कटिंग टूलसाठी तपासणी आणि माेजमापन यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    11-Feb-2021   
Total Views |
 कटिंग टूलचे ( Cutting Tool ) एकाहून अधिक पॅरामीटर मोजण्यासाठी पारंपरिक मोजमापन उपकरणांपेक्षा ऑप्टिक्स आणि लेझरसारखे स्पर्शविरहित तंत्रज्ञान वापरून अधिक अचूक आणि जलद मोजमापन करता येते. झोलर कंपनीने कटिंग टूल उत्पादकांसाठी विकसित केलेल्या स्माइलचेक टूल प्रीसेटर मशीनची क्षमता, वैशिष्ट्ये आणि फायदे याबाबत वैविध्यपूर्ण तपशीलवार माहिती या लेखात देण्यात आली आहे.
भारतातील कटिंग टूल उद्योग प्रगतीपथावर असून त्याचा एक पुरावा म्हणजे अनेक स्वतंत्र उद्योजकांचा कार्बाइड आणि पॉलिक्रिस्टलाइन डायमंड (PCD) टूल निर्मितीच्या क्षेत्रामधील प्रवेश होय. टूल निर्मात्यांना सध्याच्या स्पर्धेत अग्रेसर राहण्यासाठी, कटिंग टूलच्या तपासणीसाठी समर्पित (डेडिकेटेड) मशीनमध्ये गुंतवणूक करून गुणवत्तेवर जोर देणे आवश्यक आहे.

1_1  H x W: 0 x
बाजारामध्ये या कामासाठी उपयुक्त असणारी विविध मशीन उपलब्ध आहेत. त्यांची अचूकता आणि बहुपयोगिता यामध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. झोलर कंपनीच्या 'स्माइलचेक' या प्रीसेटिंग आणि मापन मशीनमध्ये (चित्र क्र. 1) 2D मोजमापन आणि प्रीसेटिंगच्या कामासाठी एक प्राथमिक कॅमेरा वापरण्यात आला आहे. त्याशिवाय कटिंग टूलच्या परिघावरील तसेच फेसवरील पॅरामीटरची तपासणी करण्यासाठी एक दुय्यम टूल तपासणी कॅमेराही दिलेला आहे. अशा अत्याधुनिक मोजमापन उपकरणामुळे केवळ उत्पादनाची गुणवत्ताच सुधारत नाही, तर ग्राइंडिंग मशीन ऑपरेटर आणि गुणवत्ता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी होऊन संपूर्ण प्रक्रियेतून येणारा शीण टाळण्यासदेखील मदत होते.
मशीनमध्ये वापरलेले तत्त्व

2_1  H x W: 0 x
स्माइलचेक, प्रतिमेवर प्रक्रिया (इमेज प्रोसेसिंग) करण्याच्या तत्त्वावर कार्य करणारे स्पर्शरहित टूल मापन मशीन आहे.कटिंग टूलचे ( Cutting Tool ) बहुविध पॅरामीटर मोजण्यासाठी ऑप्टिक्स कॅरियरवरील प्राथमिक आणि दुय्यम कॅमेरे आपाती (इन्सिडंट) आणि प्रसारित (ट्रान्स्मिटेड) होणाऱ्या प्रकाशाचा वापर करतात. ऑप्टिक्स कॅरियरची X (आडवी - व्यास) आणि Z (उभी - उंची) या दोन्ही अक्षांवरील हालचाल सी.एन.सी. ड्राइव्हच्या (चित्र क्र. 2 ) साहाय्याने केली जाते. यातून एक पूर्णपणे स्वयंचलित आणि सफाईदार मापन प्रक्रिया कार्यान्वित करता येते.
 
आपण ज्याला C अक्ष असे म्हणू शकू, त्या स्पिंडललाही सी.एन.सी. ड्राइव्ह दिलेला आहे आणि त्यामुळे मशीन स्वयंचलितपणे फिरू शकते आणि कटिंग टूलवर फोकस करू शकते. परिभ्रमणाचा कोन अचूकपणे मोजण्यासाठी अतिशय उपयुक्त असा रोटरी एन्कोडर C अक्षावर वैकल्पिकरित्या मिळू शकतो. इंडेक्सिंग त्रुटीसारख्या विशिष्ट पॅरामीटरचे मोजमाप करण्यासाठी याची गरज पडते. ज्यांच्यामध्ये कोणत्याही दोन यंत्रण/कर्तन कडा किंवा पॉकेट यांच्यामध्ये सुसंगत कोनीय विभाजन असणे हा डिझाइनचाच एक भाग असतो, अशा मल्टि एज टूल किंवा कटर बॉडीसाठी हे आवश्यक आहे.
 
झोलरमध्ये गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मशीनच्या हार्डवेअरमध्ये सोनी, टी.एच.के., हायडेनहाइन असे सर्वोत्कृष्ट ब्रँडचेच सर्व घटकभाग वापरले जातात. अक्षीय हालचाल, कॅमेरा आणि इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर यांच्या संयोजनातून 1 मायक्रॉन रिझॉल्यूशन असलेल्या मापन यंत्रणेसाठी ± 2 मायक्रॉनची अचूकता असलेले मापन परिणाम दिले जातात. ड्रॉबार यंत्ररचना अंतर्भूत असलेले पर्यायी 'पॉवर क्लॅम्पिंग स्पिंडल' क्लॅम्पिंगमधील विसंगती दूर करण्यास मदत करते आणि त्यामुळे मशीनचे कार्य वापरकर्त्याच्या कौशल्यावर अवलंबून रहात नाही. त्याशिवाय, मशीनचे कार्य स्पर्शरहित असल्याने मोजमाप करतानाकटिंग टूलचे ( Cutting Tool ) नुकसान होण्याचा अजिबात धोका उद्भवत नाही.
क्षमता आणि वैशिष्ट्ये
स्माइलचेकचा प्राथमिक कॅमेरा (चित्र क्र. 3) प्रसारित प्रकाशाखाली उंची, व्यास, स्टेप लांबी, रेडियल रनआउट, अक्षीय रनआउट, नोज त्रिज्या, चॅम्फर कोन असे अनेक पॅरामीटर मोजू शकतो, पण त्याची क्षमता तेवढ्यापुरतीच मर्यादित नसते. दुय्यम कॅमेरा आपल्याला कटिंग टूलच्या परिघावरील आणि फेसवरील काही पॅरामीटर मोजायला मदत करतो. उदाहरणार्थ, हेलिक्स कोन, हेलिकल पिच, अक्षीय रिलीफ कोन (विशिष्ट टूलमध्ये), लँड रुंदी, रेडियल रिलीफ कोन, सेंटर ऑफसेट, चीझल कडेचा कोन इत्यादी.

3 4_1  H x W: 0

3 4_2  H x W: 0 
 
स्माइलचेकमध्ये समजण्यास सुलभ, ग्राफिकल आणि विजेटवर आधारित इंटरफेस असलेले, वापरकर्त्यासाठी अनुकूल पायलट 4.0 सॉफ्टवेअर (चित्र क्र. 5) दिलेले आहे. यातील विविध प्री लोडेड प्रोग्रॅम सध्या अस्तित्वात असलेल्या जवळजवळ सर्व टूलचे मापन करू शकतात. स्टँडर्ड किंवा प्रीमियम पॅकेजचा एक भाग असलेले सध्याचे बहुतेक प्रोग्रॅम ग्राहकांच्या विनंतीनुसार आणि त्यांनी दिलेल्या इनपुटच्या आधारावरच विकसित करण्यात आलेले आहेत. यातील अतिशय साध्या आणि सोप्या इंटरफेस आणि प्री लोडेड प्रोग्रॅममुळे कारखान्यात काम करणाऱ्या ऑपरेटरना यावर सहजपणे शिकून काम करता येते.

5_1  H x W: 0 x
समर्पित तपासणी सॉफ्टवेअर मॉड्यूल 'मेटिस'मुळे वापरकर्ता स्क्रीनवर दृश्यमान असलेले सर्व पॅरामीटर स्वतःच्या नियंत्रणाखाली काही बुद्धिमान (इंटेलिजंट) आणि मार्गदर्शित पर्याय (फंक्शन) वापरून मोजमापन करू शकतो. यात असा एक मंच उपलब्ध करून दिला जातो, ज्यावर वापरकर्ता टूलच्या प्रतिमेवर (चित्र क्र. 6) स्वतःच्या हाताने रेषा काढू शकतो. अर्थात ही सोय जो पॅरामीटर किंवा वैशिष्ट्य मोजले जात असेल त्यावर अवलंबून असते. बुद्धिमान प्रणाली स्वयंचलितपणे त्याच्या सर्वात जवळ असणाऱ्या दृश्यमान वैशिष्ट्याची प्रतिमा टिपते. यामुळे वापरकर्त्याला कामामध्ये पुरेसे स्वातंत्र्य मिळते आणि त्याच वेळी या प्रणालीच्या बुद्धिमत्तेमुळे वापरकर्त्याकडून चूक होण्याची शक्यता कमी होते. पारंपरिक उपकरणे वापरून असे काही करणे शक्य नसते. वैकल्पिकरित्या, कॅप्टो, KM किंवा VDI सारखी जलद बदल अनुकूलन (क्विक चेंज अॅडॅप्टेशन) वापरून टर्निंग टूलच्या मध्याची उंची (सेंटर हाइट) मोजण्यासाठीसुद्धा दुय्यम कॅमेरा वापरला जाऊ शकतो.

6_1  H x W: 0 x
हे मशीन मॉड्यूलर असल्यामुळे त्यात वापरलेल्या अनुकूलन आणि निवडलेल्या प्रकारांनुसार 620 मिमी. व्यास आणि 800 मिमी. उंचीपर्यंतची टूल मोजता येतात. स्टँडर्ड किंवा ग्राहकानुकूल अॅडॅप्टरच्या मदतीने स्पिंडलमध्ये SK, BT, ISO, BBT, HSK, कॅप्टो, VDI, KM, मोर्स इत्यादी विविध प्रकारच्या टूल पकडण्याच्या शैली वापरता येतात, पण हे तेवढ्यापुरते मर्यादित नसते. यामुळे टूल पकडण्याची शैली कोणतीही असली, तरी मशीनमध्ये कोणतेही कटिंग टूल मोजण्याची क्षमता आहे. सॉफ्टवेअरमध्ये एक विशेष ग्राइंडिंग व्हील पॅकेजदेखील (चित्र क्र. 7) आहे. ग्राइंडिंग मशीनमध्ये ग्राइंडिंग व्हीलचा वापर करण्यापूर्वी त्यांचे मापन करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. यामुळे ऑपरेटर ग्राइंडरवरील संबंधित पॅरामीटरसाठी सहज भरपाई (कॉम्पेन्सेशन) करू शकतो आणि ग्राइंडिंग व्हील वापरण्यापूर्वी त्याची स्थिती तपासू शकतो.

7_1  H x W: 0 x
समकेंद्रिततेच्या (कॉन्सेंट्रिसिटी) त्रुटीचा प्रभाव अंतिम परिणामावर होऊ न देता पॅरामीटरचे मोजमाप करणे, हे प्रत्येक टूल उत्पादकासाठी एक आव्हान आहे. 'वॉबल भरपाई' (वॉबल कॉम्पेन्सेशन) तंत्रज्ञानाच्या मदतीने स्माइलचेक हे सहज साध्य करते. हे वैशिष्ट्य टूलच्या मुठीवर (शँक) ठराविक अंतरावरच्या दोन प्रतलांचे अरीय (रेडियल) संरेखन मोजते आणि सॉफ्टवेअरमधून त्यातील चुकीची भरपाई करते. यामुळे टूल पकडण्याच्या सेटअपमधून उद्भवलेल्या समकेंद्रिततेच्या त्रुटीचा प्रभाव काढला जातो. नंतर ऑपरेटर केवळ मापनातील रनआउट आणि इतर पॅरामीटर मोजू शकतो. थोडक्यात, क्लॅम्पिंगमधील फरकाचा कटिंग टूलच्या मोजमापनावर परिणाम होण्याचे टळते.
फॉर्म टूलच्या मोजमापासाठी प्रोफाइल प्रोजेक्टरचा वापर करणे ही एक क्लिष्ट आणि ढोबळ पद्धत आहे आणि यातून मापनाची अपेक्षित अचूकता मिळत नाही. फॉर्म टूलसाठी स्माइलचेकमध्ये 'लासो' नावाचे एक विशेष मॉड्यूल आहे. हे स्पर्शसहित (टॅक्टाइल) फॉर्म ट्रेसरच्या ऑप्टिकल व्हर्जनप्रमाणे कार्य करते. हे फंक्शन, टूल कंटूरचा मागोवा (ट्रॅक) घेते आणि रेकॉर्ड केलेल्या प्रतिमांवर एका DXF फाइलमध्ये प्रक्रिया करते. नंतर विचलन मोजण्यासाठी DXF फाइलची तुलना मास्टर (नाममात्र कंटूर) DXF फाइलशी करता येऊ शकते. 'लासो' खास करून जटिल आणि खास प्रकारची फॉर्म टूल (चित्र क्र. 8) तयार करणाऱ्या उत्पादकांसाठी आहे. नाममात्र कंटूरच्या संदर्भात एक टॉलरन्स बँड नक्की केला जातो. जेव्हा वास्तविक मापनाची DXF फाइल मास्टरवर सुपरइम्पोज केली जाते, तेव्हा चित्र क्र. 9 मध्ये दाखविल्याप्रमाणे, टॉलरन्सच्या बाहेर असलेले विचलन रंगीत आलेखाद्वारे लगेच दाखविले जाते.

8_1  H x W: 0 x
 
 

9_1  H x W: 0 x 
मुख्य फायदे
• उत्कृष्ट अचूकतेसाठी स्पर्शविरहित मापनाचा प्रकार
• पटकन शिकता येईल असे वापरकर्त्याला अनुकूल सॉफ्टवेअर
• वापरकर्त्यावर अवलंबून नसलेले पूर्ण सी.एन.सी. ऑपरेशन
• तांत्रिक आवश्यकतांनुसार कॉन्फिगर करता येण्याजोगी वैशिष्ट्ये
• सहज आणि अचूक मोजमाप करण्यासाठी बिल्ट इन टूल मापन प्रोग्रॅम
• मॉड्यूलर रचनेमुळे सर्व प्रकारच्या टूलसाठी उपयुक्त
• टूलच्या गुणवत्तेचे संनियंत्रण आणि त्यातील सुधारणा प्रभावीपणे करता येऊ शकतात.
• सर्वसमावेशक दस्तऐवजीकरण आणि अहवाल वैशिष्ट्ये
• संभाव्य ग्राहकांना गुणवत्तेची हमी देण्यासाठी चांगले साधन म्हणून काम करते.
• सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि उत्कृष्ट विश्वासार्हतेसाठी जर्मनीमधील एकाच उत्पादन सुविधेद्वारे जागतिक मागणी पूर्ण केली जाते.

उदाहरण
ओरिएंट टूल्स कंपनीमध्ये हे उपकरण वापरले जाते. या कंपनीचे संचालक दीपक दास याच्या वापराविषयी बोलताना म्हणाले, "आम्ही पूर्वी प्रोफाइल प्रोजेक्टर आणि मायक्रोमीटरसारखी हातात पकडण्याची गेज वापरून मर्यादित संख्येच्या पॅरामीटरची तपासणी आणि मोजमाप करीत होतो. मात्र या कामासाठी आम्हाला वापरकर्त्याच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्याशिवाय यामधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये फरक, अचूक मोजले जाऊ शकतील अशा पॅरामीटरची संख्या तसेच प्रमाणित अहवाल आदींची समस्या उद्भवत होती. ही बाब क्षमतेपेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या टूलचे विश्लेषण आणि त्याच्या पॅरामीटरमध्ये निदर्शनास आलेल्या विसंगतीमुळे आमच्या लक्षात आली. या समस्येच्या निवारणासाठी आम्ही झोलर कंपनीशी संपर्क साधला तसेच आम्हाला उत्पादन प्रक्रियेत सातत्य निर्माण करण्यासाठी तपासणी अहवालांसह कार्बाइड टूलचे अचूक मोजमापन हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर आमच्या समस्येच्या निवारणासाठी संबंधित कंपनीने आम्हाला पारंपरिक उपकरणांऐवजी स्वयंचलित कॅमेरा आधारित स्माईलचेक तपासणी आणि मापन मशीन वापरण्याचा सल्ला दिला. यामुळे टूलची गुणवत्ता नियंत्रित करणे, विशिष्ट पॅरामीटरचे विश्लेषण करणे आणि नोंदी ठेवणे सहज शक्य झाले. त्याशिवाय वेगवान मोजमापन, अचूक निकाल, विश्लेषणाचा अहवाल, टूलच्या कामगिरीत सुधारणा, पुन्हा ग्राइंडिंग करण्यापूर्वी टूलची पूर्व-परीक्षा करणे सहज शक्य झाले."
अशाप्रकारे स्वयंचलित, स्पर्शरहित मापन उपकरणामुळे टूल निर्मितीमधील आवश्यक असलेल्या अचूकतेची खात्री केली जाते. झोलरची सर्व उपकरणे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सर्व वाचकांना मी आमच्या पुण्यातील कार्यालयाला भेट देण्याची विनंती करतो.
@@AUTHORINFO_V1@@