स्पिंडल ( Spindle )मध्ये ( Spindle ) काही अडचणी निर्माण झाल्यानंतर अनेक कंपन्या तो दुरुस्तीसाठी परदेशी कंपन्यांकडे पाठवितात. यासाठी वेळ आणि खर्च दोन्ही अधिक आहेत. या सर्व बाबींचा विचार करून कमी वेळात आणि कमी खर्चात प्रिसिजन मशीन क्राफ्ट प्रा. लि. कंपनीने केलेली सुधारणा या लेखात वाचावयास मिळेल.
प्रिसिजन मशीन क्राफ्ट प्रा. लि. (पी.एम.के.) या आमच्या कंपनीमध्ये 100 kW आणि 1,00,000 आर.पी.एम.पर्यंत वेग असलेले कार्ट्रिज स्पिंडल ( Spindle ) (बेल्ट ड्रिव्हन, गियर ड्रिव्हन आणि इंटिग्रेटेड मोटर ड्रिव्हन) तयार केले जातात. त्याशिवाय 5000 मिमी. व्यासापर्यंतचे प्रिसिजन सी.एन.सी. रोटरी टेबल/ स्वयंचलित पॅलेट चेंजरची आम्ही निर्मिती करतो. 180 मिमी. व्यासाचा आणि 6000 मिमी. C3/C5 वर्गलांबीपर्यंत (बॉल स्क्रूची लांबी) प्रिसिजन बॉल स्क्रू/रोलर स्क्रूचीदेखील आम्ही निर्मिती करतो.
आमच्या कंपनीमध्ये स्पिंडल ( Spindle ) हेड रीबिल्डिंगवर काम केले जाते. परदेशी मशीनच्या दुरुस्तीची कामे भारतीय लोक करू शकत नाहीत असा चुकीचा समज आपल्याकडे रुढ आहे. याच भावनेतून बहुतांशी उद्योजक आपल्या किंमती मशीनचा स्पिंडल ( Spindle ) दुरुस्तीसाठी परदेशी कंपन्यांकडे पाठवितात. स्पिंडल ( Spindle ) दुरुस्त होऊन तो कारखान्यामध्ये परत येण्याकरिता कमीतकमी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो. त्याशिवाय दुरुस्तीसाठी खूपच खर्च येतो. जास्तीचा पैसा आणि लागणारा अधिक वेळ या दोन्ही गोष्टी माहिती असूनदेखील केवळ 'उच्च गुणवत्तेचा परदेशी उत्पाद' अशा समजापोटी हा पर्याय स्वीकारला जातो.
काही दिवसांपूर्वी आमच्या एका ग्राहकाने त्यांच्या मशीनचा स्पिंडल ( Spindle ) हेड दुरुस्तीसाठी आमच्याकडे पाठविला. स्पिंडल ( Spindle ) हेडमधून आवाज येणे आणि झिजेमुळे गिअरच्या बॅकलॅशमधील वाढलेले अंतर, अशा दोन समस्या घेऊन हा स्पिंडल ( Spindle ) आमच्याकडे आला.
स्पिंडल ( Spindle )दुरुस्त करण्यामधील अडचणी आणि उपाय
1. स्पिंडल ( Spindle ) हेड उघडण्यापूर्वी आम्ही त्याच्या सर्व पॅरामीटरची उदाहरणार्थ, अॅक्षिअल प्ले, रेडियल प्ले, गिअर बॅकलॅश, क्लॅम्पिंग बल (फोर्स), गळती (लीकेज) तपासणी केली. स्पिंडल ( Spindle )च्या रनआउटमध्ये वाढ, नॉइजमध्ये वाढ अशा दोन समस्या आम्हाला प्राथमिक तपासणीमध्ये आढळल्या. त्यानंतर स्पिंडल ( Spindle ) पूर्ण उघडला. त्यामध्ये गिअरचा बॅकलॅश वाढल्याचे दिसले. त्याच्याव्यतिरिक्त स्पिंडल ( Spindle )च्या बेअरिंगदेखील खराब झालेल्या होत्या. या स्पिंडल ( Spindle )मध्ये नॉर्मल म्हणजेच सील नसलेल्या बेअरिंग होत्या. यंत्रणादरम्यान स्पिंडल ( Spindle )मध्ये शीतकाद्वारे (कुलंट) काही कचरा किंवा घाण गेली तरी बेअरिंगमध्ये त्याचा शिरकाव होणार नाही यासाठी सील्ड् बेअरिंग वापरले. यामुळे स्पिंडल ( Spindle )च्या आयुर्मानात वाढ होण्यास मदत होते. बेअरिंग बदलल्यामुळे आणि गिअर बॅकलॅश काढल्यामुळे स्पिंडल ( Spindle )मधील आवाज कमी झाला.
2. स्पिंडल दुरुस्तीसाठी आल्यानंतर त्याचे ड्रॉइंग मिळण्याबाबत अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे तो उघडण्यासाठी बराच वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून आम्ही स्पिंडल उघडण्यासाठी विशेष स्पॅनरचे डिझाइन करून त्याची निर्मिती करतो.
3. स्पिंडलचे सर्व भाग स्वच्छ करण्यासाठी क्लीनिंग टॅँकची व्यवस्था केली.
4. नियंत्रित तापमान असलेल्या खोलीमध्ये स्पिंडलच्या प्रत्येक भागाचे शाफ्ट, डिस्टन्स स्पेसर, हाउसिंग बोअर, लीब्रिंथ/सील, फ्रंट कव्हर (पॅरलॅलिटी), स्पिंडल नोज (टेपर) गुणवत्तेसाठी परीक्षण केले.
5. ब्लू मॅचसाठी शाफ्ट टेपर रीग्राइंड केला.
6. योग्य गणित करून स्पेसर तयार केल्याने गिअरमधील बॅकलॅश नाहीसा झाला.
7. अॅसेम्ब्लीसाठी प्रिसिजन बेअरिंगची निवड केल्यामुळे स्पिंडलच्या आयुर्मानात आणि अचूकतेत वाढ झाली.
8. तापमान नियंत्रित केलेल्या खोलीमध्ये स्पिंडलची काटेकोर (प्रिसिजन) जुळणी केली. यामुळे बोअर आणि मँड्रेल रनआउटच्या रीडिंगमध्ये फरक येत नाहीत.
9. स्थितिक (स्टॅटिक) आणि गतिक (डायनॅमिक) चाचण्या घेतल्या. त्यामध्ये शाफ्ट बॅलन्सिंग करून कंपने नाहीशी केली.
10. स्पिंडल ग्राहकाला सूपूर्द करण्यासाठी तयार करण्यात आला.
अंतिम परीक्षणाचे निकाल
1. टेपर नोजवर स्पिंडल रनआउटची तपासणी केली असता तो बोअरवर 0.002 मिमी. पेक्षा कमी आणि ड्रॉबारसह मँड्रेलवर 300 मिमी. लांबीवर 0.010 मिमी. असल्याचे आढळले.
2. ड्रॉ बार अॅसेम्ब्लीसह 350 मिमी. लांबीच्या मँड्रेलवर स्पिंडल रनआउट तपासला असता तो 0.015 मिमी. पेक्षा कमी असल्याचे आढळले. पूर्वी तो 0.1 मिमी. होता.
3. दुरुस्तीपूर्वी स्पिंडल टेपर नोज ब्लू मॅच 45 टक्के होता, दुरुस्तीनंतर तो 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळले.
4. कंपन (व्हायब्रेशन) तपासणी केली असता, 0.1 मिमी./सेंकदांपेक्षाही कमी असल्याची नोंद करण्यात आली.
5. 26° सें. तापमानाला स्पिंडल रन 2200 आर.पी.एम.पर्यंत स्थिर (स्टॅबिलाइझ) केला.
ग्राहकाला झालेले फायदे
• स्पिंडलच्या दुरुस्तीवर 1 वर्षाची वॉरंटी
• ग्राहकाला अतिशय कमी खर्चात कमीतकमी वेळात
(5-6 दिवसांत) स्पिंडल दुरुस्त करून मिळाला.