टूलचे मापन आणि तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    22-May-2020
Total Views |
 
सी.एन.सी. मशिनवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक यंत्रणकामाची सुरुवात कार्यवस्तुसाठी मशिनचा सेटअप करण्यापासून होते. यातील सर्वात महत्त्वाचा आणि वेळखाऊ भाग म्हणजे टूलचे सेटिंग करणे होय. यामध्ये टूलची लांबी तसेच ऑफसेट सेटअप करणे आणि रनआउटचे परीक्षण करणे ही महत्त्वाची कामे असतात.

nata_2  H x W:  
 
जेव्हा मशिनिंग सेंटरवर यंत्रण चालू असते तेव्हा टूलचे मशिनबाहेर (ऑफलाइन) अचूक मापन करणे ही टूल प्रीसेटर उपकरणामागील मूलभूत संकल्पना आहे. मशिनवर अचूक यंत्रण करण्यासाठी टूलची अचूकता महत्त्वाची असते. अशावेळी एक काम झाल्यानंतर दुसरे टूल लावताना त्याचे सेटिंग मशिनवरच करावयाचे झाल्यास मशिनचा जास्त वेळ वाया जातो. हा वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी टूल प्रीसेटर आणि मशिनवर अपेक्षित असलेली मापे मोजून ते टूल आधीच तयार ठेवल्यास कमी वेळात ते मशिनमध्ये बसवून काम चालू करता येते. 
 
आधुनिक टूल प्रीसेटरमध्ये एक हँडल, एका बाजूला कॅमेरा आणि त्याच्या विरुद्ध बाजूला एक प्रकाशाचा स्रोत अशी रचना असते. तसेच योग्य हत्यारधारकासह (टूल होल्डर) टूल मध्यभागी सुरक्षितपणे पकडलेले असते आणि हँडलची हालचाल सी.एन.सी.द्वारा नियंत्रित केली जाते. याशिवाय टूल प्रीसेटरला आवश्यक सॉफ्टवेअरसह एक संगणक जोडलेला असतो. प्रीसेटरमधील कॅमेऱ्याने टिपलेल्या टूलच्या प्रतिमेवर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून मिळणारी मोजमापे तात्काळ स्क्रीनवर दर्शविली जातात. त्यानंतर ही मोजमापे डिजिटल मशिनिंग सेंटरला किंवा कॅम प्रोग्रॅमला पाठविली जातात.
 
टूल प्रीसेटरमध्ये ISO 50 किंवा ISO 40 टेपर असलेला स्पिंडल असतो. विविध प्रकारचे टेपर असलेल्या हत्यारधारकांचे मापन करण्यासाठी ॲडॅप्टरचा वापर केला जातो. कार्यवस्तूचे यंत्रण अपेक्षेनुसार होऊन वारंवार लागणाऱ्या (कन्झ्युमेबल) वस्तूंमध्ये बचत करणे आणि टूलचे आयुष्य वाढविणे यासाठी रनआउट हा एक महत्त्वाचा घटक असतो. टूल मशिनवर लावण्यापूर्वी त्यात काही समस्या आहे का, ते पाहणे महत्त्वाचे असते. चांगला पृष्ठीय फिनिश आणि उच्च मर्यादा (टॉलरन्स) यांचा विचार करताना टूल रनआउट नियंत्रणात असणे अनिवार्य आहे. टूल प्रीसेटरमध्ये रनआउटची तपासणी स्वयंचलितपणे केली जाऊ शकते. त्यामुळे टूल गोल फिरवून त्याचा रनआउट तात्काळ आणि अचूकपणे मोजता येतो. 
 
टूल स्पिंडलमध्ये बसविल्यानंतर मशिनमधील डायल इंडिकेटरद्वारा टूलची तपासणी करण्यात बराच वेळ खर्च होतो. मात्र, टूल प्रीसेटरमुळे हेच काम जलद आणि अचूकपणे करता येते. त्याबरोबरच टूलची उंची आणि व्यास तसेच कोपऱ्यांची (कॉर्नर) त्रिज्या यांचे मापनही आपोआप होते. त्यानंतर ही माहिती कॅम प्रोग्रॅमकडे पाठवून अचूक टूल मार्गांची निर्मिती करता येते.
 
टूल प्रीसेटरमध्ये मॅग्निफायरची सुविधा उपलब्ध असल्याने टूलच्या अग्राची झीज आणि तूटफूट पाहण्यासाठी 45 पट वाढविलेली प्रतिमा दाखविली जाते. यावरून टूल बदलण्याचा निर्णय घेणे सोपे जाते. बहुतांश सी.एन.सी. टूल प्रीसेटरचे रिझोल्युशन 1 मायक्रॉन आणि पुनरावर्तनक्षमता 2 मायक्रॉन असते.
 
टूल प्रीसेटर कशासाठी?
टूल प्रीसेटरची गरज प्रामुख्याने गुणवत्ता, इष्टतम उत्पादनप्रक्रिया आणि लवचीकपणा यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे.
• उच्च गुणवत्ता असलेल्या जलद आणि अचूक मापनासाठी
• सेटअपला लागणारा वेळ आणि मशिनचा अनुत्पादक वेळ दोन्ही इष्टतम
• खर्चात बचत
• टूलच्या आयुष्याचे गणन करणे शक्य. यामध्ये बोअरिंग बार, रीमर, मिलिंग कटर, फॉर्म टूल, स्टेप ड्रिल इत्यादी टूलचे मापन आपण टूल प्रीसेटरमध्ये करू शकतो.
टूल प्रीसेटिंग आणि मापनाच्या क्षेत्रातील EVOSET ही जगातील अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे. आम्ही उत्पादनक्षमतेला वापरासाठीच्या सहजतेची जोड देतो. यात वैयक्तिक प्रकल्पांसाठी ग्राहकानुरूप (कस्टमाइज) उपाययोजना, टूल व्यवस्थापनासाठी परिपूर्ण उपाय आणि सर्व निर्मिती प्रक्रियांचे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) यांचा समावेश असतो.
 
ग्राहकाच्या विशिष्ट गरजांची इष्टतम अंमलबजावणी करण्यावर या उत्पादनात भर दिला आहे. टूल प्रीसेटिंग मापन आणि परीक्षण क्षेत्रात EVOSET कल्पक आणि पूरक उपाय देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. अनेक वर्षांचा अनुभव, उपकरणे आणि सॉफ्टवेअरचे इनहाउस विकसन यांच्या साहाय्याने आमचा अभियांत्रिकी कार्यगट उत्पादनाच्या कुशलतेची आणि सफलतेची हमी देतो. याद्वारे मोठ्या प्रमाणात मशिनचा ताफा असणाऱ्या तसेच मशिन कमी असणाऱ्या परंतु, निरनिराळ्या कामासाठी ज्या कंपन्यांना सातत्याने टूल बदलावी लागतात, अशा कंपन्यांच्या उत्पादनातील अचूकता आणि उत्पादनक्षमता 20 टक्क्यांहून अधिक वाढू शकते.
 
ऑप्टिमा सी.एन.सी.
ऑप्टिमा सी.एन.सी. टूल प्रीसेटिंग मशिन कोणत्याही सी.एन.सी. आणि पूर्णतः स्वयंचलित वस्तुनिर्मिती प्रणालीसाठी हव्या त्या कॉन्फिगरेशनमध्ये ग्राहकानुरूप बदल करून उपलब्ध करण्यात येत आहे.
हे मशिन सहज चालविता येण्याजोगे असून त्याची अचूकता संशयातीत आहे. मशिनमध्ये वापरले गेलेले उच्च दर्जाचे यंत्रभाग आणि बाजारपेठेतील आमची प्रतिमा, या प्रक्रियेची हमी देतात.
 
प्रक्रियेची विेशासार्हता
स्वयंचलित हाताळणी, मोटरद्वारा चालित C अक्षासह ऑटोफोकस उपलब्ध.
 
वैशिष्ट्ये
• X, Z आणि C अक्षांमध्ये सी.एन.सी. नियंत्रण
• विद्युतशक्ती किंवा निर्वात (व्हॅक्युम) व्यवस्थेद्वारा क्लॅम्प करता येणारे उच्च अचूकतेचे स्पिंडल
• PWB EyeRay सी.एन.सी. सॉफ्टवेअर
• टेलीसेंट्रिक भिंगासह सी.एम.ओ.एस. डिजिटल कॅमेरा
• टचस्क्रीन तंत्रज्ञानासह ऑल इन वन पीसी 20.0/विंडोज10, 64 बिट
• X आणि Y अक्षात मोटरद्वारा चालित सातत्यपूर्ण सूक्ष्म समायोजन
• टूल व्यवस्थापन
• टूल परीक्षण
• लेबल प्रिंटर
• उपकरण (डिव्हाइस) टेबल
• सर्व मशिन नियंत्रक आणि निर्मिती प्रक्रियांसोबत लिंक
• सुरक्षिततेची सर्वोच्च मानके
• उच्च समकेंद्रियता
• मोजमापनामध्ये उच्च अचूकता
 
ग्राहकाचा अनुभव
सी.एन.सी. मशिन शॉपच्या सेटअपसाठी टूल प्रीसेटर आवश्यक आहे. टूलची उंची, ऑफसेट तपासण्यासाठी आणि टूलचे सेटिंग करण्यासाठी पुणे येथील जयहिंद इंडस्ट्रीज् कंपनीमध्ये ऑप्टिमा सी.एन.सी. टूल प्रीसेटरचा वापर केला जातो. ‘जयहिंद’चे कटिंग टूलचे व्यवस्थापक नितीन देशमुख यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “सी.एन.सी. मशिनमध्ये मॅगझिनवर टूल लोड करताना टूलची उंची तपासावी लागते. ही उंची व्हर्निअरने किंवा पट्टीने तपासता येत नाही. तर त्यासाठी टूल प्रीसेटर आवश्यक असतो. 2006 पासून आम्ही टूल प्रीसेटरचा वापर करीत आहोत. टूलचा हाइट ऑफसेट, टूलचा व्यास आणि टूलचे रनआउट, कोन, आतल्या (इनसाइड) प्रोफाइलची तपासणी इत्यादीसाठी टूल प्रीसेटरचा उपयोग होतो. टूल ठरवून दिलेल्या टॉलरन्समध्ये बनविले आहे की नाही हेदेखील टूल प्रीसेटरवर तपासता येते. जसे की, टूलचे महत्त्वाचे व्यास, अँगल आणि त्रिज्या याद्वारे आपण तपासू शकतो. टूल प्रीसेटरमध्ये देण्यात आलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा आम्ही सध्या वापर करीत आहोत. यामुळे कार्यवस्तुच्या सेटअप वेळेमध्ये फायदा होत आहे. टूल प्रीसेटरवर टूल येण्यापूर्वी ॲडॅप्टरमध्ये ते हाताने घट्ट बसविले जाते. त्यानंतर टूल ऑप्टिमा प्रीसेटरवर व्यासाची उंची तपासली जाते. ही तपासणी टूल ड्रॉइंगनुसार केली जाते.
 
टूल प्रीसेटरवर सेट केलेले टूल ज्यावेळी मुख्य कामासाठी येते त्यावेळी त्यात 10 ते 12 मायक्रॉनचा फरक (डेव्हिएशन) येतो. टूल प्रीसेटरवर टूल स्थिर असते. त्यामुळे स्थिर परिस्थितीत येणारी मोजमापे आणि मशिनवर ते टूल एका विशिष्ट आर.पी.एम.ला फिरताना येणारी मापे यामध्ये थोडाफार फरक येतो. यासाठी आम्ही यंत्रभागाच्या आकारानुसार ते टूल प्रीसेटरवर सेट करतो. स्टॅटिक लोडच्या तुलनेत डायनॅमिक लोडमुळे त्यामध्ये रनआउट वाढत असेल तर ते ऑपरेटरला तपासावे लागते. आमच्याकडे 80 मशिन असून त्या सर्वांसाठी एक टूल प्रीसेटर आहे.”
 
टूल प्रीसेटरचा वापर करण्यासाठी विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीचीच गरज लागते असे नाही, तर थोडेफार प्रशिक्षण घेऊन किंवा सवयीनंतर मशिन ऑपरेटरदेखील ऑप्टिमा टूल प्रीसेटरचा वापर करू शकतो.
 
 
 
<="" div="" style="float: left; margin: -25px 20px 20px 0px;">
nata_1  H x W:  
नटराजन अय्यर
व्यवस्थापकीय संचालक, ट्रायमॉस इंडिया प्रा. लि.
0 9823147614
 
नटराजन अय्यर यांनी गणित विषयात Bsc पदवी घेतली असून, ‘ट्रायमॉस इंडिया प्रा. लि.’ कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@