हॉरीझॉन्टल बोरिंग मिल मशीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Udyam Prakashan Marathi    09-Sep-2020   
Total Views |

1_1  H x W: 0 x


जेव्हा मोठ्या संख्येने उत्पादन (मास प्रॉडक्शन) करावयाचे असते तेव्हा सामान्यतः हॉरिझाँटल मशीनिंग सेंटर (एच.एम.सी.) वापरले जाते. मोठ्या संख्येने निर्मिती करावयाच्या यंत्रभागांच्या उत्पादनात सक्रिय नसणारा, परंतु मोठ्या यंत्रभागांचे (अवजड यंत्रभाग/स्ट्रक्चरल भाग आणि इतर) यंत्रण करणारा कारखानदारांचा एक मोठा वर्ग या उद्योगक्षेत्रात आहे. या प्रकारच्या कामासाठी अजूनही पारंपरिक मशीनच वापरल्या जातात. ही पोकळी भरण्याचा प्रयत्न आम्ही 'हुर्को'मध्ये करीत आहोत. मोठ्या यंत्रभागांचे यंत्रण करणाऱ्या उद्योजकांसाठी आम्ही हॉरिझाँटल बोअरिंग मिल विकसित करण्याचा विचार केला.
हॉरिझाँटल मिलिंग मशीन आणि बोअरिंग मिलमधील सर्वात मोठा फरक म्हणजे कामाचा आवाका आणि कार्यवस्तूचा आकार. उदाहरणार्थ, वस्त्रोद्योगातील मशीन बॉडी, प्रेस बॉडी आणि इतर मोठ्या यंत्रभागांचे यंत्रण एच.एम.सी.वर करणे शक्य नाही, कारण मशीनची वजन पेलण्याची मर्यादा आणि कार्यवस्तूचा आकार. अशावेळी हॉरिझाँटल बोअरिंग मिल उपयोगी असते. वाहन उद्योगातील आणि इतर उद्योगातील मोठ्या संख्येने उत्पादन करण्याच्या यंत्रभागांसाठी एच.एम.सी. वापरले जाते, तर आकाराने मोठ्या असलेल्या यंत्रभागांच्या उत्पादनासाठी बोअरिंग मिल वापरले जाते. बोअरिंग मिलची दृढ संरचना (रिजिड कन्स्ट्रक्शन) आणि त्यात असणारे गिअर हेड स्पिंडल, वाइड बॉक्स गाइडवेज यांच्यामुळे अवजड यंत्रभागांच्या उत्पादकांसाठी हा योग्य पर्याय आहे.
 
मोठ्या प्रमाणावर मागणी असतानादेखील आम्ही हा प्रकल्प उशीरानेच हातात घेतला असे म्हटले पाहिजे. कोणत्याही नवीन प्रक्रियेचा अवलंब करताना त्या प्रत्येक नवीन प्रक्रियेमध्ये आव्हाने असतातच. जेव्हा आम्ही HBM मालिका विकसित करीत होतो, तेव्हा आम्ही आमच्याच HMX मालिकेबरोबर स्पर्धा करीत आहोत की काय असे आम्हाला वाटत होते. HBM आणि HMX या दोन्ही मशीन वेगवेगळ्या संकल्पनांवर बनविलेल्या असल्या तरीही त्यावेळी त्यांच्यातील स्पर्धेचा विचार केला होता. नवीन उत्पादनाला बाजारात कसा प्रतिसाद मिळेल, हे दुसरे आव्हान होते. माझ्या मते आमच्या या मशीनला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परदेशात आतापर्यंत जवळपास 20 मशीन विकण्यात आलेल्या आहेत.

 
2_1  H x W: 0 x

HBMX मालिकेतील मशीन (चित्र क्र. 1) मोठ्या आकाराच्या यंत्रण उद्योगांना लक्ष्य करतात. उदाहरणार्थ, मशीन टूल निर्माते, वस्त्रोद्योगातील मशीन आणि प्रिंटिंग मशीनची निर्मिती
करणाऱ्या कंपन्या.
वर उल्लेख केलेल्या उद्योगक्षेत्रात हॉरिझाँटल बोअरिंग मिल मशीन प्रमुख मशीन म्हणून वापरले जाते. यात 2500 Nm पर्यंत टॉर्क निर्माण करणारे गिअर हेड स्पिंडल आहेत. याच्या क्विलची लांबी 900 मिमी. आहे. त्यामुळे आपल्याला यंत्रणाचा विस्तृत पल्ला मिळतो. LM गाइडवेऐवजी त्यामध्ये बॉक्स गाइडवे दिलेले आहेत. यात संपर्काचे क्षेत्र (काँटॅक्ट एरीया) जास्त असते आणि उच्च पॅरामीटरवर यंत्रण करताना निर्माण होणारे थ्रस्ट आणि कंपने (व्हायब्रेशन) सहजपणे शोषून घेतली जातात.

या उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये
अक्षांची लांबी : HBMX मध्ये X, Y, Z अक्षांची लांबी अनुक्रमे 2400 मिमी., 2100 मिमी., 1500 मिमी. आणि W अक्षाचा (स्पिंडलमधून बाहेर येणारे क्विल) व्यास 135 मिमी. आणि लांबी 900 मिमी. असते.
टेबलचा पृष्ठभाग : टेबलचा काम करण्याचा पृष्ठभाग 1800 मिमी. x 2000 मिमी. असल्याने आपण मोठ्या यंत्रभागांचे यंत्रण करू शकतो.
क्विल : HBMX मध्ये 135 मिमी. व्यास आणि 900 मिमी. लांबी असलेले पुढे जाणारे क्विल (चित्र क्र. 2) असते. त्यामुळे टूलला लहान पोकळ्यांमध्ये पोहोचण्यासाठी लांबलचक टूलिंगची आवश्यकता नसते.
  
3_1  H x W: 0 x

गिअर हेड स्पिंडल : आमच्या बोअरिंग मिलच्या डिझाइनमध्ये दोन गती असलेली गिअर हेड स्पिंडल (चित्र क्र. 3) दिलेली आहेत. उच्च (हाय) गिअरसाठी 10-1500 आर.पी.एम. आणि कमी (लो) गिअरसाठी 10-350 आर.पी.एम. अशी गती असते. 548 Nm ते 2500 Nm टॉर्क निर्माण केला जातो. या स्पिंडलमध्ये कायमस्वरुपी ग्रीस पॅक केलेली ABEC 7 प्रिसिजन क्लास अँग्युलर काँटॅक्ट हायब्रिड सिरॅमिक बेअरिंग दिलेली आहेत.
  

4_1  H x W: 0 x 
 
सरकवेग (फीड) : यात 10 मी./मिनिट रॅपिड ट्रॅव्हर्स आणि 7.6 मी./मिनिट सरकवेग असतो.
 
बॉल स्क्रू : HBMX मध्ये X, Y, Z अक्षांसाठी 80 मिमी. बॉल स्क्रू आणि W अक्षासाठी 63 मिमी. बॉल स्क्रू दिलेला असतो.
 
रोटरी टेबल : HBMX मध्ये एक चौथ्या अक्षाचे कंटूरिंग रोटरी टेबल (चित्र क्र. 4) दिलेले असते, (केवळ स्थितीगत नाही) ज्याची पुनरावर्तनक्षमता 18 मायक्रॉन असते.
  

5_1  H x W: 0 x 
 
वजन : जास्तीतजास्त 10,000 किलो वजनाची कार्यवस्तू या मशीनवर लावता येते आणि मशीनचे एकूण वजन 26,000 किलो आहे.
अॅप्रोच : बऱ्याचवेळा बोअरिंग ऑपरेशन करताना, आपल्याला प्रवेश (अॅप्रोच) मिळविण्यासाठी मोठ्या आकाराचा किंवा विशेष बोअरिंग बार वापरण्याची आवश्यकता असते. यामुळे बोअरिंग ऑपरेशनचा एकूण खर्च खूप वाढतो. बोअरिंग मिलमध्ये उपलब्ध असलेला W अक्ष वापरल्याने कोणतेही खास बोअरिंग टूल न वापरता आपल्याला यंत्रणासाठी सुलभ प्रवेश मिळतो, ज्यामुळे यंत्रणाचा खर्च वाढत नाही. चिप ब्रेकिंग आणि कटिंग टूलचे
आयुर्मान वाढविण्यासाठी कूलंट थ्रू स्पिंडल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
 
बॉक्स गाइडवे : यात तीनही अक्षांसाठी 155 मिमी. रूंदीचे कठिणीकरण केलेले बॉक्स गाइडवे (चित्र क्र. 5) दिलेले आहेत, ज्यामुळे खोल काप घेताना कंपने शोषली जातात.

6_1  H x W: 0 x 
 
आरपार शीतक प्रवाह : 15 बार दाबाने स्पिंडलच्या आरपार (थ्रू) शीतक प्रवाह मिळतो, ज्यामुळे खोल मिलिंग ऑपरेशनदरम्यान चिप बाहेर काढण्यास मदत होते आणि कटिंग टूलचे आयुर्मान वाढते.
रेखीय ग्लास स्केल : उच्च तापमान क्षेत्रात कार्य करीत असताना औष्णिक स्थिरता (थर्मल स्टॅबिलिटी) टिकवून ठेवण्यासाठी आणि अचूकता वाढविण्यासाठी यामध्ये सर्व तीनही अक्षांमध्ये रेखीय ग्लास स्केल दिलेले आहेत.
 
ए.टी.सी. : यामध्ये 60 टूलचे स्टँडर्ड ऑटोमॅटिक टूल चेंजर (ए.टी.सी.) आणि 90 टूलचे पर्यायी ए.टी.सी. आहे. यामुळे यंत्रणादरम्यान अनेक टूल संचयित करणे सुलभ होते.
 
हुर्को विन्मॅक्स सी.एन.सी. कंट्रोलर : संभाषणाद्वारे आणि एन.सी. मोड किंवा दोघांद्वारे टूलमार्गाची निर्मिती करता येते. यंत्रण आवश्यक असलेल्या कोणत्याही यंत्रभागासाठी प्रक्रियेस लागणारा एकंदर वेळ कमी करण्यास अंतिम वापरकर्त्याला सक्षम करते. +3 हुर्को नियंत्रक (कंट्रोलर) वापरण्याच्या फायद्यासंबंधी अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी कृपया http://www.HurcoCanHelp.com लिंकवर क्लिक करा.
 
कॉलम : उच्च सरकवेगाने यंत्रण करताना, विशेषत: उच्च पॅरामीटरसह रफिंगदरम्यान, दृढपणासाठी मशीनमध्ये भरभक्कम (मॅसिव्ह) कॉलम दिलेले आहेत. 
 
सर्वाधिक पसंतीचा नियंत्रक : आमच्या मॅक्स 5 या नियंत्रकामध्ये बाजारात उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्यात अल्टिमोशन/4 जीबी प्रोग्रॅम मेमरी, 128 जीबी मशीन मेमरी, अपडेटेड प्रोसेसर, 3D सिम्युलेशन ग्राफिक्स, इंटरप्ट फंक्शन यांसारखी बरीच प्रगत वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे हा नियंत्रक वापरकर्त्यासाठी अत्यंत लवचीक आणि अनुकूल ठरतो. 2017 मध्ये मॅक्स 5 नियंत्रकाला जगातील सर्वाधिक पसंतीचा नियंत्रक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
 
टूल चेंज ऑप्टिमायझेशन : टूल चेंज ऑप्टिमायझेशन यंत्रभाग, यंत्रणाच्या प्रोग्रॅमचे विश्लेषण करते आणि चांगल्या कार्यक्षमतेसाठी टूल बदलांची स्वयंचलितपणे पुनर्रचना करून टूल बदलांची संख्या कमी करते.
 
एन.सी. कोड : हुर्को कंट्रोल इंडस्ट्री स्टँडर्ड, फानुक, सीमेन्स आणि इतर बऱ्याच कंट्रोलसोबत वापरल्या जाणाऱ्या एन.सी. कोडशी जमवून घेते. (ज्यास EIA/ISO किंवा G कोडदेखील म्हटले जाते.) आपल्याकडील उपलब्ध एन.सी. प्रोग्रॅमसुद्धा हुर्कोवर वापरू शकता. फानुकचा अनुभव असणाऱ्या मशीन ऑपरेटरला एन.सी. मोडमध्ये हुर्को मशीन ऑपरेट करण्यास सोयीस्कर वाटेल.
 
एन.सी. एडिटर : एन.सी. प्रोग्रॅम लिहिणे किंवा संपादित करणे यासाठी शक्तिशाली एन.सी. एडिटर हा सर्वात वेगवान उपाय आहे. एडिटर लाल रंगात चुकीचा वाक्यप्रयोग (सिंटॅक्स) दाखवितो आणि रिअल टाइममध्ये हिरव्या रंगात शेरे दाखवितो. कर्सर हलविला असता प्रत्येक कोडचा अर्थदेखील हुर्को एन.सी. एडिटर दाखवितो.
आपण ज्यांचे संभाषणात्मकरीत्या (कम्युनिकेटिव्ह) प्रोग्रॅम करू शकत नाही अशा कंटूर आणि 3D वैशिष्ट्ये असलेल्या एन.सी. प्रोग्रॅमच्या सर्व किंवा विशिष्ट भागाला संभाषणात्मक प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करण्यास हा आपल्याला अनुमती देतो.
वेळ वाचणे, प्रोग्रॅमिंग सुलभ होणे आणि विद्यमान प्रोग्रॅमचे संपादन सुलभ होणे असे फायदे यामधून आपल्याला मिळतात. कॉपी/कट/पेस्ट आणि फाइंड/रीप्लेस यासारखी प्रगत वैशिष्ट्ये संपादन जलद आणि सुलभ करतात. हुर्को कंट्रोलद्वारे संपूर्ण मॅक्रो B आणि एन.सी. प्रोग्रॅमरद्वारे वापरलेले जवळजवळ सर्व G आणि M कोड वापरता येतात.
 
अल्टीमोशन सॉफ्टवेअर : उत्कृष्ट मोशन आणि जर्क नियंत्रण करता येते. त्यात 0.44 mS ब्लॉक प्रोसेसिंग स्पीडसह 10,000 ब्लॉक्सचे व्हेरिएबल लुक अहेड फंक्शन आहे. टूल मार्गाला 'तर्कसंगत' (रॅशनल) करण्याची क्षमतादेखील त्यात आहे. मशीन स्लाइडच्या अॅक्सिलरेशन आणि डिसिलरेशनवरील विलक्षण नियंत्रणासह उच्च गती, यंत्रण सक्षम करते आणि त्याच्या परिणामस्वरूपे यंत्रणाचा वेळ कमी होतो. पृष्ठीय फिनिश आणि अचूकता वाढते. आम्ही नेहमीच नवीन सुधारणा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
 
 
 

7_1  H x W: 0 x 
मयंक त्रिपाठी
प्रॉडक्ट स्पेशालिस्ट,
हुर्को इंडिया प्रा. लि.
 
600017434
[email protected]
मयंक त्रिपाठी हुर्को इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये प्रॉडक्ट स्पेशालिस्ट आहेत. त्यांना मॅन्युफॅक्चरिंग आणि सेल्स आणि अॅप्लिकेशनमधील कामाचा 11 वर्षांचा अनुभव आहे.
@@AUTHORINFO_V1@@