कटर रेडियस ऑफसेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    28-May-2020   
Total Views |
 
 
मिलिंग प्रक्रिया वापरून कंटूरिंग करत असताना प्रथम Z अक्षाची खोली ठरवून त्यानंतर X आणि Y किंवा दोन्ही अक्षाला गती दिली जाते. कटिंग टूलच्या गतीप्रमाणे टूल मार्ग (पाथ) सर्व प्रकारच्या कंटूरिंग कामामध्ये असतो. सी.एन.सी. लेथ मशिन किंवा सी.एन.सी. मशिनिंग सेंटर यामधील कोणत्याही मशिनवर टूलचे टोक कंटूरला टँजंट असावे लागते. याचा अर्थ टूलच्या गतीने तयार झालेल्या मार्गामध्ये कटरचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) आणि कंटूरचा मार्ग यामध्ये समान अंतर असावे. यालाच समान अंतर असणारा टूल मार्ग (इक्विडिस्टंट टूल पाथ) असे म्हणतात.

2_2  H x W: 0 x 

2_1  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 1 आणि 2 पाहिल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की,
1. यंत्रण करावयाचा कंटूर, कटरच्या त्रिज्येइतक्या अंतराने कॉम्पेन्सेट झालेला हवा. म्हणजेच कटरचा मध्यबिंदू चित्र क्र. 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे असावा लागतो.
2. यातील गंमतीचा भाग असा की, यंत्रणाची ही गरज ड्रॉईंगमध्ये दाखविलेली नसते. ड्रॉईंगमध्ये सर्व मापे यंत्रभागाच्या कंटूरला धरून असतात. टूलच्या मध्यबिंदूशी त्याचा काहीही संबंध नसतो.
3. यामध्ये असा प्रश्न पडतो की, ड्रॉईंगवरून टूलच्या मध्यबिंदूचे स्थान (सेंटर पोझिशन) यंत्रभागाच्या कंटूरच्या संदर्भाने कसे घ्यावयाचे, तर त्यासाठी त्याची मूल्ये गणित करून काढावी लागतील.
जर वापरात असलेली सी.एन.सी. प्रणाली अद्ययावत असेल आणि त्यामध्ये कटर रेडियस कॉम्पेन्सेशन किंवा कटर रेडियस ऑफसेट नावाचे विशेष प्रगत असे फीचर असेल, तर सी.एन.सी. प्रणाली स्वतःच ही मूल्ये काढेल आणि पुढील तरतूदही करेल. सी.एन.सी. टर्निंगमध्ये या फीचरचे नाव टूल नोज रेडियस ऑफसेट किंवा टूल नोज रेडियस कॉम्पेन्सेशन असे असते. या प्रगत वैशिष्ट्यामुळे प्रोग्रॅमर ड्रॉईंगच्या मापावरून प्रोग्रॅम करू शकतो आणि त्यानंतर कंट्रोल पुढील आवश्यक सर्व मोजमापे आणि समायोजन (ॲडजेस्टमेंट) करतो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चित्र क्र. 3 मध्ये दिलेल्या उदाहरणातील महत्त्वाचे मुद्दे.
1. क्लाइंब मिलिंग मोडमध्ये यंत्रण बाहेरील बाजूकडून होईल. 
2. टूल प्रथम Y अक्षामध्ये काम करेल.
3. कार्यवस्तुच्या तळातील डावा कोपरा प्रोग्रॅम झीरो म्हणून निवडला आहे.
4. P1, P2, P3, P4, P5 बिंदू ड्रॉईंगवर दाखविलेले आहेत.
5. या बिंदूंनुसार कोऑर्डिनेट टेबल बनविले आहे.

4_2  H x W: 0 x 

4_1  H x W: 0 x 
 
कोऑर्डिनेट टेबल
 
या बिंदूंना कंटूर चेंज पॉइंट म्हणतात. कटरच्या मार्गासाठी याची आवश्यकता असते. वरील टेबलमध्ये P3 या बिंदुचे Y अक्षावरील मूल्य ड्रॉईंगवर नाही. त्यामुळे हे मूल्य काढण्यासाठी त्रिकोणमितीचा (ट्रिग्नॉमेट्री) वापर करावा लागेल, तो कसा ते पुढे पाहू.
प्रथम a ची मूल्ये काढावी लागतील. (चित्र क्र. 4)

6_2  H x W: 0 x 
 
a = 2.25 X tan 18°
= 0.7311
त्यावरून P3 (Y) = 1.125 +0.7311 = 1.8561
अशा पद्धतीने P3 (Y) कोऑर्डिनेट काढता येतो.
 
ऑफसेटचे प्रकार
ऑफसेट मेमरी A, B, C हे फानूक नियंत्रकामधील नियंत्रण पर्याय आहेत.
• पर्याय A : एकच मूल्य. फक्त लांबी आणि व्यास एकच आकडा
• पर्याय B : लांबी आणि भूमितीसाठी. यामध्ये T1, H1, D1 वापरू शकतो.
• पर्याय C : एक्स्टेन्डेड वेअर कॉम्पेनसेशन. या प्रकारात ऑफसेट पेजवर पुढील माहिती दाखविली जाते. लांबी, झीज झालेली लांबी, कॉम्पेन्सेशन भूमिती (जॉमेट्री), कॉम्पेन्सेशन भूमिती झीज (वेअर).
 
सी.एन.सी. नियंत्रक, कंटूर बदलण्यासाठी आवश्यक असणारे ऑफसेट पुढील तीन मुद्यांवरून काढतो किंवा त्याचे मोजमापन करतो.
• ड्रॉईंग कंटूरवरील पॉइंट
• कटर मोशनची ठरवून दिलेली दिशा
• कंट्रोल सिस्टिम मेमरीमध्ये साठविलेली कटरची त्रिज्या.
 
कटर रेडियस ऑफसेट वापरण्याची कारणे
• कटर त्रिज्येचा नेमका आकार माहीत नसणे.
• कटरच्या झीजेसाठी समायोजन.
• रफिंग आणि फिनिशिंग ऑपरेशन.
• यंत्रणामधील टॉलरन्स राखणे.
 
कटिंग मोशनची दिशा
दिशा CW किंवा CCW नसून उजवीकडे किंवा डावीकडे असते. कटर रेडियस ऑफसेट यशस्वीपणे वापरण्यासाठी चार महत्त्वाच्या पायऱ्या.
1. ऑफसेट कसा सुरू करावयाचा.
2. ऑफसेट कसे बदलायचे.
3. ऑफसेट कसे थांबवायचे.
4. ऑफसेट सुरुवात आणि शेवट यामध्ये कसे बघायचे याची माहिती घेणे.
 
कटर रेडियस ऑफसेटसाठी वापरण्यात येणारी G फंक्शन (चित्र क्र. 5)

8_2  H x W: 0 x 
 
G40 कटर रेडियस ऑफसेट कॅन्सल
G41 कटर रेडियस ऑफसेट डाव्या बाजूला
G42 कटर रेडियस ऑफसेट उजव्या बाजूला
 
प्रोग्रॅम फॉरमॅट
G40/ G41/G42 S...B...M...
S - स्पिंडल वेग/कटिंग वेग
M - सूचना (इन्स्ट्रक्शन)
B - सूचना
 
उदाहरण : रेडियस कॉम्पेन्सेशनसह यंत्रण टूल रेडियस 10 मिमी. टूल नंबर 1 प्रोग्रॅम (चित्र क्र. 6)

6_1  H x W: 0 x
 
G92 X 0Y0Z0 
G90 G17 S100 T1 D1 M03 टूल ऑफसेट स्पिंडल सुरुवात प्लेन G17
G41 G01 X 40 X30 Y30 F125 Y70 कॉम्पेन्सेशन सुरुवात
X 90
Y30
X 40
G40 G00 X0 Y0 - कॉम्पेन्सेशन कॅन्सल
M30- प्रोग्रॅम एंड
 
टूल रेडियस 10 मिमी. टूल नंबर 01 प्रोग्रॅम (चित्र क्र. 7)

8_1  H x W: 0 x 
 
G92 X0 Y0 Z0 
G90 G17 F150 S100 T1 D1 M03 - टूल ऑफसेट स्पिंडल सुरू
G42 G01 X 30 Y30 - कॉम्पेन्सेशन सुरुवात
X50
Y60
X80
X100 Y40
X140
X120 Y70
X30
Y30
G40 G00 X0 Y0 कॉम्पेन्सेशन कॅन्सल
M30- प्रोग्रॅम एंड
 
 

joshi_1  H x W: 
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@