व्‍हायब्रेशन आयसोलेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    24-May-2020   
Total Views |
2_2  H x W: 0 x  
 
आधुनिक मशिन आणि उपकरणांचे डिझाइन आणि कार्य यामधील दर्जाविषयक अपेक्षा वाढतच चालल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षात मशिनचा यंत्रण वेग, लोडमधील गतिज (डायनॅमिक) बदल आणि साध्य करण्याजोगी अचूकता या विषयातील तांत्रिक क्षमता झपाट्याने वाढत आहेत. तसेच वापरल्या जाणार्‍या मटेरियलची भूमिती आणि गुणधर्म यांची प्रमुख वैशिष्ट्ये यांच्यातही नाविन्य दिसून येत आहे. तथापि याच्याबरोबरीने प्रसारित होणारी कंपने (व्हायब्रेशन) आणि त्यामुळे मशिनमधून किंवा कार्यवस्तुच्या यंत्रणाचेवेळी येणारा आवाज कमी करणेही आवश्यक बनले आहे. यामध्ये धातूवर यंत्रण करणार्‍या मशिनमधून उत्पन्न होणारी कंपने तसेच मोजमापन करणार्‍या उपकरणांना जाणविणारी कंपने अशा दोन्ही प्रकारच्या कंपनांचा संबंध आहे. दोन्ही ठिकाणी आयसोलेशन करणे आवश्यक आहे. माणसे, इमारती आणि पर्यावरण यांना सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपायांचे महत्त्वही वाढत चालले आहे.

2_2  H x W: 0 x 
 
व्हायब्रेशन आयसोलेशन तंत्रज्ञान
प्रथम आपण व्हायब्रेशन आयसोलेशन तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणार्‍या काही पारिभाषिक शब्दांचा परिचय करून घेऊ.
 
नैसर्गिक वारंवारिता (नॅचरल फ्रिक्वेन्सी)
कोणत्याही विसंवाहकाची (इन्सुलेटर) नैसर्गिक वारंवारिता म्हणजे तो इन्सुलेटर आणि त्याच्याशी संबंधित वस्तुमान ज्या वारंवारितेने हलू इच्छिते ती वारंवारिता होय.
 
डॅम्पिंग
कोणत्याही इन्सुलेटरचा कंपन पावणार्‍या प्रणालीमधून ऊर्जा काढून टाकण्याची भौतिक प्रक्रिया म्हणजे डॅम्पिंग होय. यामुळे कंपने एका स्वीकारार्ह स्तरावर मर्यादित केली जातात आणि यांत्रिकी ऊर्जेचे ऊष्णतेमध्ये रूपांतरण होते.
 
इन्सुलेशन
कंपने आणि त्यामुळे निर्माण होणारे त्रासदायक बल (डिस्टर्बिंग फोर्स) यांना परस्परांपासून वेगळे करणे म्हणजे इन्सुलेशन. हा परिणाम दोन्ही दिशांमध्ये म्हणजे मशिनपासून बाहेर आणि बाहेरून मशिनकडे येणार्‍या
बलांवर कार्य करतो.
 
स्रोत (सोर्स) इन्सुलेशन
कंपनांमुळे निर्माण होणारी स्पंदने (पल्स) आणि त्यातून निर्माण होणार्‍या कंपन बलांना अटकाव करण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे स्रोत इन्सुलेशन. यामुळे शेजारची मशिन, इमारत आणि माणसांचे कंपनापासून संरक्षण होते. कंपनविरहित स्थापन (आयसोलेटेड माउंटिंग) केलेल्या मशिनची हालचाल त्याच्या कार्याच्या मर्यादेत राहील, यावर याठिकाणी विशेष लक्ष ठेवायला लागते.
 
रिसीव्हर इन्सुलेशन
संवेदनशील मशिनबरोबर (सी.एम.एम. आणि अन्य मापनशास्त्रविषयक उपकरणे, सूक्ष्मदर्शक, सेमीकन्डक्टर आणि लेझर उद्योगक्षेत्र, मायक्रो आणि नॅनो तंत्रज्ञान अ‍ॅप्लिकेशन वगैरे) काम करणार्‍याने विचारात घ्यावा असा हा कदाचित सर्वाधिक महत्त्वाचा घटक असेल. रिसीव्हर इन्सुलेशनच्या बाबतीत, कंपन संवेदनशील उपकरणांना जमिनीतून (स्रोतापासून) येणार्‍या कंपनांच्या हस्तक्षेपापासून संरक्षित ठेवणे आवश्यक असते.
 
सुजोड गुणोत्तर (मॅचिंग रेशो)
त्रासदायक ठरणारी वारंवारिता (डिस्टर्बिंग फ्रिक्वेन्सी) आणि प्रणालीची नैसर्गिक वारंवारिता यांच्यामधील गुणोत्तर म्हणजे सुजोड गुणोत्तर.
 
पारेषण क्षमता (ट्रान्समिसिबिलिटी)
त्रासदायक ठरणारी वारंवारिता आणि इन्सुलेटरची नैसर्गिक वारंवारिता यांच्यातील गुणोत्तर (सुजोड गुणोत्तर), तसेच इन्सुलेटरचे डॅम्पिंग यांच्यावर कंपन इन्सुलेशनचा प्रभावीपणा प्रामुख्याने अवलंबून असतो. स्रोत इन्सुलेटरच्या बाबतीत मशिनचे आर.पी.एम. अथवा स्ट्रोकचा दर ही त्रासदायक वारंवारिता असते. रिसीव्हर इन्सुलेटरच्या बाबतीत इतर स्त्रोतातून येणारी कंपने ही त्रासदायक वारंवारिता असते. सर्वसाधारणपणे, त्रासदायक वारंवारिता आणि नैसर्गिक वारंवारिता यांच्यातील गुणोत्तर जितके अधिक, तितकी इन्सुलेशन कार्यक्षमता वाढते.
 
जेव्हा कोणतेही संवेदनशील मशिन वेगळे (आयसोलेट) करावयाचे असेल, तेव्हा ते मशिन सध्या कोणत्या स्तरावरील कंपने अनुभवत आहे, ते पाहणे महत्त्वाचे असते. त्याच्यासाठी आपल्याला मशिनच्या प्रत्यक्ष स्थानावर एक ‘कंपन स्थळ सर्वेक्षण आणि माहिती (डाटा) विश्लेषण’ करावे लागते.
 
कंपन मापन (स्थळ सर्वेक्षण) आणि विश्लेषणाची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती
• सी.एम.एम., मायक्रोस्कोप, राउंड/रफनेस चाचणी यंत्र, सेमीकन्डक्टर आणि नॅनो तंत्रज्ञान अ‍ॅप्लिकेशन अथवा अन्य तितक्याच संवेदनशील मशिनची अचूकता, पुनरावर्तनक्षमता आणि कामाची गुणवत्ता यांच्यावर कमी वारंवारितेची कंपने वाईट प्रभाव पाडू शकतात. दीर्घकालीन अचूकता आणि विेशासार्हता मिळविण्यासाठी मशिनच्या वर्तमान अथवा प्रस्तावित स्थळी असलेली कंपन पातळी मोजणे आणि तिचे विश्लेषण करण्याची शिफारस केली जाते.
• योग्य कंपन नियंत्रणासाठी कार्यस्थळाचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करून तेथील कंपनांची पातळी निश्चित करणे आवश्यक आहे. विश्लेषणामध्ये संभाव्य समस्येचे कारण बनू शकतील अशा वारंवारिता आणि संबंधित प्रवेग (अ‍ॅक्सिलरेशन) किंवा वेग किंवा विस्थापनांचा वास्तविक चाचणी डाटा समाविष्ट असतो.
• यामुळे समस्येचे निदान होण्यास मदत होते. कंपन इन्सुलेशन उपाययोजना/प्रणालीच्या सोबत कोणतीही प्रतिबंधात्मक अथवा सुधारात्मक क्रिया करायची असेल, तर त्याची निश्चिती होते.
• एक अत्याधुनिक फास्ट फोरिअर ट्रान्स्फॉर्म (एफ.एफ.टी.) अ‍ॅनालायझर, अत्यंत संवेदनशील जिओफोन आणि एक संगणकीय गणन प्रोग्राम यांच्या संयोजनाद्वारे (चित्र क्र. 1) मापन केले जाते. जिओफोनवर 0.2 ते 30Hz या पल्ल्यातील 0.01 मायक्रॉन/सेकंद पेक्षाही कमी कंपन वेग मोजता येतात.

2_1  H x W: 0 x 
 
• सामान्य पर्यावरणीय हस्तक्षेपांचे मापन करण्यासाठी तीनही अक्षांचे (X, Y, Z) मापन एकाच वेळी करण्यात येते. X, Y आणि Z या प्रत्येक व्हेक्टरवर मापण्यात आलेली सर्वाधिक कंपने निश्चित करणे, ही पहिली पायरी असते. या तीनपैकी जे मूल्य सर्वाधिक असेल त्याची तुलना मशिनच्या ‘लिमिट कर्व्ह’ आलेखाशी करावयाची असते. याचा उपयोग मशिनसाठी काही विशेष काळजी घेणे अथवा कंपन निरोधक प्रणाली आवश्यक आहे का नाही ते ठरविण्यासाठी केला जातो.
 
व्हायब्रेशन आयसोलेटर प्रणाली
आयसोलेटर कंपने थोपवितो. तसे पाहिले तर मशिनच्या खालच्या बाजूला एक साधा रबराचा तुकडा ठेवला तरीही तो आयसोलेटरचे काम करतो. परंतु आपल्याला असा आयसोलेटर निश्चित करायचा आहे की, ज्याची नैसर्गिक वारंवारिता त्रासदायक ठरणार्‍या वारंवारितेपेक्षा कमी असेल. जर त्रासदायक ठरणार्‍या वारंवारिता किंवा तिच्या जवळपासची नैसर्गिक वारंवारिता असलेला आयसोलेटर निवडला गेला, तर त्याने समस्या दुपटी/तिपटीने वाढेल. त्यामुळे वापरण्यात येणार्‍या आयसोलेटरची नैसर्गिक वारंवारिता खूप कमी असली तरच तो कंपने थोपवू शकेल. आयसोलेटरच्या निवडीमधील हा एक निकष आहे. आयसोलेटरचे निष्क्रिय (पॅसिव्ह) आणि सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) असे दोन प्रकार असतात. साध्या भाषेत सांगायचे झाले तर निष्क्रिय आयसोलेटर म्हणजे कंपनांचा स्रोतापासून निरोध करणारा कोणताही डॅम्पनर. जेव्हा आपण कोणत्याही आयसोलेटरकडून मशिनवर येणारे कंपन बंद करायची अपेक्षा ठेवतो, तेव्हा त्याला सक्रिय आयसोलेशन म्हणता येईल. परंतु कोणत्याही प्रणालीला सक्रिय प्रणाली म्हणायचे असेल, तर ती कंपनाची पातळी किती आहे त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार डॅम्पिंग गुणोत्तर अनुकूलित करण्यास सक्षम असली पाहिजे. या आयसोलेटरला 3 अथवा 6 हालचालीची मुक्तता (डिग्री ऑफ फ्रीडम) असते. तीन मुक्तता दिशा म्हणजे X, Y आणि Z अक्षात, पुढे मागे, वर खाली, डावीकडे उजवीकडे हालचाल करायची मुक्तता. सहा हालचालींची मुक्तता म्हणजे X, Y आणि Z अक्षात, धन आणि ऋण रेखीय हालचालीव्यतिरिक्त घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने अथवा त्यांच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करण्याची मुक्तता. यातील जितक्या दिशांतील हालचाल थांबविण्यात आयसोलेटर यशस्वी होईल तितका त्याच्या डॅम्पिंग प्रभाव दिसेल.
 
कंपन आयसोलेशन प्रणालीचे प्रकार
 
1. निष्क्रिय व्हायब्रेशन आयसोलेटर
हे आयसोलेटर उत्तेजना मिळाल्यावर कंपनांचे नैसर्गिक वारंवारितेच्या पल्ल्यामधील विस्तारीकरण (अ‍ॅम्प्लिफिकेशन) दर्शवितात. हे रेझोनन्स अ‍ॅम्प्लिफिकेशन, आयसोलेटरच्या डॅम्पिंग क्षमतेवर अवलंबून असते. निष्क्रिय आयसोलेटर सामान्यतः मशिन टूल उद्योगक्षेत्रात अधिक वापरले जातात. मोल्डिंग आणि प्रेस मशिनसारख्या मशिनमध्येही याचा वापर होतो.
 
बिल्झ व्हायब्रेशन टेक्नॉलॉजीद्वारा निर्मित इन्सुलेशन रबर पॅड, लेव्हलिंग एलिमेन्ट (समतलन घटक) आणि प्रिसिजन वेज माउंट हे औद्योगिक अ‍ॅप्लिकेशनमध्ये इष्टतम परिणाम देणारे निष्क्रिय आयसोलेटर आहेत.
 
2. सक्रिय व्हायब्रेशन आयसोलेटर
सक्रिय आयसोलेशन प्रणालीमध्ये प्रणालीच्या कोणत्याही विचलनाला संतुलित करण्यासाठी अ‍ॅक्चुएटरचा उपयोग केला जातो. नियमित उत्तेजनासाठी, अ‍ॅक्चुएटरचे संबंधित आयसोलेटर 1800 फेज शिफ्टद्वारा कोणत्याही अडथळ्याचे निराकरण करतात. अशा वेळी फीड - फॉरवर्ड संदेश अथवा रियल टाइम मॉनिटरिंग वापरून आणि मशिनच्या प्रत्यक्ष स्थानासाठी नियंत्रण प्रणाली वापरून पातळी नियंत्रण (लेव्हल कंट्रोल) प्रणाली कार्यरत केली जाऊ शकते. असे केल्याने आयसोलेटरच्या नैसर्गिक वारंवारितेच्या जवळपासच्या वारंवारितांचे रेझोनन्स अ‍ॅम्प्लिफिकेशन किमान पातळीवर ठेवता येते. आयसोलेशन कार्यक्षमता वाढविता येते आणि अधिक उच्च वारंवारितांसाठी इष्टतम परिणाम मिळतात. यामध्ये एका बाजूला आयसोलेटरच्या नैसर्गिक वारंवारितेच्या जवळच्या वारंवारिता अतिशय कडक आयसोलेटर वापरून आणि दुसर्‍या बाजूला उच्च वारंवारितांसाठी इष्टतम आयसोलेशन देणारे अतिशय नरम आयसोलेटर एकत्रितपणे वापरून त्या दोन्हींच्या गुणधर्मामुळे मिळणारे लाभ मिळविले जातात.
 
जे फीड-फॉरवर्ड संदेशाद्वारे ओळखले जात नाहीत अशा स्वैर अडथळ्यांसाठी पुरेशा प्रमाणात जलद आणि प्रभावीपणे कार्य करणारे संवेदक आवश्यक असतात. बिल्झ व्हायब्रेशन टेक्नॉलॉजीद्वारा निर्मित सक्रिय आयसोलेशन प्रणाली (AISTM) सारख्या एअर स्प्रिंग तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीमध्ये उच्च गतीचे मायक्रोप्रोसेसर आणि उच्च अचूकतेचे संवेदक असतात. यांचा उपयोग करून मशिनचे अचूक स्थान आणि प्रवेग यांचा सतत शोध घेतला जातो. यामुळे आयसोलेटरचे विचलन आणि स्थिरावण्यास लागणारा वेळ कमीतकमी होतो आणि उभ्या तसेच आडव्या अक्षामध्ये उत्कृष्ट समतलन अचूकता मिळते. मापनशास्त्रविषयक कामामध्ये, सूक्ष्मदर्शक आणि लेझर उपकरणे, सेमीकन्डक्टर उद्योगक्षेत्रात वगैरे अशा प्रणालींचा उपयोग करावा अशी शिफारस केली जाते.
 
निष्क्रिय आयसोलेशनचे प्रकार
 
1.1इन्सुलेशन पॅड

4_2  H x W: 0 x 
 
कंपन आणि मशिन/कार्यवस्तू यांच्यातून येणारा आवाज या दुहेरी समस्येवरील कमी खर्चिक उपाय म्हणून इन्सुलेशन पॅडचा (चित्र क्र. 2 ) वापर विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बर्‍याच वर्षांपासून यशस्वीपणे करण्यात येत आहे. हे उच्च दर्जाचे मिश्र मटेरियल कापसाच्या तंतूंमध्ये गुंतलेले (एम्बेड) बुचाचे कण आणि नायट्राइल रबर यांच्या पूर्वनिश्चित प्रमाणातील मिश्रणापासून बनविले जाते. पॅडच्या प्रकारानुसार त्याचे भौतिक आणि यांत्रिक गुणधर्म वेगवेगळ्या औद्योगिक उपयोगासाठी असलेल्या सर्व आवश्यकता पूर्ण करतात. अतिशय चांगल्या डॅम्पिंग गुणधर्मामुळे स्टॅटिक आणि डायनॅमिक लोडिंग या दोन्ही स्थितीमध्ये इष्टतम विस्थापन आणि पातळीचे सातत्य (लेव्हल कन्सिस्टन्सी) सुनिश्चित केले जाते. आधुनिक शीतक वंगण द्रव्यांपासून होणारे परिणाम रोखण्यासाठी त्यात उच्च प्रतिरोधक गुणधर्म आहेत.
 
इन्सुलेटिंग पॅड विकसित करताना कंपन आणि मशिनच्या स्ट्रक्चरमधून येणारा आवाज या दोन्ही समस्या टाळल्या जाण्याकडे लक्ष दिले जाते. विविध मशिनमध्ये विविध प्रकारची डायनॅमिक विशेषता असते आणि त्यानुसार इन्सुलेशनची गरज नक्की होते. कोणतीही कंपन समस्या असली, तरी उपलब्ध असंख्य निरनिराळ्या पॅडमधून योग्य पर्याय मिळतो. आमच्या इन्सुलेशन पॅडची उत्कृष्ट कॉम्प्रेशन सेट मूल्ये विशेष उल्लेखनीय आहेत. आधुनिक मशिनमध्ये भौमितिक अचूकता वर्षानुवर्षे न बदलता स्थिर रहावी ही अपेक्षा असल्यामुळे हा गुणधर्म मशिनला कंपनांच्या प्रभावापासून मुक्त करून स्थापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
फायदे
• मशिनच्या स्ट्रक्चरमधून येणार्‍या आवाजासाठी परिणामकारक ध्वनी विरोध.
• काळानुसार जीर्ण होण्यापासून प्रतिरोध : किती भार द्यायचा त्याचे नियम पाळले तर अमर्यादित काळ सेवा देऊ शकतात. आकारामध्ये कोणताही कायमस्वरूपी बदल होत नाही.
• रासायनिक प्रतिरोध : औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारे ऑइल, ग्रीस, अ‍ॅसिड आणि शीतके यांच्यासाठी अतिशय चांगला प्रतिरोध.
• तापमान प्रतिरोध : -200 ते +1200 से.
• डॅम्पिंग गुणधर्म : 30 टक्क्यांपर्यंतचे उच्च श्रेणीचे डॅम्पिंग
 
मशिन बसविताना इन्सुलेशन पॅडचा वापर करण्यासाठी चार संभाव्य पर्याय
1. फ्री स्टँडिंग : ज्या मशिनमध्ये संरेखन (अलाइनमेंट) तितकेसे महत्त्वपूर्ण नसते तिथे इन्सुलेशन पॅड वापरून फाउंडेशन करता येते. (चित्र क्र. 3 ) उंच सखल जमिनीला समतल करण्यासाठी पॅड किंवा तत्सम वस्तू वापरल्या जातात. सामान्यतः हे पॅड संपूर्ण पृष्ठभागावर पसरून न ठेवता विशिष्ट स्थानीच ठेवले जातात. मशिनचे वजन आणि त्याच्या खालचा आधार देणारा पृष्ठभाग यांच्यानुसार इन्सुलेशन पॅडची आवश्यक संख्या आणि आकार ठरविला जातो.

4_1  H x W: 0 x
 
2. जेव्हा मशिन हलविण्यात येते तेव्हा पॅडच्या पूर्वस्थानावर अबाधित राहणारी बोल्ट ऑन इन्स्टॉलेशन (चित्र क्र. 4) फिटिंग वापरून, मशिन बेडला स्थिरपणे जोडले जाते. विशेषतः उच्च डायनॅमिक शक्ती असलेल्या मशिनसाठी हा पर्याय वापरला जातो. (उदाहरणार्थ, इंजेक्शन मोल्डिंग मशिन, स्टॅम्पिंग साधने)

6_1  H x W: 0 x 
 
3. बोल्ट थ्रू : इन्सुलेशन पॅड आणि इन्सुलेशन पॅड वॉशर यांचा वापर करून मशिन जमिनीमध्ये स्थिर करण्यासाठी बोल्ट थ्रू इन्सुलेशन (चित्र क्र. 5) पर्याय वापरला जातो. इन्सुलेशन वॉशरचा उपयोग केल्याने बोल्टमार्फत कंपने वितरित होण्यापासून रोखले जाते.

6_2  H x W: 0 x
 
4. इन्सुलेशन पॅड सेटद्वारा (चित्र क्र. 6) अतिशय परिणामकारक धक्का (शॉक) आणि कंपन इन्सुलेशन करण्यासाठी विविध पॅडचा संच वापरला जातो, ज्यामुळे इन्सुलेशनमध्ये विलक्षण सुधारणा होते.

8_2  H x W: 0 x 
 
1.2 लेव्हलिंग करणारे उपकरण (एलिमेंट)
कंपन आणि मशिन/कार्यवस्तू यांच्यातून येणारा आवाज यांच्यापासून इन्सुलेट केलेले मशिन जागेवर बसविण्यासाठी लेव्हलिंग (चित्र क्र. 7) घटकांचा उपयोग केला जातो. देखभालीची आवश्यकता नसलेले हे लेव्हलिंग फीट मशिनचे सुलभ आणि अचूक लेव्हलिंग निश्चित करतात आणि अनेक प्रकारच्या डिझाइनमध्ये उपलब्ध असतात. त्यांचा आकार आणि इन्सुलेशन पॅड यांची निवड अ‍ॅप्लिकेशन आणि भार यांच्यानुसार केली जाते. निवडलेल्या बोल्टची लांबी आणि इतर आवश्यकतेनुसार लेव्हलिंगची व्याप्ती ठरविता येते.

8_1  H x W: 0 x 
 
उपयोग
इंजेक्शन मोल्डिंग मशिन, प्रेस, पंच अशासारख्या मशिनच्या माउंटिंगसाठी खास विकसित केलेल्या या अ‍ॅटॅचमेंटमधील प्रेशर प्लेटच्या डिझाइनमुळे भाराचे इष्टतम वितरण होते. लेव्हलिंगच्या संपूर्ण पल्ल्यामध्ये अतिशय उच्च क्षितिजसमांतर सातत्य असते.
 
1.3 FAEBI रबर एअर स्प्रिंग
धक्के, कंपने आणि मशिनच्या स्ट्रक्चरमधून येणारा आवाज यांच्यापासून मशिन, उपकरणे आणि संपूर्ण सिस्टिम (अ‍ॅग्रिगेट) यांचे परिणामकारक इन्सुलेशन करण्यासाठी या स्प्रिंगचा वापर केला जातो. या घटकामध्ये उच्च दर्जाच्या इलास्टोमरपासून बनविलेल्या घंटेच्या आकाराचा रबर फॉर्म असतो, ज्याची बाजू अधिक सशक्त केलेली असते. या मजबूत डिझाइनमुळे केवळ उत्तम इन्सुलेशनचे गुणधर्मच मिळतात असे नाही, तर अतिशय चांगली यांत्रिकी स्थिरताही मिळते. अतिभार किंवा अचानक हवेचा दाब कमी होण्यामुळे नुकसान होणे टळते. एअर स्प्रिंग घटकाचे आडव्या दिशेतील विस्थापन अत्यंत कमी असते. स्प्रिंग घटक बेस प्लेटमध्ये अँटिस्लिप पॅड समाविष्ट केल्यामुळे जमिनीमध्ये अतिरिक्त अँकरिंगची गरज भासत नाही.
 
सक्रिय आयसोलेशनचे प्रकार
मेकॅनिकल न्युमॅटिक लेव्हल कंट्रोल (एम.पी.एन.)
बिल्झ लेव्हल नियंत्रित प्रणाली हा कंपन इन्सुलेशनच्या इष्टतम प्रभावासाठी महत्त्वपूर्ण घटक असतो, ज्यात FAEBI® आणि FAEBI® -HD रबर अथवा BiAirE® मेम्ब्रेन एअर स्प्रिंग यांचा वापर केलेला असतो. (चित्र क्र. 8 आणि 9) यांच्यामुळे इन्सुलेटरचे अयोग्य आणि नको असलेले विस्थापन किंवा लोडमधील बदलामुळे एअर स्प्रिंगवर बसविलेल्या मशिन अथवा सिस्टिम यांचा समतोल ढळणे टाळले जाते. एअर स्प्रिंगमधील हवेचा दाब संबंधित लोडशी जुळवून घेण्यासाठी प्रत्येक एअर स्प्रिंगची उंची आपोआप नियंत्रित व्हावी लागते आणि त्यासाठी सिस्टिममध्ये जलद गतीने हवा दाखल करणे किंवा ती बाहेर सोडणे आवश्यक असते. यामुळे गुरुत्वमध्यात बदल झाले तरीही सर्वोच्च श्रेणीची स्थिरता आणि परिणामकारक इन्सुलेशन मिळते.

10_1  H x W: 0  

10_2  H x W: 0  
 
2.1 FAEBI® - HD संयोजनक्षम डॅम्पिंगसह
संयोजनक्षम डॅम्पिंगसह संयुक्त रबर एअर स्प्रिंग इन्सुलेटर FAEBI® -HD मध्ये एक बाजू सशक्त केलेला इलास्टोमरचा रबर फॉर्म, धातूचे बॉन्डिंग आणि दोन चेंबर असलेली एक प्रणाली समाविष्ट असते. शक्य तितका अधिक डॅम्पिंग परिणाम साधण्यासाठी एअर स्प्रिंगचा आतला भाग दोन एअर चेंबरमध्ये विभागलेला असतो आणि त्यांना जोडणारी एक हवेची नळी (एअर होज) असते. (भार आणि डॅम्पिंग आकारमान). पाहिजे तितका डॅम्पिंग परिणाम मिळविण्यासाठी बाहेरून एका संयोजनक्षम थ्रॉटल व्हॉल्व्हद्वारा क्रॉस सेक्शनमधील हवेचा प्रवाह कमीजास्त करता येतो. एका चेंबरच्या प्रणालीपेक्षा (FAEBI) यात अधिक डॅम्पिंग परिणाम मिळत असल्याने रेझोनन्स अ‍ॅम्प्लिफिकेशन पुष्कळ प्रमाणात कमी होतात आणि मशिनच्या अनावश्यक हालचाली लक्षणीय वेगाने विरून जातात. ऊर्जेचे शोषण झाल्यामुळे निर्माण होणारे उत्पादन, मशिन आणि टूलची झीज यांच्यावर अतिशय सकारात्मक प्रभाव पडतो.
 
फायदे
व्हिस्कस डॅम्पिंगच्या तुलनेत एअर डॅम्पिंगमध्ये झीज अजिबात नसते. तसेच कोणत्याही देखभालीची गरज नसते आणि डॅम्पिंग फॅक्टर बाहेरून समायोजित करता येतो. (चित्र क्र. 10अ आणि 10ब)

11_1  H x W: 0  

11_2  H x W: 0
 
 
2.2 संयोजनक्षम डॅम्पिंगसह BiAir® मेम्ब्रेन एअर स्प्रिंग इन्सुलेटर
BiAir® मेम्ब्रेन एअर स्प्रिंग इन्सुलेटर (चित्र क्र. 11अ आणि 11 ब) टर्न अथवा कास्ट केलेल्या अ‍ॅल्युमिनिअमपासून बनविलेले असते. त्यातील हवेची पोकळी (एअर स्पेस) एका पातळ, लवचीक आणि दाब निरोधक गुंडाळी होऊ शकणार्‍या पटलाने (रोलिंग मेम्ब्रेन) बंद केलेली असते. पटलावर एक पिस्टन असतो आणि तो हवेच्या पोकळीवर दाब देतो. या डिझाइनमुळे कंपनाविरुद्ध अत्यंत परिणामकारक इन्सुलेशन मिळते. त्याच वेळी उच्च श्रेणीचे डॅम्पिंग मिळविण्यासाठी इन्सुलेटरच्या आतील दोन भागांत विभागलेल्या हवेच्या पोकळीमध्ये बाहेरून एका संयोजनक्षम थ्रॉटल व्हॉल्व्हद्वारा क्रॉस सेक्शनमधील हवेचा प्रवाह सेट करता येतो.

11_1  H x W: 0  

chetan_2  H x W 
 
हवेच्या प्रवाहात थ्रॉटल व्हॉल्व्हद्वारा निर्माण होणार्‍या घर्षणाद्वारे 15 टक्क्यांपर्यंत डॅम्पिंग परिणाम मिळू शकतो. अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व्ह अथवा पिस्टन स्ट्रोकवरील यांत्रिकी मर्यादेद्वारा पटलाचे अतिदाबामुळे होणारे नुकसान टाळले जाते.
 
अ‍ॅप्लिकेशन
• संवेदनशील मोजमापन आणि चाचणी उपकरणे
• अचूकतेने फिनिशिंग करणारे मशिन
• लेझर उपकरणे तसेच ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे
• वाहने, इंजिन आणि गिअरबॉक्स टेस्ट बेडसाठी कंपन इन्सुलेटेड बेअरिंग
• फाउंडेशन इन्सुलेशन
 
पारंपरिक स्टील स्प्रिंगच्या तुलनेतील फायदे
सक्रिय पातळी नियंत्रकासह BiAir® एअर स्प्रिंग इन्सुलेटरचा वापर केल्यामुळे मशिन किंवा फाउंडेशनची योग्य पातळी सातत्याने राखली जाते. पातळी नियंत्रण आणि समायोजन पूर्णपणे स्वयंचालित असते. बदलत्या भारानुसार एअर स्प्रिंगमधील हवेचा दाब योग्य प्रमाणात समायोजित केला जातो. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्सुलेशनचा परिणाम एकसारखा राहतो. स्टील स्प्रिंगप्रमाणे एअर स्प्रिंग मशिन स्ट्रक्चरमधून येणारा आवाज पारेषित करीत नाहीत.
 
 
 
चेतन सावंत ‘बिल्झ व्हायब्रेशन टेक्नोलॉजी’ कंपनीच्या ‘मशिन हाऊस इंडिया प्रा. लि.’ चे संचालक आहेत.
संवेदनशील मापने आणि मेट्रॉलॉजी, ऑप्टिक्स आणि लाइफ सायन्ससाठी आवश्यक असणार्‍या व्हायब्रेशन आयसोलेशन सोल्युशनमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
9096003430
 
@@AUTHORINFO_V1@@