प्रतलाची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    15-Jun-2020
Total Views |
 
 
सी.एन.सी. मशिनवर काम करत असताना ज्यावेळी सर्क्युलर इंटरपोलेशन करण्याची वेळ येते. त्यावेळी प्रतलाची निवड (प्लेन सिलेक्शन) हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जेव्हा सी.एन.सी. मशिन सुरू केले जाते, त्यावेळी काही ठराविक G कोड आपोआप चालू होतात. अशा आपोआप चालू होणाऱ्या सर्व G कोडला डिफॉल्ट G कोड असे म्हणतात.
 
प्रतल म्हणजे काय?
प्रतल म्हणजे असा पृष्ठभाग, ज्यामध्ये सरळ रेषेने जोडले जाणारे कोणतेही बिंदू संपूर्णपणे त्या पृष्ठभागावरच राहतील.
  
प्रतलामधील यंत्रण
कटिंग टूलचा मार्ग हा सरळ रेषा आणि आर्क यांचे एकत्रीकरण असते.
 
सी.एन.सी. मिलिंग मशिनवर G17 X-Y प्रतल हा कोड मशिन चालू केल्यावर आपोआप चालू होतो. तसेच सी.एन.सी. लेथवर G18 Z-Y प्रतल हा कोड मशिन चालू केल्यावर आपोआप चालू होतो.

3_2  H x W: 0 x 
 
सी.एन.सी. लेथवरील सर्व कामे X आणि Z अक्षावर होत असल्यामुळे आणि मशिन चालू होताना G18-Z-X प्रतल आपोआप चालू होत असल्यामुळे प्रतल बदलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. जेव्हा सर्क्युलर इंटरपोलेशन X आणि Y या अक्षामध्ये करायचे आहे, त्यासाठी सर्क्युलर इंटरपोलेशनचा सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू हे दोन्ही X-Y अक्षामध्ये असतील तर सी.एन.सी. मशिन योग्य आणि हवा असलेला कंस (आर्क) आणि वर्तुळ कापेल. परंतु, समजा तुम्हाला जर सी.एन.सी. मिल बेडवर 2D डोम आकारात यंत्रण करायचे असेल तर प्रचलित सर्वसामान्य सी.एन.सी. यंत्रण पद्धती चालणार नाहीत. या प्रकारचे यंत्रण करण्यासाठी पुढील दोन पर्याय उपलब्ध आहेत.
 
1. यंत्रभाग मिलच्या बेडवर फिट करा. ज्यामुळे सर्वसामान्य X आणि Y अक्षामध्ये डोम यंत्रण करता येईल.
2. G17 X-Y प्रतलापासून दुसऱ्या प्रतलाची निवड करा. दुसऱ्या प्रतलाची निवड, कंस कोणत्या दिशेत यंत्रण करावयाचा आहे, त्यावर अवलंबून असते. (चित्र क्र. 1)

3_3  H x W: 0 x 
 
G17 - X आणि Y अक्ष प्रतल
G18 - X आणि Z अक्ष प्रतल
G19- Y आणि Z अक्ष प्रतल
 
फॉरमॅट 1
G17 G02/G03 X-Y-I-J-F
G18 G02/G03 X-Z-I-K-F
G19 G02/G03 Y-Z-I-K-F
 
फॉरमॅट 1 मध्ये कंस निश्चित करण्यासाठी प्रथम मध्यबिंदू ठरविला पाहिजे. त्यासाठी I.J.K चा वापर करावा लागतो. मध्यबिंदू सध्याच्या प्रतलामध्येच निवडावा लागतो.
 
I,J,K-X,Y, Z शी संबंधित असतात. मध्यबिंदूवरून अक्ष आणि कोणती दोन अंतरे निवडावीत हे ठरते. उदाहरणार्थ, (G17) X,Y प्रतलासाठी I आणि J. त्याचबरोबर I,J,K अबसोल्युट किंवा इन्क्रिमेंटल (चित्र क्र. 2) या दोन्हींपैकी एका मोडमध्ये निवडता येतात. त्यासाठी स्वतंत्र G कोड वापरावे लागते.
G20
G21

5_1  H x W: 0 x 
 
फॉरमॅट 2
G17 G02/G03 X-Y-R-F
G18 G02/G03 X-Z-R-F
G19 G02/G03 Y-Z-R-F 
या फॉरमॅटमध्ये R चा वापर प्रत्यक्ष अपेक्षित त्रिज्या कंसासाठी केला जातो. जेव्हा कंसाचे यंत्रण फक्त सुरुवातीचा बिंदू, शेवटचा बिंदू आणि त्रिज्या यावरून करावयाचे असते, त्यावेळी दोन पर्याय उपलब्ध होतात. (चित्र क्र. 3)

3_1  H x W: 0 x 
 
1. आर्क स्वीप 1800 पेक्षा कमी
2. आर्क स्वीप 1800 पेक्षा जास्त
त्रिज्येच्या मूल्याची +Ve किंवा -Ve खूण कोणत्या कंसाचे यंत्रण करावयाचे आहे, ते ठरविते.
R चे +Ve मूल्य : आर्क स्वीप 1800 पेक्षा कमी.
ठ चे -Ve मूल्य : आर्क स्वीप 1800 पेक्षा जास्त.

4 6_2  H x W: 0 

4 6_1  H x W: 0 
 
उदाहरण 1 (G17 साठी)
X-Y प्रतलामध्ये कंस मध्य (1.0, 0.0) असून त्रिज्या 2.0" आहे. सुरुवातीचा बिंदू (3.0, 0.0) असून स्वीप 900 CCW आहे. सरकवेग 10 युनिट/मिनिट आहे. यासाठीचा कंस यंत्रण करण्याचा प्रोग्रॅम. या उदाहरणासाठीचा प्रोग्रॅम दोन पद्धतीने लिहिता येतो. (तक्ता क्र. 1)
उदाहरण 2 (G18 साठी)
टर्निंग मशिनवर मशिन सुरू केल्यावर लगेच आपोआप G18 सुरू होते. त्यामुळे वेगळी G18 कमांड द्यावी लागत नाही. हवा असणारा प्रोग्रॅम केला की काम होते.

joshi_2  H x W: 
 
चित्र क्र. 4 मध्ये बिंदू P2 पासून P3 आणि त्यानंतर P3 पासून P4 पर्यंतचा प्रोग्रॅम दिला आहे.
 
G02 X 25.0 Z-10.0 R5.0 F0.25
G03 X39.0 Z-17.0 R7.0 
अबसोल्युट मोड (G90)
N1 G17 G21 G54 G95
N2 T01 M06 G43 M08
N3 S1000 M03 Z50
N4 G90 G00 X30 Y10
N5 G90 Z-22 F50
N6 G01 X50 Y10
N7 G01 X50 Y30
N8 G01 X70 Y30
N9 G01 X70 Y10
N10 G01 X90 Y10
N11 G03 X110 Y30 R20 F10
N12 G01 X110 Y90 
N13 G03 X90 Y110 R20 F10
N14 G01 X30 Y110
N15 G03 X10 Y90 R20 F10
N16 G01 X10 Y30
N17 G03 X30 Y10 R20 F10
N18 G90 G00 Z50
N19 G90 G00 X110 Y110 F50
N20 M05
N21 M09
N22 M30
 
 
 
 

joshi_1  H x W: 
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार 
8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@