इंडेक्सिंगच्या विविध रचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    22-May-2020
Total Views |
 
‘धातुकाम’ ऑगस्ट 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात इंडेक्सिंग प्रकारचे ड्रिल जिग कसे कार्य करते ते आपण पाहिले. अशा प्रकारच्या जिगची वैशिष्टये पुढे दिली आहेत.
 
1. कार्यवस्तूवर करावयाची सर्व भोके एकाच सेटिंगमध्ये (वस्तुची काढघाल न करता) केल्यामुळे भोकांमधील परस्परसंबंध
अचूक मिळतो.
2. जो परस्परसंबंध कार्यवस्तूवरील भोकांचा असतो, तोच परस्परसंबंध इंडेक्स प्लेटवरील भोकांमध्ये ठेवणे गरजेचे असते. अशा प्रकारची जिग बऱ्याच मोठ्या प्रमाणात असलेल्या उत्पादनावेळी वापरली जातात. तसेच अशा प्रकारच्या जिगचा वापर मोठ्या आकाराच्या कार्यवस्तुंसाठीसुद्धा केला जातो. उदाहरणार्थ, क्लच हाउसिंग, डिफरन्शिअल हाउसिंग, फ्लाय व्हील इत्यादी.

1_2  H x W: 0 x 
 
जर कार्यवस्तू फार मोठी आणि जड असेल, तर मात्र स्वयंचलनाचा उपयोग करणे गरजेचे आहे. फिक्श्चरचे इंडेक्सिंग आणि इंडेक्स पिनची हालचाल यासाठी स्वयंचलनाचा वापर केला जातो. अशा फिक्श्चरमध्ये हालचालींचा अनुक्रम ठरविणे अतिशय महत्त्वाचे असते.
 
सर्वसाधारणपणे इंडेक्स पिन आणि त्यासाठी लागणारे भाग जिगच्या अचल (फिक्स) भागावर बसविलेले असतात. ही पिन हालचाल करणाऱ्या इंडेक्स प्लेटवर केलेल्या भोकात अथवा खाचेत जाऊन बसते.
 
इंडेक्सिंगचे वेगवेगळे प्रकार आणि रचना
मागील अंकात आपण जे इंडेक्सिंग फिक्श्चर बघितले त्याची संकल्पना चित्र क्र. 1 मध्ये दाखविली आहे.

1_3  H x W: 0 x 
 
स्प्रिंग भारित इंडेक्स पिन
चित्र क्र. 1 मध्ये इंडेक्स पिन हाताने मागे ओढली जाते. त्यानंतर इंडेक्स प्लेट फिरविली जाते. इंडेक्स प्लेट थोडी जरी फिरविली आणि इंडेक्स पिन सोडून दिली तर पिनचा पुढचा भाग प्लेटच्या मागील पृष्ठभागावर टेकलेला असतो. त्यामुळे कर्मचाऱ्याला पिन मागे ओढून धरावी लागत नाही. इंडेक्स प्लेट फिरविल्यामुळे जेव्हा दुसरे भोक इंडेक्स पिनच्या बरोबर समोर येते तेव्हा पिन स्प्रिंगच्या बलामुळे आपोआप इंडेक्स प्लेटवरील भोकात शिरते. इंडेक्स पिनला आणि बुशला दिलेल्या चॅम्फरचासुध्दा उपयोग होतो. अर्थात पिन इंडेक्स प्लेटवरील भोकात जाण्यासाठी कर्मचाऱ्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. हे केवळ स्प्रिंग वापरल्यामुळे साध्य होते.
 
सरकती इंडेक्स पिन

1_1  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 2 मध्ये दाखविलेल्या आरेखनात स्प्रिंगचा वापर केलेला नाही. त्यामुळे जेव्हा पिन इंडेक्स प्लेटवर असलेल्या भोकात बसवायची असते तेव्हा मात्र कर्मचाऱ्याला विशेष काळजी घ्यावी लागते. इंडेक्स पिनचा डायमंडचा आकार असलेला भाग ठराविक स्थितीत रहावा म्हणून पिनवर विशिष्ट खाच दिलेली असते. या खाचेमध्ये बसेल असा विशिष्ट डॉग पॉइंट स्क्रू बसविलेला असतो.
 
बॉल टाइप इंडेक्सिंग

6_1  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 3 मध्ये दाखविलेल्या चित्रात स्प्रिंगच्या बलामुळे कार्यरत असलेला बॉल दाखविलेला आहे. इंडेक्स प्लेटवर त्रिकोणी आकाराचे खड्डे (कोनिकल डिम्पल) बनविलेले आहेत. इंडेक्स प्लेट फिरविल्यानंतर बॉल दाबला जातो. प्लेटवरील दुसऱ्या खड्ड्यासमोर बॉल आल्यानंतर तो पुन्हा खड्ड्यात बसतो आणि इंडेक्सिंग कृती पूर्ण होते. बॉल निघून येऊ नये म्हणून यासाठी रिटेनिंग प्लेट बसविलेली असते. ज्याप्रमाणे चारचाकी गाडीचे गिअर बदलताना अनुभव येतो तशाच प्रकारचा अनुभव अशा प्रकारच्या इंडेक्सिंगमध्ये येतो. अशा प्रकारचे इंडेक्सिंग छोट्या कार्यवस्तुसाठी वापरले जाते. यंत्रणाचे बल जास्त आल्यास बॉल खाली दाबला जातो. यामुळे यंत्रण हवे तसे होत नाही. ही पद्धत कमी खर्चिक तसेच बनविण्यास आणि वापरण्यास सोपी असते.
 
रॅक आणि पिनियन टाइप इंडेक्सिंग
चित्र क्र. 4 अ मध्ये दाखविल्याप्रमाणे पिनियनमुळे रॅक (पिन) वर खाली होते. आडव्या किंवा उभ्या पातळीत इंडेक्स प्लेट असली तरी अशा दोन्ही परिस्थितीत या प्रकारच्या इंडेक्सिंगचा वापर करता येतो. याचा वापर विशेषतः मोठ्या कार्यवस्तुंसाठी केला जातो. दांडी (लीव्हर) वर खाली करून पिन वर खाली होते. 

6_3  H x W: 0 x 
 
बऱ्याच वेळेस पिन स्वयंचलनाने वर खाली केली जाते. रॅक आणि पिनियन हे दोन्ही भाग केस हार्ड आणि ग्राइंडिंग करावे लागत असल्याने ते खर्चिक होतात. परंतु, जेव्हा इंडेक्सिंग पिनची जागा अडचणीच्या ठिकाणी असते, तेव्हा या प्रकारचे डिझाइन वापरावे लागते. जास्त लांबीच्या दांडीमुळे रॅक सहजपणे कार्यान्वित होतो. रॅक, पिनियन आणि बुश हे कठीण करावेत.


6_2  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 4 ब मध्ये दाखविल्याप्रमाणे जर बुश बसविले तर रॅक वर येताना बुश वर ढकलले जाऊन निघू शकते. म्हणून अशाप्रकारे बुश बसवू नये.

9_3  H x W: 0 x 
 
 
चित्र क्र. 4 क मध्ये रॅकचा वरचा भाग निमुळता केलेला आहे, तसेच कॉलर बुशसुद्धा निमुळते केलेले आहे. अशा प्रकारचे टेपर देण्यामागचे कारण म्हणजे सरळ दंडगोल आकाराच्या पिनचा सतत वापर केल्यामुळे तिची झीज होते आणि त्यामुळे संपूर्ण रॅकच बदलावा लागतो. रॅक बदलणे खर्चिक आणि बनविण्यासाठी वेळखाऊ असतो. टेपर रॅक दिल्याने जसा पिनचा किंवा बुशचा व्यास लहान मोठा होतो तशी पिन पुढे पुढे जाते. त्यामुळे पिन आणि बुशचे आयुर्मान वाढते.
 
इंडेक्सिंग प्लेटमध्ये बसविलेल्या इंडेक्सिंग पिन
 
9_1  H x W: 0 x
 
चित्र क्र. 5 अ मध्ये इंडेक्स पिन, इंडेक्सिंग प्लेटमध्ये म्हणजेच हालचाल करणाऱ्या प्लेटमध्ये बसविलेली आहे. आतापर्यंत इंडेक्स पिन फिक्स प्लेटमध्ये बसविलेली होती. इंडेक्स प्लेटवर एकच भोक असते आणि फिक्स प्लेटवर कार्यवस्तूवर जेवढी भोके असतात तेवढी भोके करावी लागतात. चित्र क्र. 5 ब मध्ये टेपर पिन दाखविली आहे.
 
आतापर्यंत आपण इंडेक्स प्लेटला लंबरूप स्थितीत म्हणजेच खालून किंवा मागून बसविलेल्या इंडेक्स पिन बघितल्या आहेत. इंडेक्स प्लेटच्या केंद्राच्या दिशेने मागे पुढे होणाऱ्या इंडेक्स पिनची माहिती पुढे दिली आहे.
 
केंद्राच्या दिशेने मागे पुढे होणारी इंडेक्स पिन

9_2  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 6 अ मध्ये दाखविल्याप्रमाणे इंडेक्स पिनचा पुढचा भाग समांतर खाचेमध्ये लोकेट होतो. ही खाच कालांतराने झिजून मोठी होते. त्यामुळे ती पिन बदलावी लागते. यासाठी वर दिलेला उपाय करता येईल. पिनचा पुढचा भाग निमुळता केला तर ही पिन आपल्याला दीर्घकाळ वापरता येऊ शकते. पिनची किंवा टेपर स्लॉटची झीज झाली तरी पिन पुढे पुढे जाते आणि इंडेक्सिंग अचूक होते. (चित्र क्र. 6 ब)
 
ajit_1  H x W:
 
आता आपण एक अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी रॅचेट टाइप इंडेक्सिंगची व्यवस्था पाहू. चित्र क्र. 7 मध्ये आपल्याला असे दिसेल की, इंडेक्सिंग फक्त एकाच दिशेने होत आहे. ते उलट्या दिशेने फिरणार नाही. चित्र क्र. 7 मध्ये स्प्रिंगच्या बलावर काम करणारी इंडेक्सिंग पिन (प्लंजर) दिसत आहे. इंडेक्स प्लेटवर विशिष्ट खाचा केलेल्या आहेत. या खाचेचा एक भाग सरळ लंबरूप आहे, तर दुसरा पृष्ठभाग टेपर आहे.
 
ajit_2  H x W:
 
1. टेपरमुळे कार्यवस्तू फक्त एकाच दिशेने म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरू शकते. चित्रात फिरणारी दिशा दर्शविली आहे.
2. जसजसा प्लंजर झिजत जातो तसतसा तो पुढे सरकत जातो आणि त्यामुळे त्याच्या झिजण्याचा विपरीत परिणाम इंडेक्सिंगच्या अचूकतेवर होत नाही.
अर्थातच ज्या ठिकाणी यंत्रणाचे बल कमी आहे, अशा ठिकाणी ही व्यवस्था वापरण्यास काहीच हरकत नाही. यामध्ये कर्मचाऱ्याला फक्त कार्यवस्तू किंवा इंडेक्स प्लेट फिरविणे एवढेच काम करावे लागते. यामध्ये देखभालीचा खर्च नगण्य असून दृष्यमानता चांगली आहे. कार्यवस्तूवर असलेल्या भोकांइतक्या खाचा इंडेक्स प्लेटवर कराव्या लागतात. अशा अनेक प्रकारच्या इंडेक्सिंगसाठी लागणाऱ्या व्यवस्था आपल्याला वापरात आणता येतील.
 
 
 
<="" div="" style="float: left; margin: -25px 20px 20px 0px;">
ajit_3  H x W:  
अजित देशपांडे
अतिथी प्राध्यापक, ARAI, SAE
0 9011018388
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्समधील जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@