ये पॅलेट बदलण्याचा वेळ कमीतकमी ठेवता येण्याची सोय आहे. त्यामुळे एकूण उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ होते. मझाक मशिनचे रोलर गाइड अतिशय अचूक आणि भक्कम यंत्रणेची बनलेली असल्यामुळे दीर्घकालीन वापरामध्ये अचूक यंत्रण आणि दृढता टिकून राहते. अवजड आकाराच्या यंत्रभागांचे मिलिंग करण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे.
 
आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की, या ग्राहकाला त्यांच्या ग्राहक कंपनीच्या सर्व आंतरराष्ट्रीय प्लांटमध्ये हे यंत्रभाग पुरविण्याचे संपूर्ण कंत्राट मिळाले आहे. या मशिनवर आता जरी ते एस.जी. आयर्नमध्ये कास्ट केलेले यंत्रभाग करीत असले, तरी मशिनची क्षमता बघता भविष्यकाळात इन्कोनेल, टूल स्टीलमध्ये बनविलेले कठीण यंत्रभागदेखील यंत्रणाची उत्तम गुणवत्ता आणि उत्पादकता राखून करू शकतील. यामुळे कंपनीच्या भरभराटीत या मशिनचा मोठा वाटा असेल यात शंका नाही. 
 
 

Raosaheb Bhole_1 &nb 
रावसाहेब भोळे
वरिष्ठ व्यवस्थापक, अ‍ॅप्लिकेशन विभाग, यामाझाकी मझाक इंडिया प्रा. लि. 
9970002048
 
रावसाहेब भोळे यामाझाकी मझाक इंडिया प्रा. लि. कंपनीच्या अ‍ॅप्लिकेशन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. त्यांना इंजिनचे भाग आणि हेवी इंडस्ट्रीमधील यंत्रण क्षेत्रासाठीचे प्रकल्प डिझाइन आणि निर्मितीचा 17 वर्षांचा अनुभव आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@