मिलिंगमधील वर्तुळाकार अंतर्वेशन - 2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    02-Jul-2020   
Total Views |
 
 
‘धातुकाम’ फेब्रुवारी 2019 च्या अंकात आपण सी.एन.सी. प्रोग्रॅममध्ये टूलच्या कंटूरशी संबंधित असलेल्या लिनिअर अंतर्वेशन (इंटरपोलेशन) आणि सर्क्युलर अंतर्वेशन (इंटरपोलेशन) या दोन हालचालींविषयी माहिती घेतली. या लेखात आपण बॉस मिलिंगबद्दल जाणून घेणार आहोत.
 
बॉस मिलिंग (चित्र क्र. 9)

2_2  H x W: 0 x 
 
पूर्ण वर्तुळाच्या बाह्य मिलिंगमध्ये बॉस किंवा स्पिगॉट मिलिंग हे पारिभाषिक शब्द वापरण्यात येतात. याच्या उलट प्रकार म्हणजे गोलाकार खोबणीचे पूर्ण वर्तुळाकृती अंतर्गत मिलिंग. 0.375” खोलीवर प्रोग्रॅम करताना 0.75” चा व्यास असलेला एंड मिल कटर वापरला आहे. या कामासाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम पुढे दिला आहे.
 
02930
( 0.75” व्यासाचा एंड मिल कटर)
N1 G20
N2 G17 G40 G80
N3 G90 G54 G00 X -1.0 Y1.5 S750 M03
N4 G43 Z0.1 H01
N5 G01 Z-0.375 F40.0 M08
N6 G41 Y0.906 D01 F20.0 
N7 Y0 F14.0
N8 G02 J-0.906
N9 G01 X 1.0 F20.0 M09
N10 G40 Y1.5 F40.0 M05
N11 G91 G28 X0 Y0 Z2.0
N12 M30
%
 
बॉस मिलिंगचे उदाहरण

2_1  H x W: 0 x 
 
टूलची हालचाल (चित्र क्र. 10)
अंतर्गत वर्तुळाचे यंत्रण : अंतर्गत वर्तुळाचे यंत्रण ही नेहमीची बाब आहे. वर्तुळाकार खोबणी किंवा काउंटरबोअर अशी त्याची उदाहरणे आहेत.
 
उदाहरण : 0.250” खोलीवर Ø 1.25” च्या गोलाकार पोकळीचे यंत्रण करायचे आहे. जिथे एंट्री करायचा बिंदू महत्त्वाचा नसेल तिथे सुरुवात करताना सामान्य रेखीय हालचाल वापरली जाईल. यंत्रणासाठी सेंटर कटिंग एंड मिलचा वापर केला आहे. (चित्र क्र. 11)
 
4_2  H x W: 0 x
 
03500
(0.5 व्यासाचे सेंटर एंड मिल)
G1 G20
N2 G17 G40 G80
N3 G90 G54 G00 X0 Y0 S900 M03
N4 G43 Z0.1 H01
N5 G01 Z-0.25 F10.0 M08
N6 G41 Y0.625 D01 F12.0
N7 G03 J-0.625
 
वरील प्रोग्रॅममध्ये कंसाचा प्रारंभबिंदू आणि अंतिमबिंदू दोन्हीही घड्याळातील 12 वाजताच्या स्थितीवर प्रोग्रॅम केले असताना 90 अंशावर दाखवितात. कंसाच्या केंद्रापासून होणाऱ्या हालचालीदरम्यान कटरच्या त्रिज्येइतका ऑफसेट सुरू होतो.

4_1  H x W: 0 x 
 
अंतर्गत वर्तुळाचे यंत्रण - वर्तुळाकार प्रवेश : पृष्ठीय फिनिश सुधारण्यासाठी वर्तुळाकार हालचालीच्या प्रारंभबिंदूपर्यंत एका कंसाकार मार्गाने पोहोचता येते. नेहमी सुरुवात केंद्रापासून केली जाते. प्रथम 45 अंश रेखीय हालचाल करून कटरच्या त्रिज्येचा ऑफसेट दिला जातो आणि नंतर एका वर्तुळात सामावणाऱ्या कंसावरून सुरुवात केली जाते. (चित्र क्र.12)

6_2  H x W: 0 x 
 
03501
(0.5 व्यासाचे सेंटर एंड मिल)
N1 G20
N2 G17 G40 G80
N3 G90 G54 G00 X0 Y0 S900 M03
N4 G43 Z0.1 H01
N5 G01 Z-0.25 F10.0 M08
N6 G41 X0.3125 Y0 0.3125 D01 F12.0
N7 G03 X0 Y0.625 R0.3125
N8 J-0.625
N9 X-0.3125 Y0.3125 R0.3125
N10 G01 G40 X0 Y0 F20.0 M09
N11 G91 G28 X0 Y0 Z2.0 M05
N12 M30 
%
 
वर्तुळ कापण्याचे आवर्तन
 
बऱ्याच मशिनच्या नियंत्रकामध्ये (कंट्रोलर) वर्तुळ कापण्याची आज्ञावली समाविष्ट असते. ही सोय मित्सुबिशी आणि यासनॅकमध्ये असते, परंतु फानुकमध्ये नसते. यात संपूर्ण वर्तुळ कापण्यासाठी विशेष प्रारंभिक आज्ञा, नमुनादाखल G12 आणि G13 समाविष्ट असतात. प्रोग्रॅमिंगसाठी ही अतिशय उपयुक्त अशी सोय आहे. परंतु काही वर्षांपासून फानुकने ती द्यायचे बंद केले आहे.
 
G02 आणि G12 तसेच G03 आणि G13 यांच्यात एक तार्किक संबंध असतो.
G12 पूर्ण वर्तुळ कापण्याचे आवर्तन CW
G13 पूर्ण वर्तुळ कापण्याचे आवर्तन CCW (चित्र क्र.13)

6_1  H x W: 0 x 
 
प्रोग्रॅम फॉरमॅट
G12 I.... D... F CW
G13 I.... D... F CCW
I : पूर्ण झालेल्या वर्तुळाची त्रिज्या जिला एका चिन्हासहित वाढीव मूल्यात प्रोग्रॅम केलेले असते.
D : कटरच्या त्रिज्येच्या ऑफसेटसाठी कंट्रोल रजिस्टर क्रमांक.
F : सरकवेग
 
धन चिन्ह : यंत्रणाचा प्रारंभबिंदू 0 अंशावर असेल.
ऋण चिन्ह : यंत्रणाचा प्रारंभबिंदू 180 अंशावर असेल.
 
इतर अटी
1. कटिंग टूलच्या कामाचा प्रारंभ नेहमी गोलाकार खोबणीच्या केंद्रस्थानापासून झाला पाहिजे.
2. यंत्रणाचे प्रतल नेहमी XY प्रतल असे सेट केले पाहिजे.
3. कंसाचा प्रारंभबिंदू सामान्यतः अंतर्भूत केलेला असतो, तो 0 किंवा 180 अंश असा ठेवला जातो. (Y अक्षातून प्रारंभ करणे शक्य नसते.)
4. कटरच्या त्रिज्येचा अंतर्भूत केलेला ऑफसेट उजवीकडे G12, डावीकडे G13.
5. G12 आणि G13 चा उपयोग करीत असताना G41 आणि G42 या आज्ञांचा वापर करू नका.
उदाहरण : G 12/ G 13 आवर्तने वापरून संपूर्ण वर्तुळाचे यंत्रण
 
प्रोग्रॅम
03502 (0.5 व्यासाचे सेंटर कटिंग एंड मिल)
N1 G20
N2 G17G40G80
N3G90G54G00X0y05900M03
N4G43Z0.1H01
N5G01Z-0.25F10.0M08
N6G13I0.625D01F12.0M09
N7G91G28X0y0Z2.0M05
N M30
%.
 
 
 

satish_1  H x W 
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@