‘टंगालॉय’चा नवीन 88° मिलिंग कटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prkashan Marathi    31-Jan-2020   
Total Views |
 
 
‘टंगालॉय’ कंपनी यंत्रणासाठी उपयुक्त अशी वैविध्यपूर्ण टूल बनविण्यामध्ये अग्रेसर आहे. ग्राहकाभिमुख धोरणामुळे आमच्याकडे निरनिराळ्या प्रक्रियांमधील अडचणी शोधून त्यावर विशेष टूल बनविण्याचे काम चालू असते. कोल्हापूर येथील एका उद्योगसमूहाने आम्हाला एका मिलिंग कटरसंबंधी विचारणा केली. सिलिंडर ब्लॉकचा बेअरिंग कॅप फेस आणि पॅन फेसवर (चित्र क्र. 1) मिलिंग करताना त्यांना काही अडचणी येत होत्या. त्यामध्ये फिनिश योग्य मिळत नव्हता, टूल आयुर्मान कमी होते आणि एकूण खर्च कमी करावा असे त्यांना वाटत होते. 
 
मिलिंग करताना विशेषतः रफिंग ऑपरेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘टंगालॉय’ने नवीन 88° मिलिंग कटर (चित्र क्र. 2) विकसित केला आहे. साधारण कटरपेक्षा याचा साइड क्लिअरन्स जास्त असल्याने कार्यवस्तुची साइड वॉल, फिक्श्चर किंवा क्लॅम्पिंग यंत्रणेशी हा कटर (चित्र क्र. 3) धडकत नाही.
 

1_1  H x W: 0 x 
 
या कटरमध्ये 8 कडा वापरता येणारे इन्सर्ट बसविलेले आहेत. टूलच्या वापराचे नियोजन करून आणि टूलची झीज कशी होत आहे, यावर लक्ष ठेवून ठराविक काळाने इन्सर्ट फिरविता येतात किंवा बदलता येतात. यामुळे इन्सर्टचा पूर्ण वापर करता येतो आणि टूलचा खर्च कमी होतो. 
 
इन्सर्टच्या विशिष्ट स्थानामुळे (पोझिशन) जास्त मोठा रेक अँगल मिळतो. त्यामुळे यंत्रण करताना टूलवर येणारे बल कमी होते आणि मोठ्या प्रवेश कोनामुळे यंत्रभाग वर उचलला जात नाही, तसेच यंत्रण सहज होते.
 
 
यंत्रभागाच्या पृष्ठभागाच्या कडेला मिलिंग करताना योग्य इन्सर्ट वापरून शेवटपर्यंत मिलिंग करता येते. यासाठी वेगवेगळे इन्सर्ट उपलब्ध आहेत. 0.8 मिमी. त्रिज्या असलेल्या इन्सर्टने कडेला 1.3 मिमी.पर्यंत अंतर राखून रफ मिलिंग करता येते. 
कटरमध्ये इन्सर्ट योग्य पद्धतीने घट्ट बसावा यासाठी अचूक यंत्रण करून सीटला तीन बाजूंनी आधार (सपोर्ट) दिलेला आहे आणि तो M4 स्क्रूने घट्ट पकडता येतो. यंत्रणानंतर अधिक चांगला पृष्ठीय फिनिश आवश्यक असेल तर वायपर इन्सर्टची सोय आहे. 
 

2_1  H x W: 0 x 
 
इन्सर्टच्या विशिष्ट स्थानामुळे (पोझिशन) जास्त मोठा रेक अँगल मिळतो. त्यामुळे यंत्रण करताना टूलवर येणारे बल कमी होते आणि मोठ्या प्रवेश कोनामुळे यंत्रभाग वर उचलला जात नाही, तसेच यंत्रण सहज होते. 
इन्सर्टची कर्तन कडा अंतर्वक्र बनविलेली असल्याने चिप सहज बाहेर येते आणि सेमीफिनिश आणि फिनिश असे दोन कट घेण्याची गरज पडत नाही.
 

3_1  H x W: 0 x 
 

5_1  H x W: 0 x 
 
कास्ट आयर्न, स्टील आणि स्टेनलेस स्टील अशा विविध यंत्रभागांचे मिलिंग सहज करण्यासाठी चार वेगवेगळ्या ग्रेडचे इन्सर्ट वापरता येतात. या इन्सर्टवर आमचे विशिष्ट ‘प्रीमियम टेक’ आवरण आहे. त्यामुळे यंत्रणामधील टेन्साईल स्ट्रेस नियंत्रित केला जातो आणि इन्सर्टचे बारीक तुकडे पडणे, कडांवर मटेरियल साठणे, तडे जाणे असे प्रकार घडत नाहीत. टूलचे आयुर्मान सुमारे 30 टक्क्यांनी वाढते. 
 
लेखाच्या सुरुवातीस उल्लेख केलेल्या उद्योगसमूहाला आम्ही प्रक्रियेत काही बदल सुचविले. ब्लॉकची बाजू थोडी पातळ असल्याने खूप मजबूत फिक्श्चर लावता येत नाही, अशा परिस्थितीत आमचा नवीन 88° (चित्र क्र. 4) मिलिंग कटर चांगले काम करू शकतो. 
 

4_1  H x W: 0 x 
 

chart_1  H x W: 
 
मिलिंग करताना सर्वसाधारण शोल्डर मिल कटर वापरल्यास कडांचे तुकडे पडत होते. नवीन 88° मिलिंग कटर वापरल्यावर एकाच टूलद्वारे 30 च्या जागी 80 यंत्रभागांचे यंत्रण होऊ लागले. 
 
मिलिंग कटर आणि इन्सर्टचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. याची माहिती आमच्या कॅटलॉगमध्ये दिली आहे. यंत्रणासाठी काही मार्गदर्शक बाबी दिलेल्या आहेत, तसेच फेस मिलिंग करताना बाजूने काही कडा राहू नयेत यासाठी टूल ऑफसेट आणि इन्सर्टची निवड कशी करावी याचे विश्लेषण यामध्ये आहे.
 
 

jay shah_1  H x 
जय शाह 
9960102221
 
जय शाह टंगालॉय इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना या क्षेत्रातील सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@