रजिस्टर कमांड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    10-Jun-2020   
Total Views |
 
सी.एन.सी. मशिनचे प्रोग्रॅमिंग करताना उपलब्ध असणाऱ्या संदर्भ बिंदूंना (रेफरन्स पॉइंट) एकमेकांच्या संमतीने आणि संबंधाने जोडणे आवश्यक असते. यालाच हार्मोनाइज करणे असे म्हणतात. कार्यवस्तू असणारा संदर्भ बिंदू (प्रोग्रॅम झीरो) आणि टूलचे अग्र (टिप) यामध्ये काही निश्चित साधनाने एकत्रित जोडणी गरजेची ठरते. नियंत्रण प्रणालीला (कंट्रोल सिस्टिम) टूल प्रत्यक्ष मशिन एरियामध्ये नेमके कुठे आहे, याची माहिती देणाऱ्या यंत्रणेची गरज असते. टूलची सध्याची जागा प्रोग्रॅममधून नियंत्रण प्रणालीच्या मेमरीमध्ये घालता येते. या पद्धतीने माहिती देण्यासाठी G कमांडची गरज असते, या कमांडला स्थान नोंदणी (पोझिशन रजिस्टर) असे म्हणतात.
 
स्थान नोंदणी कमांड : नियंत्रण प्रणालीमध्ये असणाऱ्या प्रिपरेटरी कमांड म्हणजेच G कोड कमांड. पुढे दिलेल्या या दोन कमांड टूलची स्थान नोंदणी म्हणून वापरल्या जातात.

3_2  H x W: 0 x 
 
सध्याच्या प्रगत सी.एन.सी. प्रोग्रॅमिंगमध्ये वरील दोन्ही स्थान नोंदणी कमांड बाजूला काढून त्याऐवजी प्रगत किंवा लवचीक (फ्लेक्झिबल) अशा वर्क ऑफसेट नावाने G54 ते G59 या कमांड दिल्या आहेत. तरीही विषय समजून घेण्यासाठी किंवा कौशल्यात वाढ करण्यासाठी G92 आणि G50 व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे.
 
स्थान नोंदणी कमांडची व्याख्या : अक्षावर प्रोग्रॅम झीरो ते टूलचे सध्याचे स्थान यामधील अंतर किंवा दिशा, स्थान नोंदणी कमांडने सेट केली जाते. वरील व्याख्येवरून असे लक्षात येईल की, मशिन झीरोचा त्यात कुठेही उल्लेख नाही, तर त्याऐवजी सध्याचे टूलचे स्थान विचारात घेतले जाते. व्याख्येप्रमाणे अंतर एका दिशेतच असते किंवा ते प्रोग्रॅम झीरो ते टूलचे सध्याचे स्थान असे असते. प्रोग्रॅम झीरोपासून टूल स्थानापर्यंत दिशा दाखविली जाते.

3_3  H x W: 0 x 
 
त्यामुळे प्रोग्रॅममध्ये प्रत्येक अक्षासाठी योग्य खूण असते.
1. पॉझिटिव्ह (+ve)
2. निगेटिव्ह (-ve)
3. झीरो (0)
वरील तीन खुणांपैकी एक खूण असावीच लागते. स्थान नोंदणी केवळ ॲब्सोल्युट मोडमध्येच काम करते. (G90)
 
प्रोग्रॅमिंग फॉरमॅट
G92 X...Y...Z...
वरील फॉर्मॅटमध्ये प्रत्येक अक्षासमोर दिलेले मूल्य (व्हॅल्यू) प्रोग्रॅम झीरोपासून टूल संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर असते.
 
टूल पोझिशन सेटिंग
टूलचे सध्याचे स्थान, नियंत्रण मेमरीमध्ये नोंद करणे हे G92 कमांडचे प्रमुख काम असते. G92 कमांड ज्या ब्लॉकमध्ये दिलेली असते, त्या ब्लॉकमुळे मशिनमधील कोणतीही हालचाल होणार नाही. G92 मुळे होणारा परिणाम केवळ ॲब्सोल्युट पोझिशन मोडमध्ये संगणकाच्या पडद्यावर दिसेल.
 
मशिनिंग सेंटरवरील ॲप्लिकेशन
सी.एन.सी. मशिनिंग सेंटरवर काम करताना प्रथम प्रत्येक अक्षासाठी पोझिशन रजिस्टर प्रस्थापित करावे लागते. त्यासाठी पुढील दोन पद्धतींचा वापर केला जातो.
1. टूल पोझिशन मशिन झीरोला सेट करणे.
2. टूल पोझिशन मशिन झीरोपासून बाजूला करणे.
 
टूल सेट मशीन झीरोवर

3_1  H x W: 0 x 
 
यामध्ये मशिन झीरो पोझिशन ही टूल बदल पोझिशन असावी लागते. व्यवहारात किंवा प्रत्यक्ष कामात हे शक्य नाही. उदाहरणार्थ, खालील प्रोग्रॅम लाइन पहा.
G92 X25 Y12 Z10.5 
यासाठी सी.एन.सी. ऑपरेटरला X अक्ष मशिन झीरोपासून अचूक 25 मिमी. सेट करावा लागेल. त्याचवेळी Y अक्ष मशिन झीरोपासून 12 मिमी.वर तर Z अक्ष मशिन झीरोपासून अचूक 10.5 मिमी.ला सेट करावा लागेल. (चित्र क्र.1)
 
मशिन झीरोपासून बाजूला टूल सेट
यामध्ये प्रोग्रॅमर XY टूल पोझिशन मशिन ट्रॅव्हल मर्यादेमध्ये कुठेही सेट करू शकतो. हीच पोझिशन टूल बदल पोझिशन म्हणून XY अक्षासाठी वापरू शकतो. मशिन झीरोची गरज पडत नसल्यामुळे ऑपरेटर कार्यवस्तुचा सेटअप टेबलवर कुठेही करू शकतो.

6_2  H x W: 0 x 
 
सुरुवातीच्या टूल बदल पोझिशनपर्यंत टूल आणण्यासाठी ऑपरेटर प्रोग्रॅम झीरोपासून G92 ब्लॉकमध्ये घातलेल्या अंतरापर्यंत हाताने टूल नेतो, ही गोष्ट फार सोपी आहे. टूल बदल पोझिशन एकदा प्रस्थापित झाल्यानंतर प्रोग्रॅममधील इतर सर्व टूल, बदलासाठी टूल बदल पोझिशनला येतील. या पद्धतीमधील एक तोटा म्हणजे नियंत्रण प्रणालीची पॉवर चालू असेपर्यंतच टूल बदल पोझिशन मेमरीमध्ये साठविलेली असते. मशिनची पॉवर गेल्यास किंवा मशिन बंद केल्यास आणि पुन्हा चालू केल्यास टूल बदल पोझिशन आहे तशी रहात (रिटेन) नाही, ती मेमरीतून नाहीशी झालेली असते, ती पुन्हा त्यात नोंदवावी लागते.
 
Z अक्ष पोझिशन रजिस्टर
उभ्या (व्हर्टिकल) मशिनमध्ये स्वयंचलित टूल बदल होण्यासाठी Z अक्ष मशिन झीरोपर्यंत मागे न्यावा लागतो. पोझिशन रजिस्टर मूल्य प्रोग्रॅम झीरोपासून Z अक्षावरील संदर्भ टूल टिपपर्यंत किंवा Z अक्ष मशिन झीरोला असताना घ्यावे लागते. प्रत्येक टूलला Z मूल्य वेगळे असते.

6_3  H x W: 0 x 
 
प्रोग्रॅमिंग उदाहरण
उभ्या मशिनिंग सेंटरवर कार्यवस्तू प्रोग्रॅममध्ये पोझिशन रजिस्टर कमांड वापरण्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे लागते.
1. प्रथम यंत्रण टूल बदलून घ्या.
2. कोणत्याही टूल हालचालीच्या आधी G92 प्रस्थापित करून घ्या.
3. यंत्रणाचे काम पूर्ण झाल्यानंतर टूल G92 पोझिशनला यायलाच हवे. त्यासाठीचा प्रोग्रॅम पुढे दिला आहे.
02501 (प्रोग्रॅम नंबर)
N1 G21 (सेट मेट्रिक युनिट)
N2 G17 G40 G80 G90 T01 (टूल 1 तयार)
N3 M06 (टूल नंबर 1 स्पिंडलमध्ये)
N4 G92 X15 Y10 Z40 (करंट XY सेट)
N5 G00 X5 Y1 S800 M03 (पोझिशनला हलविणे)
N6 Z1 M08 (मूव्ह टू क्लिअर अबोव्ह)
N7 G01 Z-0.5 F5.0 (फीड टू डेप्थ)
N8 X5 Y7 F7.0 (खाच यंत्रण)
N9 G00 Z40 M09 (रॅपिड टू न मशिन झीरो)
N10 X15 Y10 M05 (रॅपिड टू दध सेट पोझिशन)
N11 M01 पर्यायी थांबा (ऑप्शनल स्टॉप) टूल 1 साठी
 
स्किप कमांड (G31)
स्किप कमांड आणि ब्लॉक स्किप कमांड या दोन वेगवेगळ्या कमांड आहेत. ब्लॉक स्किप कमांड (\) या खुणेद्वारे दाखविली जाते. ही कमांड फर्स्ट ब्लॉक कॅरॅक्टर म्हणून येते. G31 ही प्रोग्रॅमेबल मोशन कमांड आहे. या कमांडचा वापर सी.एन.सी. मशिनवरील प्रोबिंग डिव्हाइससाठी होतो. तसेच स्वयंचलित टूल लांबी मोजमापन (ऑटोमॅटिक टूल लेंथ मेजरमेंट) आणि पार्ट अलाइनमेंट या ॲप्लिकेशनसाठीही या कमांडचा वापर होतो.
G31 कमांड ही G01 सारखीच आहे. लिनिअर इंटरपोलेशन, आर्कसाठी ही कमांड वापरता येत नाही. त्याचबरोबर नेहमीच्या यंत्रणासाठीदेखील ती वापरता येत नाही. ही कमांड G40 कटर त्रिज्या कॅन्सल मोडमध्येच वापरावी लागते.
 
G31 स्किप फंक्शन
G31 प्रोग्रॅम फॉर्मॅट
G31 X(U)...Z(W)...P...F... 
X, Z - G90 ॲब्सोल्युट कमांडमध्ये एंड पॉइंट कोऑर्डिनेट

6_1  H x W: 0 x 
 
G91 इन्क्रिमेंटल कमांडमध्ये एंड पॉइंट कोऑर्डिनेट
P - P1 ते P4 ठरविलेले स्किप सिग्नल सोर्स. जर झ निश्चित केला नाही तर पहिले निर्धारित P1 मूल्य घेतले जाते.
F - G31 ब्लॉकमधील सरकवेग
कार्य : G31 ही कमांड G01 प्रमाणेच काम करते. परंतु, जर कार्यरत असताना स्किप सिग्नल आला तर तो ब्लॉकचे काम करण्याचे थांबवितो आणि प्रोग्रॅम पुढील ब्लॉककडे जातो.

joshi_2  H x W: 
 
स्किप सिग्नल ट्रिगर झाल्यावर, सिस्टिम ब्रेक पॉइंटचे कोऑर्डिनेट साठवून ठेवते.
 
 
 

joshi_1  H x W: 
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
0 8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@