ऑईल संप : हवाबंद करणारे स्वयंचलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Dhatukam - Udyam Prakashan    04-Feb-2021   
Total Views |
एका मोठ्या कंपनीच्या चारचाकी गाड्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ऑईल संपसाठी केलेले हे स्वयंचलन आहे. ऑईल संप हा प्रेसिंग करून तयार केलेला भाग असल्यामुळे मशिनिंग केलेल्या एखाद्या उत्पादनासारखी याची मापे आणि पृष्ठभाग एकसमान नसतात. हे संप हवाबंद करण्यासाठी सिलिकॉनचे सीलंट्स वापरतात. हे सिलिकॉनचे सीलंट अत्यंत घट्ट असतात. त्यामुळे बंद करावयाच्या पृष्ठभागावर ते एकसारखे पसरवणे कठीण असते. तसेच हवेतील आर्द्रतेच्या संपर्कात आल्याबरोबर (क्युरिंगमुळे) ते कठीण होऊ लागतात. त्यामुळे विविक्षित वेळेमध्येच (डिस्पेन्सिंग नॉझल) ते पृष्ठभागावर (डिस्पेन्सिंग झाले की लगेच) अपेक्षित ठिकाणी बसावेच लागतात.

1_1  H x W: 0 x
पूर्वीची पद्धत
हे सर्व काम पूर्वी मॅन्युअली चालायचे. यामध्ये डिस्पेन्सिंग गन वापरून मॅन्युअली डिस्पेन्सिंग करण्यासाठी एका संपसाठी साधारण एक ते दीड मिनिट एवढा वेळ लागत होता. पृष्ठभाग एकसमान नसल्यामुळे विनाकारण जास्त सीलंट सोडले जायचे. त्यामुळे हवाबंद होण्याची प्रक्रिया होत होती, मात्र अतिरिक्त सीलंट बाहेर ओघळून आल्यामुळे क्लिष्ट काम झाले होते. परिणामी त्याची अपेक्षित एकसमान गुणवत्ता मिळत नव्हती.

52_1  H x W: 0
नवीन पद्धत
या समस्येचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, याच्यामध्ये ऑईल संप हा डिस्पेन्सिंगपूर्वी एका विविक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्यासाठी जागा (लोकेशन) असणारे फिक्श्चर तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ’रोबोद्वारे’ डिस्पेन्सिंग केले तर आपल्याला पाहिजे ती प्रोफाईल, त्याची वारंवारिता व्यवस्थित मिळू शकेल, असे लक्षात आले. त्यानंतर आपण योग्य प्रकारचे नॉझल आणि योग्य प्रकारचे डिस्पेन्सर इक्विपमेंट वापरून त्याच्या बीडचा (सीलंट पृष्ठभागावर पडल्यावर तयार होणारा आकार) आकार नियंत्रित करू शकू असे ठरले. योग्य प्रकारचे नॉझल आणि डिस्पेन्सर इक्विपमेंटमुळे प्रोफाईलचा उत्तम दर्जा मिळेल असे निश्चित झाले. प्रत्येक वेळेस बीडच्या आकारात सातत्य मिळाल्यामुळे सीलंटच्या वापरावर नियंत्रण मिळेल. ही सर्व प्रक्रिया ’रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाद्वारे केल्यामुळे अत्यंत वेगाने होऊ शकेल असे निष्पन्न झाले.
या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही त्या कंपोनंटचा अभ्यास केला आणि एक स्वयंचलित प्रक्रिया बनविली. त्यासाठी एक फिक्श्चर तयार केले, जेणेकरून तो कंपोनंट उलटा सुलटा बसणार नाही. या फिक्श्चरवर कंपोनंट ठेवून फक्त बटन दाबले की, यंत्रमानवी हात यायचा आणि पाहिजे त्या ठिकाणी संपूर्ण डिस्पेन्सिंग करून जायचा.

स्वयंचलनामुळे झालेले फायदे
1. डिस्पेन्सिंगच्या वेळी सारख्या प्रकारची बीड मिळाली. सारख्या प्रकारची बीड मिळणे हे आदर्श समजले जाते, कारण त्यामुळे ठराविक वजनाचे सीलंटच सर्व ठिकाणी असल्यामुळे सिलिंगची खात्री मिळू शकते.
2. मॅन्युअली काम करताना बीडचा आकार नियंत्रणात राहत नव्हता. गळती (लिकेज) टाळण्यासाठी जास्तीत जास्त बीड आकार ठेवला जायचा, मात्र या स्वयंचलनामुळे बीड आकारावरती आणि वापरावरती नियंत्रण राहू लागले.
3. सायकल टाईम एक ते दीड मिनिटांवरून 30 सेकंदावर
4. सीलंट वापराची प्रति संप सरासरी 30 ग्रॅमवरून 17 ग्रॅमपर्यंत खाली आली.
@@AUTHORINFO_V1@@